मार्गशीर्ष व. १४ जोगा परमानंदांची समाधि ! शके १२६० च्या मार्गशीर्ष व. १४ रोजी प्रसिद्ध भगवद्भक्त जोगा परमानंद यांनी बार्शी येथे समाधि घेतली.

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
12 Jan 2021 - 11:17 am

आज काय घडले...

joga paramanand

तेराव्या शतकात परमार्थाचे पीक सर्वत्र सोळा आणे आलेले होते. जोगा परमानंद तेली जातीत निर्माण झाले. परमानंद हे यांच्या गुरूचे नांव आणि जोगा हे यांचे स्वतःचे नांव. हे बार्शीस रहात असत. तेथे असलेल्या भगवानाच्या मंदिराकडे ते रोज गीतेतिल एक श्लोक म्हणत, नमस्कार घालीत जात असत. अंगाला खडे टोचूं नयेत म्हणून एका भाविकाने त्यांना उंची पितांबर नेसवला. त्याची काळजी घेण्यासाठी जोगा नमस्कार जपून घालू लागले, त्यास देवळांत जाण्यास उशीर झाला. आरती केव्हांच होऊन गेली होती. देवाच्या भजनाच्या आड येणारा पीतांबर त्यांनी फाडून टाकला! देवाला गरिबी आवडते, श्रीमंती नाही. पंढरीनाथाचा प्रेमळ भक्त म्हणून जोगा प्रसिद्ध आहेत. सत्संगाची त्यांना अत्यंत प्रीति होती. यांची उपलब्ध कविता थोडी परंतु फार प्रेमळ आहे. 'लावण्यगुणसागर' परमात्मा हृदयांत प्रगटल्यावर जी अवस्था होते, ती त्यांनी
"मेघश्याम पाहता आपोआप । डोळ्यां लागले वडप ।
अष्टहि सात्त्विकांचे रोप । हृदयआळां उगवलें ।।
भक्तिभावें ओल्हावलें । प्रेमफळासी पैं आलें ।
नवविधा हे पिकलें । परमाब्द म्हणे जोगा।
या अभंगांत सांगितली आहे. जोगा परमानंदांना परमेश्वरभक्तीबरोबरच संतसंगाचीहि विशेष आवड होती. 'रोमांच खरवितु खेदाचिदु डळमळितु । पाहता नेत्र उन्मीळितु' अशी अवस्था व्हावी, अष्ट सात्त्विक भाव प्रगट व्हावेत आणि प्रेमभरित अंतःकरणांत देव प्रगटावा, अशी यांची इच्छा होती. ‘राया विठोबावे डिंगर प्रेमें बोधले डुल्लती', असे संत प्रत्यक्ष सचिदानंदाचियामूर्ति' आहेत, संत हे 'माझे माहेर' आहे, अशी यांची भावना असे. जोगा परमानंदांच्या काळांत सर्वत्र 'ब्रह्मविद्येचा सुकाळु' झाला होता. पंढरीच्या विठोबाचे भक्त सर्व जातीत निर्माण होऊन त्यांनी समाजांत सत्प्रेरणा निर्माण केली.
-७ ऑक्टोबर १३३८

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

निनाद's picture

13 Jan 2021 - 11:28 am | निनाद

उत्तम ओळख करू दिली. लेख अजून मोठा असता तरी चालले असते.
असे अजून येऊ द्या.

चौथा कोनाडा's picture

13 Jan 2021 - 5:32 pm | चौथा कोनाडा

या संताबद्दल प्रथमच वाचण्यात आले.
छोटेखानी पण उत्तम लेखन. धन्यवाद !