विजयनगर - उदयास्त

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
4 May 2021 - 9:01 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नमस्कार !

गेली कित्येक वर्षं हंपीला वर्षातून एकदा तरी जातोय. अर्थात या वर्षी करोनामुळे जमले नाही. हंपीवर अनेक पुस्तके वाचली आणि अभ्यासही केला. त्याच्यावर एक दीर्घ लेखही लिहिला. बहुतेकांना तो आवडलाही. पण हंपीचे अवशेष पाहतांना जो त्रास होतो तो मात्र सहन होत नाही. हंपीची अवस्था अशी का झाली याचाही अभ्यास केलाय आणि त्यावर लवकरच एक लेख लिहायचा आहे.

जर भारताचा हंपी व्हायचा नसेल तर ह्ंपीच्या इतिहासाचा अभ्यास अनिर्वार्य आहे. अर्थात हंपीच्या राजवटींमधे सगळ्या प्रकारचे राजे आपल्याला आढळतील. चांगले, वाईट, अगदी भावाचे मुडदे पाडणारे राजेही आढळतील पण एक विसरता येत नाही या राजांनी हिंदू धर्माची पताका फडकत ठेवली ज्याचा शेवट मराठ्यांचा भगवा फडकण्यात झाला. मी हिंदू धर्मावर कितीही टीका केली तरी भारत एकसंध ठेवण्यात हिंदूंचा आणि हिंदू धर्माचा मोठा वाटा आहे, नव्हे त्यामुळेच भारत अजून एकसंध आहे याची मला खात्री पटली आहे. हिंदूंनी हा लढा कसा लढला याचे उत्तम उदाहरण म्हणजे विजयनगरचा लढा.
प्रत्येक इतिहासप्रेमीने वाचले पाहिजे असे हे एक मराठी पुस्तक!

या त्यांच्या त्यागाची अल्पशी परतफेड म्हणून मी पुस्तक लिहिण्याचे ठरवले पण नंतर रॉबर्ट सेवेल यांच्या The Forgotten Empire या पुस्तकाचा अनुवाद करण्याचे ठरवले. कारण माझ्या लेखनात आणि या पुस्तकातील मजकूर जवळ जवळ एकच झाला असता. असो.

आज या पुस्तकाची घोषणा करण्यात मला अत्यंत आनंद होतो आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हे पुस्तक विक्रीसाठी हातात पडेल अशी अपेक्षा आहे.
पुस्तकाचे नाव : विजयनगर - उदयास्त
मूळ लेखक : रॉबर्ट सेवेल अनुवाद: जयंत कुलकर्णी.
प्रकाशन : कॉफी हाऊस
पृष्ठे : २९३ ते ४१०

ज्यांना पुस्तक पाहिजे आहे त्यांनी मला मेसेज करावा. म्हणजे मी जूनमधे संपर्क करेन.

आपला,
जयंत कुलकर्णी

इतिहासलेख

प्रतिक्रिया

सुरसंगम's picture

4 May 2021 - 9:04 pm | सुरसंगम

तूम्ही फक्त स्वतःच्या पुस्तकाच्या जाहिराती करताच मिपा आयडी वापरता काय ?

जयंत कुलकर्णी's picture

4 May 2021 - 9:16 pm | जयंत कुलकर्णी

हो !

श्रीरंग_जोशी's picture

4 May 2021 - 9:19 pm | श्रीरंग_जोशी

या लेखावर ही प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले. कृपया खालिल दुवा उघडा.

जयंत कुलकर्णी यांचे मिपावर प्रकाशित झालेले लेखन
माझ्यासह अनेक मिपाकर व मिपावाचक जयंतरावांच्या लेखनाचे चाहते आहेत.

Bhakti's picture

4 May 2021 - 9:56 pm | Bhakti

अभिनंदन आणि शुभेच्छा!

मुक्त विहारि's picture

4 May 2021 - 9:56 pm | मुक्त विहारि

त्यांचे लेख वाचल्यामुळेच, The Lonest Day, हा सिनेमा चांगला समजला ....

मुक्त विहारि's picture

4 May 2021 - 9:57 pm | मुक्त विहारि

The Longest Day

मुक्त विहारि's picture

4 May 2021 - 9:59 pm | मुक्त विहारि
श्रीरंग_जोशी's picture

4 May 2021 - 9:21 pm | श्रीरंग_जोशी

'विजयनगर - उदयास्त' या नव्या पुस्तकाचे स्वागत.
सदर पुस्तकाची किंडल आवृत्ती काढणार आहात का?
पुस्तक वाचण्याची उत्कंठा आहे.

प्रचेतस's picture

4 May 2021 - 9:58 pm | प्रचेतस

एक प्रत अगोदरच राखून ठेवली आहेच.
मुखपृष्ठावर तलरीगट्ट प्रवेशद्वार आहे असे दिसते :) सुंदर आहे.

गोरगावलेकर's picture

4 May 2021 - 10:42 pm | गोरगावलेकर

गेल्या दिवाळीनंतर हंपीची सहल जवळपास निश्चित होती परंतु करोनाच्या साथीमुळे हुलकावणी मिळाली. बघूया आता या दिवाळीनंतर तरी शक्य होते का ते.
सहलीच्या आधी पुस्तक मिळाल्यास खूप उपयोगी ठरेल. पुस्तकाची प्रत राखून ठेवणार आहे. लवकरच मेसेज पाठवते.

तुषार काळभोर's picture

4 May 2021 - 10:57 pm | तुषार काळभोर

हंपीचं खूप वर्षांपासून कौतुक ऐकलंय.
मिपावर सुद्धा हंपी विषयी पुष्कळ दर्जेदार लेखन झालंय.

अर्थात हंपीच्या राजवटींमधे सगळ्या प्रकारचे राजे आपल्याला आढळतील.
>>
विजयनगर राजवट म्हणजे राजा कृष्णदेव राय हेच एक माहिती आहे. म्हणजे पुस्तक अतिशय विस्तृत असणार यात शंका नाही.

शुभेच्छा!

कॉमी's picture

4 May 2021 - 11:58 pm | कॉमी

नुकतेच तुमचे सायकॉलॉजी ऑफ मनी घेण्यात आले आहे. अजून वाचले नाही.
विजयनगरच्या साम्राज्याबद्दल दुमिंगुश पाईश आणि फेर्नांव नुनिश या दोन पोर्तुगीज समकालीन प्रवाश्याच्या बखरीवरचे (संपादक- वसुंधरा फिलियोझा) एक पुस्तक आमच्या आवडत्या नॅशनल बुक ट्रस्ट ने अनुवादित केले होते, ते काही वर्षांमागे वाचले होते पण फारसे लक्षात राहीले नाही. त्याचे नुकतेच पुनर्वाचन झाल्याने विजयनगर बद्दल विस्तृत माहिती वाचायला आवडेल. पुस्तकाच्या प्रतीक्षेत.

विंजिनेर's picture

5 May 2021 - 7:33 am | विंजिनेर

अभिनंदन! हा ही अनुवाद खिळवून ठेवणारा असणार ह्यात शंका नाही
-('देरसू'पासून जयंतकाकांचा निस्सीम चाहता) विंजिनेर

जयंत कुलकर्णी's picture

5 May 2021 - 8:18 am | जयंत कुलकर्णी

... श्री सुरसंगम यांची चूक नाही. बरेच दिवसात मिपावर मी लिहिले नाही हे सत्य आहे. मधे एकदा विचार आला होता की एखादी कथा लिहावी पण गेल्या काही वर्षात मिपाकरांच्या आवडी निवडी बदलल्या आहेत. अर्थात ते नैसर्गिकच आहे. आता माझे लिखाण नवीन पिढीला आवडायलाच पाहिजे असा माझा बिलकूल आग्रह नाही. मी मिपावर पुष्कळ लिखाण केले आणि मी अनेक वेळा सांगितले आहे की मी लिहू शकतो आणि लोकांना माझे लिखाण आवडते हे मला मिपावरच कळले. मला जेव्हा राज्याचा पुरस्कार मिळाला तेव्हाही मी माझ्या माहितीत हे लिहिले होते. मी एक कादंबरीही मिपावर टाकली होती... ती अजूनही तेथे आहे. मला वाटले एवढे लिहिल्यावर मिपाकर एक दोन माहितीचे लेख खपवून घेतील... असो... श्री सुरसंगमसाहेब... मला क्षणभर वाईट वाटले पण क्षणभरच... माझ्या मनात राग नाही... तुम्हीही मिपावर लिहीत चला आणि मिपाचे साहित्य विश्र्व समृद्ध करा...

प्रचेतस's picture

5 May 2021 - 8:30 am | प्रचेतस

जयंतकाका, मिपाकरांच्या आवडीनिवडी जरी काही प्रमाणात बदलल्या असतील तरी तुमचे लेखन वाचायला सर्वांना आवडतेच. तेव्हा येथे अवश्य लिहीत राहा, तुमचे लिखाण आमच्यासारख्याना मेजवानीच असते.

मुक्त विहारि's picture

5 May 2021 - 11:03 am | मुक्त विहारि

मिपाकरांना दर्जेदार लिखाण आवडते ....

प्रतिसादांच्या संख्येवर, धाग्याचा कस ठरवणे चुकीचे आहे ...

नाहीतर, मोकलाया दाही दिश्या, हे कसदार लिखाण ठरले असते किंवा मी पाडलेल्या जिलब्या कसदार ठरल्या असत्या ...

बदलत्या काळानुसार प्रत्येकाला गुळाची चव समजतेच असे नाही ही देखील असु शकेल...

बेकार तरुण's picture

5 May 2021 - 11:20 am | बेकार तरुण

जयंतकाका, मिपाकरांच्या आवडीनिवडी जरी काही प्रमाणात बदलल्या असतील तरी तुमचे लेखन वाचायला सर्वांना आवडतेच. तेव्हा येथे अवश्य लिहीत राहा, तुमचे लिखाण आमच्यासारख्याना मेजवानीच असते. >>> +१००

साहेब तुम्ही लै चांगले लिहता हो त्यात काही वादच नाही. आणि मी ही तुमचा चाहता आहे.

मला एव्हढंच म्हणायचं होते की तुम्ही इतरांच्या नवोदित लेखावर कधी प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. तुमच्या सारख्या सुप्रसिध्द, अनुभवी लेखकांनी जर नवोदित कलाकाराला मार्गदर्शन केले , त्यांना प्रोत्साहन दिले तर मिपावर अधिक चांगले सकस लेखक तयार होतील आणि मिपाकरांना अधिक दर्जेदार साहित्य वाचावयास मिळेल.

बाकी तुम्ही दुखावले गेले असल्यास जाहिर माफी मागतो.


संपादित

नावातकायआहे's picture

5 May 2021 - 1:20 pm | नावातकायआहे

सुरसंगम साहेब!
प्रतिसाद वाचला. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेउन गप्प बसतो आहे.

आज एका मराठी आणि एका हिंदी म्हणीचा अर्थ अनुभवासकट कळला.

कोणती म्हण असेल बरे ती?

चौकटराजा's picture

5 May 2021 - 9:14 am | चौकटराजा

जकुंच्या एका निरागस धाग्यावर वाद झाला हे वाचून बरे वाटले ! अलिकडे काही लोक इच्छा असूनही मिपावर लिहित नाहीत याचे कारण हे "बरे" वाटणे असेल काय ?

मदनबाण's picture

5 May 2021 - 11:57 am | मदनबाण

जयंत काका, तुमच्या नव्या पुस्तकासाठी खूप सार्‍या शुभेच्छा ! :) आपण इथे लेखन करत राहा, वाचक वाचत असतातच.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja

मुक्त विहारि's picture

5 May 2021 - 1:07 pm | मुक्त विहारि

आणि योग्य तिथे योग्य ते प्रतिसाद, पण देत असतात ...

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

5 May 2021 - 3:28 pm | सौ मृदुला धनंजय...

कुलकर्णी सर नवीन पुस्तकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा....

चौथा कोनाडा's picture

11 May 2021 - 12:21 pm | चौथा कोनाडा

या धाग्यावर सुरसंगम यांचे गार्‍हाणे आणि त्यावर जकु यांचा प्रतिवाद वाचून मिपावरील खिलाडूवृत्तीचा अनुभव आला आणि मिपाकर असल्याचा अभिमान वाटला !

गॉडजिला's picture

11 May 2021 - 12:57 pm | गॉडजिला

जकु यांचा प्रतिवाद वाचून मिपावरील खिलाडूवृत्तीचा अनुभव आला
जकुंनी अक्षरशः मन जिंकलं लोकांचे.

चौथा कोनाडा's picture

12 May 2021 - 11:10 am | चौथा कोनाडा

अगदी बरोबर. मत मांडतानाचा जकुंचा प्रांजळपणा वाखणाण्यासारखा आहे. त्यांनी सुर संगम यांना लेखन करायचे आवताण दिले आहे, बघू काय करतात ते.

गोरगावलेकर's picture

12 Jun 2021 - 11:30 pm | गोरगावलेकर

आज हातात पडले पुस्तक. आता सुरु करते वाचायला

कॉमी's picture

12 Jun 2021 - 11:46 pm | कॉमी

सेम हिअर.

चौथा कोनाडा's picture

14 Jun 2021 - 5:17 pm | चौथा कोनाडा

आज हातात पडले पुस्तक. आता सुरु करते वाचायला

+१