============================================================================================
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते.
============================================================================================
असो !
आपण सगळेजण खूप कष्ट करून पैसे कमावतो. आपल्याला आनंद मिळावा म्हणून तो खर्चून विविध मार्गांद्वारे आपण आनंद मिळवतो. जोपर्यंत पैश्याची आवक सुरु असते तोपर्यंत आपल्याला तो खर्च करण्यात काही वाटत नाही. पण अचानक एखादी आपत्ती येते आणि आपली आर्थिक गणिते कोलमडून पडतात. या अशा आपत्तीचा सामना कसा करायचा याचा जर आपण आधीच विचार करून ठेवला तर अशा आपत्तींना तोंड देणे सोपे जाते. आपण कदाचित संपूर्ण नुकसान टाळू शकत नाही पण ते निदान सहन करण्याच्या मर्यादेत (रिस्क अपेटाइट मध्ये) ठेवू शकतो.
आपण आज कोणकोणत्या आर्थिक आपत्तीच्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात आणि त्याचा कसा सामना करता येईल त्याचा थोडक्यात विचार करणार आहोत.
धोका १: अचानक नोकरी जाणे :
गेल्या दीड वर्षात करोना मुळे आपल्यापैकी अनेक जणांना हा दुर्दैवी अनुभव आला असेल. सुखासुखी चाललेली नोकरी अचानक जाणे म्हणजे आपली सर्व आर्थिक नियोजने (केली असतील तर) कोलमडून पडणे हे साधे सरळ गणित आहे. या आपत्तीचा सामना खालील प्रकारे करता येऊ शकतो:
उपाय :
१. कॉन्टेंगेंसी पैसे नेहमी तयार ठेवणे : या उपायात तुमच्या मासिक खर्चाच्या सहा पट रक्कम तुम्ही साठवून ठेवणे अपेक्षित आहे. म्हणजे जरी नोकरी गेली तरी आपण या पैशाचा वापर करून निदान पुढचे सहा महिने तरी काढू शकतो. इथे मासिक खर्च म्हणताना त्या खर्चात तुमचे घराचे हफ्ते हफ्ते , भाडे , तुमच्या मुलांच्या फिया असे सगळे खर्च गृहीत धरणे अपेक्षित आहे. मासिक खर्चाची ढोबळ यादी मी खाली देत आहे. प्रत्येकाने आपापले असे खर्च मांडून एकदा अभ्यासावेत म्हणजे तुम्हास किती पैसे कॉन्टेंगेंसी साठी ठेवावे लागतील याचा अंदाज येईल. हे कॉन्टेंगेंसी चे पैसे लिक्विड फंड मध्ये ठेवावेत जेणे करून एका क्लिक वर एक कामकाजाच्या दिवसात तुम्हास ते मिळू शकतील. शक्यतो ही रक्कम पती आणि पत्नी यांनी आपापल्या खात्यात अर्धी अर्धी करून ठेवावी.
- Loans EMI
- Insurance Premiums
- Society maintenance
- Petrol
- Hotel
- Veg
- Grocery
- School Fees
- Rickshaw / Van wale kaka fees
- Kids Tuition Fees
- kids other classes
- Mobile recharge
- Internet
- Land Line
- Tata Sky
- Milk
- Hobby And lifestyle
- Medical
- Doctor
- Cloths and Hosiery
- Vehicle Servicing
- Vehicle Insurance
- Festival expenses
- Property Tax
- MSEB
- Others
- Trip
- Vehicle Insurance
- Festival expenses
- Property Tax
- MSEB
- Others
- Trip
२. हल्ली नोकरी सुरक्षा विमा पण मिळतो. यात जर तुमची नोकरी गेली तर ती विमा कंपनी तुम्हास पुढील ३ किंवा ६ महिने निश्चित रक्कम देते. आपण या विम्याचा अभ्यास करून कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करून मगच अशा विम्यात पैसे घालावेत असे मी सुचवतो.
३. आपल्या नोकरीच्या ठिकाणी कायम डोळ्यात तेल घालून जागे असणे आवश्यक आहे. आपल्या कंपनीत आपण रिडंडंट होत नाहीये ना याची काळजी कायम घ्यावी. आपल्या नोकरीस काही धोका नाही ना हे कायम लक्ष देऊन असावे. आपली स्किल सेट कायम अपडेट ठेवावी. वेळ पडली तर दुसरी नोकरी मिळवण्यासाठी आपण कायम पात्र राहू (कॉम्पिटन्ट) हे पाहावे.
धोका २ : अचानक उद्भवणारे हॉस्पिटलायझेशन:
उपाय: अचानक होणारे हॉस्पिटलायझेशन तुमची सर्व बचत उध्वस्त करु शकते. यासाठी मेडिक्लेम पॉलिसी घेणे अतिशय उपयुक्त ठरते. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की जर हॉस्पिटलायझेशन झालंच नाही तर प्रीमियम वाया जातील. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्हाला जर हॉस्पिटलायझेशन लागलं नाही तर तुम्ही भरलेले प्रीमियम वाया गेले हे दुःख करत बसण्यापेक्षा तुम्ही निरोगी आयुष्य जगत आहात यात आनंद माना.
कोणतीही मेडिक्लेम पॉलिसी घेताना फॉर्म भरायला लागतो त्या फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती प्रामाणिकपणे भरा. पॉलिसी घेताना ती नीट अभ्यास करून घ्या. एवढेच काय तर पॉलिसी घेतल्यानंतर सुद्धा तीन दिवसाचा अवधी तुम्हाला रिव्ह्यू साठी दिला जातो. पॉलिसीचा प्रीमियम किती आहे त्या प्रीमियम मध्ये कव्हर किती मिळणार आहे याचे कॉस्ट बेनेफिट अनालिसिस करणे फार आवश्यक आहे. बऱ्याच वेळा घरात ज्येष्ठ नागरिक असतात. अशा लोकांच्या पॉलिसी घेणे फार महाग पडते. कधीकधी प्रीमियमची रक्कम इतकी जाते की त्यातून मिळणारे कव्हर आणि आजारांना मिळणारे विमा संरक्षण हे अपुरे असते आणि कॉस्ट बेनेफिट अनालिसिस वरती टिकत नाही. अशा वेळी अशा ज्येष्ठ नागरिकांच्या हॉस्पिटलायझेशन साठी एक स्वतंत्र रक्कम जमा करून ठेवणे आवश्यक ठरते.
अनेकदा हल्ली कॉर्पोरेट कंपन्या पेरेंटल इन्शुरन्स देतात. अशा कंपनी अशा प्रकारच्या इन्शुरन्स मध्ये बहुतांश वेळा अधिक असलेले आजार सुद्धा कव्हर केले जातात. तेव्हा ज्यांना ज्यांना हा पेरेंटल इन्शुरन्स उपलब्ध आहे त्या सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. कंपनीच्या मार्फत मिळणारा आरोग्य विमा अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी वापरावा आणि स्वतः साठी स्वतंत्र मेडिक्लेम पॉलिसी घ्यावी असा सल्ला मी देऊ इच्छितो.
आपण घेतलेल्या मेडिक्लेम पॉलिसी ची माहिती घरातल्या सर्वांना देणे आवश्यक आहे. बरेचदा असे होते की अशा पॉलिसी ची माहिती फक्त घरातल्या कमावत्या पुरुषालाच माहिती असते आणि प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा तो कमावता पुरुषच आजारी पडतो कधी कोमात असतो त्यामुळे अशा पॉलिसीची माहिती जर घरातल्या मंडळींना नसेल तर त्या मंडळींची फारच ससेहोलपट होते. आणि हे फक्त मेडिक्लेम पॉलिसी बाबत मी सांगत नाहीये तर घरातल्या कर्त्या पुरुषाने आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कोणत्या कोणत्या मेडिक्लेम पॉलिसी आपण घेतलेल्या आहेत, आपल्यावर किती कर्ज आहे? ते कोणाकोणाचे आहे. या आणि अशा सर्व बाबींची माहिती घरातल्या इतर मंडळींना देणे आवश्यक वाटते. अनेक घरातील कर्त्या पुरुषाचा असा समज असतो की बायकांना काय कळते, त्यांनाही माहिती देण्याची गरज काय? हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा असून घातक आहे. घरातल्या सर्व आर्थिक बाबींची माहिती आपल्या जोडीदाराला असणे मला तरी खूप आवश्यक वाटते.
जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला रुग्णालयाची गरज पडली आणि मेडिक्लेम पॉलिसी वापरावी लागली तर त्या वेळी कुणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, पॉलिसी नंबर त्याचे ओळखपत्र या सर्व गोष्टींची माहिती एका कागदावर लिहून तो सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावा. किमान तीन महिन्यात नाही एकदा तरी त्याचा रिव्ह्यू घ्यावा. मेडिक्लेम पॉलिसी विकणाऱ्या एजंटने सुद्धा आपल्या क्लायंटची निदान सहा महिन्यातून एकदा बोलावे आणि त्यांना त्यांच्या पोलिसी बद्दल काही शंका अडचणी आहेत का याची विचारणा करावी.
धोका 3 : आपण आपली पुंजी ठेवलेली बँक किंवा पतपेढी दिवाळखोरीत निघणे आणि आपली सर्व रक्कम तिथे अडकून पडणे.
उपाय: गेल्या काही वर्षात डी एस के किंवा किंवा रुपी सारख्या बँकेत अनेकांनी ठेवलेल्या ठेवी त्या बँका दिवाळखोरीत निघाल्या मुळे अडकल्या गेल्या. आता परत मिळतील का नाही याची कुणी खात्री देऊ शकत नाही. जेव्हा आपण एखाद्या बँकेत किंवा स्कीम मध्ये अधिक व्याजाच्या आमिषाने पैसे गुंतवतो त्या वेळी अधिक व्याज मिळण्याच्या शक्यता बरोबर गुंतवलेली रक्कम बुडू सुद्धा शकते ही शक्यता आपण कधी गृहीतच धरत नाही. यावर उपाय म्हणजे शक्यतो आपली सर्व पुंजी कधी एकाच ठिकाणी गुंतवून ठेवू नये. आपल्या रिस्क अपेटाइट नुसार वेगवेगळ्या ठिकाणी विभागून गुंतवावी. निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम ही अधिक व्याज मिळवण्याच्या हव्यासापोटी अशा धोकादायक ठिकाणी गुंतवण्या पेक्षा सुरक्षित अशा राष्ट्रीयीकृत बँका ती रक्कम गुंतवावी. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण गुंतवलेल्या रकमेला किती विमा कवच आहे याचीही माहिती करून घ्यावी. भिशी, मल्टी लेयर मार्केटिंग अशा पासून दूर राहिलेले बरे असे माझे मत आहे.
धोका 4: तुमचे राहते घर नैसर्गिक आपत्तीत नष्ट होणे.
उपाय: तुमचे राहते घर जर सर्व सरकारी नियम पाळून बांधले गेले असेल तर अशा नैसर्गिक आपत्तीपासून तुमच्या घराला संरक्षण मिळण्याची सोय अनेक विमा कंपन्यांनी केलेली आहे. असा विमा उपलब्ध असेल तर तो जरूर घ्यायचा विचार करावा. आपण ज्या घरात राहतो त्या घराचे अथवा बिल्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट वेळोवेळी करून घ्यावे आणि आवश्यक ते सर्व दुरुस्त्या करून घ्याव्यात.
धोका 5: तुमची मौल्यवान वस्तू चोरीला जाणे.
उपाय: तुमची मौल्यवान वस्तू जसे सोने-नाणे दागिने पैसे घरात सुरक्षित वाटत नसतील तर त्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची सोय असते. पण पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की बँकेच्या लवकर मदत अशा ऐवजाची चोरी झाली तर बँकेला आपल्याला ते परत देणे , त्याची नुकसान भरपाई देणे हे बंधनकारक नाहीये. फक्त घरापेक्षा बँकेत अधिक थोडी जास्त सुरक्षितता असते म्हणून आपण तिथे आपली मौल्यवान वस्तू ठेवू शकतो. यावर दुसरा उपाय म्हणजे प्रत्यक्ष सोने खरेदी करून बाळगण्यापेक्षा गोल्ड ईटीएफ फंड यासारख्या दुसरा पर्यायाचा आपण विचार करू शकतो. याशिवाय घरात अगदी जरुरीपुरती कॅश ठेवून बाकीचे पैसे लिक्विड फंडात ठेवणे नेहमीच फायदेशीर ठरते.
तुमच्या वाहनांचा विमा काढून ठेवणे हे अनेकदा उपयुक्त ठरते. किंबहुना कायद्याने ते बंधनकारक आहे. जर तुमच्या वाहनाची चोरी वगैरे झाली किंवा अपघात नुकसान झाले तर त्या नुकसानाला काही भाग निदान इन्शुरन्स मधून वसूल होऊ शकतो.
धोका 6: घरातील कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू होणे.
उपाय: घरातील कर्त्या पुरुषाने आपला टर्म इन्शुरन्स काढून घेणे हा एक यावरचा उपाय आहे. तो टर्म इन्शुरन्स किती घ्यावा कुठल्या कंपनीचा घ्यावा कुठल्या प्रकारचा घ्यावा याची आपल्या सल्लागाराची विचारविनिमय करून निर्णय घ्यावा. मी वर सांगितल्याप्रमाणे घेतलेल्या सर्व इन्शुरन्स ची माहिती घरातील इतर मंडळींना अवश्य अवश्य द्यावी. दुर्दैवाने तशी वेळ आलीच तर कोणाला संपर्क करायचा आहे काय प्रोसेस आहे याची सर्व माहिती आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींना द्यावी. अन्यथा घेतलेल्या इन्शुरन्स चा काहीही उपयोग होत नाही. अशा प्रकारचे टर्म इन्शुरन्स घेताना सर्व माहिती प्रामाणिकपणे द्यावी. इन्शुरन्स घेतल्यावर तीस दिवसाचा तुम्हाला रिव्यू टाईम मिळतो. त्या वेळात घेतलेल्या पॉलिसीचा नीट अभ्यास करून घ्यावा. काही गोष्टी पटल्या नाहीत तर ही पॉलिसी या काळात परत करता येते.
धोका 7: घरातील कर्ता पुरुष अपघातात अपघातात निकामी होणे आणि त्या पुढे पैसे कमावण्यास असमर्थ ठरणे.
उपाय: यासाठी ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी उपलब्ध आहेत. त्या घेतल्या तर अशा आपत्ती पासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते.
वरील सर्व मुद्दे वाचल्यावर एखाद्याला अशी शंका येईल की मी कुठला तरी विमा एजंट किंवा विक्रेता आहे. पण असे काही नाही. पण वरील दिलेले मुद्दे हे माझ्या अनुभवातून किंवा माझ्या मित्रमंडळी नातेवाईक यांना आलेल्या अनुभवातून मला समजलेले आहेत ते मी इथे मांडले आहेत. ते प्रत्येकाने अमलात आणावेत असा माझा बिलकुल आग्रह नाही.
आपत्ती येऊ नये म्हणून आपण काही करू शकत नाही. पण समजा आपत्ती आली तर आपले कमीत कमी नुकसान व्हावे त्या कळकळी पोटी वरील गोष्टी सांगितल्या आहेत. शेवटी ज्याने त्याने आपापले सद्सद्विवेक बुद्धी वापरून निर्णय घ्यावा.
कौस्तुभ पोंक्षे
प्रतिक्रिया
28 Aug 2021 - 6:06 pm | प्रकाश घाटपांडे
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते.
हा नेमका कुठला मंत्र आहे? तांव्याच्या चौकोनी पत्र्यावर असे मंत्र कोरुन ते सिद्ध यंत्र म्हणून गजानन बुक डेपो वा तत्सम ठिकाणी पुर्वी विकले जायचे. आता टीव्हीवर जाहिराती असतात. लेखाची सुरवात अशी करुन नेमके काय सूचित करायचे आहे हे समजले नाही.
28 Aug 2021 - 6:09 pm | kvponkshe
उपरोधात्मक लिहिलय ते. असे मन्त्र म्हनुन काही होत नसते.
28 Aug 2021 - 7:06 pm | गॉडजिला
:(
मला तर आख्या धाग्यात फक्त मंत्रपठण विधी हेच एकदम सुटसुटीत सोपं, कष्ट रहित आणि मुळातच फार कमी असलेल्या माझ्या बुध्दीच्या आवाक्यातील म्हणूनचं करायला जमेल असे प्रकरण वाटले होते... तेव्हढा भाग सोडुन आख्खा धागा डोक्यावरुन गेला होता माझ्या...:(
अन तूम्ही तर बॉम्ब टाकलात की माझ्या भावी आर्थिक भरभराटीवर. आजकाल एक तर धंदा मंदीत आहे, खिसे रिकामे आहेत कसे बसे एक वेळ समाधानाने जेवण हाच काय तो किंचीत आनंदाचा क्षण असतोोआता मी काय करू ?
तुमचे इतर सगळे उपाय खिशात पैसा असताना करायचे आहेत मी तर कफल्लक आहे, मलाआताकसलेही कामकरण्यातमनलागतनाही, माझ्याकडे पैसा यावा म्हणून मी काय केले पाहिजे यावर आपण काही मार्गदर्शन करु शकता का ?
28 Aug 2021 - 8:42 pm | कंजूस
प्रत्येक पायरीवर उपाय ठेवले आहेत. आशावादी राहा. श्रावण महिन्यातील कथा आहे ती वाचा. प्रसाद वाटा. आम्हास बोलवा. प्रसादाचे महत्त्व कथा ऐकण्याएवढेच आहे.
28 Aug 2021 - 9:19 pm | गॉडजिला
मनापासून धन्यवाद कंजूसजी, तुमच्या शब्दाने थोडा धीर आला आहे, चार शब्द प्रेमाचे अन धीराचे फार मोठे काम करतात, त्याचे मोल अनमोल आहे.
29 Aug 2021 - 1:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे देवा...! पण एवढ्याने लक्ष्मी स्थिर राहील का ? लक्ष्मी आली की मन चंचल बनते त्यामुले लक्ष्मी ( मी पैशाबद्दल बोलतोय) सांभाळणेही कला आहे. सांभाळायचे म्हणजे मन मारुन जगायचे असे नव्हे. आता ऐन दिवाळीत ऋषिमुनींनी ज्या संपत्तीचे आवाहन केले त्या श्रीसुक्तमबद्दल धागा काढणे आले.
-दिलीप बिरुटे
(धार्मिक ) :)
30 Aug 2021 - 9:07 pm | वामन देशमुख
हे जर तुम्हाला माहीत होते तर ते इथे लिहिण्याचे कारणच काय?
श्री महालक्ष्मीचा पुरोगामी अवमान करणे?
31 Aug 2021 - 7:56 am | कॉमी
उत्सुकता!
सदर लेखकाने लिहिताना मर्यादा सोडून, अश्लील इत्यादी काही लिहिलेले दिसत नाही.
मंत्रांबद्दलच्या "उपहासात" तो मंत्र आहे तसा आणि त्याच्या डिझायर्ड इफेक्ट सकट कोट केला आहे. इतर कोणतीही खवचट टिप्पणी सुद्धा नाही. त्यामुळे सर्व विचार करून इतकेच दिसते की "(१) हिंदू मंत्र काम करत नाहीत असा विश्वास असणे (आणि) (२) हेच पब्लिकली सांगणे" हेच भावना दुखावणारे आहे. मंत्र संपादित करून काढून टाकला तर फक्त दोन वर उपाय मिळतो, (१) वर काय उपाय करावा !?
का मंत्र इत्यादींबद्दल तुमच्या भावना ज्या काही असतील त्या असुदेत, पण बाहेर एक शब्दही बोलला तर आमच्या भावना दुखावतात, असे काही आहे ? But don't you think that makes no sense ? एखाद्या माणूस एखादा विचार ठेऊ शकतो अशी मान्यता असल्यावर जनरली तो विचार सभ्य शब्दाच्या मर्यादेमध्ये विनोद म्हणा, उपहास म्हणा, किंवा सरळसोट विधान म्हणा, वापरण्याची मान्यता असतेच कि.
ऑ ? महालक्ष्मीचा अपमान कसे काय झाला ? महालक्ष्मीच्या मंत्राचा इफेक्ट होत नाही असे म्हणणे, किंवा फॉरज्ञाटम्याटर महालक्ष्मी अस्तित्वातच नसते असे म्हणणे महालक्ष्मीच्या संकल्पनेचा अथवा खुद्द देवतेचा अपमान कसा काय बुवा ?
ह्यात पुरोगामी तरी काय आहे ? "मंत्र म्हणल्यावर काही होत नसते" हा विचार जर तुम्हाला एक्सकलुसिव्हली पुरोगामी वाटत असेल तर 'कुछ तो गडबड है दया' असे मला वाटेल.
28 Aug 2021 - 8:40 pm | कंजूस
आपल्याला जमतील तेवढे करणे. मंत्राने काम होते असे कुणाला वाटणे आता सामान्य गोष्ट आहे. सिद्धिविनायक, शिरडी जोरात आहे. प्रत्येक जिल्ह्यातून , राज्यातून शिरडी, बालाजी, वैष्णोदेवीला वाहने जातात. बाबा महाराज आहेतच.
जोडीला सायकॉलजी ओफ मनी, रिच ड्याड पुअर ड्याड पुस्तके आहेतच. एवढे तोडगे आणि उपाय केल्यावर पैसा येणारच.
29 Aug 2021 - 10:24 am | वामन देशमुख
ओ kvponkshe साहेब,
तुमच्या अर्थविषयक लिखाणामध्ये हिंदू धर्मियांच्या पुज्य देवतांचा उपरोधिक उल्लेख करण्याची काहीही गरज नाही.
संपादक मंडळाला विनंती करून संपादक मंडळाला विनंती करून लेखातील आक्षेपार्ह भाग आणि संबंधित प्रतिसाद काढून टाका.
यापुढे तारतम्य बाळगा आणि असे लिखाण करू नका.
29 Aug 2021 - 11:07 am | गॉडजिला
त्यांचा वैयक्तीक अनुभव ते १००% विषद करू शकतात आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवात कोणालाही फायदा झाला नसेल तर तसेही ते स्पश्टपणे मांडू शकतात यात उप्रोधाचा प्रश्नच नाही, जास्ती जास्त त्यांनी हिंदु उपासना सोडावी व इतर धर्मीय उपासना करून पैशाचा पाऊस पडतो का ते तपासावे अशी सूचना करता येऊ शकते. इतर धर्मीय देवही त्यांच्या अनुभवानुसार उपयुक्त ठरले नाहीत तर ते ईश्वर ही संकल्पना निरुपयोगी असे वैयक्तीक प्रतिपादन जाहीरपणे करु शकतात व त्यांचे म्हणणे मान्य करणे कोणत्याही जातीधर्माच्या सश्रद्ध अथवा अश्रद्ध व्यक्तीला बंधनकारक नाही.
मी स्वतः अर्थिक भरभराटीसाठी कुबेरा पासुन लक्ष्मी पर्यंत अनेकांच्या उपासना विधी वाचले आहेत व ज्यांनी ते केले त्यांना त्याचा फायदा झाला नाही हे ही सपुरावा मान्य करतो.
बाकी माझे मत थोडे उलटे आहे, उपासनेचा चांगला विधी असणाऱ्या या धाग्यावर त्यांनी विनाकारण आधूनीक अर्थनीती घुसडवून उपासनेची थट्टा केली आहे सबब या धाग्यातील उपासना विधी ही बाब सोडुन धाग्यातील इतर मजकूर त्वरित संपादित करावा इतर मजकूर लिहल्याने श्रध्दावान व्यक्ती हतोत्सहित नक्की होऊ शकते.
29 Aug 2021 - 11:22 am | वामन देशमुख
उपरोधात्मक लिहिलय ते. असे मन्त्र म्हनुन काही होत नसते.
29 Aug 2021 - 11:29 am | गॉडजिला
संपादित तर झाली नाही ?
29 Aug 2021 - 11:33 am | गॉडजिला
हिंदू देवतेला फोल आणि इतर धर्मीय देवता/उपासना मात्र पावरफुल असे काही स्पष्ट अथवा अस्पष्ट पणे सुचवले असेल
29 Aug 2021 - 11:35 am | गॉडजिला
वरील विधान उपरोधिक कीतीही असले तरी ते फक्त उपरोध व्यक्त व्हायला मर्यादित आहे त्यात हिंदुत्व टारगेट आजिबात केले ले नाही.
29 Aug 2021 - 11:51 am | रंगीला रतन
यापुढे तारतम्य बाळगा आणि असे लिखाण करू नका.
देशमुख साहेब बहुतेक तुम्ही सदर आयडीने लिहिलेला दुसऱ्या घराचा लेख वाचला नाही!
तारतम्य कशाशी खातात हे त्यांना ठाऊक नसल्याने त्याची अपेक्षा करू नका :)
कृ ह.घ्या
30 Aug 2021 - 9:10 pm | वामन देशमुख
ते स्वयंस्पष्ट आहे, पण अश्या भरकटलेल्या माणसांना योग्य मार्गावर आणण्याचे काम करतोय.
29 Aug 2021 - 12:16 pm | सतिश गावडे
@वामन देशमुखः
तुमचं या विधानाबद्दल काय मत आहे? हे सत्य/वास्तव आहे? की हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे?
29 Aug 2021 - 1:46 pm | वामन देशमुख
- हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे.
म्हणून, कुणालाही हिंदू श्रद्धा अवमानित करण्याचा / दुखाविण्याचा / खिल्ली उडविण्याचा / उपरोधिक लिहीण्याचा कसलाही अधिकार नाही.
30 Aug 2021 - 12:08 am | गॉडजिला
ते शब्द ऐकून तूम्ही आत्महत्या तरी केली असती अथवा हार्ट अटॅक तरी आला असता.
गंमत अशी आहे की ती फक्त तीच्या देवांच्या नावे बोटं मोडत होती मात्र आता हिंदु देवांच्या नावे रोज बोटं मोडत असे असा शब्द वापरून तिला हिन्दू धर्माचे शत्रू जाहीर करायचे काडीलावू काम मी केले आहे वस्तुतः तिने देवाला रोज शिव्या घातल्या तरी त्या देवाला दिलेल्या शिव्या आहेत कोणत्याही व्यक्तीचां तीने ती व्यक्ती फक्त हिन्दू आहे म्हणून तिरस्कार केला नव्हता, कमी लेखलं नव्हते पण आता मात्र तुमच्या तर्का नुसार ती हिंदु देवांना बोल लावणारी ठरली म्हणजेच समस्त हिंदुंची शत्रू ठरवली जात आहे...
मी आधीही स्पष्ट केले आहे हिंदुत्व टार्गेट तेंव्हा होते जेंव्हा इतर श्रध्दांचा उदोउदो व हिंदू श्रध्दाची मात्र हेतुपुरस्सर हेटाळणी एखादी व्यक्ती करते पण जर एखादी व्यक्ती हिंदु असुनही स्वतःच्या श्रध्दांची हेटाळणी करते पण इतर धर्मीय श्रध्दाचा उदो उदो करत नसेल तर त्या व्यक्तीला हिंदु विरोधकांचा दर्जा देणे हा हिंदू धर्मांधपणा होय .जो भारताचा अफगाणिस्तान बनवायला नक्की कामीं येईल.
शिवाजी महाराजांनी देखील हिंदू धर्मांधपणा आजिबात सहन केला नव्हता आम्हीं देखील त्याचा निषेध करतो.
30 Aug 2021 - 9:00 pm | वामन देशमुख
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा उपरोध / उपहास / हेटाळणी / चेष्टा / अवमान / तिरस्कार करण्याचा अधिकार कुणालाही नाही, हिंदूंनाही नाही.
हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे हिंदू धर्मांध असते तर पाकिस्तान / अफगाणिस्तान निर्माणच झाले नसते.
हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहायचे असेल तर आजच धर्मांध होऊन अशी कोणतीही विषवल्ली, तिचा विषवृक्ष होण्याआधीच ठेचावी लागेल. सुरुवात अश्या किरकोळ वाटणाऱ्या उपरोधिक विधानापासून होते आणि शेवट मूर्तिभंजनात होतो.
मूळ मुद्दा:
सदर अर्थविषयक भासणाऱ्या लेखाच्या पहिल्या काही ओळी आणि त्याखालचा लेखकाचा पहिल्या प्रतिसाद, या मिश्रणात असाच विषांकूर दडलेला आहे. लेखकाने, संपादक मंडळाला विनंती करून तो काढून टाकायला हवा.
30 Aug 2021 - 9:38 pm | गॉडजिला
http://misalpav.com/comment/1117561#comment-1117561
31 Aug 2021 - 12:22 am | गॉडजिला
बिनडोक विधान. कारण हिंदू जितकें धर्मांध होते त्यापेक्षा जास्त धर्मांध जरी बनले असते तरीही ब्रिटिशांचे गुलाम झालेच असते आणि कदाचित नंतर भारत शैविस्थान वेशवीस्थानातही विभागला गेला असता.
तुमची मते वाचून भिंतीवरील पालीची गोश्ट आठवते जिथं ती विचार करत असते की या भिंतीला मी धरले आहे म्हणून भिंत उभी आहे....
31 Aug 2021 - 6:19 am | वामन देशमुख
भावना पोहोचल्या.
31 Aug 2021 - 6:49 am | गॉडजिला
Dont be a bunch of confusion full of knowledge...
वाईट वाटले तुम्हाला मुद्दाच कळला नाही याचे
31 Aug 2021 - 7:45 am | वामन देशमुख
या ही भावना पोहोचल्या.
31 Aug 2021 - 7:48 am | गॉडजिला
मी तर माझ्यापाशीच ठेवून घेतल्या होत्या...
31 Aug 2021 - 7:48 am | वामन देशमुख
नाही. सर्वात वाईट + संतापजनक बाब ही आहे की @kvponkshe यांनी साळसूदपणाने हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा टिपिकल पुरोगामी अवमान केला आहे -
हे पहा.
@kvponkshe यांच्या मूळ लेखातील भाग -
@kvponkshe यांचा वरील भागाबद्धलचा पहिला प्रतिसाद -
मी पुन्हा @kvponkshe यांना विचारतो -
जर तुम्हाला कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लक्ष्मी देवीचा मंत्र म्हणून काहीही होत नसते हे जर माहित होते तर तुम्ही तो मंत्र आणि त्याखालचा उपरोधिक प्रतिसाद लिहिलाच कशाला?
31 Aug 2021 - 7:57 am | गॉडजिला
मंत्रविधिने सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते ही बाब त्यांना उप्रोधात्मक वाटत आहे असे दिसते... म्हणून त्यांनी असे रक्षण वगैरे काही होत नसते हे स्पष्ट केले आहे त्यांना लोकांनी मंत्र म्हणू नये असे सुचवायचेच नाहीय फक्त ते म्हटल्याने आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होतेच ही बाब उप्रोधतमक वाटते आहे...
उपरोध दैवत अथवा उपासनेचा अथवा धर्माचा नसून फलश्रुती मागील अपेक्षांचा केलेला आहे असे भासते
31 Aug 2021 - 6:26 am | वामन देशमुख
सहमत. पाकिस्तान, इराण, बलुचिस्तान, अफगाणिस्तान, इंडिया, बांगलादेश... यांपेक्षा शैवीस्थान, वैष्णवीस्थान, ब्रह्मदेश, गांधार, पर्शिया... हे चांगले, नाही का?
31 Aug 2021 - 6:53 am | गॉडजिला
तर भारताचा अफगाण करायच्या मोहिमेवर का स्वार होत आहात ?
धर्मांधपणा न्हवे डोळसपणा हे धर्मांधतेवर उत्तर आहे.
29 Aug 2021 - 12:35 pm | शानबा५१२
मला वाटत लेखकाला असे सुचवायचे आहे की फक्त मंत्रांवर विश्वास ठेउन कींवा ते म्हणुन आपण आर्थिक संकटातुन सुटत नाही तर काही 'टर्म ईन्शुरन्स' सारख्या क्रूत्या कराव्या लागतात, बरोबर ना लेखकभाउ?
30 Aug 2021 - 8:45 am | kvponkshe
बरोबर
29 Aug 2021 - 11:25 pm | अपूर्व कात्रे
अचानक नोकरी जाणे या प्रकारातुन सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही जो contingency fund तयार करायचा पर्याय दिलाय तो १०० टक्के बरोबर आहे. फक्त त्यात २ सुधारणा सुचवू इच्छितो.
१. हा fund किमान सहा महिने ते कमाल दोन अडीच वर्षाचा खर्च भागेल असा हवा. सहा ते नऊ महिने तगून राहता येईल अशी रक्कम निव्वळ अशा लोकांनी साठवून ठेवावी ज्यांना नोकरीची हमी (किंवा एक गेली तर जवळपास त्याच पगाराची दुसरी नोकरी लगेच मिळू शकेल) जास्त आहे, ज्यांचा खर्च मासिक उत्पन्नापेक्षा बऱ्यापैकी कमी आहे, सहा ते नऊ महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार राहिले तरी उपासमारीची वेळ येणार नाही. या प्रकाराच्या लोकांमध्ये सरकारी नोकरी असलेले, नुकतेच शिकून नोकरीला लागलेले, ज्यांचे आई वडील (किंवा कुटुंबातील सदस्य) अजूनही कमावते आहेत किंवा निव्वळ यांच्यावर कमाईचा भार नाही, आणि ज्यांचा जोडीदार कमावता आहे आणि/किंवा वरीलपैकी किमान एका category मध्ये आहे.
बाकी बऱ्याच जणांना यापेक्षा अधिक रक्कम emergency/contingency fund मध्ये ठेवावी लागू शकते. स्वयंरोजगार असलेले लोक, व्यावसायिक (proprietors, partners in partnership firms, directors of OPCs) वगैरे लोक, काही niche skills असलेले लोक ज्यांची गरज ते काम करत असलेल्या कंपनीमध्ये खूप असते पण काही कारणाने जर अशांच्या नोकरीवर पाय आला तर अशीच दुसरी नोकरी मिळणे फार लवकर शक्य होत नाही अशा आणि या तऱ्हेच्या लोकांनी साधारण वर्ष ते अडीच वर्ष पुरेल एवढी रक्कम अशा fund मध्ये ठेवावी असं माझं मत आहे. शिवाय नोकरदार किंवा स्वयंरोजगार मंडळींनी आहे ती नोकरी गेल्यास दुसरी नोकरी मिळवण्यासाठी skills upgradation साठीही या फंडात भर घालावी. हे skill upgradation नोकरीवर असताना करायच्या upgradation पेक्षा वेगळे असावे अशी अपेक्षा आहे.
२. नोकरी गेलेली असताना किंवा प्राथमिक उत्पन्नाचा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद असताना मासिक खर्चात कपात करावी लागते. तुम्ही यादीत दिलेल्या hotel, trip, hobby and lifestyle, festival expenses वगैरे discretionary spending या काळात बंद करणे अपेक्षित आहे. अगदी त्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवले असतील तरीही अगदीच गरज असल्याशिवाय किंवा प्राथमिक उत्पन्नाची जागा घेणारे दुसरे उत्पन्न चालू झाल्याशिवाय discretionary spending पूर्णपणे बंद ठेवणे पुढील आर्थिक आरोग्यासाठी हितावह आहे.
31 Aug 2021 - 8:03 am | सुरसंगम
याला म्हणतात चांगल्या विषयावरील धाग्याचं फतफतं करणं.
अरे त्या पोंक्षेने जो पोटतिडकीने विषय मांडलाय त्यावर कोणी बोलायला तयारच नाहीये.
सगळे "धर्म बुडाला सकळ पृथ्वी आंदोळली" असा आव आणून त्याच्यावर तुटून पडलेत.
बाकी गॉ.जि. यांनी संयम ठेवून दुसरा काही कामधंदा अर्धवेळ देऊन जमतंय का तो प्रयत्न करावा.
कदाचित हीच संधी असू शकेल शून्यातून नवे विश्व् उभी करण्याची.
! कठीण समयी सकरात्मक विचारासाठी शुभेच्छा सर्वांना !
31 Aug 2021 - 8:14 am | गॉडजिला
प्रयत्न तर चालूच आहे पणं कधी कधी एक नैतिक, आत्मिक अथवा दैवी बळ (जे हवे ते म्हणा) काहितरी नवीन सुरू करायला फार मोठे बूस्टर म्हणून काम करते...
आणि अशा प्रसंगी मंत्र साधना फार कामी येते असे लोकं सांगतात त्यामूळे जेंव्हा धागालेखकाने लक्ष्मी उपासना सांगितली तेव्हा मनात फार मोठी आशा निर्माण झाली होती की याचा मला फायदा होईल पण अर्थातच नंतर धागा उपासनेचा न राहता नियोजनावर फोकस करणारा बनला त्यामुळं माझा जरा हिरमोड झाला. हा धागा सर्वस्वी उपासनेला वाहून घेतलेला हवा होता असे अजूनही वाटते.
जर इतर कोणाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अनुभव सिध्द उपासना तोडगे माहित असतील तर त्यांनी ते दुसऱ्या धाग्यावर अवश्य प्रसिध्द करावेत अशी विनंती आहे किंबहुना चालु घडामोडी अथवा सध्या मी काय पाहतोय च्या धर्तीवर खास तोडग्यांवर आधारित एक सेप्रेट धागाच काढला जावा जिथं विवीध अडचणींवर श्रध्दाळू लोकांसाठीच उपयुक्त मार्गदर्शन केलेले असेल, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी त्या धाग्यांवर हजेरी व प्रतिसाद देऊ नये
_/\_
31 Aug 2021 - 12:09 pm | टवाळ कार्टा
प्रचंड सहमत....
31 Aug 2021 - 9:48 am | सुबोध खरे
जर हॉस्पिटलायझेशन झालंच नाही तर प्रीमियम वाया जातील. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्हाला जर हॉस्पिटलायझेशन लागलं नाही तर तुम्ही भरलेले प्रीमियम वाया गेले हे दुःख करत बसण्यापेक्षा तुम्ही निरोगी आयुष्य जगत आहात यात आनंद माना.
१०० % सत्य
कोणताही विमा आपल्याला कधीच वापरायला लागूच नये अशीच आपली इच्छा असावी.
हीच गोष्ट आरोग्यविम्याला लागू आहे.
मी गेली १५ वर्षे दर वर्षी १८ हजारापासून ते २५ हजार पर्यंत ( वयानुसार/ आय आर डी ए च्या अधिनियमानुसार हप्ता थोडा वाढत जातो) आरोग्यविम्याचा प्रीमियम भरत आलो आहे. यात माझ्या संपूर्ण कुटुंबाचा १५ लाख रुपयांपर्यंत आरोग्यविमा येतो. सुदैवाने मला आजपर्यंत आरोग्य विम्याची गरज पडलेली नाही
मागच्या वर्षी मला कोव्हीड झाला होता तेंव्हा सुदैवाने मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले नव्हते परंतु तसे अनेक लोक मी त्या काळात पाहिले ज्यांचे उत्पन्न बंद झाले आणि त्यावर लाखांनी जर रुग्णालयाचे बिल भरावे लागले. यामुळे त्यांचे आयुष्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातील काही लोक "काय करायचाय आरोग्य विमा? मला काय धाड भरली आहे?" अशा विचारांचे होते.
मला कोव्हिड झाला तेंव्हा आपल्याला रुग्णालयात जावे लागले तरी १५ लाख रुपये पर्यंत चिंता नाही हा विचार सुद्धा अतिशय दिलासा देणारा होता.
याशिवाय माझा आयुर्विमा १ कोटी रुपयांचे आहे. मी दोन्ही मुलांना जवळ बोलावून या दोन्ही विम्याची कागदपत्रे कुठे ठेवली आहेत आणि लागले तर कुणाला संपर्क करायचा आहे हे समजावून सांगितले.
उद्या माझे बरे वाईट झाले तर निदान आर्थिक कारणाने कुटुंबाची दुर्दशा होऊ नये एवढी काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.
आमच्या वडिलांचे एक "स्वतःला अत्यंत शहाणे समजणारे निवृत्त प्राध्यापक मित्र वय वर्षे ८०.
मला नेहमी हेच सांगत असत कि "मी कसलाही विमा काढलेला नाही. मला आजतागायत काहीही झालेले नाही".
मी त्यांना दवाखान्याच्या समोरची रेल्वे लाईन दाखवून म्हणालो कि काका आपले म्हणणे म्हणजे "मी इतकी वर्षे रेल्वे लाईन पार करत आलो आहे मला काही झाले का? म्हणजेच रेल्वे लाईन पार करणे सुरक्षित आहे असे म्हणण्यासारखे आहे."
हेच महाशय कोव्हीड होऊन फोर्टिस रुग्णालयात भरती झाले आणि साधारण ६ लाख बिल झाले ते त्यांच्या मुलाने भरले. (सुदैवाने त्याच्या कपंनीने अपवादात्मक बाब म्हणून ते पैसे परत केले हा भाग अलाहिदा).
विम्याचे पैसे भरणे म्हणजे पैसे फुकट जाणे असे समजणारे कित्येक लोक मी पाहतो आहे.