ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
18 May 2021 - 9:48 am

मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी.

तांत्रिक बाबी -
०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est)

१) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे.

२) मीटिंग लिंक - येथे क्लीक करा
https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz09

कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल -

१) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल.

२) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल.

३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील.

४) श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति.

५) इतर कुणाला काही विषय मांडता येईल

६) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल.

इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे.

ज्यांना येणे शक्य आहे, त्यांनी प्रतिक्रियांत जरुर कळवावे.

*ज्यांना काही कारणास्तव हजार राहणं जमलं नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग इथे आहे

सुरुवातीला परिचय

चित्रगुप्त काकांची चित्रे इथे सुरु होतात

मनो - पानिपत पुस्तकाबद्दल

श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति

राहिलेल्यांचा परिचय, श्री. बिपीन सांगळे यांची कविता वाचन इतर गप्पा आणि समारोप

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

18 May 2021 - 9:53 am | श्रीरंग_जोशी

ऑनलाइन कट्ट्याच्या आयोजनासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
या कट्ट्याला मी नक्की येणार. या माध्मयातून मिपाकरांशी संवाद साधण्यास उत्सूक आहे.

कुमार१'s picture

18 May 2021 - 9:59 am | कुमार१

मी पण येणार !

उगा काहितरीच's picture

20 May 2021 - 8:30 am | उगा काहितरीच

+1

आनन्दा's picture

18 May 2021 - 10:13 am | आनन्दा

यायचा प्रयत्न नक्की करेन. किमान हजेरी तरी..

यायचा प्रयत्न नक्की करतो

अमर विश्वास's picture

18 May 2021 - 11:07 am | अमर विश्वास

उत्तम कल्पना ... नक्की प्रयत्न करतो

प्रकाश घाटपांडे's picture

18 May 2021 - 11:18 am | प्रकाश घाटपांडे

हो. जमेल यायला. चांगली कल्पना आहे. अशा पद्धतीने अनेक लोक भेटण्याचा योग नक्की येईल व स्नेह वृद्धींगत होईल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

18 May 2021 - 11:27 am | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम उपक्रम.
सर्वानी मिसळ पाव खात हा ऑन्लाईन कट्टा केला तर धमाल येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2021 - 12:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपले प्रतिसाद नेहमीच आवडतात. आपण ऑनलाइन का होईना आल्यास गप्पा मारता येतील.

मिसळपाव खात खात आणि सॉफ्ट ड्रिंक्स घेत घेत मजा येईल. :)

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

18 May 2021 - 12:53 pm | चौथा कोनाडा

सॉफ्टड्रिंक्सची आयडिया भारी आहे, फक्त त्यावेळी वीजांचा कडकडट, धो धो पाऊस पायाजेल, त्यावेळी माईसाहेबांचा आवाज काय जबरदस्त वाटेल.

प्रचेतस's picture

18 May 2021 - 11:37 am | प्रचेतस

सहभागी होणार.

टवाळ कार्टा's picture

18 May 2021 - 11:44 am | टवाळ कार्टा

हिला विचारून सांगतो =))

संजय पाटिल's picture

18 May 2021 - 11:53 am | संजय पाटिल

यावं म्हणतोय.....
बघू कसं जमतय...

समीर वैद्य's picture

18 May 2021 - 11:54 am | समीर वैद्य

नक्की येणार. ह्या उपक्रमासाठी धन्यवाद.

अनन्त अवधुत's picture

18 May 2021 - 12:03 pm | अनन्त अवधुत

शनिवार सकाळ ऑलरेडि बूक्ड आहे त्यामुळे कट्ट्याला येणे अवघड आहे. माझ्याकडुन शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2021 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपावच्या ऑनलाइन कट्यास ९८. १२ % उपस्थित राहण्याचा प्रयत्न करीन. ऑनलाइन कट्टा आयड्या आवडली. ट्राय टू बेष्ट फ्रॉम माय साइड.

संयोजकांचे मन:पूर्वक आभार. उपक्रमास शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

18 May 2021 - 11:16 pm | कपिलमुनी

प्रा.डॉ. असलात तरी विद्वान असल्याचा पुरावा द्या !

गणेशा's picture

18 May 2021 - 12:24 pm | गणेशा

सहभागी होणार...

सर्व ऍक्टिव्ह सदश्यांनी सहभागी व्हावे...:-)

कॉमी's picture

18 May 2021 - 12:25 pm | कॉमी

येणार !
कट्टाप्रेमी कायजू गोजिरा कुठेयत ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2021 - 1:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उगाच आनंदावर विरजन घालू नका प्लीज. त्यांच्या चपला बाहेरच दिसल्या तर बाहेरच्या बाहेर कट मारावा लागेल. ;)

उगाच आमचा उस भारी, द्रांक्षे भारी. ऐकावे लागेल.

-दिलीप बिरुटे

गॉडजिला's picture

19 May 2021 - 12:43 pm | गॉडजिला

....

बेकार तरुण's picture

18 May 2021 - 12:29 pm | बेकार तरुण

येणार नक्की...

योगायोगाने पाचसहा ज्येष्ठ नागरिक आल्याने 'हा ज्येष्ठ नागरिक कट्टा' असा शिक्क बसला. त्यामुळे मी कट्ट्याला बाद. आणि झुम कट्ट्याला दोघेच बोललो श्रीरंग फ्यामली आणि मी. तरी या कट्ट्याला बरीच उपस्थिती करून solidarity का काय म्हणतात ती दाखवावी.

चंद्रसूर्यकुमार's picture

18 May 2021 - 1:39 pm | चंद्रसूर्यकुमार

शनीवारी संध्याकाळी साडेसातला दुसरा झूम कॉल आहे. तो वेळेत संपेल ही अपेक्षा. उशीर झाल्यास तो कॉल संपल्यावर उशीरा का होईना जॉईन व्हायचा प्रयत्न करेन.

मला जरा तांत्रिक बाबी माहीत करून घ्यायच्या आहेत. . मुख्य म्हणजे लप्तोप, मोबैल किंवा इपद वरून त्व वर चस्त करता येईल का ? म्हणजे जरा नीट दिसेल.
इपद = ipad
त्व= TV
चस्त = cast
लप्तोप = Laptop
मोबैल = mobile.
सावरकरांच्या काळात केय्बोअर्द (keyboard) नसल्याने त्यांना मराठी प्रतिशब्द हुडकायला बरेच कष्ट पडले असणार. आता कित्ती सोपे झालेले आहे बघा. इंग्रजी शब्द मिपावर जसाच्या तसा त्य्पे (type) केला की झाला मराठी शब्द तयार. (चोप्य्पस्ते आहेच पूर्वीपासून).

इथे काही उपाय दिलेले आहेत, पहा जमतंय का
https://www.pocket-lint.com/apps/news/151726-how-to-get-zoom-on-your-tv

सरनौबत's picture

18 May 2021 - 3:19 pm | सरनौबत

नक्की येणार. ह्या उपक्रमासाठी धन्यवाद.

MipaPremiYogesh's picture

18 May 2021 - 3:31 pm | MipaPremiYogesh

वाह नक्कीच स्तुत्य उपक्रम

चांदणे संदीप's picture

18 May 2021 - 4:48 pm | चांदणे संदीप

मोजक्याच मिपाकरांशी प्रत्यक्षात भेट झालेली आहे. तेही एक-दोन वेळाच. किमान ऑनलाईन तरी बर्‍याच जणांना भेटणे होईल त्यामुळे या कट्ट्याला नक्की येणार.

सं - दी - प

असा मी असामी's picture

18 May 2021 - 5:02 pm | असा मी असामी

नक्की प्रयत्न करतो

वामन देशमुख's picture

18 May 2021 - 6:07 pm | वामन देशमुख

मी येणार, नक्की येणार, म्हणजे यायलाच हवं, न येण्याचा प्रश्नच नाही, नाही येऊन कुणाला सांगणार, किंबहुना मी तर म्हणतो की मी म्हणजे शंभर टक्के येणारच...

---

पुढाकार घेतल्याबद्धल धन्यवाद!

- कट्टोक्सुक वामन

मिपा ऑलरेडी ऑनलाइन कट्टाच आहे हा समज असल्याने आता ऑनलाइन कट्टा म्हणजे काय ते समजुन घ्यायला हवे म्हणून मी नक्किच हजेरी लावेन.

सुबोध खरे's picture

18 May 2021 - 7:27 pm | सुबोध खरे

हीच कल्पना माझ्या मनात गेले काही दिवस घोळत होती. असा कट्टा आम्ही चुलत भावंडं गेले दीड वर्षे करत आलो आहोत

परंतु आळशीपणा मुळे पुढे काहीच झालं नाही.

असो.

श्री मनो यांचे अभिनंदन.

आणि कट्ट्याला नक्कीच येणार.

सर्वाना एकच विनंती आहे. शक्य असल्यास करोना आणि त्यामुळे होणारा त्रास हा विषय टाळता आल्यास बरे होईल.

जिकडे तिकडे हाच विषय आहे आणि त्यातून कट्ट्यावर पण हाच विषय आल्यास लोकांचा विरस होईल.

करोना नकोच हे अगदी आवश्यक. तसेच अमूक आला, तमूक दिसत नाहीये वगैरेत बराच वेळ जाण्याचा कौटुंबिक झूमट्ट्यात अनुभव आला होता तेही टाळणे बरे.
सर्वांनी आपापली ओळख करून द्यावी. शिवाय विशेष नवीन काही उद्योग करत असल्यास त्याविषयी थोडक्यात सांगता येईल.
या निमित्ताने सुचलेला नवीन शब्दः झूमट्टा.

इरसाल's picture

18 May 2021 - 7:51 pm | इरसाल

सगळ्या मान्यवरांना भेटायची इच्छा आहे. शक्य झाल्यास नक्की जॉइन करणार.

लई भारी's picture

18 May 2021 - 7:54 pm | लई भारी

उत्तम कल्पना! जरूर प्रयत्न करेन.
उगाच शंका - ४० मिनिट आणि १०० लोक हि मर्यादा असेल का?
या दोन्ही बाबतीत आपण पुढे जाऊ अशी आशा आहे मला :-)

लोक-मर्यादा ३०० आणि वेळेवर काही बंधन नाही, आपण ठरवू तिथे थांबता येईल.

नावातकायआहे's picture

18 May 2021 - 8:09 pm | नावातकायआहे

नक्की प्रयत्न करतो!

यश राज's picture

18 May 2021 - 8:13 pm | यश राज

कटट्याला येण्याचा नक्कि प्रयत्न करेन.

चौथा कोनाडा's picture

18 May 2021 - 8:20 pm | चौथा कोनाडा

आयल्ला, कट्टा हौसफुल्ल होणार दिसतंय ! म्हंजे आमी ऐनवेळी यायचं ठरवलं तर जागा मिळणार नाही की काय ?

जास्तीतजास्त किती मिपाकर या ऑनलाईन कट्ट्याला उपस्थित राहू शकतात ?

श्रीरंग_जोशी's picture

18 May 2021 - 8:38 pm | श्रीरंग_जोशी

चकटफू झूम कमाल १०० जणांना मिटिंगमधे प्रवेश करु देते. बिझनेस प्लॅन वाले सबस्क्रीप्शन असल्यास हीच मर्यादा ३०० वा अधिकही असू शकते.

संदर्भः झूम प्रायसिंग.

कुमार१'s picture

18 May 2021 - 8:33 pm | कुमार१

जास्तीतजास्त किती मिपाकर या ऑनलाईन कट्ट्याला उपस्थित राहू शकतात ?

संख्या बरीच असल्यास तंत्रज्ञांनी नियोजन सुचवावे ही वि.

३०० लोक एका वेळी येऊ शकतील अशी सोय आहे, त्यामुळं जागा हाऊसफुल होणार नाही, जरूर या. इतक्या सर्वांना एकदम बोलताना आयोजन कठीण होणार आहे, त्यावर काहीतरी मार्ग काढू.

लंबूटांग's picture

19 May 2021 - 2:19 am | लंबूटांग

> इतक्या सर्वांना एकदम बोलताना आयोजन कठीण होणार आहे, त्यावर काहीतरी मार्ग काढू.

आमच्या ऑफिसमधे मोठ्या मीटिंग्समधे ५-६ जणांच्या Breakout rooms तयार करतात. झूममधे meeting organizer ला करता येतात तयार बहुतेक.

श्रीरंग_जोशी's picture

19 May 2021 - 3:05 am | श्रीरंग_जोशी

झूम मिटिन्ग्जमधे ब्रेक आउट रुमद्वारे सहभागी झालेल्यांची दोन किंवा अधिक गटांत विभागणी झालेली पाहिली आहे

प्रत्येकाने गळ्यात आपल्या आइडी नावाची पाटी अडकवल्यास नाव जाणून घेण्यात वेळ जाणार नाही.

श्रीरंग_जोशी's picture

19 May 2021 - 7:45 am | श्रीरंग_जोशी

किंवा झूमचे पार्टिसिपंट नेम प्रत्येकाने स्वतःचा मिपा आयडीचे ठेवावे.

कंजूस's picture

19 May 2021 - 8:20 am | कंजूस

मी तेच केलं आहे.

भारतीय रात्र ९. म्हणजे फारच रात्र इकडे त्यामुळे नाही जमणार याचे रेकार्डिंग असेल काय नंतर बघायला ?

हो रेकॉर्डिंग करून ठेवतो. अमेरिकेचे दोन्ही किनारे आणि भारत जमवायचं म्हणजे ही वेळ साधायला हवी.

कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल -

१) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल.

२) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल.

३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील.

४) इतर कुणाला काही विषय मांडता येईल

५) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल.

इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे.

जर कुणाकडे मूळ पोस्ट एडिट करण्याचे हक्क असतील, तर हा मजकूर मूळ धाग्यात ऍडवावा ही विनंती.

Bhakti's picture

19 May 2021 - 7:40 am | Bhakti

हेच विचाणार होते.
छान आहे रूपरेषा!

चौथा कोनाडा's picture

19 May 2021 - 12:36 pm | चौथा कोनाडा

उत्तम रुपरेषा !
उत्सुकता आहे !

तिता's picture

19 May 2021 - 7:30 am | तिता

सुन्दर कल्पना. मी येणार. दुबईमधून. दुबईचे कोणी मिपाकर भेटले तर आनंद द्विगुणित होईल

शाम भागवत's picture

19 May 2021 - 1:33 pm | शाम भागवत

झूम व गुगल मीट मध्ये काय फरक आहे?
मी गुगल मीट वापरले आहे.
झूम हे चीनी अॅप आहे का? ते प्रथम इन्टॉल करायला लागते का?

प्रचेतस's picture

19 May 2021 - 3:57 pm | प्रचेतस

झूम आणि गूगल मीट दोन्ही ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी बनवलेले सॉफ्टवेअर आहेत.

अमेरिकन नागरिकत्व असलेल्या मूळच्या चिनी व्यक्तीने बनवले आहे.
इन्स्टॉल न करताही थेट ब्राउझरमध्येही जाऊन बघू शकता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2021 - 4:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण पण व्यक्ती चीनी आहेच ना.... =))

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

21 May 2021 - 10:23 am | शाम भागवत

इन्स्टॉल न करताही थेट ब्राउझरमध्येही जाऊन बघू शकता.

याची नोंद घेतली आहे.
हे फारच छान झालं

कुमार१'s picture

19 May 2021 - 2:20 pm | कुमार१

झूम हे चीनी अॅप आहे का? ते प्रथम इन्टॉल करायला लागते का?
>>>
होय

शाम भागवत's picture

19 May 2021 - 3:42 pm | शाम भागवत

माझा सहभाग नसेल.

Bhakti's picture

20 May 2021 - 7:18 am | Bhakti

Lol =)
का?app चिनी आहे म्हणून
असं काही नसत हो,बाकी तुमची मर्जी!
=)

पाषाणभेद's picture

19 May 2021 - 2:42 pm | पाषाणभेद

मी माझ्या पाभे नावाचा चेहरा कसा काय घेऊन येवू?

कंजूस's picture

19 May 2021 - 4:40 pm | कंजूस

बांंधावा.

उपयोजक's picture

20 May 2021 - 7:17 am | उपयोजक

The thing

चौथा कोनाडा's picture

20 May 2021 - 1:16 pm | चौथा कोनाडा

भारी ...,

आता माझापण डीपी तयार करायला घेतो !

१.५ शहाणा's picture

19 May 2021 - 8:06 pm | १.५ शहाणा

मी नक्की समिल होइन

कंजूस's picture

20 May 2021 - 5:23 am | कंजूस

२) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल.

याचा स्लाइडशो ओडिओ सह यूटूबवर टाकावा. म्हणजे तो पाहून आल्यावर झूमवरचा वेळ वाया जाणार नाही. शिवाय चित्राची माहितीवाला चानेल म्हणून इतर लोकही पाहतीलच.

मी बरेच वर्षांपासून यूट्यूबवर चित्रांचा स्लाईड शो (काही पार्श्वसंगीत आणि काही माझ्या आवाजातील कथन यांसह) करावा या विचारात आहे परंतु ते कसे करावे याबद्दल कहीच ठाऊक नसल्याने ते राहून गेले. या निमित्ताने ते जमले तर छानच होईल. कृपया हे कळवले तर खूप मदत होईल.
बाकी कट्ट्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांना फारशी रूचि नसल्यास त्याऐवजी नंतर सावकाशीने एक लेख लिहीन किंवा खास चित्रकलेत रूचि असणारांचा एक स्वतंत्र झूमट्टा पुढे कधीतरी करता येईल.

कंजूस's picture

20 May 2021 - 9:51 am | कंजूस

आता ठरल्याप्रमाणे तुमचे सादरीकरण होऊ द्याच. ऐन वेळी बदल केल्याने गोंधळ होईल. फक्त हे मी सुचवले की मराठीत असा चानेल असावा.

पिकासोबद्दलचे माधुरी पुरंदरे यांचे पुस्तक वाचले होते तेव्हा मराठीत असल्याने फारच आनंद झाला होता.

श्रीरंग_जोशी's picture

20 May 2021 - 9:55 am | श्रीरंग_जोशी

रेकॉर्डेड माहितीपेक्षा थेट प्रक्षेपण अधिक उस्फूर्त असते. कट्टेकरी प्रश्न विचारु शकतात, दाद देऊ शकतात. कट्ट्यादरम्यान तुमची पेंटिंग्ज पाहणे कट्टेकर्‍यांसाठी पर्वणी ठरेल. कृपया याबाबत पुनर्विचार करू नये.

चौथा कोनाडा's picture

20 May 2021 - 12:37 pm | चौथा कोनाडा

कंजूसराव, उत्तम सुचवणी !

हा पहिला ऑनलाईन कट्टा असल्यामुळे अश्या वेळ वाचवण्याच्या क्लुप्त्या महत्वाच्या आहेत. अर्थात कमी उपस्थिती असेल तर चित्रगुप्त यांची प्रात्यक्षिकासहित महिती पहायला,ऐकायला खुपच आवडेल !!!

आणि चित्रगुप्त यांचा " यूट्यूबवर स्लाईडशो आणि चित्ररसिकांचा स्वतंत्र कट्टा" : १०१ % अनुमोदन !
खुप मजा येईल !

कार्यक्रम आराखड्यात एक विषय नवीन

श्री. अरविंद कोल्हटकर मिपा आणि ऐसी अक्षरे या दोन्ही स्थळांवर अनेकदा माहितीपूर्ण आणि वेगळे असे इतिहास, संस्कृत, गणित इत्यादी विषयांवर लिहित असतात. ते शुल्बसूत्रांतील भूमिति याविषयी बोलतील.

पत्रिकेत ४) क्रमांकावर श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति असा बदल संपादकांना करता आला तर करावा ही विनंती.

तेजस आठवले's picture

20 May 2021 - 9:58 am | तेजस आठवले

नक्की येतो.

तेजस आठवले's picture

20 May 2021 - 11:47 am | तेजस आठवले

लहान मुलान्चे आणि एकुणच सगळ्यान्चेच सध्या होणारे अति स्क्रिन एक्स्पोझर आणि त्याचे परिणाम ह्यावर चर्चा झाली तर ऐकायला आवडेल.

म्या यकदा वडापावची गाडी सिंबायसीस च्या बाहेर लावली होती तिथं अन्कॉन्फरंस सुरु होती..

म्या इचारलं म्हंजे काय ? तो पोट्टे बोलु गेले की तिथ्ठ PHP camp unconference चालु हाय.. मंजे कुनीबी तिथे जमयचं आन पिच्पीतलं काय बी म्हायत असेल तर लगेच बोर्डाव ल्ह्याचं इषय लोकाना आवडला के लगा तुमास्नी मोटी खोली भेटुन जाते अन तुमी प्रेसेंटेशन सुरु क्रायचं ज्याज्या पब्लिकाला तुम्च्या इशयात रस हायि ते आपोपा तुमच्य रुमास्नी गोळा होत्याल

बस आपन हेच ऑनलाइन मिपा कट्याले करयाच्च...

१) एक धागा काढाचा मिपा कट्टा २०२१ लाइव

२) जस जसं पब्लीक येत जाइल आन त्याना काइ इषय असेल लोकांशी बोलाचा तर त्याचे एक सेपरेट रुम बन्वुन त्याचा युआरेल या धाग्याव देचा, जायचं ते जात्याल त्यावं क्लिक करुन...

उदा, चित्रगुप्तजी आलं मिटींगात अन म्हत्लं की मला यावर संवाद सादाय्वडेल की एक संवादगट नामक मिटींग्रुम करायची
१) इशय चित्रक्ला. प्रमुख उपस्थीती चित्रगुप्त.
त्याचा युआरेल

२) इशय लेणी. प्रमुख उपस्थीती प्रचेतस.
त्याचा युआरेल

३) इशय अम्रुतानुभव. प्रमुख उपस्थीती मार्कस गामा.
त्याचा युआरेल

४) इशय कॉफी वीथ सोनेरी पेय. प्रमुख उपस्थीती फक्त बीहारी
त्याचा युआरेल

५) इशय छंद माझा डवखुरा, प्रमुख उपस्थीती फलाना फलाना
त्याचा युआरेल अमका ढिमका...

म्हंजे गर्दी होनार नाय अन ज्यांना निसतं या इशयातुन त्यात जायचय अन कट्याचा आनंद घेयाचा हाय तेंचे बी सोय हुन जाइल

ही पहिलीच वेळ आहे, या वेळचा अनुभव पाहून पुढे करू सुधारणा. खरं सांगायचं तर किती लोक येतील हाच अंदाज नव्हता. कुणाची काय आवड ते तर लांबची गोष्ट झाली. कट्टा हाउसफुल झाला की पुढे सुधारणा करू.

कंजूस's picture

21 May 2021 - 5:54 am | कंजूस

पुढे सुधारणा करू.

११

गॉडजिला's picture

21 May 2021 - 3:44 pm | गॉडजिला

कुणाची काय आवड ते तर लांबची गोष्ट झाली

बराबरै. तसं तर आपण इथंही भेटत आहोत आपल्या आवडी निवडी शेअर करत आहोतच, कट्याच्या अनेक लाभांपैकी एक म्हणजे ज्यांचे लेख आप रोज वाचतो, प्रतिसादतो त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटायला मिळते याचा आनंद घेणॅ. आपण एक्टे नसुन आपल्या आचार विचाराचे/ प्रभाव टाकणारे चार लोकांसोबत एक थोडीशी स्पेस शेअर करता येणे (अर्थात हे करणे काहींचे साध्य नसुन साधनही असु शकते पण तो विषय आत्ता नको) हे उद्देश असल्याने त्यानुशंगाने नियोजन झाले तर मजा येइल कट्याला...

अर्थात माझ्या प्रमाणे मिपाचाही असा कट्टा हा प्रथम प्रयोग असल्याने फार उत्सुकता आहे या सांस्कृतीक कार्यक्रमाबाबत... पोर्बॅबली इट कूड ब्यी ब्रेक्थ्रु ? हु नोज ?

वडाप's picture

20 May 2021 - 1:07 pm | वडाप

हिकडं लावू काय?

.मी येइन, नविन असल्यामुळे ओळख होईल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 May 2021 - 10:19 am | ज्ञानोबाचे पैजार

बरेच दादा लोक येणार असल्याने लैच दंगा होणार असे दिसते,
या ऑनलाईन कट्ट्याला मी पण मुकौपस्थिती लावायचा प्रयत्न करेन.
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

21 May 2021 - 12:13 pm | चौथा कोनाडा

पैजारबुवा,

तुम्ही लिहिलेल्या "मुकौपस्थिती" मुळे माझ्या डोळ्यापुढे आलेलं तुमच्या उपस्थितीचं चित्रं :

HNBDH2234

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 May 2021 - 3:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

हे पाहुन आम्हाला "अ आ आई, म म मका, मी तुझा मामा दे मला मुका" हे गाणे आठवले

पण वरील प्रतिसादात आम्हाला आम्हाला "मुकं करोती वाचालं" यातला मुक अपेक्षीत होता

पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

21 May 2021 - 5:09 pm | चौथा कोनाडा

पैजारबुवा
😂

चरण कुटं हायेत ... पैजारबुवा !

गुल्लू दादा's picture

21 May 2021 - 5:44 pm | गुल्लू दादा

जबरदस्त चित्र टाकलात चौ.को.

वामन देशमुख's picture

21 May 2021 - 5:26 pm | वामन देशमुख
  • कट्ट्यावर सोशल डिस्टंसिन्ग पाळायचे आहे का?
  • कट्ट्यावर मास्क घालून बसायचे आहे का?
  • कट्ट्यावर किती वेळ बसायचे आहे?
  • बसायचेच आहे तर चखणा काय काय आहे?
  • नंतर खायला काय काय आहे?

ह्या ह्या ह्या !!!

चौथा कोनाडा's picture

21 May 2021 - 6:00 pm | चौथा कोनाडा

१. हो. उदाहरणार्थ मंडई, दारूचा गुत्ता अश्या गर्दीच्या ठिकाणाहून कट्टाला उपस्थित राहू नये. घरातून उपस्थित राहिल्यास उत्तम. बायका, मुलांना दुसऱ्या खोलीत बसायला सांगितल्यास १०० % सोशल दिस्तां डिस्तसिंग राखले जाईल.

२. मास्क चालेल. पण बाकीचेही कपडे घालणं अनिवार्य. फक्त मास्क आणि चड्डी/टॉवेलवर बसलोय असं नको.

३. आपण कितीही वेळ बसला तरीही चालेल. आम्ही १ तासाने निघणार.

४. चाखणा आपल्या आवडीचा आणि आपल्या आपणच आणावा.
आम्हाला सँपल कुरिअर करावे. पत्ता व्यानि केलेला आहे.

५. नंतर मिपातर्फे खायला काही नाही. जेवण स्वतच्या जबाबदारी वर करावे. उपाशी पोटी झोपले तरी आम्हाला काही देणेघेणे नाही !

ह्या ... ह्या ... ह्या ...

कॉम्प्युटरला वेबकॅम नसल्यास काय करता येईल? मोबाईलचा कॅमेरा जोडता येतो का?
लोकांचे व्हिडिओ बघून आणि नुसते ऑडिओ ऐकवणे असे काही करता येईल का?

तुषार काळभोर's picture

21 May 2021 - 5:53 pm | तुषार काळभोर

कॉम्प्युटरला वेबकॅम नसल्यास काय करता येईल? मोबाईलचा कॅमेरा जोडता येतो का?
लोकांचे व्हिडिओ बघून आणि नुसते ऑडिओ ऐकवणे असे काही करता येईल का?
>>
कॉम्प्युटर व मोबाईल दोन्हीकडून जॉइन करता येईल. कॉम्प्युटरच्या मोठ्या स्क्रीनवर पाहायचं. मोबाईलवर ऐकायचं, बोलायचं, अन मोबाईलच्या क्यामेर्‍याने दिसायचं.