(नम्र विनंती: कविता हलके वाचावी. न आवडल्यास विसरून जावी. भावना दुखवून वगैरे घेऊ नयेत. तितकी तिची लायकी नाही. दिवस हे असे आहेत. त्यात आपला जरा विरंगुळा, इतकेच!)
--------
आठवतं तुला? तुझ्या अंगाला सेंटचा वास येत होता, सॕनिटायझरचा नाही.
वॉचमनने दारात तुझं टेंप्रेचर मोजलं नव्हतं, पण मी हातात हात घेतल्यावर ते लगेच वाढत चाललेलं मला कळत होतं
तुझे थरथरते, अधीर ओठ घामट मास्कच्या मागे लपलेले नव्हते.
पण हपिसात उपस्थिती 100% असल्यामुळे एकांत मात्र नव्हता नावापुरताही.
तू आणि मी मग बाहेर पडलो, बॉसने जरा रागानेच हाफडे दिल्यावर
भटक भटक भटकलो तुझ्या बाईकवर भन्नाट
हो, लॉकडाऊन नव्हता ना,
पोलीस हाणहाणून सुजवतील अशी भीती नव्हती.
फारतर सिग्नल तोडल्याचे शंभर घेतले असते!
संध्याकाळी पोचलो पिक्चर पहायला, कुठला कुणास ठाऊक
नाहीतर काय, थेटरात एकदाचा अंधार होण्याशी मतलब
मास्क ओढल्यासारखंच की ते
कोण कुठं ओळखू येतंय मग?
अंधार झाला, पडदा उजळला
अन् प्रेमाच्या व्हायरसचा संसर्ग
ताबडतोब झाला दोघांनाही
पसरला तो श्वासातून, स्पर्शातून, अवघ्या अंगांगात
क्षणात निकामी झाली दोन हृदये
आणि धापा टाकू लागलो दोघेही
आॕक्सिजनयुक्त सळसळत्या रक्ताची निर्माण झाली टंचाई अख्ख्या शरीरात (फक्त एक भाग सोडून)
पण इथेच तर खरी मजाय!
रामबाण लसही तयारच होती दोघांपाशी
एकमेकाला टोचायची कशी भर थेटरात हाच फक्त प्रश्न
व्हायरसनेच केलता सवाल, व्हायरसनेच दिले उत्तर
पिक्चर टाकून अर्ध्यात
बाहेर पडलो दोघेही
थेट पोचलो तुझ्या फ्लॕटवर
सोसायटीवाल्यांच्या नजरा चुकवून
या व्हायरसलाही जाम भिऊन असत ते, नाही?
कुलूप काढून आत शिरताच सुरू केली आपण ट्रिटमेंट
घेतलं (!) एकमेकाला आप्रेशनटेबलवर
आणि दिला जालीम लशीचा डोस
पुनःपुन्हा
थोड्याच वेळात निगेटीव्ह होऊन कोसळलो
आणि मग
झालो एकमेकांपासून
कोरंटाईन
सात दिवस की चौदा, की अजून जास्त
ते मात्र हातात नव्हतं दोघांच्याही
पण एकूण काय, कोरंटाईन जितकं कमी तितकं चांगलं
हो ना?
प्रतिक्रिया
20 Sep 2020 - 11:46 am | डॅनी ओशन
भारी जमलीये एकदम. आप्रेशन टेबल आणि निगेटिव्ह होणे उपमा लय जबरी आहेत.
20 Sep 2020 - 1:12 pm | चलत मुसाफिर
प्रतिसाद पाहून कोव्हीड टेस्ट निगेटीव्ह आल्यासारखा आनंद झाला. मिपाकरांनी या कवितेवर सणसणीत मौन बाळगलेले पाहून आपल्या कवितेने काही अक्षम्य अपराध केलाय की काय असे वाटू लागले होते.
धन्यवाद :-)
20 Sep 2020 - 4:28 pm | एस
वाह. मिपाला शोभणारी कविता. आज टाऱ्या - डॉन्या बिन्या गँग पाहिजे होती. आणि अर्थात तात्याही. हम्म!
लय भारी. कॉफीचे नळ बुदकन फुटलेन कीबोर्ड बदलायची पाळी आणलीन. =))
20 Sep 2020 - 5:28 pm | चलत मुसाफिर
कवी तलवार परजून तयार आहे. होऊन जाऊ द्या. :-)
प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
20 Sep 2020 - 5:37 pm | शा वि कु
झकास !
😝
20 Sep 2020 - 9:16 pm | चलत मुसाफिर
धन्यवाद
21 Sep 2020 - 8:57 am | ज्ञानोबाचे पैजार
कॉलेज मधे असताना चे दिवस स्वतःच स्वतः वर उपचार करुन घेण्याचे होते. डॉक्टरांकडे जाउन उपचार घेण्याएवढी चैन परवडत नव्हती.
पण गप्पा अशा व्हायच्या की आपल्याला दुनियेभरच्या डॉक्टरांचा अनुभव आहे. तेव्हा बोलताना एका मित्राने स्वतःचा निगेटिव्ह होण्याचा वेळ दोन तास सांगितला होता. तो इतक्या आत्मविश्र्वासाने बोलत होता की काही वेळापुरते आम्ही सगळे जण नैराष्यात गेलो होतो.
त्या काळी फॅमेली डॉक्टरची संकल्पना असल्याने फार काळ प्रतिक्षा करावी लागायची. एक डॉक्टर मिळाला की आयुष्यभर त्याच्याच कडे तापाचे औषध घ्यायचे. दुसर्या डॉक्टरकडे नुसते पाहिले तरी आपले फ्यामेली डॉक्टर नाराज व्हायचे आणि उपचार बंद करायचे.
आता वातावरण बदलले आहे म्हणे. आजकाल तर मोबाईल इंटरनेटवर ही डॉक्टर सापडतात असे ऐकले आहे.
जाउ दे आता चणे असले तरी दात नाहीत. त्यामूळे रामकृष्ण हरी, तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी,
पैजारबुवा,
21 Sep 2020 - 7:13 pm | चलत मुसाफिर
कोणत्याही 'शास्त्रा'त कालपरत्वे नवनवे शोध लागून प्रगती ही व्हायचीच. त्यात नवल ते काय? :-)
21 Sep 2020 - 12:29 pm | अनन्त्_यात्री
एक बाळबोध शंका: तेव्हा सार्वजनिक/ खासगी इस्पितळांत उपचारार्थ जाणारे नव्हते?
21 Sep 2020 - 12:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
सार्वजनिक इस्पितळात उपचार घेतो असे सांगणार्यां पैकीच तो एक मित्र होता. ज्याला आम्ही गुरु स्थानी मानत होतो. पण बर्याच काळाने असे लक्षात आले की त्या सगळ्या मनगढंत कहाण्या होत्या. आमच्या सारखी बरीच बालके त्याच्या मागे असायची.
त्याने आम्हाला ऑपरेशन थेटर मधे डॉक्टर पाठीवर झोपून, पोटावर झोपून कसे उपचार करतात, ईंजेक्षनच्या सुईची लांबी कशी वाढवायची, उपचार करताना अपघात होउ नये म्हणून पिशवीत लस सुरक्षीत कशी जमा करायची याचे अनेक धडे शिकवले होते.
एकदा तर तो वर्गातच लस साठवण्याच्या पिशव्या घेउन आला होता.
असा मनुष्य त्या काळात भारी वाटला नाही तर नवलच
पैजारबुवा,
21 Sep 2020 - 2:08 pm | सॅनफ्लॉवर्स
आपल्या अफाट कल्पनाविलासाला दंडवत. :-)
21 Sep 2020 - 7:11 pm | चलत मुसाफिर
प्रतिसाद वाचल्यापासून कवी व्हेंटिलेटरवर आहे.
29 Sep 2020 - 4:34 pm | चलत मुसाफिर
सर्वांना धन्यवाद
12 Jul 2023 - 9:35 pm | चित्रगुप्त
'आचरट रस', 'बाष्कळ रस' याप्रमाणेच ही आधुनिक शृंगार-रसातली कविता आवडली.
नवरस:
https://www.youtube.com/watch?v=sSdMUaF3-18&t=134s
13 Jul 2023 - 6:32 am | चलत मुसाफिर
अहो सर, शृंगार रस ही फारच उच्च पातळी झाली. या कवितेला तिथे नेऊन बसवणे म्हणजे... (उपमा सुचत नाहीये!). कोविड लॉकडाऊनमधे आलेले बेकार फ्रस्ट्रेशन हे या कवितेच्या जन्माचे एकमेव कारण होते.
फार फार तर 'वासना रस' अशी एक टेंपररी सबक्याटेगरी मानून घेऊ. हिंदी भाषेत त्यासाठी अधिक समर्पक शब्द आहेत पण ते इथे लिहीत नाही.
कविता गोड (खारट..?) मानून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद.