समस्या ....
आज नाही पौर्णिमा ,अन ग्रहण नाही आजला,
सांग सखये कोणता तो, चंद्र कैसा ग्रासला ?
याला उत्तर .......
स्वैर वार्यावरति सोडुन , केस अपुले मोकळे,
गंधलोलुप होउनीया , खुडत होती ती फुले .
तिमिर घन कचपाशपट तो , मुक्त जो झेपावला,
आणि त्याने यौवनेचा , मुखचंद्र् अवचित ग्रासला.
दूर गेला घर धनी जो, नाही अजुनी परतला,
आस लागुनि भेटिची तिज, जीव तो व्याकूळला.
जीव घेणी ती प्रतीक्षा, साहवे ना तीजला
आणि चिंतेने तियेचा, मुखचंद्र् अवचित ग्रासला.
माळण्याला मधुपुष्पमाला, जाउनी ती बैसली,
पाहुनी प्रतिबिंब अपुले, धुंदली आनंदली,
आणि पिकला पाहता तो, केस कचपाशातला,
काळजीने सुंदरीचा, मुखचंद्र् अवचित ग्रासला.
चोरुनी भेटावयाला, प्रियकराला चालली
भेटिच्या त्या कल्पनेने, रोमरोमी बहरली,
पुढति दिसला अन अचानक, जन्मदाता तीजला,
भीतिने त्या यौवनेचा, मुखचंद्र् अवचित ग्रासला.
वरील समस्या व त्याची पूर्ती माझे मामा श्री. जे. मधुकर (वय ७२ वर्षे ) यांचे कवन आहे. ते स्वतः आंतर जाल वापरत नाहीत. त्यांना मी "मि.पा." ची ओळख करुन दिली असता त्यांना हे संकेत स्थळ आवडले. व त्यांनी सर्व मिपा करांच्या अभिनंदनार्थ वरील समस्या व पूर्ती मला लिहून दिली आहे.
स्वैर वार्यावरति सोडुन , केस अपुले मोकळे,
गंधलोलुप होउनीया , खुडत होती ती फुले .
तिमिर घन कचपाशपट तो , मुक्त जो झेपावला,
आणि त्याने यौवनेचा , मुखचंद्र् अवचित ग्रासला.
मस्तच.....त्या यौवनेचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
वेताळ
प्रतिक्रिया
23 Nov 2008 - 10:52 am | सागरलहरी
अरे ? आपणा समस्तांची (काव्य ) प्रसव क्षमतेस कांय झाले ?

आपला
(मामा भक्त भाचा) लहरी सागर.
23 Nov 2008 - 11:03 am | वेताळ
स्वैर वार्यावरति सोडुन , केस अपुले मोकळे,
गंधलोलुप होउनीया , खुडत होती ती फुले .
तिमिर घन कचपाशपट तो , मुक्त जो झेपावला,
आणि त्याने यौवनेचा , मुखचंद्र् अवचित ग्रासला.
मस्तच.....त्या यौवनेचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
वेताळ
24 Nov 2008 - 12:34 pm | राघव
अस्से आहे होय? म्हणजे हा चंद्र म्हणत होतात होय?? :)
छान कविता! मामांना नमस्कार सांगा आमचा!
शुभेच्छा!
मुमुक्षु
24 Nov 2008 - 12:38 pm | सागर
आज नाही पौर्णिमा ,अन ग्रहण नाही आजला,
सांग सखये कोणता तो, चंद्र कैसा ग्रासला ?
माझा एक काव्य प्रयत्न
कोण म्हणती प्रियेचा मुखचंद्र, तर कोण म्हणती मधुचंद्र
आम्हाला तर स्पष्ट दिसतसे, ग्रासियेला तो अमावस्येचा चंद्र
:)
- सागर