संभाव्याच्या अब्ज छटांतून
वर्तमान उजळतो कशाने?
कोण ठरविते? किंवा सारे,
यदृच्छयाच घडून जाते?
भूतभविष्यातील भासांचे
इंद्रजाल मायावी छेदून
काल-प्रवाहा स्तब्ध करोनी
ऐलपैल वर्तमान उरते
कालौघाची गाज अनाहत
चराचराला व्यापुनी उरते
"क्षण आत्ताचा क्षणजीवी नच"
क्षणोक्षणी वर्तमान म्हणते
प्रतिक्रिया
23 Sep 2021 - 6:52 pm | गॉडजिला
आवडली.
23 Sep 2021 - 7:47 pm | सतीश रावले
गाज हा शब्द मराठी आहे का?
16 Oct 2021 - 4:33 pm | इरसाल
छान आहे कविता.
सतीश "गाज" हा शब्द मराठी नाही त्यांनी गाजी चा काना वेलांटी खोडुन स्वतःच्या मनासारखा एक शब्द तयार केलाय.
16 Oct 2021 - 4:40 pm | प्राची अश्विनी
हो, समुद्राची गाज म्हणतात.
24 Sep 2021 - 4:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली
"क्षण आत्ताचा क्षणजीवी नच"
क्षणोक्षणी वर्तमान म्हणते
क्या बात है, सुंदर कल्पना,
पैजारबुवा,
25 Sep 2021 - 1:22 am | पाषाणभेद
विचार करायला लावणारी कविता.
16 Oct 2021 - 4:09 pm | अनन्त्_यात्री
सर्व कवितारसिकांना धन्यवाद!
16 Oct 2021 - 4:40 pm | प्राची अश्विनी
सुरेख.