ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
18 May 2021 - 9:48 am

मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी.

तांत्रिक बाबी -
०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est)

१) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे.

२) मीटिंग लिंक - येथे क्लीक करा
https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz09

कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल -

१) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल.

२) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल.

३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील.

४) श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति.

५) इतर कुणाला काही विषय मांडता येईल

६) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल.

इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे.

ज्यांना येणे शक्य आहे, त्यांनी प्रतिक्रियांत जरुर कळवावे.

*ज्यांना काही कारणास्तव हजार राहणं जमलं नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग इथे आहे

सुरुवातीला परिचय

चित्रगुप्त काकांची चित्रे इथे सुरु होतात

मनो - पानिपत पुस्तकाबद्दल

श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति

राहिलेल्यांचा परिचय, श्री. बिपीन सांगळे यांची कविता वाचन इतर गप्पा आणि समारोप

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

सुरिया's picture

21 May 2021 - 6:02 pm | सुरिया

तसे नाही, मोबाईलमध्ये झूम वापरायचेच नाही. फक्त कॅमेरा वापरायचा. झूम पीसीवरच इन्स्टॉल करायचेय.

तुषार काळभोर's picture

21 May 2021 - 6:16 pm | तुषार काळभोर

डायनोसर नामशेष व्ह्यायच्या आधी, म्हणजे अंदाजे २००५-०६ मध्ये चायनीज फोन जर केबल ने विंडोज एक्सपी कॉम्प्युटरला जोडला, तर तो वेब कॅम म्हणून डिटेक्ट व्ह्यायचा अन वापरता यायचा.
आता तसं होत नाही.

उगा काहितरीच's picture

21 May 2021 - 8:33 pm | उगा काहितरीच

अस केल्याने echo होईल . एका ठिकाणावरून mute करावा लागेल.

शिवाजी नाठे's picture

21 May 2021 - 8:07 pm | शिवाजी नाठे

हरहुन्नरी मिपाकरांचे लेख तर आवडतातच , बोल ऐकाण्याची संधी वाया घालवू नये असे वाटते

चौथा कोनाडा's picture

21 May 2021 - 8:21 pm | चौथा कोनाडा

फक्त वाचक सहभागी होऊ शकतात का ?
हो !

बांवरे's picture

22 May 2021 - 1:12 am | बांवरे

सहभागी व्हायचा प्रयत्न करेन.

बिपीन सुरेश सांगळे's picture

22 May 2021 - 9:06 am | बिपीन सुरेश सांगळे

नमस्कार मंडळी ,
मीही जॉईन होईन .
वाट पाहतो

मिटींग क्रमांक व पासवर्ड दिला तर जॉइन करायला सोपे होईल असे वाटते

चौथा कोनाडा's picture

22 May 2021 - 4:52 pm | चौथा कोनाडा

मीटिंगची लिंक धाग्यात दिलेलीच आहे, ती पुन्हा खाली देतोय.

https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz09

पासवर्ड द्यायची गरज नसेल (अथवा ऐनवेळी धाग्यावर देणार असतील) असे वाटते !

पासवर्ड लिंकमध्ये आपोआप दिला आहे, स्वतंत्र टाकण्याची गरज नाही.

पुढच्या कट्ट्याला मी पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी ह्यावर जो काही माझा अभ्यास आहे तो share करू शकतो. आजच्या कट्ट्याला वेळ मिळाल्यास आज पण करू शकतो पण पहिलाच कट्टा असल्याने बघुयात कसं होतंय

कंजूस's picture

22 May 2021 - 12:54 pm | कंजूस

टाका पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी ह्यावर.

MipaPremiYogesh's picture

22 May 2021 - 3:40 pm | MipaPremiYogesh

विडिओ तर केलेला नाहीये अजून पण माझ्याकडे पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन आहे फोटो सकट

नीळा's picture

22 May 2021 - 1:25 pm | नीळा

मी पण येणार

मदनबाण's picture

22 May 2021 - 8:24 pm | मदनबाण

मीटिंग कोड :- 970 2319 7139

मीटिंग पासकोड :- हा तुम्ही ध्यायचा विसरलात का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “When you connect to the silence within you, that is when you can make sense of the disturbance going on around you.“ :- Stephen Richards

मनो's picture

22 May 2021 - 8:51 pm | मनो

लिंकमध्येच pwd parameter असल्यानं अजून काही लागत नाही. तरी काही लागलं तर इथे विचारा, हा धागा मी उघडून ठेवतो आहे, ९.२० पासून

चित्रगुप्त's picture

22 May 2021 - 9:18 pm | चित्रगुप्त

पासकोडाची वगैरे गरज नाही. नुस्ते लिंकेवर क्लिकले की झाले असे आत्ताच समजले आहे.

अनन्त्_यात्री's picture

22 May 2021 - 8:37 pm | अनन्त्_यात्री

येण्याचा प्रयत्न करेन.
ज्यांना येणे जमणार नाही त्यांच्यासाठी इतिवृत्त (रेकाॅर्डेड स्वरूपात ) असेल का?

रेकॉर्डिंग youtube वर टाकूया, असं नियोजन आहे.

कुमार१'s picture

22 May 2021 - 9:16 pm | कुमार१

मंडळी,
पहिली घंटा झालेली आहे....... !

चौकटराजा's picture

22 May 2021 - 9:40 pm | चौकटराजा

मीटिंग आय डी दिल्यावर पासवार्ड मागत आहे व आपण दिलेल्या लिंकमधला पासवर्ड तिथे दिलेल्या फील्ड पेक्षा मोठा आहे !

पाषाणभेद's picture

22 May 2021 - 10:07 pm | पाषाणभेद

थोडी घाई करा. वेळ कमी आहे.
दुसरे असे की, लिहीणे हे माध्यम टाळून आपण दिसणे या माध्यमाकडे का वळतो आहोत याचा शोध घ्यायला हवा.
ते कितपत योग्य आहे की अयोग्य आहे यावर चर्चा करावी.

वामन देशमुख's picture

22 May 2021 - 11:35 pm | वामन देशमुख

सर्वांचे आभार!

पाषाणभेद's picture

22 May 2021 - 11:37 pm | पाषाणभेद

चित्रगुप्तजी, आपली चित्रे बघून हरखायला झालं. आम्हाला हेवा वाटतो तुमच्या कलाकारीचा.

कट्टा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. YouTube वर रेकॉर्डिंग अपलोड झालं की इथेच त्याची लिंक देईन.

पुढच्या वेळी काय सुधारणा करायला हव्यात ते जरूर सांगा. कार्यक्रम अपेक्षेपेक्षा जास्त लांबला, पण प्रत्येकाला बोलण्याची संधी देणे आवश्यक होते असे मला वाटते.

मिपाकरांचा अगदी पहिलाच सार्वजनिक कट्टा खूप छान झाला. यापुपढे वेगवेगळ्या विषयांवरील स्वतंत्र कट्टे करूया. तुम्ही दोघांनी पुढाकार घेऊन खूप कष्ट घेऊन ही सुरुवात केली हे खूपच कौतुकास्पद आहे. आभार आणि शुभेच्छा.

नावातकायआहे's picture

23 May 2021 - 12:28 am | नावातकायआहे

कट्टा मस्तच झाला!
अनेक दिग्गज ज्यांचे फक्त लिखाण वाचले होते त्यांचे दर्शन झाले!!
पु.क.प्र!

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 May 2021 - 1:00 am | बिपीन सुरेश सांगळे

मिपाकर
कट्टा मस्त झाला .

श्रीरंग
आपले संयोजनासाठी खूपच आभार !

मनो
आपले अभिनंदन न कौतुक .
आपण खूपच मेहनत घेत आहात . पुढच्या पुस्तकासाठी खूप शुभेच्छा !
उर्दू पाहायला तरी मिळते पण फारसी भाषा काळाच्या ओघात मागे पडली आहे आणि आपण तिचा अभ्यास करत आहात , ग्रेट !

चित्रगुप्त
वावा ! आपली चित्रे पाहून नजर हरखली . मस्त न मस्त . तुमच्याशी खूप बोलण्यासारखे आहे . आपल्याला संपर्क साधतो .

अरविंद काका ,
आपलेही कौतुक आहे .

हजर असलेल्या सर्व सदस्यांचे कौतुकच आहे . विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती कमी असताना , हजर असलेल्या कविता , भक्ती आणि नूतन यांचे .

चौथा कोनाडा
अहो काय झटपट अन सुरेख स्केच ! बापरे !

भारी भारी मंडळींचा सहवास मिळाला हे भाग्यच . आता प्रत्येकाचे नाव घेत नाही पण उपस्थित सर्वच मंडळी !

असे कट्टे घ्यायला काही हरकत नसावी . ज्यांना शक्य आहे ते अटेंड करतील .

पुन्हा आभार .
कळावे

चित्रगुप्त's picture

23 May 2021 - 3:33 am | चित्रगुप्त

कट्टा छानच झाला. आपण अवश्य बोलूया.

Bhakti's picture

23 May 2021 - 7:41 am | Bhakti

वृत्तांत चांगला लिहीलाय.
चित्रगुप्त काका तुमच्या चित्र त्यामागील कथा ऐकून भारी वाटलं.नवीन चित्रांची वाट पाहते.तुमचे मित्र प्रकाश काकां कडे बरेच किस्से असणार.मस्त बोलले ते!
मनो तुमचा व्यासंग फारच मोठा आहे.नवीन उपक्रमसाठी शुभेच्छा!
कोल्हाटकर काका अबब !पहिल्या दुसऱ्या स्लाइडलाच डोक्याहून विमान चालले होते.पण स्लाइडस शेअर नक्की करा.
श्रीरंगने यांनी छान हसतमुखाने सुत्रे सांभाळली.:)
सूचना
१.दरवेळी एक नवीन पुस्तकाच्या निमित्ताने नवीन लेखकाला बोलवत रहा.
२.चित्र,फोटो , भटकंती इत्यादी अशा दृश्य कलाकृती सादरीकरण कलाकारांना नक्की सहभागी करा.

सहभागी सर्वांच्या मनमोकळ्या बोलण्याने मजा आली.
असेच गप्पा मारत रहावे.:)

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 May 2021 - 1:11 am | बिपीन सुरेश सांगळे

कविता जाधव
आपल्याला संपर्क साधू शकत नाही. कृपया आपण मला व्यनि कराल का ?
म्हणजे रिप्लाय देता येईल .
आभार न कळावे

ज्यांना काही कारणास्तव हजार राहणं जमलं नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग इथे आहे
https://www.youtube.com/watch?v=HciJUcXytAU

सुरुवातीला परिचय

चित्रगुप्त काकांची चित्रे इथे सुरु होतात
https://www.youtube.com/watch?v=HciJUcXytAU&t=1440

मनो - पानिपत पुस्तकाबद्दल
https://www.youtube.com/watch?v=HciJUcXytAU&t=2765

श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति
https://www.youtube.com/watch?v=HciJUcXytAU&t=4025

राहिलेल्यांचा परिचय, श्री. बिपीन सांगळे यांची कविता वाचन इतर गप्पा आणि समारोप
https://www.youtube.com/watch?v=HciJUcXytAU&t=5053

शक्य झालं तर मूळ धाग्यातच टाकावे अशी संपादकांना विनंती.

राघवेंद्र's picture

23 May 2021 - 2:19 am | राघवेंद्र

धन्यवाद मनो. कट्टा हुकला पण आता रेकॉर्डिंग पाहतो. श्रीरंग शेठ मस्त सूत्र संचालन करत होते हे थोड्या वेळासाठी डोकावल्यावर दिसत होते.

चौथा कोनाडा's picture

23 May 2021 - 1:10 pm | चौथा कोनाडा

हे एक नंबर काम झाले !
👆
कालचा कट्टा पुन्हा अनुभवला !

खुप खुप धन्यवाद, मनो !

कंजूस's picture

24 May 2021 - 8:37 am | कंजूस

सर्व एकाच ठिकाणी चालू होतात. - कविता वाचनाशी. मलाच हा अनुभव येतोय?

कंजूस's picture

24 May 2021 - 8:38 am | कंजूस

सर्व एकाच ठिकाणी चालू होतात. - कविता वाचनाशी. मलाच हा अनुभव येतोय?

प्रत्येक लिंकमध्ये t= एवढाच फरक आहे. तिथे सेकंदात द्यायचं की कुठे सुरू होणार. जर वेगवेगळे आकडे t= च्या समोर टाकले, तर ते चालतात का?

कदाचित तुमच्या ब्राउझर हिस्टरी मध्ये match झाल्याने, तुम्ही लिंक दुसरी टाकली तरी ब्राउझर दिलेले t सोडून जास्त पाहिलेल्या शेवटच्या t लिंकला उघडतो आहे.

कुमार१'s picture

23 May 2021 - 4:30 am | कुमार१

कट्टा छानच झाला

संयोजकांचे व सर्व सहभागी परिवाराचे अभिनंदन !

कंजूस's picture

23 May 2021 - 7:17 am | कंजूस

दोन तासांचा डाउनलोड* करून घेतला आणि भराभर पाहून घेतला. कट्टा फारच छान झाला आहे.

साधारण तीन महिन्यांत एकदा असा महाकट्टा करावा.

#* डाउनलोड youtube go वर होतो.
किंवा
Get video.org/en वर 360p size. तो पेन ड्राइववर टाकून टिवीला पाहता येतो.

प्रचेतस's picture

23 May 2021 - 7:17 am | प्रचेतस

कट्टा एकदम सुरेख झाला. नेटक्या संयोजनाबद्दल करण्यासाठी मनो आणि श्रीरंग जोशी यांचे आभार.

चित्रगुप्तांची चित्र सफर एकदम सुरेख. मनो यांनी त्यांच्या पुस्तकामागे घेतलेले परिश्रम उलगडून दाखवले त्यांचे खास आभार आणि आगामी पुस्तकासाठी शुभेच्छा. नेमकं नेटवर्क खंडित झाल्यामुळे काहीकाळ अरविंद कोल्हटकर यांचे शुल्बसुत्रांतील भूमिती विषयक सादरीकरण पाहू शकलो नाही पण ते रेकॉर्डिंगमुळे पाहता येईल.

उपस्थित सर्व मिपाकरांचेही अनेक आभार. मजा आली कट्ट्याला.

गॉडजिला's picture

23 May 2021 - 8:26 am | गॉडजिला

थोरामोठ्यासोबत असे मनमोकळे, अनौपचारीक क्षण मिळणे ही अत्यन्त आल्हाददायक बाब आहे. एकूणच कोरोनामुळे धमाल जरी बंद झालेली दिसली तरी मजा पुरेपूर चालू आहे याचीच पावती हा कट्टा देतो

श्रीरंग_जोशी's picture

23 May 2021 - 8:28 am | श्रीरंग_जोशी

या कट्ट्याच्या आयोजनासाठी मनो यांचे मनःपूर्वक आभार व मला सुत्रसंचालनाची जबाबदारी दिल्याबद्दलही आभार.
सहभागी होणार्‍यांच्या मोठ्या संख्येमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमाच्या परिणामकारकतेवर मर्यादा येईल असे वाटत होते. परंतु सर्वांनी शिस्त पाळल्याने ही मर्यादा जाणवली नाही अन कट्टा बहारदार झाला.

चित्रगुप्त यांची चित्रे जवळून बघता येणे व त्यांच्या तोंडून त्याबाबत माहिती ऐकायला मिळणे ही पर्वणीच होती.
मनो यांच्या बॅटल ऑफ पानिपत या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास थोडक्यात जाणून घेता आला व त्यांच्या आगामी पुस्तकाबाबतही माहिती मिळाली.
श्री. अरविंद कोल्हटकर यांच्या शुल्बसूत्रांतील भूमिति विषयावरील प्रेझेंटेशन रोचक होते अन गणिताच्या इतिहासाच्या थोडी ओळख यातून झाली.
त्यांच्या या विषयावरच्या लेखांचे दुवे:

चौथा कोनाडा यांनी कट्ट्यादरम्यान काढलेले चित्रगुप्त यांचे चित्र, मदनबाण यांनी दाखवलेली पुरातन मंदिरांच्या रचनाशास्त्राची चित्रफीत व होळकर वंशातल्या स्त्रीचे तैलचित्र व बिपिन सांगळे यांचे काव्यवाचन व गणेशा, विदेशी वाचाळ व इतर काही मिपाकरांच्या खेळकर व उस्फुर्त प्रतिक्रियांनी कट्ट्याची रंगत अधिकच वाढवली.

'हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या' ही हिंदी म्हण सांगणार्‍या इंदूरच्या प्रकाश (चित्रगुप्तांचे मित्र) यांनीही उत्तम माहिती दिली.

मिपाच्या माध्यमातून ओळख झालेल्या बर्‍याच मित्रांबरोबर प्रथमच थेट संवाद साधता आला. सामिल झालेल्या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार. तसेच सुत्रसंचालक म्हणून मला सांभाळून घेतल्याबद्दल तर विशेष आभार. हा स्नेह असाच वृद्धींगत होत राहो.

चौथा कोनाडा's picture

24 May 2021 - 6:26 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, श्रीरंग !
आपले हसतमुख सुत्रसंचलन लाजवाब !

यश राज's picture

23 May 2021 - 8:58 am | यश राज

संयोजकांचे मनापासून आभार . श्रीरंग आपले सूत्रसंचालन खूप आवडले.

चित्रगुप्त काका यांची चित्रे अप्रतिम. कोल्हटकर काकानी प्राचीन गणिताचा इतिहास उलगडला त्याबद्दल आभार. मनो तुमच्या पुस्तक प्रकाशित करण्यापर्यंतचा प्रवास उलगडला याबद्दल आभार.
चौथा कोनाडा यांचे शीघ्र चित्र खूप आवडले.

मिपा वर असणाऱ्या आयडींचे प्रत्यक्षात दर्शन झाले त्याबद्दल अजून एकदा आभार.

पुढच्या कट्ट्याच्या प्रतीक्षेत.

तुषार काळभोर's picture

23 May 2021 - 9:18 am | तुषार काळभोर

इंटरनेट गंडलं होतं. मग एअरटेल 4G डेटा कार्ड, माझ्या मोबाईलचा हॉटस्पॉट, नंतर बायकोच्या मोबाईलचा हॉटस्पॉट अशा माध्यमातून ये जा करत होतो. दोन वेळा मोबाईलवरून ॲप वापरूनही कनेक्ट केलं, पण तोच इश्यू होता. शनिवार संध्याकाळच्या नेटवर्क कंजेशन मुळे वारंवार खंड पडत होता. मग चित्रगुप्त यांचा भाग सुरू असताना कंटाळून फोनवरून कॉल केला आणि ऐकू लागलो. उर्वरित कट्टा फक्त ऐकला.
मनो यांनी रेकॉर्डिंग केल्याने जे मिस केलं त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता आला.
(२ तास कट्टा चालला, हे रेकॉर्डिंग ने कळलं, काल वेळ कसा गेला ते कळलंच नाही.)

तुषार काळभोर's picture

23 May 2021 - 9:21 am | तुषार काळभोर

ऑनलाईन कट्टा इतका छान झाला,
प्रत्यक्ष कट्ट्यात कितीतरी पट मजा येत असेल, हे नक्की!

कुमार१'s picture

23 May 2021 - 9:30 am | कुमार१

प्रत्यक्ष कट्ट्यात कितीतरी पट मजा येत असेल, हे नक्की!

>>> +१११

2019 मधल्या दिवाळीपूर्व पुणे कट्ट्यानंतर सध्याच्या वातावरणामुळे बराच काळ कट्टा होऊ शकलेला नाही याचा खेद होतो.
त्या सुखद आठवणी अजूनही येतात.

पुढच्या वर्षी सर्वत्र निरोगी वातावरण असावे आणि मग लवकरात लवकर एक प्रत्यक्ष कट्टा व्हावा ही मनोमन इच्छा !

अनन्त्_यात्री's picture

23 May 2021 - 9:31 am | अनन्त्_यात्री

चांगला झाला. पण पुढचा कट्टा अधिक नेटका, आटोपशीर व लक्षात राहील असा करण्यासाठी एकच मुलाखत (१० मिनिटांची) ठेवावी व बाकीचा वेळ ओळख व गप्पांसाठी ठेवावा.

अनन्त्_यात्री's picture

23 May 2021 - 9:31 am | अनन्त्_यात्री

चांगला झाला. पण पुढचा कट्टा अधिक नेटका, आटोपशीर व लक्षात राहील असा करण्यासाठी एकच मुलाखत (१० मिनिटांची) ठेवावी व बाकीचा वेळ ओळख व गप्पांसाठी ठेवावा.

सुरसंगम's picture

23 May 2021 - 10:31 am | सुरसंगम

अभिनंदन सर्व सहभागी मिपाकरांचे !
सुंदर कट्टा नियोजन.

बेकार तरुण's picture

23 May 2021 - 10:39 am | बेकार तरुण

कट्ट्याला खूपच मजा आली...
श्रीरंग अन मनो यांचे मनापासुन आभार.

बापूसाहेब's picture

23 May 2021 - 10:57 am | बापूसाहेब

कट्टा अटेंड करणे miss झाले.. पण सकाळी उठल्याबरोबर यूट्यूब वर पूर्ण व्हिडिओ पाहिला.

पुढचा कट्टा नक्की अटेंड करणार.

बापूसाहेब's picture

23 May 2021 - 10:57 am | बापूसाहेब
बापूसाहेब's picture

23 May 2021 - 10:58 am | बापूसाहेब

कट्टा अटेंड करणे miss झाले.. पण सकाळी उठल्याबरोबर यूट्यूब वर पूर्ण व्हिडिओ पाहिला.

पुढचा कट्टा नक्की अटेंड करणार.

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 May 2021 - 11:48 am | बिपीन सुरेश सांगळे

मंडळी
माझा हा पहिलाच कट्टा होता .
मागे पुण्यातला पाताळेश्वर कट्टा माझा हुकला .
असो . पण ज्यांची नावं आपण वाचतो त्या मंडळींना प्रत्यक्ष पाहून मजा वाटली , आनंद वाटला .
प्रकाश ,कुमारआणि काही ज्येष्ठ मंडळी आणि तरुण पिढी सगळेच

किणकिनाट's picture

23 May 2021 - 12:03 pm | किणकिनाट

काल बर्याच दिवसानन्तर बर्याच लोकात मिसळता आले. त्यासाठी संयोजकांचे मनापासून आभार.

कट्टा खूपच छान झाला. श्रीरंग जोशी॑चे सूत्रसंचालन आवडले. तीनही सत्र आवडली. नवीन / जुन्या अनेक सदस्या॑ची ओळख आवडली.

पुढच्या कट्ट्याच्या प्रतीक्षेत. आणि लवकरच सर्व सुरळीत होऊन एखादा प्रत्यक्ष कट्टा व्हावा ही आशा आणि प्रार्थना.

चौथा कोनाडा's picture

23 May 2021 - 12:48 pm | चौथा कोनाडा

हा ऑनलाईन कट्टा लै भारी झाला. एन्जॉय केला कट्टा !
संयोजनाबद्दल कौतुक वाटले. सुत्रसंचलन फारच मस्त झाले.
मनो, श्रीरंग जोशी आणि संयोजकांचे विशेष धन्यवाद !

@ चौथा कोनाडा: तुम्ही केले तसे स्केच करणे - तेही समोर प्रत्यक्ष व्यक्ती किंवा स्थिर फोटो नसून स्क्रीन वरील हलती बोलती प्रतिमा असताना, एवढ्या कमी काळात - किती कठीण आहे याची चांगलीच कल्पना आहे. असे चित्र करणे खरेच कौतुकास्पद आहे. तुमची चित्रे मिपावर लेख लिहून जरूर टाका. अनेक आभार.

चौथा कोनाडा's picture

24 May 2021 - 6:40 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, चित्रगुप्तजी !
आपल्यासारख्या सिद्धहस्त चित्रकाराने केलेले कौतुक म्हणजे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट !
खरं तर मी अजुन शिकत आहे असं चित्रं काढणं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 May 2021 - 2:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही वेळ सहभागी होता आलं. संयोजकांचे मनापासून आभार आणि अभिनंदन...!

-दिलीप बिरुटे

प्रमोद देर्देकर's picture

23 May 2021 - 2:45 pm | प्रमोद देर्देकर

संयोजनाश्री मनो आणि रंगाशेठ याचे अभिनंदन !

मस्त झालाय कट्टा !

चांदणे संदीप's picture

23 May 2021 - 3:01 pm | चांदणे संदीप

काही अपरिहार्य कारणांमुळे (म्हणजे नेमकी कालच मला लौकर झोप आल्यामुळे) दुर्दैवाने मी ऑनलाईन कट्टा मिसला. :(

रेकॉर्डिंग पाहिले व अजूनच वाईट वाटले.

पुढील कट्ट्याच्या प्रतीक्षेत!

सं - दी - प

जव्हेरगंज's picture

23 May 2021 - 4:33 pm | जव्हेरगंज

व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहिले.
जबरी झाला कट्टा!!

सिरुसेरि's picture

23 May 2021 - 4:45 pm | सिरुसेरि

सुरेख रेकॉर्डिंग . मजेशीर कट्टा .

गुल्लू दादा's picture

24 May 2021 - 12:23 am | गुल्लू दादा

रात्री 8 पर्यंत कट्टा आहे याचा माझा जप चालू होता. ऐनवेळी 2 नातेवाईकांचे कॉल आले. त्यासाठी नाईलाजाने त्यांकडे जावे लागले. आज यु ट्यूब वर बघितल्यानंतर खूप मिस केलं याची जाणीव झाली. पुढचा कट्टा अगदी येणार म्हणजे येणार. बाकी कट्टयाविषयी बोलायचं झाल्यास श्रीरंग सरांचा हसतमुख चेहरा पाहून अगदी प्रसन्न वाटलं (तुमच्याशी मैत्री करायला मला खूप आवडेल). गणेशा सरांचे बिनधास्त बोल आवडले. चौथा कोनाडा सरांचे शीघ्र चित्र फार आवडले आणि ते पाहून आपल्याला का असे येत नसावे याचा हेवा वाटला. बाकी सर्व सहभागी सदस्यांचे कौतुक वाटले. असेच कट्टे अगदी प्रत्येक महिन्याला आयोजित करावे. ज्यांना शक्य होईल ते येतील. पुणे आणि मुंबई मध्ये जास्त कट्टे आयोजित होत असल्याने बाकीच्या शहरातील मिपाकरांसाठी ऑनलाईन कट्ट्याला विशेष महत्व आहे असे मला वाटते. त्यासाठी ते सतत आयोजित व्हावे. ज्यांनी यासाठी परिश्रम घेतले त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद....!

गणेशा's picture

24 May 2021 - 8:00 am | गणेशा

कट्टा भारी झाला..

चित्रे.. गणित.. इतिहास.. सारे काही जबरदस्त होते...
मज्जा आली...

MipaPremiYogesh's picture

24 May 2021 - 12:15 pm | MipaPremiYogesh