आज काय घडले... फाल्गुन शु. १५ होळी पौर्णिमेचे रहस्य ! फाल्गुनी पौर्णिमेचा दिवस होळी पौर्णिमा म्हणून भारतात प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशी नावे आहेत. या सणाच्या उत्पत्तीसंबंधी एकवाक्यता नाही.

Primary tabs

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 10:21 am

holi
फाल्गुनी पौर्णिमेचा दिवस होळी पौर्णिमा म्हणून भारतात प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशी नावे आहेत.

या सणाच्या उत्पत्तीसंबंधी एकवाक्यता नाही. वसंतऋतूच्या आगमनासाठी हा वसंतोत्सव चालू असतो असाही एक समज आहे. उत्तरेतील.लोक हा उत्सव कृष्णाप्तंबंधी मानतात. बालकृष्णाला विषमय दुग्ध पाजणारी पूतना हिचे होळीच्या रात्रींच दहन करण्यांत आले असा एक विश्वास आहे. महाराष्ट्रांतील लोक मानतात की, पूर्वी ढुंढानामक राक्षसीण लहान बालकांना फार पीडा देत असे, तेव्हां तिला हांकून लावण्यासाठी बीभत्स शिव्या देऊन जिकडे तिकडे अग्नि निर्माण करण्याची वहिवाट पडली आहे. हा सण साजरा करण्याचे प्रकारहि निरनिराळे आहेत. या सणांत प्रकट होणारी अनीति व बीभत्सपणा हळूहळू नष्ट होऊन राष्ट्रवर्धक असे स्वरूप येण्यास सुरुवात झाली आहे. या दिवशी मैदानी व मर्दानी खेळांच्या चढाओढी ठेवून एकमेकांत सामाजिक हितसंबंध निर्माण करण्याची प्रवृत्ति आजकाल वाढली आहे.

होळीसणांत अश्लीलता कां शिरली असावी या प्रश्नाचे उत्तर शोधतांना श्री. काका कालेलकर मार्मिकपणे विचार करतातः

"होळी म्हणजे कामदहन. वैराग्याची साधना. विषयाला काव्याचे मोहक स्वरूप दिल्याने तो वाढतो. त्यालाच बीभत्स रूप देऊन त्याला उघडा नागडा करून त्याचे खरे स्वरूप समाजास दाखवून त्याविषयी शिसारी उत्पन्न करण्याचा उद्देश तर नसेल? सबंध हिवाळाभर ज्याच्या मोहांत आपण सांपडलो त्याची फजिती करून, त्याला जाळून टाकून पश्चात्तापाची विभूति शरीराला चचून वैराग्य धारण करण्याचा उद्देश यांत असेल काय ?"

आणि कामदहनाच्या कल्पनेवर आधारलेल्या या कल्पनेस पुराणांत आधार सांपडतो. मदनदहनानंतर शंकरांनी आपल्या गणांना सांगितले की, "फाल्गुन शु. १५ स मी मदनास जाळले आहे. तेव्हां त्याच दिवशी सर्वांनी होळी करावी." कमी पहा

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

Ashutosh badave's picture

10 Apr 2021 - 10:22 am | Ashutosh badave

होलि