थोतांडवादी

Primary tabs

आनन्दा's picture
आनन्दा in जे न देखे रवी...
5 Mar 2021 - 6:08 pm

अरे थोतांड थोतांड
कसे रचले कुभांड
धागा वाचता वाचता
पसरले की भोकांड

सारे भोकांड पंडित
झाले की हो एकत्रित
आणि लागले उकरू
काहीतरी विपरीत

करोनाच्या काळजीने
जीव झाला माझा अर्धा
ढवळ्या पवळ्याच्या जोडीने
सुरू उलटीची स्पर्धा

आले पंडित प्रकांड
कधी उकरोनी कांड
कुणी म्हणे नोटकांड
कोणी म्हणे नॉटिकांड

परी कसे विसरले
बोलायला अटकांड
भुलले वासनाकंड
विझवले अग्निकांड

जीव पुरता शिणला
सारे थोतांड वाचून
शुक्रवार आहे चला
येऊ पेट्रोल टाकून

विडम्बनविडंबन

प्रतिक्रिया

खेडूत's picture

5 Mar 2021 - 6:16 pm | खेडूत

हे हे... चान!

पेट्रोल फक्त टाकायचं की वर काडी सुद्धा, ते नाही लिहिलंय..!

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 8:22 pm | मुक्त विहारि

त्यामुळे, काडी लावायची गरज नाही

आम्ही पेट्रोल टाकणार त्याला आम्ही जाबाब्दार... काडी टाकली की तुम्ही जबाबदार ... हाकानाका . . .

माझं पेट्रोल तुमची जबाबदारी :)

रंगीला रतन's picture

5 Mar 2021 - 7:06 pm | रंगीला रतन

भारीच की.

आमचा शनिवार असतो