नार्को ! एक दिलखुलास मुलाखत...

जीएस's picture
जीएस in जनातलं, मनातलं
25 Nov 2008 - 7:17 pm

हेमंत करकरे यांनी काल अतिरेक्यांशी सामना करतांना हौतात्म्य पत्करले. केवळ दोनच दिवसांपूर्वी मी एकंदर एटीएसच्या कारभाराबद्दल एक उपहासात्मक मुलाखत लिहिली होती.

त्यांचा आता मृत्यू झालेला असतांना इतका ताजा लेख इथे असणे मला माझ्या हिंदू संस्कारांमुळे अनुचित वाटते म्हणून तो लेख अप्रकाशित करत आहे.

खालील प्रतिक्रियांना मी प्रतिसादात उत्तर देत आहे.

समाजलेख

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

25 Nov 2008 - 7:35 pm | लिखाळ

>अरे या केकताबाईला बाहेर घालवा आधी, कितीवेळा सांगितले की बालाजीकडून स्क्रिप्ट घेउ नका म्हणून... <<
>हो, आता नवा आरोप, आरोपी वा थिअरी सुचवा आणि हजार रुपये मिळवा ही योजना सुरू केली आहे त्याला प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे. <<
:)
गडकरींकडून प्रेरणा, नावातला डी, छू, लाजबिज सोडदेसाई, आम्ही आणि कुरकुरे संवाद फारच भारी...ईटीएस पण मस्त !!
जोरदार..

-- लिखाळ.

महेश हतोळकर's picture

25 Nov 2008 - 9:05 pm | महेश हतोळकर

कुरकुरीत झालाय!

झकासराव's picture

25 Nov 2008 - 10:10 pm | झकासराव

=))
जीएस व्यंगात्मक रित्या लिहिल आहेस पण अगदी जळजळीत प्रश्न आहेत हे.
अतिशय योग्य फॉरमॅट वापरला आहे. :)

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

भास्कर केन्डे's picture

27 Nov 2008 - 6:15 am | भास्कर केन्डे

श्री. झकासराव,

क्षमा असावी. पण जीएस तुमच्या आमच्या पेक्षा वयाने तसेच (सामाजिक) कर्तूत्वाने मोठे आहेत. तुम्हाला कदाचित ते महित नसेन. पण त्यामुळे माहिती होईपर्यंत तरी सरळ आरे तुरे करू नये असे वाटते.

त्यांना आरे-तुरे ची भाषा वापरु नये अशी विनंती.

स्नेह आहेच वृद्धींगत व्हावा.

आपला,
(नम्र) भास्कर
ता. क. - कृपया हा सल्ला वैयक्तिक समजून राग मानून घेऊ नये ही नम्र विनंती.

भास्कर केन्डे's picture

27 Nov 2008 - 6:16 am | भास्कर केन्डे

बाकी तुमच्या प्रतिसादाशी सहमत.

टारझन's picture

25 Nov 2008 - 10:15 pm | टारझन

निम्म्यातून वाचायचं सोडलं

- टारझन

दिनेश५७'s picture

25 Nov 2008 - 10:33 pm | दिनेश५७

मी दोन वेळा वाचलं. अजूनही वाचणार. विचार करायला लावणारं.

भास्कर केन्डे's picture

25 Nov 2008 - 10:54 pm | भास्कर केन्डे

जी एस यांचे लेखन आम्हाला त्यांच्या धारदार शैलीमुळे फार आवडते. लेखनातून सामाजिक प्रश्नांवर जीएस जसा घणागाती हल्ला हल्ला करतात तसा या मराठी संकेतस्थळांवर कोणालाही जमला नाही असे आमचे मत.

मालेगाव स्फोटांचा तपास हा सुद्धा एक ज्वलंत सामाजिक प्रश्न बनला आहे. सरकारी अधिकारी व खुद्द सरकार मर्यादा सोडून निवडनुकांवर डोळा ठेऊन या प्रश्नातून घाणेरडे राजकारण करत आहे हे ढळढळीत सत्य समोर येत आहे. विषय मांडणीसाठी निवडलेली कल्पना अफलातून आहे. पण या विषयावर जीएस यांच्या लेखाला आणखी धार हवी होती असे वाटते.

आपला,
(नम्र चाहता) भास्कर
आम्ही येथे वसतो.

निखिलराव's picture

26 Nov 2008 - 12:58 pm | निखिलराव

खरच मस्त लेखन, ज्वलन्त प्रश्न खुप चाग्ल्या प्रकारे हाताळला आहे.

Ganesh R Walunj's picture

26 Nov 2008 - 1:07 pm | Ganesh R Walunj

वाचताना ए ति एस ने केलेला सर्व प्रकार लक्शात येतो.
अशाच प्रकारे झनझनीत लिखान द्याल अशीच आपल्या कदुन अपेक्शा

योगी९००'s picture

27 Nov 2008 - 3:59 am | योगी९००

शेवटी करकरे देशासाठी शहिद झाले.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

भास्कर केन्डे's picture

27 Nov 2008 - 6:08 am | भास्कर केन्डे

काल पर्यंत कुकुरेंवर छी थू करणारे सगळे देशबांधव आता या शहिदाच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थणा करत आहेत. आपण पण किती हळवे असतो ना? साध्वीवर कुरकुरे चमूने केलेले अत्याचार पुढे मागे सिद्ध होतील (?) तेव्हा पुन्हा कुरकुरे शहीदांच्या यादीतून राजकारण्यांचे तळवे चाटणार्‍यांच्या यादीत...

जे जे होईल ते ते पहावे...

हे राम!

कोलबेर's picture

27 Nov 2008 - 6:13 am | कोलबेर

काल पर्यंत कुकुरेंवर छी थू करणारे सगळे देशबांधव आता या शहिदाच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थणा करत आहेत. आपण पण किती हळवे असतो ना?

करकरेंच्यावर कसलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले हे मात्र निर्विवाद सत्य आहे. अजुन त्यांच्या बलिदानाला काही तास देखिल झाले नसताना "काल पर्यंत कुकुरेंवर छी थू करणारे सगळे देशबांधव" हा उल्लेख अतीशय खटकला.

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 7:30 am | आजानुकर्ण

अगदी कालपर्यंत करकरेंना शिव्या घालण्यात पुढे असलेले हिंदुत्त्ववादी आता काय भूमिका घेतात हे पाहत होतो. मुसलमान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात करकरे मृत्युमुखी पडल्याने ह्या अतिशय वाईट प्रसंगात तथाकथित हिंदुत्त्ववाद्यांचेही थोबाड फुटले आहे. आजचा सामना वाचा. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय हे कळेल. निष्पाप नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी आपले प्राण दिलेल्या करकरे व एटीएसच्या निषेधार्थ शिव(राळ)सेनेने १ डिसेंबरला महाराष्ट्र बंद चे आवाहन केले आहे. बघू आता तरी डोके ताळ्यावर येते का ते.

आपला
(सुन्न) आजानुकर्ण

अभिजीत's picture

27 Nov 2008 - 6:20 am | अभिजीत

क्रुपया हा लेख काढावा.
आता यावर कोणतेही भाष्य करणे चुक आहे.
- अभिजीत

भास्कर केन्डे's picture

27 Nov 2008 - 6:33 am | भास्कर केन्डे

का काढावा?

एक भारतीय म्हणून पोलिसांच्या बलिदानाचे दु:ख सर्वांप्रमाणे मला सुद्धा झाले आहे. त्या अतिरेक्यांचा संताप आला आहे. जिवानिशी गेलेल्या निष्पाप जनसामान्यांच्या रक्ताचे फोटो बघून जीव कासावीस होत आहे.

पण हा मुद्दा सर्वस्वी वेगळा आहे. साध्वीला अश्लील सीडी ऐकवने, जीव तळहातवर घेऊन देशसेवा करणार्‍या लष्करी अधिकार्‍याच्या पत्नी-मुलींवर बलात्कार करण्याच्या धमक्या देणे हे सगळे एक संस्था म्हणून त्यांना माफ करता येते का? भावनेच्या आहारी जाऊन आपण त्या घटनांची चौकशी थांबवता कामा नये.

शहिद हेमंत करकरेंच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे काय उद्योग चालू होते हे राहू देत की सर्वांच्या समक्ष. लगेच त्यांना महात्मा बनवायची घाई का?

आपला,
(सध्या मुंबईत चाललेल्या भयंकर प्रकाराने दु:खी परंतू भानावर असलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

कुंदन's picture

27 Nov 2008 - 6:10 pm | कुंदन

>>साध्वीला अश्लील सीडी ऐकवने, जीव तळहातवर घेऊन देशसेवा करणार्‍या लष्करी अधिकार्‍याच्या पत्नी-मुलींवर बलात्कार करण्याच्या धमक्या देणे

याबाबत खरेच काही ठोस पुरावा उपलब्ध असल्यास कृपया दुवा द्यावा.

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 7:31 am | आजानुकर्ण

एका विशिष्ट विचारसरणीची मनोवृत्ती दर्शवणारे हे लेखन काढू नये अशा मताचा मी आहे.

आपला
(निग्रही) आजानुकर्ण

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Nov 2008 - 6:32 pm | llपुण्याचे पेशवेll

आजच्याच सकाळला बातमी आहे की 'गुजरात पोलिसानी महाराष्ट्र पोलिसाना ६० अतिरेकी मुंबईत घुसायच्या तयारीत असा संदेश ५ दिवसापूर्वीच दिला होता'. पण आमचे सरकार मात्र साध्वीच्या पाठी लागले होते. करावे तसे भरावे लागते. (दुर्दैवाने इथे मात्र जनतेला भरावे लागले.(असो या लोकानाही ह्या जनतेनेच निवडून दिले होते ना!))
हे अधिकारी केवळ माझ्या महाराष्ट्राचे होते म्हणून मला त्याचे दु:ख वाटले.
या अतिरेकी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्वच शूर पोलिस आणि लष्कराच्या जवान वीराना श्रध्दांजली.
पुण्याचे पेशवे

सर्किट's picture

27 Nov 2008 - 9:00 am | सर्किट (not verified)

हेमंत करकरेंच्या अतिरेक्यांकडून घडलेल्या हत्येच्या आधी, स्वयंसेवकांनी करकरेंवर काय आरोप केले होते, हे सर्वांच्या नजरेसमोर रहावे.

म्हणून हा लेख काढू नये.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

बगाराम's picture

2 Dec 2008 - 8:37 am | बगाराम

तुमच्याशी सहमत आहे, पण दिवंगत अधिकार्‍या विषयी काढलेले काही उद्गार मनात कालवा कालव करुन गेले. कसली विषारी जमात आहे ही स्वतः देशासाठी काहीही न करता ज्यांनी प्राणार्पण केले त्यांच्या विषयी आकस बाळगणारी. छे, फार अस्वस्थ व्हायला झाले हे विचार वाचुन. कृपया लेख काढला आहेच तर काही प्रतिसाद देखिल काढून सदर सदस्यांना समज द्यावी.

(व्यथित) बगाराम

सुनील's picture

27 Nov 2008 - 5:32 pm | सुनील

साध्वी, अद्यापही एक संशयीत. परंतु, त्या निरपराधच आहेत असे गृहीत धरून, एका कर्तबगार पोलीस अधिकार्‍याची उडवलेली खिल्ली लोकांच्या नजरेसमोर रहावी, म्हणून हा लेख काढू नये.

कदाचित त्या पुढे निर्दोष सुटतीलही (त्या तश्या सुटाव्यात अशी माझीही इच्छा आहे). पण जर का त्या (आणि इतर लष्करी अधिकारी) दोषी ठरले, तर ह्या मंडळींची काय भूमिका राहणार आहे?

जाता जाता - शिवसेनेने १ डिसेंबरचा बंद मागे घेऊन स्वतःची लाज वाचवली, हे बरे केले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 5:58 pm | आजानुकर्ण

शिवसेनेने १ डिसेंबरचा बंद मागे घेऊन स्वतःची लाज वाचवली, हे बरे केले.

हेच म्हणतो. आता तरी या मुद्द्यावर राजकारण करत न बसता सर्व दहशतवाद्यांना शिक्षा करावी असे वाटते.

अनामिका's picture

27 Nov 2008 - 5:51 pm | अनामिका

काल करकरे गेल्याचे समजले आणि जिएस च्या या लिखाणाची आठवण झाली.
करकरे खरच अतिरेक्यांच्या गोळीला बळी पडले की इतर कुणाच्या या बाबतीत मी अजुनही साशंकच आहे. आपल्याकडे काहीही होवु शकते.माणसाच्या जिविताच मोल उरलय कुठे?
करकरे गेले म्हणुन मालेगाव स्फोटाच्या चौकशी बाबतची त्यांची विवादास्पद भुमिका इतिहासजमा होत नाही.
काल कोठडितल्या साध्वि अथवा कर्नल पुरोहित यांच्या मनात करकरेंच्या मृत्युची बातमी ऐकल्यावर कुठल्या भावना आल्या असतिल.याचा विचार मी काल ही बातमी समजल्यापासुन्.राजकिय षडयंत्राचा भाग होवुन कामगिरी करण्यापेक्षा सगळ्या अधिकार्‍यांनी आपल्या सदसदविवेकबुद्धिला स्मरुन काम करावे हेच उचित ठरावे.
आज जर स्व .करकरे यांना मालेगाव स्फोटाच्या चौकशीची पार्श्वभुमी नसती तर त्यांना आलेल्या विरमरणाने त्यांच्या बद्दलचा अभिमान द्विगुणितच झाला असता.

"अनामिका"

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 5:59 pm | आजानुकर्ण

करकरे खरच अतिरेक्यांच्या गोळीला बळी पडले की इतर कुणाच्या या बाबतीत मी अजुनही साशंकच आहे

याबाबत ठोस पुरावा उपलब्ध नसेल तर कृपया अफवा पसरवू नका.

अफवा पसरवण्याचा प्रश्न येतोच कुठे?मी आपला माझा तर्क मांडला.आणि मला नाही वाटत मला आलेली शंका अनाठायी आहे म्हणुन?
आपल्या देशात एखादे प्रकरण अंगाशी येते असे वाटल्यावर संबंधित व्यक्तीचा काटा काढणे अतिशय सोपी गोष्ट आहे राजकारण्यांसाठी किंबहुना हातचा मळ आहे अस म्हणु हव तर. आणि अश्याप्रकारचा विचार माझ्या मनात येण्यापुर्वीच तो वृत्तवाहिनीच्या निवेदिकेने बोलुन दाखवला काल?
त्यातच मटा मधे करकरेंच्या मृत्युबद्दल आलेल्या बातमीचा विचार करता.अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळिबार करताना त्यांच्या मानेलाच लक्ष केल आणि त्यामुळेच त्यांचे प्राण वाचु शकले नाहीत.
मालेगाव बाँबस्पोटाच्या चौकशीच प्रकरण राज्यसरकारचा गळफास बनु पहात होते आणि अश्याच वेळि करकरे अतिरेक्यांच्या गोळिबाराला बळि पड्ले.आता तुम्हाआम्हा सारख्या सर्वसामान्यांना याचे दुखः नक्किच झाले असेल पण राज्यकर्त्यांच्या लेखी "सुंठी वाचुन खोकला गेल".कारण त्यांच काम आयतच अतिरेक्यांनी केल .आता मगरीचे आसु ढाळत मुख्यमंत्री ५ लाखाची मदत जाहिर करतील ,ती एकदाची दिली की प्रश्न मिटला. काय?
माझ्या या भुमिकेवर ज्याला यावर विचार करायचाय तो करेल नाही तर सोडुन देईल.
"अनामिका"

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 6:23 pm | आजानुकर्ण

तुम्ही ज्याला तर्क म्हणता त्याला या परिस्थितीमध्ये अफवा म्हणतात. अजूनही हे ऑपरेशन पूर्ण झालेले नाही. अशा तर्कांचा तिथे काम करत असलेल्या पोलीसांच्या मनोधैर्यावर काय परिणाम होईल याचा विचार करा.

या प्रसंगाचे राजकारण करायला पुढे बरीच वर्षे मिळतील थोडी कळ काढा.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Nov 2008 - 6:27 pm | llपुण्याचे पेशवेll

मलाही असेच वाटते. माझीही भूमिका अनामिकांसारखीच आहे.
पुण्याचे पेशवे

जीएस's picture

27 Nov 2008 - 6:56 pm | जीएस

हे सरकार कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही. तुम्ही म्हणता ती एक शक्यता आहेच..

करकरे, कामटे आणि साळसकर ह्या तिघांचा मृत्यू अतिरेक्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पोलिसांच्या क्वालीस गाडीतच झाला. त्या गाडीतून त्यांच्याबरोबरच प्रवास करणारे आणि दोन्ही हातात गोळ्या लागल्याने हातात गन असूनही दुर्दैवाने अतिरेक्यांना यमसदनाला धाडू न शकलेले पोलीस अरुण जाधव सांगतात...
ही पहा संपूर्ण बातमी.
www.esakal.com/esakal/11292008/SpecialnewsC06C05CB7E.htm

चतुरंग

जीएस's picture

27 Nov 2008 - 6:33 pm | जीएस

१) त्या लेखात कुठेही साध्वी निर्दोष आहे असा सूर नव्हता. दोषी अथवा निर्दोषी हे नंतरच कळेल. जे माहित नाही त्याबद्दल मी लिहित नाही.
२) तपास करायचा सोडून एटीस कसे राजकीय दबावाखाली मिडीयाधारित स्टंटबाजीत गुंतले आहे, रोज नवी विसंगत विधाने करून विषय चर्चेत ठेवत आहेत, त्यांना हिंदू संघटनांना बदनाम करायच्या कामाला जुंपल्यामुळे दहशतवादाकडे, अतिरेक्यांकडे दुर्लक्ष होत आहे ही भुमिका होती.
३) कालच्या दुर्दैवी घटनेने ती भुमिका किती योग्य होती हे सिद्धच झाले आहे. (काल अतिरेकी जेंव्हा कब्जा घेण्यासाठी पुढे सरकत होते त्याच वेळीही दुर्दैवाने टीव्हीवर हिंदू दहशतवादावर त्यांचे लाईव्ह मुला़खत देणे सुरू होते)
४)गुजरात पोलिस पाच दिवसापासून ऍलर्ट पाठवत होते. पण एटीएसला निवडणूक प्रचाराऐवजी त्यांचे काम करू दिले असते तर आज कदाचित हे सर्व अधिकारी वृथा हुतात्मा झाले नसते.
५)लेखातील मताशी ठाम असलो तरी आज त्यांचा मॄत्यू झाल्या झाल्या तो लेख ताजा असावा हे अनुचित वाटले म्हणून लेख काढत आहेत. देशाची सेवा करतांना त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. अशा मृत्यूची खंत आणि तो प्रत्यक्ष घडवणारे अतिरेकी आणि अप्रत्यक्षपणे घडवणारे राजकारणी यांची चीड आल्यावाचून रहात नाही.
६) शहीद हा शहादत म्हणजे इस्लामसाठी मृत्यू पत्करणारा या अर्थाने निर्माण झालेला शब्द आहे तो आपल्या हुतात्म्यांना वापरू नये असे वाटते.

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 6:41 pm | आजानुकर्ण

शहीद म्हणजे 'इस्लामकरिता प्राणार्पण केलेला म्हणून आपल्या वीरगती प्राप्त सैनिकांसंदर्भात तो शब्द वापरू नये असे श्री. गोडबोले म्हणतात. पण हुतात्मा म्हणजे देवांना अग्नीतून अर्पण केलेल्या वस्तू हुतात्मा म्हणजे 'हुत... आत्मा येन स' स्वत:ला ज्याने देवांना अर्पण केले तो. याप्रमाणेच हुताशन, (होमातील अग्नी) हुताशनि (होळी) असे शब्द प्रचलित आहेत. थोडक्यात शहीद व हुतात्मा या दोन्ही शब्दांची पार्श्वभूमी धामिर्कच आहे. परंतु शब्दांचे अर्थविस्तार होत असतात, कधी अर्थ बदलतही असतात. व्युत्पत्ती पाहून रोजच्या व्यवहारात शब्द वापरले जात नाहीत. शब्द ज्या अर्थाने भाषिक समूहातील लक्षणीय संख्येने लोक वापरतात तो त्या शब्दाचा अर्थ. लतादीदींनी अजरामर केलेले ''जो शहीद हुए है उनकी....'' हे गाणे व शहीद भगतसिंगसारखे चित्रपट यामुळे शहीद हा शब्द अनेक मराठी माणसांच्या बोलण्यात व लिहिण्यात येतो. धामिर्क संदर्भाचा अर्थ लोप झालेला आहे. परंतु हुतात्मा हा शब्द स्वातंत्र्य व अन्य चळवळीतील व युद्धातील ताज्या बलिदानांमुळे मराठी बोलणाऱ्यांच्या तोंडात अधिक रूळलेला आहे. त्याचाही धामिर्क संदर्भ आपल्याला आठवत नाही. असे भाषेत घडत असते. शब्दकोश भाषा घडवत नाहीत. भाषा शब्दकोश घडवते. म्हणून शब्दांची भर घालून, शब्द वगळून नवेनवे शब्दकोश तयार करावे लागतात. हुतात्मा हा शब्द इतका चपखल घडवलेला आहे, तो इतका मराठी वाटतो की तोच वापरणे अधिक योग्य ठरेल. पण कुणी शहीद म्हटले की लगेच आपल्याला इस्लाम आठवत नाही, भगतसिंग आठवतो. शहीद भगतसिंग म्हटल्याने भगतसिंगाच्या हौतात्म्याला किंवा आपल्या भाषाज्ञानाला उणेपणा येत नाही.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3571166.cms

सर्वप्रथम स्वतःहुन लेख अप्रकाशित केल्याबद्दल "जी एस साहेबांचे" आभार ...

मुळात एका "न्यायाधिष्ठीत प्रकारणावर भाष्य करणारे कोणतेही लेखन अथवा प्रतिपादन अथवा प्रतिक्रीया" देण अयोग्य आहे, तो कोर्टाचा अवमान ठरतो.
मग अशा परिस्थीतीत मुळ लेख काढुन टाकला असताना अजुन त्यावर खाली प्रतिक्रीयांची मारामारी करुन ( बिनबुडाचे व पुरावा नसलेले ) आरोप व प्रत्यारोप करणे हे माझ्या मते अयोग्य आहे.

ज्या तडफेने कालच्या घटनेबद्दलचे सर्व लेख अप्रकाशित केले गेले तशी ह्या लेखावर कारवाई का झाली नाही याचे जरासे आश्चर्य वाटले.
कालचे लेख आपण "उत्सुर्फ जनप्रतिक्रीया" म्हणुन एक वेळेला समजुन घेऊ शकतो पण इथे तर चक्क "न्यायाधिष्ठीत प्रकरणावर भाष्य" चालु आहे.
बरेच सदस्य आपल्या पदरचे काही ज्ञान घालुन ह्या लेखाला अजुन फाटे फोडत आहेत व अख्खा धागाच आता "आक्षेपार्ह्य" झाला आहे ...

सबब, न्यायाधिष्ठीत प्रकरणवर भाष्य न करण्याच्या आपल्या बंधनाला अनुसरुन हा धागा "अप्रकाशित" करावा ...

अवांतर : सदस्यांनी सुद्धा भावनेच्या भरात काहिही ( बिनबुडाचे ) न लिहता आपण जे लिहतो आहोत ते जबाबदारीने लिहावे. अशा गोष्टींना काही अर्थ नाही.
उगाच होते काय की त्यामुळे "अख्खा धागा विसर्जीत " करण्याची पाळी येते ...

अतिअवांतर :
सर्व संपादकांना विनंती, कॄपया ह्यापुढे प्रासंगीक पण नंतर आक्षेपार्ह्य लेखावर निर्णय घेताना त्या धाग्याच्या "लेखकाला" कमीत कमी एक सुचना तरी करावी तो धागा अप्रकाशित करण्याच्या आधी, कारण त्याला जर ते कुठे दुसरीकडे साठवुन ठेवायचे असेल तर ते नंतर अशक्य होऊन बसते ...
जर त्याने "लवकर" रिप्लाय दिला नाही तर तर तो तात्पुरता "दिसेनासा" करता येतो का ते पहावे, डायरेक्ट डिलीट मारल्यास लेखकाचे श्रम वाया जातात ...
काय आहे की आमच्या "मिपावरील प्रेमापोटी" आम्ही आधी इथे लिहतो आणि नंतर निवांत सवडीने ते आमच्या "ब्लॉगवर" कॉपी करतो, पण आज सकाळचा माझा मिडीयाबद्दलचा लेख अप्रकाशित झालाने माझी इच्छा असुन तो मला माझ्या ब्लॉगवर देता येणार नाही ...
त्यात काय "आक्षेपार्ह्य" होते अशी चर्चा इथे नको पण तो "साठवण्यासाठी" हवा होता ...

अति अति अवांतर :
ह्या सर्व सुचना कम विनंत्या मला सर्व संपादकांना "व्यनी अथवा खरड " या माध्यमातुन करता आल्या असत्या पण "ह्यातुन बरेच सर्वसामान्य सदस्यालाही काही सल्ले / विनंत्या / आग्रह आहे म्हणुन इथे ...

बाकी आपण योग्य निर्णय घ्यालच अशी अपेक्षा ठेवायला माझी हरकत नाही ....

( न्यायप्रिय ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सुनील's picture

27 Nov 2008 - 8:24 pm | सुनील

सहमत.

आता मूळ लेखच अस्तित्वात नसताना प्रतिक्रिया ठेवण्यात काहीच मतलब नाही. नव्या सदस्याला तर आगा-पीछा नसलेले प्रतिसाद वाचून काही उमजणारही नाही.

तेव्हा ह्या "शिमगोत्तर कवित्वाला" पूर्णविराम देणेच इष्ट!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Nov 2008 - 8:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळात एका "न्यायाधिष्ठीत प्रकारणावर भाष्य करणारे कोणतेही लेखन अथवा प्रतिपादन अथवा प्रतिक्रीया" देण अयोग्य आहे, तो कोर्टाचा अवमान ठरतो.
खरं आहे, हा लेख एवढा काळ इथे टिकला याचं मलाही आश्चर्यच वाटतंय.
आणि अशा न्यायाधिष्ठीत प्रकरणांवर स्वतःचे तर्क चालवणं (= अफवा उडवणं) यामुळेही न्यायालयाच्या कामकाजात ढवळाढवळ केल्याचा अवमान (गुन्हा?) ठरु शकतो.

अवांतर : सदस्यांनी सुद्धा भावनेच्या भरात काहिही ( बिनबुडाचे ) न लिहता आपण जे लिहतो आहोत ते जबाबदारीने लिहावे. अशा गोष्टींना काही अर्थ नाही. उगाच होते काय की त्यामुळे "अख्खा धागा विसर्जीत " करण्याची पाळी येते ...
एकीकडे आपण प्रचार माध्यमांवर टीका करायची आणि त्याच वेळी स्वतः बिनबुडाचे आरोप करायचे हे अगदी अयोग्य आहे.

अतिअवांतर :
सर्व संपादकांना विनंती, कॄपया ह्यापुढे प्रासंगीक पण नंतर आक्षेपार्ह्य लेखावर निर्णय घेताना त्या धाग्याच्या "लेखकाला" कमीत कमी एक सुचना तरी करावी तो धागा अप्रकाशित करण्याच्या आधी, कारण त्याला जर ते कुठे दुसरीकडे साठवुन ठेवायचे असेल तर ते नंतर अशक्य होऊन बसते ...

+१

(तार्किक) अदिती

मैत्र's picture

28 Nov 2008 - 7:41 am | मैत्र

डॉन, अदिती सहमत आहे.
तरीही जी एस यांनी लेख अप्रकाशित करून मांडलेला त्यांचा विचार कौतुकास्पद ( राष्ट्रभाषेत ज्याला सराहनीय म्हणतात) आहे.

ऋषिकेश's picture

28 Nov 2008 - 2:31 pm | ऋषिकेश

-(सहमत) ऋषिकेश

मनस्वी's picture

28 Nov 2008 - 2:53 pm | मनस्वी

अवांतर : सदस्यांनी सुद्धा भावनेच्या भरात काहिही ( बिनबुडाचे ) न लिहता आपण जे लिहतो आहोत ते जबाबदारीने लिहावे. अशा गोष्टींना काही अर्थ नाही. उगाच होते काय की त्यामुळे "अख्खा धागा विसर्जीत " करण्याची पाळी येते ...

बिनबुडाचे + धाग्याशी, प्रतिसादांशी अतिअसंबद्ध प्रतिसाद टाळावेतच.

अतिअवांतर :
सर्व संपादकांना विनंती, कॄपया ह्यापुढे प्रासंगीक पण नंतर आक्षेपार्ह्य लेखावर निर्णय घेताना त्या धाग्याच्या "लेखकाला" कमीत कमी एक सुचना तरी करावी तो धागा अप्रकाशित करण्याच्या आधी, कारण त्याला जर ते कुठे दुसरीकडे साठवुन ठेवायचे असेल तर ते नंतर अशक्य होऊन बसते ...

+१

धमाल मुलगा's picture

1 Dec 2008 - 10:05 am | धमाल मुलगा

छोटा डॉन यांच्या मताशी पुर्ण सहमत आहे.

श्री.जी.एस. ह्यांनी घडलेल्या घटनेचे गांभिर्य ओळखुन ह्या धाग्यावरचे मार्मिक लेखन स्वतः काढून टाकले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. हल्ली असा समंजसपणा फारच विरळा झालाय.

ज्या तडफेने कालच्या घटनेबद्दलचे सर्व लेख अप्रकाशित केले गेले तशी ह्या लेखावर कारवाई का झाली नाही याचे जरासे आश्चर्य वाटले.

वाटले तर आम्हालाही होतेच. पण पुन्हा एकदा 'असो!'

सर्व संपादकांना विनंती, कॄपया ह्यापुढे प्रासंगीक पण नंतर आक्षेपार्ह्य लेखावर निर्णय घेताना त्या धाग्याच्या "लेखकाला" कमीत कमी एक सुचना तरी करावी तो धागा अप्रकाशित करण्याच्या आधी, कारण त्याला जर ते कुठे दुसरीकडे साठवुन ठेवायचे असेल तर ते नंतर अशक्य होऊन बसते ...

व्यक्तिशः मला असं वाटतं, की कदाचित हे करणे वेळेअभावी थोडंसं क्लिष्ट होईल. तेव्हा योग्य ती काळजी आपणच घ्यावी.

काय आहे की आमच्या "मिपावरील प्रेमापोटी" आम्ही आधी इथे लिहतो आणि नंतर निवांत सवडीने ते आमच्या "ब्लॉगवर" कॉपी करतो, पण आज सकाळचा माझा मिडीयाबद्दलचा लेख अप्रकाशित झालाने माझी इच्छा असुन तो मला माझ्या ब्लॉगवर देता येणार नाही ...

लेखाची एक नक्कल इतरत्र साठवून ठेवणे हे योग्य ठरावे.