कागदी गणेशमुर्ती आणि प्रदुषण

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
6 Sep 2021 - 2:54 pm

गणेश उत्सव म्हटलं की प्लॅस्टरऑफ पॅरिसच्या मुर्ती आणि पाणीप्रदुषणाची चर्चा सुरु होतेच. पर्यावरणवादी प्रदूषणाच्या नावाने बोंब सुरु करतात आणि त्याला तेव्हढेच जोरदार समर्थन उत्सववादी सुरु करतात. मागील कोरोनावर्ष सोडले हा शिमगा दरवर्षी सुरु असतो. काही स्वयंसेवी संघटनांनी मुर्तीदान चळवळ राबवली आणि पाण्याच्या प्रदुषणाचा काही प्रमाणात अटकाव केला. काही लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती वापर करून पर्यावरणाला आधारच दिला.

PGA01

काही लोकांनी कागदी गणेशमुर्ती तयार करून इकोफ्रेंडली गणेशोत्सव अश्या हाळ्या द्यायला सुरुवात केली. (एका पंथाने त्यांच्या अनुयायांकडून नामजपाच्या वह्या भरून घ्यायला सुरुवात केली आणि हाताने नामजप लिहिलेल्या वह्या परत जमा करून घेऊन त्याच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनवून " हा इकोफ्रेंडली गणेशोत्सव" असे सांगत अनुयायांना विकायला सुरुवात केली असे ऐकण्यात आले) या वर्षी पुण्याच्या हॅण्डमेड पेपर इन्स्टिट्यूटने व्यापारी तत्वावर आशय मूर्ती विक्रीसाठी बाजारात आणलेल्या आहेत. कागदी गणेशमुर्ती वजनाने हलक्या असल्यामुळे ९ इंचापेक्षा उंच मुर्ती घरगुती सजावटीत वापरता येतात त्यामुळे अश्या मुर्तीना ग्राहकांकडून पसंती मिळेल. कदाचित पुढे अशाच गणेशमुर्तीचा ट्रेण्ड येईल.

कागदी मुर्ती (अर्थात पेपर मॅशे (कागदी लगदा ९० % + माती १०% पासून बनवलेल्या) च्या विसर्जनासाठी "मुर्ती मोठ्या पात्रात पाणी घेऊन विसर्जित करा १०-१२ तासानंतर पात्रातील राहिलेला कागदी लगदा वाळवून जवळच्या रद्दी वाल्याला द्या जेणे करून पाणीप्रदूषण टाळलं जाईल"अश्या विल्हेवाटीच्या सूचना आहेत. यामुळे असं कुणी करत असेल असं वाटत नाही.

कागदी मुर्ती (अर्थात पेपर मॅशे (कागदी लगदा-९० % + माती - १०% पासून बनवलेल्या) पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घातकच आहेत. कागदी मुर्ती पाण्यात विसर्जित केल्यावर वर मिथेन नावाचा विषारी वायू तयार होतो. तो पाण्यातील जलचरांसाठी अत्यंत घातक असतो. कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे माशांच्या कल्ल्यात कागद अडकतो आणि ते मरतात. पाण्यातील ऑक्सिजन अल्प होऊन पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती मरतात. यामुळे कागदी मुर्ती पर्यावरणस्नेही नाहीत असे काही लोकांचे म्हणणे आहे. एकूण घनकचऱ्यापैकी २६% कचरा हा कागदी असतो आणि हा जमिनीत जिरवल्यास विषारी रंग, शाई आणि काही प्लास्टिक घटक जमिनीत मुरतात ज्यामुळे प्रदूषण होते. कागद रिसायकलिंग मुळे या प्रदूषणाचे प्रमाण कमी होते पण ते फारच थोड्या प्रमाणात. कागद रिसायकलिंग जास्त ऊर्जा खाऊन इतर प्रकारचे प्रदुषण करतेच.

PGA02

दिवसेंदिवस कागदाचा वाढता वापर पर्यावरणाच्या मुळाशी उठत आहे (एकूण कागद उत्पादनासाठी लागणारा ९३% लगदा वृक्षांपासून तयार केला जातो. एका ए४ मापाचा कागद तयार करण्यासाठी सुमारे १० लिटर पाणी लागते) कागद-रिसायकलिंगसाठी प्लास्टिक रिसायकलिंगपेक्षा जास्त ऊर्जा लागत असल्याने तो प्लास्टिकपेक्षा कमी पर्यावरणस्नेही आहे.

pga03

आम्ही इतकी वर्षे उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची स्थापना करत होतो. आणि उत्सव संपल्यावर मूर्ती मनपा तलावात विसर्जन करत होतो. मनपा कर्मचारी/ सेवक नंतर त्या विसर्जित मुर्ती पाण्यातून बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावायचे (म्हणजे नक्की काय करायचे माहीत नाही) आता गेल्या वर्षीपासून शाडूची मुर्ती स्थापित करतो आणि विसर्जनानंतर कुंडीत माती टाकतो.

मित्रांनो आपण कुठल्या प्रकारच्या गणेशमुर्तीची स्थापना करता ? कागदी मुर्ती मुळे प्रदुषण वाढते की कमी होते असे आपल्याला वाटते ? कागदी मुर्ती स्थापित करता का ? असाल तर त्या मूर्तीचे विसर्जन कसे करता ?

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

बबन ताम्बे's picture

6 Sep 2021 - 3:47 pm | बबन ताम्बे

एकंदरीत पर्यावरणस्नेही म्हणायचे आणि अजून घातक प्रदुषण करायचे याला काही अर्थ नाही.
मध्ये पेपरमध्ये फोटो आला होता.मनपा कर्मचार्‍यांनी गोळा केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींच्या तुकड्यांचा ढिगारा नदीच्या किनार्‍यावर टाकून दिला होता. काय उपयोग झाला मग मुर्ती गोळा करुन ?

चौथा कोनाडा's picture

6 Sep 2021 - 8:55 pm | चौथा कोनाडा

हो. .मनपा कर्मचारी गोळा केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींचं काय करतात हे अजून वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही. ५ वर्षांपुर्वी देखिल मुंबई मनपाने समुद्रात विसर्जनावर बंदी घालून किनार्‍यावर उभ्या केलेल्या हौदात मुर्ती विसर्जन करायला लावले होते. मापाने मोठ्या असलेल्या मुर्ती त्या तोक्ड्या हौदात नीट मावल्याच नव्हत्या. आणि एकदीड महिन्यानंतर त्या मुर्ती पुन्हा समुद्रातच ढकलून दिल्या. मुंबई मनपाची जगभर शोभा झाली.

अश्या मुर्तींचा योग्य तो वापर केलेलं वाचण्यात आलेलं नाही. मनपा पातळीवर याबद्दल काय विचार असतो कळत नाही.
महाराष्टाचे पेंग्वीनपर्यटन मंत्री यांची अश्या समस्यांबाबत कामगिरी उठून दिसत नाही !
(मागच्या वर्षी पर्यटन मंत्र्यांच्या पुढाकारातून मोटॉहोम नावाची कॅम्पर व्हॅन एमटीडीसी तर्फे पर्यटकांना भाड्याने देण्यासाठी विकत घेतली होती. पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सदरची व्हॅन विकत घेतली होती असे सांगितले गेले. व्हॅनचा पुढे काय "विकास" झाला ते कळले नाही ! )

खरंतर उत्तरपुजा झाल्यानंतर मुर्ती पुन्हा पार्थिव होते, त्यातले देवत्व संपून जाते तेंव्हा त्याची नियमित कचरा म्हणून नियमानुसार विल्हेवाट लावायला काय हरकत आहे. उलट बांधकाम साहित्य / इतर सामुग्री म्हणून याचा उत्तम उपयोग होऊ शकतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Sep 2021 - 4:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

कॅम्परचा विकास, पेंग्विन् चा विकास, आरे कॉलनीचा विकास, नाईट लाईफ चा विकास, मज्जाच मज्जा आहे.
नक्की विकास कोणाचा होतोय ते समजत नाहिये. जनतेच्या पैशाची मात्र सर्वपक्षीय उधळ्पट्टी चालु आहे.

प्रसाद गोडबोले's picture

6 Sep 2021 - 4:08 pm | प्रसाद गोडबोले

पर्यावरणाच्या दृष्टीने खर्‍या अर्थाने पुरक म्हणजे जे पारंपारिक पध्दतीने चालत आहे ते - अर्थात - पार्थिव - मातीची गणेशमुर्ती !

मी कळायला लागल्यापासुन केवळ शाडुची गणपतीची मुर्ती घेतो, तीही एकदम छोटी आणि घरीच विसर्जन करतो !

बाकी हे पर्यावरण्याच्या आडुन हिंदु परंपरांवर टीका करणारे महाभाग हे बहुतांश गट क्रमांक २ - अर्थात ज्यांना प्राची हिंदु परंपरांचा इतिहासच नाहीये , आणि त्यामुळे हिंदु धर्माविषयी आदरच नाहीये असे लोकं आहेत ! उलट हिंदु धर्माविषयी तिरस्कार अन घृणाच आहे त्यांचा मनात. मागे धार्मिक उत्सव पर्यावरण पुरक करावेत म्हणुन मातीचा बकरा मोहीम चालवलेली होती त्यावेळेस हमीदमियांनी काय अप्रतिम पलटी मारली होती आठवा !

असो . अशा लोकांच्या मतांना विशेष महत्व द्यायचे कारण नाही ! आपले सण उत्सव शुध्द स्वरुपात साजरे केले तर कोठेच पर्यावरणाला हानी पोहचवणारे नाहीत ! त्यामुळे आनंदाने आणि उत्साहाने साजरे करु , कोणत्याही बुध्दीभेदाला बळी न पडता ! त्या लोकांना करायचा तो कांगावा करु दे ! ह्या संदर्भात तुकोबांचा एक सुंदर अभंग आहे :

भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥
भाविकांनीं दुर्जनाचें । मानूं नये कांहीं साचें ॥ध्रु.॥
होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥
तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥३॥

सरनौबत's picture

6 Sep 2021 - 4:51 pm | सरनौबत

उत्तम आणि समर्पक लेख. आम्ही आमच्या मंडळाची धातूची मूर्ती बनवून घेतली आहे पाच वर्षांपूर्वी. सुपारीचे विसर्जन करतो

सोत्रि's picture

6 Sep 2021 - 5:39 pm | सोत्रि

_/\_

- (नतमस्तक झालेला) सोकाजी

Bhakti's picture

6 Sep 2021 - 5:56 pm | Bhakti

हो हो,हेच म्हणायचं होती, घरीसुद्धा धातूची मूर्ती बसवण्यासाठी येत्या काही वर्षांत घरच्यांच मन वळवणार आहे.बघू या!

प्रसाद गोडबोले's picture

6 Sep 2021 - 9:59 pm | प्रसाद गोडबोले

धातूची मूर्ती पर्यावरण पुरक नाही. कोणत्याही धातुचे उत्खनन करताना निसर्गाची प्रचंड म्हणजे प्रचंड हानी होत असते. आणि बहुतांश वेळा हा सगळा प्रकार इल्लीगलीच चालु असतो. इल्लीगल मायनिंग मुळे कोकणात निसर्गाचे निकसान झाले आहे ह्यावर "रानमाणुस " ह्या युट्युबर ने बनवलेला व्हिडीओ आवर्जुन पहाण्यासारखी आहे.

आणि नुसते ओअर ( खनिज ) काढल्याने काम संपत नाही, त्याच्या शुध्दतेसाठी प्रचंड प्रोससिंग होत असते, स्मेल्टिंग वर किती उर्जा खर्च होत असेल काहीच हिशोब नाही.
बाकी बहुतांश मुर्ती तांब्याचा / पितळ्याचा असतात. जुन्या इलेक्ट्रिक वायर आणि रबरी टायर मधुन तांबे काढण्यासाठी ते पेटवले जाते हे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिले आहे !

सो नेट नेट सारांश म्हणजे - धातुची मुर्ती हा दृष्टी आड सृष्टी टाईप चा प्रकार आहे. (लोकं अगदी हिरीरीने इलेक्ट्रिक वाहनांचे समर्थन करतात , पण त्यांना माहीत नसते की ती इलेक्ट्रिसिटी ही ७०-८०% वेळा कोळसा जाळुन नाहीतर धरणे बांधुन बनवलेली असते ! हे तसे काहीसे आहे .) टेक्नॉलॉजीवर अवलंबुन कोणतीही गोष्ट पर्यावरण पुरक असण्याची शक्यता जवळ जवळ शुन्य आहे.

मातीची मुर्ती हाच पर्यावरणपुरक उपाय आहे.

अन्य शहरांचे माहीत नाही , पण चिंचवड मध्ये मोरया गणपती मंदिराजवळ संपुर्ण शाडुची मुर्ती आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली मिळते !
तेही " किंमत नाही, तुमची इच्छा असेल तितकी देणगी द्या , तीही पेटीत टाका , आमच्या हातात नको " ह्या तत्वावर मिळते , ह्या पेक्षा जास्त अजुन काय हवं !

आय रियली मिस चिंचवड अ लॉट !

Bhakti's picture

7 Sep 2021 - 6:40 am | Bhakti

ओह,
समस्या निराकरण प्रतिसाद _/\_

पण परंपरा पाळणारे भाविक लोक अधिक आहेत. शिवाय वीस टक्के कुटुंबे तिकडे वळली तरी मग गणेश मूर्तीकारांचे काय? सगळाच घोळ आहे.

म्हणजे हात सुटे नसतात. एका साच्यात मातीचा गोळा दाबून बाहेर काढल्यावर एक उठावदार एकसंध मूर्ती मिळते. त्या मूर्तीला रंगवलेलं असतं. पण आपण जर त्यास लाल/पिवळा गेरू लावून रंगवलं तर अगदी स्वस्तात पर्यावरणी मूर्ती तयार होईल. मग ती विसर्जन म्हणजे फक्त पाण्यात ठेवली की माती होईल. पण हे पटलं पाहिजे भाविकांना.

चौथा कोनाडा's picture

7 Sep 2021 - 2:26 pm | चौथा कोनाडा

आपल्याही इथे ज्या लालमातीच्या किंवा शाडूमातीच्या मुर्ती तयार करतात त्याही साच्यामधून तयार करून रंगवलेल्या असतात !

ज्येष्ठ शिल्पकार कृष्णा पाटील यांचा शाडूमातीच्या गणेशमुर्तींचा कारखाना, अगदी पाहण्यासारखे !

गॉडजिला's picture

7 Sep 2021 - 5:21 am | गॉडजिला

पण ते फार हानिकारक वगैरे अजिबात नसावे. वर्षभर कोणी विसर्जन करत नाही. दहा दिवसात काही प्रदुषण झालेच तर असे नेमके काय बिघडणार आहे ? मला विसर्जन क्रुत्रिम हौदात करणे ही बाब सर्वात कृत्रीम फिलिंग देते.

बकाल शहरे वसवायची आणी राग विसर्जनावर ? तुम्हाला पैशासाठि ओवर क्राऊडेड शहरात गुदमरताना फार फरक पडत नाही अन विसर्जनाच्या प्रदुषणाने तुमच्या तब्येती बिघडतात काय ?

ते म्हणजे त्रिकालाबाधित सत्यच असते अशी समजूत नसेल तर फार नाही पण वीस वर्षांनी आपलाच प्रतिसाद परत वाचा. मूर्ती वाहत्या पाण्यात म्हणजे नदीतच विसर्जित करायची या अट्टाहासाने मोठ्या शहरात निदान ७५ ते १०० टन मातीची भर आपण टाकत असू. सजावट, रोषणाई या निमित्ताने होणारे प्रदूषण वेगळेच.

वीस वर्षांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण कोणते जग निर्माण केले आहे आणि काय प्रकारचा उन्माद दाखवला आहे याची किंचित जरी जाणीव झाली तरी या प्रतिसादाचा उद्देश सफल झाला असे वाटेल.

गॉडजिला's picture

7 Sep 2021 - 11:31 am | गॉडजिला

आपण प्रत्येक वेळेला बोलतो, लिहितो ते म्हणजे त्रिकालाबाधित सत्यच असते

हे हे हे माझी अशी समजूत आहे अशी तुमची समजूत झाली असेल तर मेरेकू भुत मजा आया... आपकी समजूत ऐसीच कायम रहे.. असो...

वीस वर्षांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण कोणते जग निर्माण केले आहे आणि काय प्रकारचा उन्माद दाखवला आहे याची किंचित जरी जाणीव झाली तरी या प्रतिसादाचा उद्देश सफल झाला असे वाटेल.

मग बसवू नका गणपती शहरात, किंव्हा गावी निघून जावा ना ? तुम्हाला बकाल शहरात पैशासाठी जगताना वाईट वाटत नाही पण गणपतीचे प्रदुषन त्रासदायक वाटते ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Sep 2021 - 3:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

नुसती भावनिक आवहाने करुन पर्यावरण रक्षण होणार नाही, नद्या नाले फक्त गणेशमुर्तींमुळेच प्रदूषित होत नाहीत, आमची मुठा नदी वर्षातले ३६५ दिवस दुर्गंधी युक्त पाण्याने भरुन वहात असते. त्यावर तातडीने उपाय करण्याची आवष्यकता आहे. रोज तयार होणारा दुध पिशव्या, पाण्याच्या आणि शितपेयांच्या बाटल्यांचा ढिगारा, प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा मुक्त वापर (हल्ली तर टपरीवाला सुध्दा प्लॅस्टीकच्या पिशवीत चहा बांधुन देतो.) औद्योगीक प्रदुषण हा तर एक वेगळाच विषय आहे. या वर कोणतेही भरीव काम होताना दिसत नाही. पण गणेशोत्सव आला की मात्र पर्यावरण स्नेही गणेशमुर्तींच्या चर्चेला उधाण येते आणि बाप्पाच्या विसर्जनाबरोबर या विषयाचेही विसर्जन होते.

पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2021 - 1:28 pm | चौथा कोनाडा

खारे आहे पैजारबुवा.
मुठा नदीची अवस्था भीषण आहे.
पुण्याच्या कारभार्‍यांनी स्मार्ट सिटीचा निधी (मलिदा खाण्यासाठी) फक्त फुटपाथ बांधण्यासाठी आणि फुकाचे तकलादू सुशिभिकरण करण्यासाठी वापरलाय.
नदी परिसर किंवा शहर स्वच्छतेच्या नावांने बोंब आहे. नेहमीचे कारभारी कमळग्रस्त होऊन पुन्हा निवडुन आलेत. मेण्टॅलिटी जुनीच "गुंठामंत्री" छाप आहे !

गॉडजिला's picture

8 Sep 2021 - 2:45 pm | गॉडजिला

पुण्याचं पुणेपण फक्त कलमाडीच खर्‍या अर्थाने खुलवु शकले…

गेल्या काही वर्षांपासून आम्ही शाडू मातीपासून तयार मुर्ती ची प्रतिष्ठापना करीत असतो. मागील वर्षी घरीच छानसे विसर्जन केले. माती तीन दिवसांनी कुंड्यात टाकली. पण काही महिने झाले तरी शाडू माती कुंडीतील मातीत मिसळत नव्हती.

गेल्या काही वर्षांपासून आम्ही शाडू मातीपासून तयार मुर्ती ची प्रतिष्ठापना करीत असतो. मागील वर्षी घरीच छानसे विसर्जन केले. माती तीन दिवसांनी कुंड्यात टाकली. पण काही महिने झाले तरी शाडू माती कुंडीतील मातीत मिसळत नव्हती.

गॉडजिला's picture

7 Sep 2021 - 7:46 pm | गॉडजिला

पणं लहानपणीच बहुतेक शाळेतच गणपती मातीचा हवा, शाडूचा नको, POP तर अजिबातच नको कारणं पाण्यावर तरंगतो असे स्पष्ट बजावले होते.

चौथा कोनाडा's picture

7 Sep 2021 - 8:05 pm | चौथा कोनाडा

माझ्या माहितीनुसार शाडूमाती नैसर्गिक असली तरी ती कुंड्यांना, रोपट्यांना उपयोगाची नाही.
लहानपणी शाडूमाती आणायला ५ किमि गावाबाहेर जायला लागायचे, तिथे लहान लहान डोंगर होते शाडूमातीचे. आजुबाजुस कसलीच रोपटी नन्व्हती.

शलभ's picture

8 Sep 2021 - 7:38 pm | शलभ

+१
त्या मातीला वास पण येतो. ह्यावेळी मातीची मुर्ती घेणार आहे.

सुबोध खरे's picture

7 Sep 2021 - 8:01 pm | सुबोध खरे

वर्षात एकदा गणेश मूर्तीचे विसर्जन करताना लोकांना फक्त पर्यावरण आठवते.

आपण रोजच्या रोज आपण कोपऱ्यावर दूध आणायला जाताना सुद्धा "ऍक्टिव्हाला स्टार्टर" मारूनच जातो,

मित्राशी गप्पा मारत असताना इंजिन तसेच चालू ठेवतो. (डिझेल इंजिनच्या गाडीचे ड्रायव्हर तर कधीच इंजिन बंद करत नाहीत मग अगदी दहा पंधरा मिनिटे सुद्धा चालू राहिले तरी. हि "ट्रक ड्रायव्हरची" मनोवृत्ती उत्तम दर्जाच्या गाडीच्या मालकांमध्ये पण का असते हे कोडे मला उलगडलेले नाही)

बाहेर हवा थंड असली तरी काचा काही खाली करत नाही त्या ऐवजी ए सी चालूच ठेवतो.

वाटेल तिथे पार्क केल्यामुळे त्या ठिकाणी रहदारी हळू झाल्याने होणारे हवेचे प्रचंड प्रदूषण आपल्याला दिसतच नाही.

घरचा ए सी २३-२४ अंशाएवजी १८ अंशला ठेवून भरपूर वीज खर्च करतो आणि थंडी वाजते म्हणून जाड पांघरूण घेतो.

टूथपेस्ट/शाम्पू/केचपच्या बाटलीत मध्ये दोन दिवस पुरेल एवढी पेस्ट/शाम्पू/केचप असताना ती कचऱ्यात टाकतो.

आणि तीच पेस्ट पिळून घेणाऱ्या "जोशी काकां"ना नावे ठेवणारे विनोद व्हॉट्स ऍप वर हिरीरीने पुढे पाठवतो.

दुधाची प्लॅस्टिकची पिशवी तशीच कचऱ्यात टाकतो.

भाजी घ्यायला जाणार असतानाही कापडी पिशवी घेऊन जात नाही पण भय्याला भेंडी आणि फरसबी साठी दोन वेगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या द्यायला सांगतो.

स्वतःच्या मोटारीने जाणार असलो तरी घरून गार पाणी न नेता हॉटेलात बिसलेरी मागवतो.

अशा अनेक गोष्टी आहेत.

आपण सारे दांभिक आहोत.

आपण बटर चिकन, शाही पनीर बटर मसाला खाणार आणि कॅलरी कॉन्शस म्हणून डाएट पेप्सी पितो.

शेवटी एक फार महत्त्वाची गोष्ट मी तटरक्षक दलाच्या प्रदूषण नियंत्रण कक्षात काम करत असताना शिकलो.

No such thing as pollution, only resources in the wrong place

प्रदूषण म्हणजे चुकीच्या ठिकाणी असलेली साधन सामग्री

ज्या गोष्टी आपल्याला परत परत वापरता येतील अशाच गोष्टी वापरायला आपल्या मुलांना शिकवा.

केवळ पैसे मिळतात म्हणून ते खर्च करणे हा आमचा हक्कच आहे. विजेचे बिल भरण्याची आमची ऐपत आहे तेंव्हा सगळ्या खोल्यात विजेचे दिवे पंखे किंवा वातानुकूलन यंत्रे चालू ठेवली तर काय जाते?

प्रत्येक युनिट वीज निर्मिती साठी आपण किती कोळसा किंवा तेल जाळून प्रदूषण करत आहोत याचे भानच नाही.

https://blog.arcadia.com/15-key-facts-statistics-power-plant-pollution/

Electricity production (25 percent of 2019 greenhouse gas emissions)

पर्यावरण सारख्या गोष्टी पंच तारांकित हॉटेलात कॉन्फरन्स मध्ये डिस्पोसजेबल ग्लासात बिसलेरीचे पाणी पिऊन डिस्कस करण्याच्या गोष्टी आहेत

हा दांभिकपणा आहे हे आपल्या मुलांना समजवा.

तरीही मी म्हणेन कि गणेश मूर्ती धातूची असेल आणि ती दर वर्षी विसर्जित न केल्यास आपण आपल्या तर्फे फुलाच्या पाकळी इतके पर्यावरण रक्षणास हातभार लावू शकू. (मूर्तीच्या माती पेक्षा त्यावर लावलेले कृत्रिम रंग हे जास्त प्रदूषण करतात)

पहिल्या शाडो च्या मातीच्याच मुर्त्या बनत असतं .मातीच असल्या मुळे ती पर्यावरणात मिसळून जाते काहीच प्रदूषण होण्याचा प्रश्न नाही अगदी तलाव, नदी मध्ये विसर्जन केले येतो पाण्यातील जीव सृष्टी ला काहीच धोका नाही फक्त गाळ जमा होतो तो पण वाहत्या पाण्यात नाही .
बाकी कोणतेच नुकसान नाही.
मुर्त्या च आकार जसा जसा मोठा होत गेला तसे pop च्या मुर्त्या बनू लागल्या .कारण त्या तुटण्याची शक्यता खूप च कमी असते.
पण pop लवकर पाण्यात विरघळत नाही .आणि अनेक हानिकारक घटक निर्माण करतं असावे.
माझ्या कडे मातीचीच मूर्ती असते.आणि आकार पण जास्त मोठा नसतो.
गेल्या 2 वर्ष पासून इमारतीच्या टेरेस वर च विसर्जन करतो आणि विरघळले लि माती दुसऱ्या दिवशी झाडांना टाकली जाते.

जगात प्रदूषण जे निर्माण त्या मध्ये गणेश विसर्जन मुळे होणारे प्रदुषण अत्यंत नगण्य आहे.उगाचच हिंदू द्वेष करणारे पुरोगामी कालवा करत असतात.
त्यांच्या दुर्लक्ष करणे हेच उत्तम.

सुरिया's picture

7 Sep 2021 - 8:50 pm | सुरिया

प्रॉब्लेम मूर्ती हा नाही तर त्याचे विसर्जन हा आहे. विसर्जनाची डेफिनेशन व्यवस्थित समजून घेता आली पैजे.
तसे घरातही बांधकामात जिप्सम प्लास्टर फुल्ल वापरले जातेच की. पण ते विसर्जन करावे लागत नाही.
आपल्या देशात निम्म्याच्यावर जिप्सम अरब अमिरातीतून इंपोर्ट होते हि मज्जेची बाब. तेंव्हा हा आपल्या मातीतला गणेश असे म्हणावे का? ;)

Rajesh188's picture

7 Sep 2021 - 9:04 pm | Rajesh188

तुमच्या मता शी सहमत आहे प्रश्न हा विसर्जन च आहे तो कृत्रिम तलाव निर्माण करून सोडवता येईल .
पण चक्र पूर्ण होताना म्हणजे कृत्रिम तलाव,डम्पिंग ग्राउंड,प्रदूषण .
मुर्त्या ह्या मातीच्याच असाव्यात ह्या वर मी तरी ठाम आहे.
पण राई चा पर्वत करणाऱ्या ,हिंदू समाजाच्या सण ना अती तीव्र विरोध करणारे.
लोकांना पण माझा विरोध आहे.
आता corona मुळे शरीराची प्रतिकार शक्ती अती प्रमाणात कार्यरत झाल्या मुळे तिने शरीरातील पेशींवर च हल्ला केला आणि माणसं त्या मुळे मृत्यू मुखी पडली.
तसे हे हिंदू परंपरा, सण ह्यांना विरोध करणारे आहेत.
प्रमाण पेक्षा जास्त react होत असतात.
त्यांना विरोध आहेच.

गॉडजिला's picture

7 Sep 2021 - 9:06 pm | गॉडजिला

आता corona मुळे शरीराची प्रतिकार शक्ती अती प्रमाणात कार्यरत झाल्या मुळे तिने शरीरातील पेशींवर च हल्ला केला आणि माणसं त्या मुळे मृत्यू मुखी पडली.

कहर ...

सुक्या's picture

8 Sep 2021 - 12:14 am | सुक्या

गणपती --> शाडु ची मुर्ती --> प्रदुषण --> (डायरेक्ट) कोरोना

जबर्दस्त ... टॅलंट म्हणावं तर असं ...

आणि माझ्या टॅलेंट चे लोकं कौतुकही करतं ते ऐकून मी भलताच शेफारून जात असे मला आसमान ठेंगणे व्हायचे

वामन देशमुख's picture

9 Sep 2021 - 2:21 pm | वामन देशमुख

मी तिसरीत होतो तेंव्हां माझ्याकडे हे होतं

जबर्दस्त ... टॅलंट

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2021 - 1:23 pm | चौथा कोनाडा

प्रॉब्लेम मूर्ती हा नाही तर त्याचे विसर्जन हा आहे.

खरं आहे सुरिया. मग मुर्ती मातीची असो अथवा प्लाऑपॅची असो. आणि अर्थातच मातीला प्राधान्य द्यायला हवे.
प्लाऑपॅ काय किंवा जिप्सम प्लास्टर दोन्ही प्रक्रिया करुन पुनर्वापर करणे वेळखाऊ आणि खर्चिक आहे. याच्या प्रक्रिया नीटपणे रुळलेल्या नाहीत !

कासव's picture

8 Sep 2021 - 12:34 am | कासव

मी गेल्या २ वर्षा पासून गणेश मूर्ती स्वतः घरी बनवतो. १० centimetres chi असते रंग ही बाजारातल्या मूर्ती सारखे उठावदार नसता पण स्वतः केल्यामुळे समाधान मिळते.
मला ह्याची आवड आहे आणि २-३ वर्षापूर्वी एक DIY kit मिळालं होत. मूर्ती ही मतीचीच असावी. कागद धातू आणि अन्य प्रकारची नसावी. मूर्ती सुबक नसेल तरी चालेल पण स्वतः केल्याचं समाधान वेगळच असतं.

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2021 - 1:17 pm | चौथा कोनाडा

मी गेल्या २ वर्षा पासून गणेश मूर्ती स्वतः घरी बनवतो.

व्वा मस्तच ! प्रचि टाका की एखादं.
याचा वेगळा धागा (विथ प्रचि / व्हिडो) काढला तर बेष्टच !

हाही उपाय काही ठिकाणी उदयास येतोय.
गोमय गणेशमूर्ती... सकाळी टीव्हीवर बातमी पाहून जरा अचंबित झाले होते.नेहमीप्रमाणे टीव्हीवर तोकडी माहिती दिली.इथे थोडी अधिक प्रोसेस समजावली आहे.
https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/now-the-demand-for-ec...

चौथा कोनाडा's picture

9 Sep 2021 - 1:40 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप छान पर्यात दिसतो आहे.
माझ्या ओळखीच्या कुणी अजून अशी गोमय मुर्ती बसवल्याचे ऐकले नाही !

सुबोध खरे's picture

9 Sep 2021 - 6:48 pm | सुबोध खरे

मुळात मुद्दा मूर्तीसाठी वापरलेला कच्चा माल कोणता आहे हा आहे.

त्यात शाडूची माती वापरली किंवा शेण वापरले तरी त्यावर लावलेले रंग कशाचे असतात हे फार महत्त्वाचे आहे .

भारतात दर वर्षी साधारण १ लाख मूर्ती विसर्जित होतात.

उदा शेंदूर हे शिशाचे ऑक्साईड. इतर रंगासाठी क्रोमियम निकेल पारा अर्सेनिक सारखे धातूचे रंग वापरले जातात.

हे पाण्यात विरघळून पाणी प्रचंड प्रमाणात दूषित करतात. त्यातून या गल्लीचा राजा, त्या बोळाचा राजा सारख्या १५ फूट २० फूट २५ फूट मूर्ती तयार केल्या जातात आणि त्या विसर्जित केल्या जातात. त्यांच्या बरोबर आपण निर्माल्य पाण्यातच विसर्जित करण्याचा आग्रह धरतो.

यामुळे पाण्यातील सेंद्रिय पदार्थांची टक्केवारी प्रचंड प्रमाणात वाढते यात जर शेणाची मूर्ती असेल तर ते पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित होईल. गाईचे शेण हे शुद्ध असते हे मानणारे अनेक लोक आहेत परंतु शास्त्रीय सत्य त्यापासून मैलोन्मैल लांब आहे.

हवे तेवढे साहित्य जालावर उपलब्ध आहे.

चौथा कोनाडा's picture

9 Sep 2021 - 8:55 pm | चौथा कोनाडा

रंगांमुळे होणारे प्रदुषण हा महत्वाचा मुद्दा अधोरेखित केलात सुबोधजी ! +१

नैसर्गिक रंग ,मी फक्त सहजच मागच्या वर्षी​ गुलबक्षी आणि गोकर्ण फुले पाण्यात उकळून अर्क तयार केला होता.खुप दिवसांपासून हा प्रकल्प डोक्यात आहे.अभ्यास करावा लागेल यावर.

अनिंद्य's picture

8 Sep 2021 - 4:39 pm | अनिंद्य

@ चौथा कोनाडा,

समयोचित लेख.

माझ्यामते सर्वोत्तम ती मानसपूजा. पण त्यात उत्सवप्रिय परिवारजनांचे समाधान होणे नाही.

तस्मात चिक्कणमाती, टेराकोटा चांगले पर्याय आहेत, मूळच्याच रंगात सुंदर दिसतात आणि (त्यातल्या त्यात) पर्यावरणस्नेही.

मागच्यावर्षी कन्येचा टेराकोटा 'गंपू' :-)

रेशमी कापडाची + बागेतली फुले यांची पर्यावरणस्नेही आरास.

Bhakti's picture

8 Sep 2021 - 4:54 pm | Bhakti

सुंदर!

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Sep 2021 - 8:12 am | ज्ञानोबाचे पैजार

फारच सुरेख मुर्ती, गोजिरवाणी दिसते आहे, लैच आवडली,
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

9 Sep 2021 - 9:12 am | प्रचेतस

काय सुरेख मूर्ती आहे.

चौथा कोनाडा's picture

9 Sep 2021 - 1:38 pm | चौथा कोनाडा

व्वा अनिंद्य, कसला क्युट आहे पिटूकला बाप्पा ! सजावटही मनमोहक !

💖

आता हे टेरीकोट्टा म्हंजे लालमातीची मुर्ती बनवुन ज्वालेत भाजलेली ना ? हे बायोडिग्रेडेबल नसते ना ? मातीत मिसळायला किती वर्षे लागतात ?

सुरिया's picture

9 Sep 2021 - 3:05 pm | सुरिया

मातीत मिसळायला किती वर्षे लागतात ?

मोहेन्जोदडो हडप्प्पा ची खापरे अन विटा अजून सापडतात ह्यावरुन विचार करा. ;)
.
पध्धतशीर भाजलेली माती(टेराकोटा) हे जगातील सर्वात टिकाऊ मटेरिअल आहे.

'त्यातल्या त्यात' वाचले नाही का ? ;-)

चौथा कोनाडा's picture

9 Sep 2021 - 8:52 pm | चौथा कोनाडा

अर्रर्र .... आत्ता वाचला (कंसात लिहिलंय ना) ;-)
बा़की हे खरंय की याचे मटेरियल निसर्गातून काढायला काही रासायनिक प्रक्रिया करावी लागत नाहीत, आणि टेरीकोट्टा खापरं निसर्गात टाकली तरी (बहुधा) घातक नसावीत

आजानुकर्ण's picture

9 Sep 2021 - 8:55 pm | आजानुकर्ण

सुंदर मूर्ती. कशी बनवली? अधिक माहिती मिळेल का?
मी चिकणमाती वापरून घरी बनवतो. डोळे हा सगळ्यात अवघड प्रकार.
ही मागच्या वर्षीची मूर्ती.
गणेश

ही या वर्षीची - जरा सुधारणा दिसते आहे.
गणेश

आपला
(फुरोगामी, सिक्युलर, पर्यावरणवादी, गणेशप्रेमी) आजानुकर्ण

चौथा कोनाडा's picture

9 Sep 2021 - 9:04 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुपच सुरेख ! रंगसंगती छानच जमलीय !
🌷

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 9:08 am | कुमार१

फारच सुरेख मूर्ती.

मूर्तीची स्थापनाच न करणे हा पर्याय कुणीच निवडलेला दिसत नाही :)

सुबोध खरे's picture

9 Sep 2021 - 6:35 pm | सुबोध खरे

या न्यायाने पांढरेच कपडे घालायला हवेत किंवा चामड्याच्या चपला सुद्धा घालायला नकोत.

कपड्याचा रंग किंवा चामड्याच्या उत्पादनात किती तर्हेची रसायने वापरली जातात आणि ती पाण्यात मिसळून किती प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते याचा विचार व्हावा.

Leather industry is one of the most polluting industries.
Environmental Problems Caused By Leather Processing Units.

बाकी चामडं नैसर्गिक/ ऑरगॅनिक असतं इ इ पण चालू द्या.

प्रसाद गोडबोले's picture

10 Sep 2021 - 10:38 am | प्रसाद गोडबोले

मूर्तीची स्थापनाच न करणे हा पर्याय कुणीच निवडलेला दिसत नाही :)

सुचना उत्तम आहे पण , मी अन्यत्र म्हणल्याप्रमाणे - आजचा हिंदु धर्म हा सनातन वैदिक धर्म , बौध्द धर्म आणि जैन धर्म ह्या ट्रिनिटीचे, ह्या तीन धर्मातील परंपरांचे कॉन्व्हेक्स काँबिनेशन आहे .

मुळ सनातन धर्मात मुर्तीपुजाच नाही . खुद्द समर्थ म्हणाले आहेत -

"अरे जो जालाचि नाही | त्याची वार्ता पुससी काई | परंतु सांगो जेणे काही | संशय नुरे ||"

किंव्वा

"जयासी लटिका आळ आला | जो माया गौरी पासोनी जाला | जालाचि नाही तया अरुपाला | रूप कैचे || श्रीराम || "

मुळात शिव शक्ती असे द्वैतच नाही , ते एकच आहेत तर मग माया गौरी पासुन गणपतीचा जन्म झाला असे म्हणणेच लटिका आळ आहे , तो जालाच नाही , तो नित्यच आहे! मुर्ती स्थापन करणे , विसर्जन करणे ह्या सगळ्या गोष्टी जीवनमुक्ताच्या नजरेतुन पाहिल्यातर अगदीच निरर्थक आहेत !

तस्मात मुर्ती स्थापन च न करणे हे कोणताही पुर्णावस्थेतील सिध्दासाठी अगदीच स्विकारार्ह सुचना आहे ! (अवांतरः आमच्या गावी , घरी बाबा गणेशमुर्तीची स्थापना करत नाहीत. )

पण
महावीरांनी सांगितलं - वस्त्रांचा त्याग करा , ह्या उपदेशाचे भौतिक जगात सर्वांनाच अनुकरण करणे शक्य आहे का ? म्हणुन मग पर्याय म्हणुन केवळ पांढरी वस्त्रे घालणे ! किंव्वा भगवान बुध्दांनी कुठेही सांगितले का की माझी उपासना करा ? केवळ सम्यक बुध्दीने मोक्ष प्राप्ती होते पण हे सगळ्यांना जमणारे आहे का ? म्हणुन मातीचे ढिगारे करणे अन त्याच्या भोवती प्रदक्षिणा वगैरे घालणे हे सारे सव्यापसव्य करावे लागतात.

तसेच काहीसे हे देखील आहे .

"नातुडे मुख्य परमात्मा | म्हणोनी करावी लागे प्रतिमा | "

सगळेच धप्पकन नुसत्या चिंतनाने सिध्दावस्थेला प्राप्त होणे अशक्य आहे , साधना हवीच अन साधनेसाठी अनुष्ठान हवेच ! ह्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी खुप रसाळ शब्दात विवेचन केले आहे :

देखैं उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा ।
सांगैं नरु केवीं तैसा । पावे वेगा ? ॥
तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे ।
तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥
कीं प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्य होईजे ।
हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें

म्हणौनि आईकें पार्था । जयां नैष्कर्म्यपदीं आस्था ।
तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥

तस्मात , जोवर शिवशक्तीशी आपली एकरुपता होत नाही तोवर गणेशाची स्थापना करुन चिंतनाने हळुहळु त्या स्थितीकडे जाणे हाच योग्य मार्ग आहे !
http://www.misalpav.com/node/28790

अशारीतीने मुर्ती स्थापन करायची गरजच नाही ह्या शंकेचे निराकरण झाले !

इत्यलम !

||गणपती बप्पा मोरया||

गॉडजिला's picture

10 Sep 2021 - 10:11 pm | गॉडजिला

कुणीच न निवडलेला पर्याय का निवडला गेला नाही हे सर्वांना उत्तम समजले.

_/\_

गॉडजिला's picture

10 Sep 2021 - 10:14 pm | गॉडजिला

कोणाची शिवशक्तीशी एकरुपता झालेली नाही हे स्पश्ट होते हा भाग कितीही दुखद असला तरीही... आपण संतांचे म्हणने योग्यपणे लोकांपर्यंत पोचवले आहे.

प्रसाद गोडबोले's picture

11 Sep 2021 - 10:20 pm | प्रसाद गोडबोले

आपण गट क्रमांक २ मधील असुन शिवशक्ती ऐक्य वगैरे बाबींबर टिप्पण्णी करताय हीच आमच्यासाठी खुप मोठ्ठी आश्चर्याची अन कौतुकाची बाब आहे !

आपले ह्या इथले प्रतिसाद म्हणजे गट क्रमांक १ / २ मधील तळ्यात मळ्यात चाललंय की अन्यत्र तुम्हीच कबुल केले तशी लोणकढी थाप ह्या प्रश्नाचे मात्र उत्तर नाही .

असो .

हिंदू धर्मीय श्री गणेश ह्या देवतेची मना पासून पूजा अर्चा करतात .आणि बाकी बुध्दी भेद करणाऱ्या नास्तिक,पुरोगामी,हिंदू विरोधी लोकांच्या matana कचऱ्याच्या पेटीत टाकतात.
समीक्षा करायची असेल,धर्मावर चर्चा करायची असेल तर भारतातील सर्व महत्वाच्या धर्मावर झाली पाहिजे
बौद्ध,हिंदू,मुस्लिम ह्या तिन्ही धर्माची समीक्षा झाली पाहिजे
फक्त हिंदू धर्मावर चर्चा आणि बौध्द आणि मुस्लिम धर्म वर मात्र चर्चा नाही.
हे कसे शक्य आहे
हिंदू विरोधी मत बौध्द धर्मीय आणि मुस्लिम हेच व्यक्त करत असतात .
ख्रिस्त धर्मीय खुलेआम टीका करत नाहीत .
म्हणून त्या धर्माची समीक्षा नको.

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 5:37 pm | गॉडजिला

१ नंबरच्या भामटेगीरीवर करावी मग एखाद्याला कोणी गट क्रमांक एकचे वाटो अथवा गट क्रमांक दोनचे… अथवा तळ्यात मळ्यातले वाटो…राहीला प्रश्न इतर धर्मांचा तर त्यावर त्यांचे पाइक ना धागा काढतात ना प्रतिसाद लिहतात मग त्यावर चर्चा सुरु होणार तरी कशी ?

१ नंबरच्या भामटेगीरीपासुन दुर राहणे या जगात शिवशक्ती ऐक्यापेक्शा महत्वाचे आहे.

प्रसाद गोडबोले's picture

13 Sep 2021 - 1:41 am | प्रसाद गोडबोले

आत्ता कसं एकदम साजेसं बोलात ! एकदम परफेक्ट २ !

सुबोध खरे's picture

12 Sep 2021 - 11:19 pm | सुबोध खरे

अशारीतीने मुर्ती स्थापन करायची गरजच नाही ह्या शंकेचे निराकरण झाले !

लहान मुलांच्या खोकल्यावर उपाय विचारला असता

मूल होऊच न देणे हा पर्याय सुचवल्याबद्दल धन्यवाद

प्रसाद गोडबोले's picture

13 Sep 2021 - 1:40 am | प्रसाद गोडबोले

बेक्कर हसतोय =))))

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2021 - 12:42 pm | चौथा कोनाडा

मूल होऊच न देणे हा पर्याय सुचवल्याबद्दल धन्यवाद
😂

मातीत न मिसळणारे आणि त्याचे नैसर्गिक रित्या विघटन लवकर न होणारे अनेक पदार्थ आहेत.
ते सर्व वापरायचे नाही ठरवलं तर अवघड होईल.
विषारी घटक मातीत,पाण्यात,हवेत मिसळू नये इतकीच काळजी घेतली की जीवसृष्टी ला काही धोकादायक नाही.
आता जास्त मागे जाता येणार नाही.
अगदी आदिमानव युगा पर्यंत आता जाता येणार नाही

गणेश मुर्ती मातीच्या असाव्यात असे माझे वैयक्तिक मत!
आजच एका मित्राकडे मातीची ही सुंदर मुर्ती बघीतली.

Ganpati

जर मातीच्या मुर्ती इतक्या सुंदर बनत असतील तर पी.ओ.पी किंवा कागदाच्या लगद्या पासुन बनवलेल्या मुर्त्या घ्यायची गरजच काय?

चौथा कोनाडा's picture

11 Sep 2021 - 9:02 am | चौथा कोनाडा

व्वा, किती सुंदर मूर्ती! कलाकाराने चांगलंच कसब दाखवलंय.

आमच्याकडे या वर्षी बहुतांश लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती स्थापना केलीय. स्वागतार्ह पाऊल.

मी तर कित्येक वर्षांपासुन कटाक्षाने फक्त शाडु ची मुर्तीच बसवतो. पी.ओ.पी ची मुर्ती कितीही सुंदर असली तरी नको.
विसर्जन झाल्यावर (बादलीत) ती माती कुंडीत टाकुन झाड लावतो . . . त्या मातीवर पाय पडु नये इतकीच काळजी घेतो.

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2021 - 12:47 pm | चौथा कोनाडा

एकंदरीत इथं कुणी कागदी गणेशमुर्ती बसवलेली दिसत नाही !

कालच एका परिचितांकडे त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यास गेलो होतो. ते त्या पंथाचे होते ज्याच्या उल्लेख धाग्यात केला आहे. कागदी गणेशमुर्ती होती, १७-१७ इंची. मनपा हौदात विसर्जन करणार म्हणाले. आता मनपावाले कागदी लगदा कसा वेगळा करणार आणि रद्दीवाल्याला / कागद कारखान्याला देणार हाच प्रश्न आहे,

1
माझा मित्र निलेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गोमय गणपती मूर्तीसाठी पुरस्कार मिळाला असून त्याची मुलाखत उद्या दाखवणार आहेत.
महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्रालयाने आयोजित पर्यावरण पूरक गणपती देखावा स्पर्धा
आपल्या "ग्रामउदय ते राष्ट्रउदय " या पर्यावरण पूरक गणपती देखाव्याला राज्य स्तरावर प्रथम पुरस्कार
Zee २४ तास या न्युज चॅनलवर सकाळी ११.३०ला दाखविणार.
नरेंद्र सोनावणे, निलेश राजाराम चिपाडे, सुरेंद्र सोनावणे व सतिश भांबरकर उपस्थित.

चौथा कोनाडा's picture

2 Jan 2022 - 11:08 pm | चौथा कोनाडा

माहितीसाठी धन्यवाद, भक्ती.
लिंक असेल तर पोस्ट कराल प्लीज ?

Bhakti's picture

3 Jan 2022 - 7:16 am | Bhakti

https://youtu.be/NDkXsIu9NCM
इथे इतर गणपती मूर्ती विषयीही माहिती आहे.

चौथा कोनाडा's picture

7 Jan 2022 - 12:44 pm | चौथा कोनाडा

फारच छान केलेत या मंडळींनी !
अ ति श य अनुकरणीय !
हॅटस् ऑफ !
त्यांच्या मुर्तींचे सजावटींचे व्हिडिओ दाखवले असते तर दुधात साखरच !