पौष शु. ४ या दिवशी लंकेचा राजा रावण याचा धाकटा भाऊ विभीषण आणि रामचंद्र यांची भेट झाली.
लंकेला आग लावून मारुति गेल्यानंतर रावण पुढे काय करावें या विचारांत असतां बिभोषणाने सुचविले- "राम धर्माने लढत आहे. तेव्हां युद्धाग्नि पेटण्यापूर्वीच त्याची धर्मपत्नी परत करावी." पण मदोन्मत्त झालेला रावण, कुंभकर्ण, इंद्रजित् यांना हा सल्ला काय म्हणून पसंत पडावा ? शेवटी "बंधो, धर्माचा मार्ग सोडून आपण वागत आहांत, नीतीचे आणि हिताचे बोलणें तुम्हांला रुचत नाही" असे म्हणून विभीषण तडक रामाकडे येण्यास निघाला. उत्तम अलंकार घातलेला, गदा, खड्ग, आदि आयुधे घेतलेला राक्षस पाहतांच वानरसैन्यांत गडबड उडाली, परंतु बिभीपणाने समजाविलें, 'वानरांनो, मरणाऱ्याला जसे औषध रुचत नाही, तसेच माझा उपदेश रावणात पचला नाही, आज मी रामचंद्रास शरण आलो आहे. -" ही वार्ता ऐकून सुग्रीवादि वानरांचा बिभीषणावर विश्वास बसला नाही; पण रामचंद्रांनी म्हटले, "सुग्रीवा, शरणागताला अभय द्यावे. त्याचा त्याग करूं नकोस, मग तो बिभीषण असो वा रावण असो." त्यानंतर बिभीषण पुढे झाला आणि त्याने रामाच्या पायांवर डोके ठेवून 'आत्मनिवेदन' केले. रावणाच्या सामर्थ्याचंहि खरे वर्णन त्याने केले. आणि म्हटले, " लंकेवर हल्ला करून राक्षसांचा नाश करण्यास मी तुम्हांस जिवापाड साह्य करीन." आणि यानंतर राम-बिभीषण यांनी एकमेकांना आलिंगन दिले. रामाज्ञेवरून लक्ष्मणाने समुद्राचे पाणी आणले. ते घेऊन राम बोलले रावणाला प्रहस्त इंद्रजितासह ठार करून तुला लंकेच्या राज्यावर बसवनि. हे पहा आतांच राज्याभिषेक करतो. तेव्हां सर्वे वानरांना 'धन्य राजा रामचंद्र' म्हणून रामचंद्राच्या औदार्याचा जयघोष केला. या राज्याभिषेकानंतर राम, लक्ष्मण, सुग्रीव, विभीषण, अंगद, हनुमान, इत्यादि लोक समुद्र कसा ओलांडावा याचा विचार करण्यास बसले आणि त्या दृष्टीने तयारीस प्रारंभ झाला.
प्रतिक्रिया
17 Jan 2021 - 8:15 pm | कानडाऊ योगेशु
चित्राची शैली कुठली आहे? राम लक्ष्मणाला दाढी दाखवली आहे.ती ही आधुनिक पध्दतीची.
मला हा प्रश्न नेहेमी पडत आलेला आहे कि राम लक्ष्मणाची जी पारंपारिक चित्रे असतात त्यात त्यांना नेहेमीच तुळतुळीत अशी दाढी केलेली असावी असेच का दाखवतात बरे?
18 Jan 2021 - 9:36 am | प्रचेतस
चित्रकाराची सही बाळासाहेब १९१२ अशी दिसते आहे, औंध संस्थानचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी आहेत.
17 Jan 2021 - 8:58 pm | टवाळ कार्टा
पौष शु. ४ म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार कोणती तारिख