आधीचा भाग:
३. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ भाषाभ्यास व द्रविडी भाषांचे तुलनात्मक व्याकरण
तमिळ भाषा शिकल्यानंतर त्यांनी त्यातील साहित्यावर मनापासून प्रेम केले आणि त्याच्या वैशिष्ट्यावर संशोधन करण्यास सुरवात केली. " द्रविडी भाषा समुह " हा शब्दप्रयोग करणारे ते पहिले भाषा अभ्यासक होते. तमिळ बरोबरच त्यांनी तेलगू, कन्नड आणि मल्याळममधील समानतांबद्दल प्रचंड संशोधन केले. त्यांच्या संशोधनानंतर त्यांनी असे मत मांडले की, द्रविडी भाषांमध्ये तमिळ ही प्रमुख भाषा आणि संस्कृतोद्भव शब्द तमिळ मधून वगळल्यास तमिळ भाषा आणखी सशक्त होऊन आणि वाढू शकेल.
… .. पुढे
रॉबर्ट काल्डवेल यांच्या तमिळ भाषा संशोधनामुळे झालेले सामाजिक आणि राजकीय परिणाम:
रॉबर्ट काल्डवेल यांनी मांडलेल्या द्रविड सिद्धांतामुळे दक्षिणेतील समाजमन ढवळून निघाले आणि त्यांच्या दक्षिणी लोक "मुळ" देशी असण्याचा आणि उत्तरेकडील लोक परकीय असण्याच्या चर्चेला तोंड फुटले. जातीभेद आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ब्राह्मणवादी लोकांचे मोठे प्रतिनिधित्व यामुळे चर्चा टिपेला पोहोचली. यातूनच ब्राह्मण हे मूळ उत्तरेकडील असून त्यांनी संस्कृती, धर्म आणि त्यांचा वारसा दक्षिण भारतातील लोकांवर लादला आहे असा सार्वत्रिक समज रूढ केला गेला / होत गेला. उत्तरेकडील भाषा हिंदी म्हणून हिंदी विरोधालाही धार चढत गेली. उत्तरेकडील राज्ये आणि हिंदी भाषा व्हिलन ठरवली गेली.
ब्राह्मणेतर सामाजिक चळवळ:
यातूनच १९१७ साली जस्टीस पार्टीची स्थापना केली गेली. उत्तरेकडील प्रस्थापित काँग्रेस पक्ष ब्राह्मणधार्जिणा म्हणून काँग्रेसला देखील कडाडून विरोध केला गेला. आणि केंद्रीय संसदीय मंडळात आपले प्रतिनिधी देखील पाठवले नाहीत. या द्रविड चळवळीची द्वाही फिरवून १९१९ साली झालेल्या ब्रिटिश सरकारातील प्रांतीय निवडणुका जिंकल्या. यामुळे दलित चळवळी सशक्त होऊन खालील बाबींमध्ये यश मिळाले:
१. सरकारी नोकरीत विविध समुदायांना आरक्षण दिले.
२. असे कायदे केले गेले ज्यामुळे दलितांना सर्व सार्वजनिक जागा भेदभाव न करता वापरता येतील.
३. ब्राह्मणेतर लोकांना मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी मिळाली.
४. ब्राह्मण पुजारीविना विवाह पद्धती रूढ होऊ लागली, अश्या विवाहांना प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली.
५. देवदासी प्रथा निर्मूलन प्रारंभ
६. भारतातील पहिले महिला आमदार होण्यासाठी महिलांनी निवडणुका लढविण्यास परवानगी देण्यासही या पक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
जस्टीस पार्टीचे संस्थापक: डॉ. सी. नटेसन, टी. एम. नायर त्यागराज चेट्टी व पानगलचे राजे सर पानगंती रामरायानिंगार
जस्टीस पार्टी मधील नेते पेरियार इ. व्ही. रामासामी यांच्या नेतृत्वाखाली १९२५ मध्ये स्वाभिमान आणि सामाजिक सबलीकरणाच्या चळवळ सुरु झाली. त्यांनी "ब्राम्हणवादी हिंदुत्व" हेच दलित समाजाच्या विनाशचे एकमेव कारण असल्याचे प्रतिपादन करत दलित चळवळ अर्थात द्रविड कळघम (द्रविड महासंघ) तळागाळापर्यंत नेली. मद्रास प्रांतात जस्टीस पार्टी ही कॉंग्रेसला मुख्य राजकीय पर्याय म्हणून जोमाने काम करू लागली. १९३० नंतर भारत भर राष्ट्रीय भावना जोर धरू लागली. दोनचार राज्यांपुरते संकुचित धोरण राष्ट्रीय चळवळीपुढे जस्टीस पार्टी तोकडी पडू लागली. १९३७ मधील निवडणुकांत काँग्रेस कडून पराभव पत्करल्यानंतर संघटनेच्या लोकप्रियतेला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली ( नंतर फक्त १९५२ मध्ये यांचा एक प्रतिनिधी निवडून येऊ शकला होता) संघटना सरसकट राजकीय दावणीला बांधण्यापेक्षा सामाजिक सबलीकरणासाठीच प्रतिनिधित्व या आग्रहाखातर उगवत्या अण्णा दुराई सारख्या नेत्यांना राजकीय निवडूणुकीत भाग घेण्यासाठी विरोध करून संघटनेला राजकीय पक्ष होऊ दिले नाही.
अण्णा दुराई आणि पेरियार इ. व्ही. रामासामी:
अण्णा दुराई आणि द्रविड चळवळीची राजकीय वाटचाल:
याचा परिणाम म्हणून अण्णा दुराई यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम् हा नवा राजकिय पक्ष १९४९ साली स्थापन केला. तामिळनाडूमधील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करत द्रविड मुन्नेत्र कळघमने उत्तर भारतीयांच्या कथित वर्चस्वाला आव्हान देण्यास सुरुवात केली. पुढे हाच त्यांचा मुख्य मुद्दा बनत गेला. दक्षिणेकडील चार राज्यांचे एकत्रित वेगळे द्रविडनाडू / द्रविडीस्थान हे स्वतंत्र राष्ट्र करावे अशी देखील आणखी एक द्रमुकची मागणी होती. सुरुवातीला स्वतंत्र द्रविडनाडूची मागणी फक्त तामिळभाषिक प्रदेशापुरतीच होती, नंतर त्यात इतर चार दक्षिणी राज्यांनाही समाविष्ठ करण्यात आले. पण कालांतराने भाषावार प्रांतरचना झाल्याने आणि भारतातून फुटून स्वतंत्र राष्ट्र स्थापन करणे के केंद्रसरकारने अवैध ठरवल्याने ही मागणी द्रमुकला सोडून द्यावी लागली. केंद्र सरकारच्या "त्रैभाषिक" धोरणला अर्थात राष्ट्रभाषेच्या नावाखाली हिंदी लादण्याला) वेळोवेळी नापसंती दर्शवत हिंदी भाषेला कडाडून विरोध केला. आणि याच धोरणाचा पुढचा भाग म्हणून एनईपी-२०२० या राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील "त्रैभाषिक" सूत्राला (कारण त्यात पुन्हा "त्रैभाषिक" धोरणाच्या नावाखाली हिंदी सक्ती होणार म्हणून) त्यांचा विरोध आहे.
चेन्नई मरीना बीचवरील रॉबर्ट काल्डवेल यांचा पुतळा:
१९६८ साली दुसरी आंतरराष्ट्रीय तामिळ परिषद पार पडली. त्यावेळी द्रविडी भाषा समुहाच्या संशोधन आणि लेखन योगदानासाठीचा गौरव म्हणून तामिळनाडू राज्य शासनाने रॉबर्ट काल्डवेल यांच्या सन्मानार्थ चेन्नईच्या मरीना बीचजवळ स्मारक उभं केलं. त्यात "चर्च ऑफ साउथ इंडिया"ने भेट दिलेल्या काल्डवेल यांच्या पुतळ्याचे हजारो लोकांच्या उपस्थितीत अनावरण केले ! त्याचवेळी त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकिट देखील प्रकाशित करण्यात आले. चेन्नईला येणारे देशविदेशातील येणारे बरेच पर्यटक या स्मारकाला आवर्जून भेट देतात !
रॉबर्ट काल्डवेल यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकिट:
१९ व्या शतकातील काल्डवेल यांचा कालखंड आणि २० व्या शतकात रुजलेल्या सामाजिक व राजकीय चळवळींची सुरुवात आणि गेली काही दशके विशेषतः तमिळ लोकांचा केंद्रीय सत्तेशी (कारण केंद्रीय सत्तेत साधारणपणे उत्तरेकडील लोक असतात) वेळोवेळी संघर्ष व हिंदी भाषेला कडवा विरोध हे पाहता रॉबर्ट काल्डवेल यांना “तथाकथित तमिळ अस्मितेचे उद्गाते” असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
--------------------- समाप्त -----------------------------------------------------------------
प्रचि आणि इतर संदर्भ आंजावरून साभार.
प्रतिक्रिया
17 Mar 2021 - 7:59 pm | कुमार१
छान झाली लेखमाला.
22 Mar 2021 - 12:00 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद _/\_ कुमार१ सर !
17 Mar 2021 - 9:57 pm | राघवेंद्र
मस्त झाली लेखमाला. खुप नवीन माहिती मिळाली.
17 Mar 2021 - 10:10 pm | उपयोजक
18 Mar 2021 - 5:18 pm | चौथा कोनाडा
भारी संदर्भ टाकलाय, एकदम सही.
गेली दोन दशकं हिंदी भाषिक लोकांचे नोकरी धंद्यानिमित्त तिकडे स्थलांतर झालेय. हे त्याचंच प्रतिबिंब असणार.
सगळेच राराजकारणी मतपेटी संभाळण्यासाठी विविध भाषिक/ जाती जमातीचे / धर्माचे लांगूलचालन करत असतात.
18 Mar 2021 - 11:04 pm | उपयोजक
भाषाप्रेमी गायपट्ट्यातले हिंदीभाषिक आहेत. ते स्थानिक भाषा शिकत नाहीत.उलट स्वस्त दरात पडेल त्या कामाची 'सेवा' देण्याच्या 'उद्योगामुळे' सगळीकडे पसरुन हिंदी भाषा मात्र अवश्य पसरवतात. इतकी की स्थानिक उत्पादनांवर हिंदीत उत्पादनाचं नाव लिहिलं जातंय. साहजिकच तमिळप्रेमी ग्राहक घटताहेत.
22 Mar 2021 - 12:26 pm | चौथा कोनाडा
ही अतिशोयोक्ती वाटते.
बदलत्या काळात आचीला भारतभर पसरायचं असेल तर हिंदी / देवनागरी लिपीत पदार्थाचं नांव लिहिणं गरजेचं आहे.
फक्त दक्षिणेत विकण्यासाठी वेगळं पॅकींग बनवायचं हा त्या कंपनीचा आर्थिक प्रश्न असेल.
18 Mar 2021 - 5:34 pm | मुक्त विहारि
जिलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा...
18 Mar 2021 - 9:38 pm | चौथा कोनाडा
मुवि साहेब ..
🙂
18 Mar 2021 - 7:32 am | सुखी
फक्त पाकिस्तानच नाहीं इथे भारताच्या आत पण काडी टाकून गेले म्हणायचं मग..
18 Mar 2021 - 7:32 am | सुखी
लेख माहितीपूर्ण होता..__/\__
19 Mar 2021 - 8:56 pm | चौथा कोनाडा
चांगलीच काडी टाकून गेले. ही काडी वर इंग्रजी भाषा, संस्कृती अशी गळ्यात मारली की गल्लोगल्ली इंग्रजी शाळा निघाल्या !
धन्यवाद 🙏 सुखी !
18 Mar 2021 - 11:38 am | प्रचेतस
ही लेखमाला एकदमच सुरेख झाली. खूप काही माहिती मिळाली.
19 Mar 2021 - 8:45 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद,
👍
प्रचेतस !
18 Mar 2021 - 10:30 pm | उपयोजक
भारताच्या दक्षिण टोकाच्या तुत्तुकुडि या बंदरापासून पंधराएक किलोमीटरवर सॉयरपुरम् म्हणून वाळूपठार आहे.तिथल्या शुभवर्तमानप्रसारक मंडळीत १८३९ मध्ये एकोणीस वर्षांचा एक तरुण इंग्रज मिशनरी आला.तो भाषाकोविद एवढा की इंग्लंडातून निघाल्यावर आठ महिन्यांच्या बोटीच्या प्रवासात तमिळ शिकून घेऊन त्याने उतरल्याबरोबर त्या भाषेत प्रवचनही केले.सॉयरपुरमला उन्हाळा असह्य.त्यात तग धरून निर्वेध अभ्यास करता यावा म्हणून हा तरुण पाण्याने भरलेल्या कुंडात बसून वाचन करी.जन्मभर तमिळाईच्या अभ्यासात आकंठ बुडून जाण्याची ही जणू पूर्वखूणच होती.त्याचे नाव त्याच्या मिशनला साजेसेच होते : जॉर्ज उग्लोव पोप डॉ. पोप यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या भारतवासात तमिळची बहुविध सेवा केली.तमिळ व्याकरण , इंग्रजी - तमिळ कोश , नवनीतासारखे काव्यसंग्रह वगैरे संदर्भसाहित्य तयार केले.१८८५ मध्ये ते ऑक्सफर्ड विद्यापीठात तमिळचे प्राध्यापक झाले. नंतर त्यांनी तिरु - क्कुरल ग्रंथाचा छंदबद्ध इंग्रजी अनुवाद केला ; तसाच नालडियार् [चौपाया ] , तिरुवाचकम् [ पुण्यवाणी ] , मणिमेकलै या काव्य नीतिग्रंथाचाही. मरणोत्तर स्मरणशिलेवर आपला उल्लेख तमिळ माणवन् [ तमिळ उपासक ] म्हणून करावा अशी सूचना त्यांनी दिली होती . या थोर तमिळ उपासकाने १९०६ साली भारतातल्या मित्रांना नव्या वर्षाच्या शुभकामना म्हणून तमिळ संघवाङ्मयातील पुरनानूरु [ बाह्य - चतुःशती ] या गाथेतले आगवल [ ' अभंग ' ] इंग्रजीत करून पाठवले होते.
सौजन्य: अडगुलं मडगुलं - वि.श्री खैरे
यांचाही पुतळा मरीना बीचवर आहे.
19 Mar 2021 - 11:17 am | चौथा कोनाडा
अतिशय रोचक माहिती !
साधारणपणे काल्डवेल यांचे समकालीन जॉर्ज उग्लोव पोप हे ही व्यासंगी तमिळ अभ्यासक दिसतात. यांचा ही भाषाभ्यास थक्क करणारा आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठात तमिळचे प्राध्यापक म्हणून काम केले म्हणजे त्यांचे योगदान किती मोठे असावे हे लक्षात येते.
हे उल्लेखनीय आहे !
ब्रिटीश राज्यकर्त्यांनी साम्राज्यप्रसार, धर्मप्रसारासाठी स्थानिक भाषाभ्यासाला भरपुर उत्तेजन दिले जेणे करून स्थानिक लोकांच्या भावनेला हात घालता येवून धर्माची बीजं खोलपर्यंत पेरता येतील. प्रशासनावर घट्ट पकड घेता येईल.
उपयोजक, धन्यवाद जॉर्ज पोप यांच्या रोचक माहितीसाठी.
18 Mar 2021 - 10:41 pm | उपयोजक
कितीही चिकाटी असली तरी त्यामागचे बहुतांश उद्देश हे अजिबात नेक नव्हते. भारताच्या सामाजिक एकतेला बाधा आणणे, ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार ,दुफळी माजवून अस्थिरता निर्माण करुन भारताला आर्थिक गुलामगिरीत ठेवायला मदत करणे तसेच येणार्या युरोपियन धर्मोपदेशकांसाठी भारतीय भाषांमधून धर्मप्रसार करता यावा यादृष्टीने शब्दकोश निर्माण करणे या असल्या घाणेरड्या उद्देशांमुळे त्यांच्या चिकाटीचे तितकेसे अप्रुप वाटत नाही. हेवा मात्र नक्की वाटतो की अशी जबरदस्त सांघिक एकता, चिकाटी भारतीय शिक्षणव्यवस्था,समाजव्यवस्था बहुतांश भारतीय लोकांमधे आजतागायत निर्माण करु शकली नाही.
19 Mar 2021 - 7:29 am | मुक्त विहारि
धर्मांतरण येतेच...
19 Mar 2021 - 10:01 am | बबन ताम्बे
खूप छान लेखमाला. बरीच माहिती मिळाली. तामिळनाडूत दलितांना आरक्षण ब्रिटिश काळातच मिळाले हे माहीत नव्हते. आपल्याकडे त्या काळात फक्त छत्रपती शाहू महाराजांनी हे केले.
तुम्ही खूपच कष्ट घेतलेले जाणवतात सर्व माहिती गोळा करण्यासाठी.
पुढील अशाच माहितीपूर्ण लेखमालेच्या प्रतीक्षेत.
24 Mar 2021 - 8:36 pm | चौथा कोनाडा
मला वाटतं त्या काळात पाश्चात्य जगाशी संबंध, शिक्षण, साक्षरता, यांत्रीकीकरण यामुळे देशभर प्रगती आणि समाजसुधारणेचे वारे सुरु झाले होते.
कित्येक लोक परदेशी शिक्षणाला जाऊ लागल्यामुळे, जगात काय चालले आहे याचे ज्ञान झाल्यामुळे सुधारणेची बीजं रोवली गेली .
आगरकर, फुले, न्या, रानडे यांच्या सारखेच मोलाचे समाजसुधारणेचे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले !
धन्यवाद _/\_
19 Mar 2021 - 8:36 pm | टर्मीनेटर
बऱयाच दिवसांनी मिपावर आल्याने मालिकेचे चारही भाग सलग वाचता आले. मिशनरी लोकांबद्दल माझे वैयक्तिक मत टोकाचे वाईट असले तरी ही माहितीपूर्ण लेखमाला आवडली 👍
19 Mar 2021 - 9:05 pm | मुक्त विहारि
त्यांनी व्यवस्थित पणे, ख्रिश्र्चन धर्माचा प्रसार केला....
म्यानमार, कंबोडिया, थायलंड, कोरिया, जपान, चीन आदी राष्ट्रांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला, पण प्रत्येक राष्ट्रात भाषा मात्र तीच राहिली...
भाषेला धक्का लावला नाही की धर्म प्रसार चांगला होऊ शकतो..
मेक्सिको, हे अजून एक उदाहरण आहे ...
24 Mar 2021 - 8:25 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद _/\_ टर्मीनेटर !
22 Mar 2021 - 12:06 pm | बापूसाहेब
मस्त झाली लेखमाला.
खूप धन्यवाद. !!!
माझ्यासाठी ही सगळी माहिती नवीन होती.
22 Mar 2021 - 12:30 pm | चौथा कोनाडा
बापूसाहेब,
🙏
धन्यवाद !