मातीतली माणसं

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
6 Mar 2021 - 10:26 pm

मला वाटते सोशल मीडिया म्हणजे समुद्र , खुप काही चांगल्या वाईट गोष्टींचा खजिना,आणी बरेच काही.आसेच एक दिवस कोणीतरी मारवाडी मीत्राने मारवाडी समाजाचे सुंदर विवेचन शेअर केले.

मला नाही माहीत की तो मारवाडला कधी गेला होता का नाही पण मी त्या भागात खुप फिरलो आहे. जोधपुर मधे बराच काळ होतो. त्यावेळची परिस्थिती आणी आताचे जोधपूर फारच अंतर आहे. नोकरी बरोबरच संध्याकाळी काँलेजात शिक्षण घेत असल्या मुळे बरेच मारवाडी मीत्र, मैत्रीणी. लग्न समारंभ, सणवार किवा असाच पारीवारीक संबध आला व त्यातुनच काही गोष्टी लक्षात आल्या. नोकरी मुळे सिकर, बारमेर, पोखरण, रामदेवरा, लूणी, मारवाड या भागात पण भरपूर फिरणे झाले. या अनुभवातून माला जे लक्षात आले ते पुढे माडंत आहे. आशा करतो आवडेल. जर एखादा शब्द चुकीचा लिहीला गेला असेल तर टायपिंग मिस्टेक समजावी व त्या बद्दल आगोदरच क्षमा मागतो. उद्देश कुणालाही दुखावण्याचा नाही, फक्त माहीती शेअर करणे हा आहे.

माणूस म्हणजे पंचमहाभूतांच मिश्रण. सहाजिकच त्यांच्या मधले गुण दोष माणसात दिसले नाही तर नवलच. माती हा पंचमहाभूता तील एक घटक , काळी, तांबडी, चिक्कण, रेताड,मुरमाड आणी बरेच काही मातीचे प्रकार आपल्या देशात सापडतात. म्हणूनच विवीध मानवी स्वभाव. अर्थात या विधानाला कुठला ही तर्क किवा शास्त्राधार नाही, असला तर माहीत नाही. माझी आपली समजुत आहे.

राज्याच्यी भौगोलिक रचना जरी कागदोपत्री सुनिश्चित आसली तरी सांस्कृतिक रचना वेगळी आसते.ती रचना व त्याच्या सीमा हे त्या त्या भागाचा इतीहास, बोलीभाषा, खानपान, लोक, स्वभाव विषेश, लोकसंगीत आणी आशाच काही गोष्टी ठरवतात व राज्यातील आपले वेगळेपण सिद्ध करतात.

राजस्थान मधे मारवाड, मेवाड, शेखावटी, हाडोती, मेवात हे वेगवेगळे सांस्कृतिक प्रभाग आहेत. कुठे दाल बाटी चुर्मा तर कुठे गट्टेका साग, भाषा, पोशाख खानपान वेगवेगळे.

मारवाडी बोली भाषा व मारवाड प्रांतात राहणारे म्हणून मारवाडी. मारवाडी समाज हा नेहमीच आर्थिक आधारस्तंभ ठरला आहे मग मुघल, ब्रिटिश आसो किवा आताचा स्वतंत्र भारत.

मारवाडी समाजाचे उदगम स्थान , मारवाड, हा प्रदेश वाळवंट .मार+वाड
मरू हा संस्कृत शब्द म्हणजे वाळू आणी वाड हा राजस्थानी. वाड म्हणजे राहाण्याचे ठिकाण कदाचीत " वास" या शब्दाचा अपभ्रंश असू शकतो. उदाहरणार्थ झाला वाड, काठिया वाड,मार वाड ,बांस वाड, भिल वाड सारखे. बाकी इग्रंजानी त्याला भिलवाडा, बांसवाडा बनवले.

मारवाडी हा उद्दमी व चिकाटीने व्यवसाय करणारा म्हणून प्रसिद्ध . हा गुणधर्म मातीचाच असावा. मारवाड वाळवंटी प्रदेश, पाण्याचे दुर्भिक्ष, शेती व्यवसाय जेमतेमच त्यामुळे उपजीवीके साठी स्थलांतर करण्यास भाग पडले. व्यवसायात निष्ठा आणी प्रामाणीकतेच्या जोरावर स्वतःला सिद्ध करणारा आसा हा समाज.

म्हणतात मातीचा गुण माणसात उतरतो. संपुर्ण प्रदेश नावा प्रमाणेच वालुकामय.म्हणून वाळू प्रमाणेच तीथली माणसं. वाळू सर्वसमावेशक, शेती, बांधकाम, उद्योग, अग्निशामन अशा अनेक ठिकाणी वाळू लागते तीच्या शिवाय संपूर्णतः येवूच शकत नाही . त्याच प्रमाणे मारवाडी सगळ्यात मिळून मिसळून राहाणारा आवश्यक घटक.

Sand dunes, moving sand dunes, ह्या भागातील प्रवाशांचे मुख्य आकर्षण. ज्या प्रमाणे वाळूच्या टेकड्या एकत्रीत आसतात त्याच प्रमाणे मारवाडी समाज संघटीत असतो.

वाळू ज्या प्रमाणे ओला़व्याला चिटकून रहाते त्याच प्रमाणे हा समाज जिथे उद्योग धंद्याची संधी तिथे चिटकून राहातो.

वाळू इतकी हलकी आसते की वारा तीला एका जाग्यावरून दुसर्‍या जागी सहज उचलून नेते. त्या प्रमाणे मारवाडी एका जाग्यावरून सहज स्थलांतर करू शकतो किंवा आपले उद्योग क्षेत्र विनासायास बदली करतो.

मारवाड मधे वाळूची वादळे पाचविला पुजलेली , जर प्रवास केला तर या भागात प्रत्येक घरा भोवताली मातीची जाड भीतं बांधलेली दिसते. या भींतीवर वाहणारी वाळू अडते व तीचा प्रवास थांबतो. घर सुरक्षीत रहाते तसचं या समाजाचं पण, उद्योग म्हणजे अनिश्चितता अनेक संकटं म्हणून या समाजाने आपलं एक निश्चित, मर्यादित क्षेत्र ठरवून त्याच्या भोवती एक निटनेटकी अदृश्य अशी भिंत बांधली आहे व त्याच्या मर्यादेतच ते राहाण्याची कसरत करतात.

आशाच छोट्या वस्त्यांना " ढाणी " म्हणतात,त्या वाळवंटात उठुन दिसतात त्याचप्रमाणे मारवाडी हा समाजाचा प्रमुख घटक आपले वेगळेपण टिकवून आहे.

या भागात अरवली पर्वत रांगा मुळे दक्षिण पश्चिम मान्सून थोडाफार येतो पण तो सुद्धा अनिश्चित, जरी पडला तरी पाणी वाळवंटात जिरून जाते.त्याच प्रमाणे मारवाडी नवख्या गावात सुद्धा वाळवंटातल्या पाण्या प्रमाणे सहज जीरून जातो. मारवाड मधे लूणी ही एकमेव नदी बाकी राजे महाराजानी बनवलेले तलाव हे पाण्याचे साधन. पाण्याची नेहमीच कमतरता त्यामुळे काटकसर, जपून, विचार करून पाण्याचा वापर हे ओघाने आलेच आणी त्याचं पुढे सवयीत रूपांतर व स्वभाव विषेश बनणे स्वाभाविक. हाच गुणधर्म या समाजात भिनलाय. वरकरणी हा समाज कंजूष किवां चिक्कू मारवाडी म्हणून म्हंटलं जाते पण तेच त्यांच शक्तिस्थळ आहे हे मानावे लागेल.

हिशोब, चोख व्यवहार ,पारदर्शकता व परिस्थिती चे भान नेहमीच राखणारा , कितीही जरी संकटात सापडला तरी मुठीतून निसटत्या वाळू प्रमाणे स्वतःला सोडविण्याची क्षमता असलेला हा समाज म्हणजे कबीरदासानीं म्हटल्या प्रमाणे.

" ना काहू से दोस्ती,न काहू से बैर।
कबीरा खड़ा बाज़ार में, मांगे सबकी खैर, .."

या समाजातील गृहीणी आपल्या धन्याला साजेशा. पुरूष उद्योग सभांळतो तर त्याची धर्मपत्नी घर गृहस्थी.

" आपरो धनी ,आपरो छोकरो ते आपरो श्रीहरी " आसा यांचा स्वभाव.

जोधपूर, बारमेर,जालोर,नागोर,सीकर,पाली आणी मारवाड जिल्हे मारवाड म्हणून ओळखले जातात. मारवाडी नुसतेच उद्योग व्यवसाय करणारे म्हणून जनसामान्यांना माहीती पण ते तीतकेच कलोपासक, "ह़वेली" त्यांची भव्यता, कलात्मकता, भित्तीचित्रे ही प्रवाश्यांचे मुख्य आकर्षण. पटवाओकी हवेली,नाथामलजी की हवेली अशा कितीतरी हवेल्या प्रसिद्ध आहेत. बिर्ला, बजाज, डालमीया आसे कित्येक सधन, संपन्न उद्योगपती आपल्याला माहितीच आहे.

थोडक्यात लिहीण्याचा उद्देश म्हणजे मारवाडी समाज हा आपल्या देशाचा कुबेर आणी प्रगीती मधे अग्रणी आहे हे मानले पाहिजे.

समाजलेख

प्रतिक्रिया

शेखरमोघे's picture

7 Mar 2021 - 5:18 am | शेखरमोघे

छान वर्णन - अजूनही या भागाबद्दल बरेच लिहिण्यासारखे असावे. माझ्या थोड्याश्याच प्रवासात नजरेत आलेले काही स्थलविशेष

शेखाव(टी)ती: १९ व्या शतकात रेल्वेमार्ग आणि मुम्बई/कराची बन्दरे यान्चा वापर वाढल्यावर या भागातून जाणार्‍या वाटान्चा व्यापारी कामाकरता वापर कमी झाला आणि पूर्व भारत, उत्तर भारत इत्यादी भागातून अरबी समुद्राकडे मुख्यत्वे उन्टान्चा वापर करून जाणारा माल आणि त्यामुळे शेखावतीची होणारी भरभराट हळू हळू कमी होत आता फक्त एकेकाळच्या व्यापार्‍यान्चे वैभव दर्शवणार्‍या शेखावतीतील हवेल्या आताTourist Attraction म्हणून शिल्लक आहेत.
हवेल्या आणि गढ्या: एकेकाळच्या लहान मोठ्या राजे, सरदार, अधिकारी आणि गावप्रमुख यान्च्या, सुरक्षितता आणि वैभव या दोन्ही करता बान्धल्या गेलेल्या वेगवेगळ्या तर्‍हेच्या इमारती आता तारान्कित Hotels म्हणून जोरदार (कोरोनाच्या आधी) धन्दा करत आहेत.

सोत्रि's picture

7 Mar 2021 - 6:05 am | सोत्रि

सुरस लेखमाला होऊ घातलीय राजस्थानी अनुभवांवर, येऊद्या अजून!

- (कोकणातल्या मातीतला) सोकाजी

कंजूस's picture

7 Mar 2021 - 9:08 am | कंजूस

पण एक पर्यटक म्हणून. तुम्ही तिथे काही वर्षं राहिलात आणि मारवाडी समाजात मिसळलात. तुम्हास मारवाड अधिक समजला. लेखातून ते जाणवते.
पर्यटकांच्या भारी क्याम्रातील फोटोंतून मारवाड बघणे आणि तिथे राहून समजणे खूप अंतर आहे.
किरण नगरकरांच्या cuckold, jaisa यासारख्या कथा कादंबऱ्यांतून थोडीफार कल्पना येऊ शकेल.

जोधपूर,जैसलमेर,बारमेर हा वाळवंटी भाग अजून पाहायचा आहे.
मारवाडने परकी आक्रमणं पहिली झेलली आहेत. ब्रिटिश आल्यावर जैसलमेरमधून होणारा व्यापार बंद पडल्यावर ते लगेच चैन्नई, मदुराई, कोची, आणि कोलकात्यास गेले आणि पुढे काय झाले ते आपण पाहतोच आहे.

सरकारकडे कोणतीही सवलत मागायला न जाणारे दोन समाज - पारशी आणि मारवाडी.

कंजूस's picture

7 Mar 2021 - 9:10 am | कंजूस

#jaisa#x - Jasoda

मुक्त विहारि's picture

7 Mar 2021 - 11:16 am | मुक्त विहारि

रोचक आहे

अजून लिहा

तुषार काळभोर's picture

7 Mar 2021 - 11:33 am | तुषार काळभोर

छोट्या वस्त्यांना " ढाणी " म्हणतात,

>>
ओह, वाघोली मध्ये राजस्थानी गावावर आधारित रिसॉर्ट सारखं ' चोखी ढानी' आहे. = " चांगलं गाव"= "आटपाट नगर"

उपयोजक's picture

7 Mar 2021 - 12:37 pm | उपयोजक

म्हणजे कोणीतरी वारल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल शोक करणार्‍या व्यावसायिक स्त्रिया. हा समाज का अस्तित्वात आला असावा? इतका व्यवहारी?

राजस्थानमधील पटवोंकी हवेली , सहेलीयोंकी बाडी , हवामहल , राज मंदीर चित्रपटगॄह हि ठिकाणे प्रेक्षणीय आहेत .