हळव्यांची गळवे

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in जे न देखे रवी...
27 Sep 2020 - 7:06 pm

मनावर यांच्या ठसठसणारी गळवे आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

गैरसमज करुन घ्यायला हे नेहमी पुढे आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

हे इतरांना टोचतील; प्रत्युत्तरे त्यांना नको आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

हे नेहमीच बरोबर असतात; इतर लोकच चुकत आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

भावनांना डिवचलेत? आता ते सूडाच्या तयारीत आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

शब्दबाण मारलेत? ते ग्रुप सोडायच्या तयारीत आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

यांना हवं तसं जगात घडत नाही.त्यामुळे अस्वस्थ आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

त्रास फक्त यांनीच भोगला जगात.बाकीचे सुखात आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

संयमाच्या नावे शिमगा आणि चिडचिडीचे टोक आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

लावून थोडीशी संध्याकाळी; बडबडायला बसलेच आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

कसं वागावं यांच्याशी? बघावं तेव्हा पेटलेले आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

'माहिमचे हळवे' या आगामी काव्यसंग्रहातून.

कविताविडंबनविडंबन

प्रतिक्रिया

मार्कस ऑरेलियस's picture

27 Sep 2020 - 7:55 pm | मार्कस ऑरेलियस

असो , उडीदामाजी काळेगोरे !

जगात जशी हळवी माणसे असतात तशीच कुटील , आतल्यागाठीची , अन सतत तुमच्यविरोधात कुरापती करणारी माणसेही असतात. ह्यांना शांत सुखाने जगताच येत नाही , दुसर्‍यांना डिवचणे ही ह्यांच्यासाठी मुलभुत अ‍ॅक्टिव्हिटी असते . असे काही नमुने अत्यंत जवळीने पाहिले असल्याने ह्यांच्यापेक्षा हे 'हळवे' नमुने परवडले असे आमचे ठाम मत झाले आहे .

बाकी शुभेछा !

सॅगी's picture

2 Oct 2020 - 11:54 pm | सॅगी

थोडी उशिराच वाचली, पण परफेक्ट जमली आहे. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2020 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.खरे साहेबांवर आहे वाटतं कविता, फार हळव्या मनाचे आहेत ते... मनासारखं झालं नाही की ग्रुप सोडतो, मिपा सोडतो. खरड़फळा सोडतो...ग्रुप सोडतो. असे म्हणत राहतात.

''संयमाच्या नावे शिमगा आणि चिडचिडीचे टोक आहेत.यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत''

डॉ.साहेबांच्या बाबतीत हे मात्र परफेक्ट उतरले आहे, बाकी कविता त्यांच्याबद्दल, नसेल तर कवी आणि डॉक्टरसाहेब मला क्षमा करतीलच. (ह.घ्या)

-दिलीप बिरुटे
(खोडसाळ)

ही कविता कोणा एकाला उद्देशून नाही. असे बरेच हळवे लोक भेटले.त्यांच्या स्वभावसारांशावर ही कविता आहे. भाषा थोडी टोचणीची आहे. ती जरा हळव्यांनी आत्मपरीक्षण करावे म्हणून तशी वापरली आहे. ;) फक्त हळव्या/अतिहळव्यांनी भोवतालच्या लोकांचाही विचार करावा ; आत्मकेंद्रीपणामुळे त्यांनी व्यक्तित्व विकासाची संधी गमावू नये असे सांगण्याचा थोडा प्रयत्न केला आहे इतकेच!
: )