रेणुबंध होतील खिळखिळे
खळकन् फुटतील ठाशीव साचे
हादरून जातील स्तंभही
तर्काच्या भक्कम इमल्यांचे
गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या
लाव्हारस येईल उधाणून
अगणित जीवांचा कोलाहल
उरेल भवतालाला कोंदून
विस्कळखाईत कोसळताना
असेच काही घडेल? किंवा,
विज्ञानाचे ज्ञात नियम मग
वागतील वेगळेच तेव्हा?
प्रतिक्रिया
10 Aug 2021 - 5:15 am | गॉडजिला
हेचं एक अशक्य काम आहे
10 Aug 2021 - 6:14 am | तुषार काळभोर
विज्ञानकाव्य
तेही ब्लॅकहोल वर
तेही विस्कळखाई सारख्या सर्जनशील शब्दांनी तयार केलेलं..
असं काही सुचतं हेचं एक अशक्य काम आहे..
10 Aug 2021 - 11:30 am | ज्ञानोबाचे पैजार
"विस्कळखाई" हा शब्द प्रचंड आवडल्या गेला आहे
पैजारबुवा,
4 Sep 2021 - 12:01 pm | Bhakti
विस्कळखाई....कस काय सुचला हा शब्द!! मस्तच!
10 Aug 2021 - 6:53 pm | मदनबाण
रचना आवडली ! यावरुन मला जी घटना आठवली त्यावरील एक लेख :-
14 Agonizing Photos Of Pompeii’s Bodies Frozen In Time
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre
4 Sep 2021 - 10:29 am | कुमार१
रचना आवडली
4 Sep 2021 - 4:13 pm | अनन्त्_यात्री
सर्व कवितारसिकांना धन्यवाद.