मार्गशीर्ष व. ७ ला श्रीहनुमान रावणाच्या लंकेमध्ये असणाऱ्या सीतेचा शोध लावून परत रामरायापाशी आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला.
लंकेंत रावणाच्या अंतःपुरांत असणाऱ्या अशोकवनांतील सीतेचा शोध मोठ्या युक्तीने हनुमानाने लावला आणि तिला रामाची सर्व हकीकत सांगितली. रामास सांगण्यासाठी तिचाहि निरोप घेतला. सीतेचा शोध लावून कर्तव्य केले आणि लंकादहन करून आपला पराक्रम शत्रूंनाहि दाखविला. आणि आतां रामाकडे येण्यासाठी तो अरिष्ट नावाच्या पर्वतावर चढला, व तेथून त्याने उड्डाण घेतले. आणि थोड्याच अवर्धीत उत्तर किनाऱ्यावर तो येऊन ठेपल्यावर जांचवान, अंगद आदींनी त्याचे स्वागत केले. त्याच्या कामगिरीचा सर्वांनी गौरव केला. आणि यानंतर सारी मंडळी राम, लक्ष्मण व सुग्रीव हे ज्या ऋष्यमूक पर्वतावर होते त्या ठिकाणी आली. हनुमानाने सीतेसंबंधी सर्व प्रकार रामरायाला निवेदन केला. "धरणीवर बसलेली, सारखा निःश्वास टाकणारी, रावणाविषयीं अत्यंत क्रोध व अनादर असलेली व मरणास तयार झालेली, अशी सतिा मी पाहिली...मी तिचे समाधानहि केले की, वानरांचा राजा सुग्रीव बलाढ्य आहे, माझ्यासारखे शेकडों बलाढ्य वरि त्याच्याजवळ आहेत. या सर्वांच्या साहाय्याने रामलक्ष्मण रावणाचा नाश करून तुझी मुटका करतील" याप्रमाणे श्रीरामचंद्र व हनुमान यांचे आणवी या बाबतीत संभाषण झाल्यानंतर रामचंद्र मारुतीची स्तुति करून म्हणाले, " हनुमंता, तूं जें काम केलेंस ते दुसरा कोणीहि करूं शकला नसता. शंभर योजनें रुंद समुद्र ओलांडून जाण्याची शक्ति तुझ्याशिवाय किंवा गरुडाशिवाय दुसऱ्या कोणासहि नाही." असे म्हणून रामाने मोठ्या प्रेमाने मारुतीस आलिंगन दिले. यानंतर सर्व जण पुढच्या तयारीस लागले. मोठ्या प्रयासाने सेतु बांधण्यात आला. लक्षावधि वानरसेना त्यासाठी खपत होती.