प्रतिभा

Primary tabs

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
28 Sep 2020 - 11:03 pm

मी तुझ्या रोज भोवती असते
एक अदृश्य सोबती असते

मी कधी रिक्त शाश्वती असते...
वा कधी दिव्य आरती असते!

आसवांचे जुनेच लोलक, पण-
मी नवी रंगसंगती असते

सांजवेळी तुझा विसावा मी
आणि दिवसा तुझी गती असते

तू करू पाहतोस जे त्याची
फक्त मी मूक संमती असते

- कुमार जावडेकर

कवितागझल

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

28 Apr 2021 - 3:21 pm | रंगीला रतन

वाह!