जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-९ } डिपर डिप्रेशन

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
26 Jul 2020 - 11:23 am

कोव्हिड-१९ ने जगातल्या अगदी छोट्या व्यवसायां पासुन ते मोठ्या व्यवसायां पर्यंत सर्वांनाच ठप्प केले आहे हे आपण अनुभवतच आहोत... यातले अनेक व्यवसाय कायमचे बंद होतील तर काही त्यांच्या मूळ क्षमतेने कधीच काम करु शकणार नाहीत किंवा ती क्षमता परत मिळवण्यास बराच काळ जावा लागेल.
अमेरिका आणि चीन चे शीत युद्ध देखील आपण पाहत आहोत याच शिवाय अमेरिकेत येणार्‍या निवडणुका देखील या संबंधावर प्रभाव टाकत आहेत आणि यापुढे देखील त्याचा प्रभाव होताना पहायला मिळेल. [ अमेरिका युद्ध सज्जता करतो आहे का ? तो युद्ध कधी करेल ? हे प्रश्न देखील सध्या मनात उद्भवले आहेत. ]
या आधीच्या दोन भागांच्या शिर्षकात सोन्याचा उल्लेख केला गेला आहे, सोने त्याच्या उच्चतम दराकडे सातत्याने सरकताना याच काळात दिसले असुन सध्या सोने ८०००० प्रती १० ग्रॅम चा दर देखील दाखवु शकेल अश्या स्वरुपाच्या बातम्या आता येत आहेत आणि जे मला अशक्य वाटत नाही.
करोना व्हायरस अचानक चीन मध्ये उद्भवतो काय आणि फार कमी काळात तो जगाला विळखा घालुन मनुष्य प्राणी करत असलेले सर्व व्यवहार ठप्प करतो काय ! हे सगळ कसं अचानक आणि कुठलीही कल्पना नसताना होतं... ही स्थिती अनुभवताना भाग ७ मध्ये दिलेला कोट परत आठवतो:-
The crisis takes a much longer time coming than you think, and then it happens much faster than you would have thought. :- Rudiger Dornbusch

काही वर्षां पासुन या विषयावर वाचन करताना, हा विषय समजुन घेण्याचा प्रयत्न करताना आणि त्यावर चिंतन करताना मनुष्य प्राण्याच्या गोष्टी / वस्तु कनझ्युम करण्याच्या वृत्तीकडे सातत्त्याने लक्ष जात होते, ज्या ग्रहावर तो राहतो त्याच्यावर तो सातत्याने संख्येने वाढत राहतो आणि सातत्यानेच गोष्टी कनझ्युम करत राहतो. याचा वेगळ्या दृष्टीने देखील शोध घेण्याचा प्रयत्न करताना वेदात / पुराणातुन यात काही समजते का ? असा अणि इतर दृष्टीने शोध घेणे चालु असताना एक उत्तम व्हिडियो कालच पाहण्यात आला तो खाली देत आहे.
जगभरात अर्थव्यवस्थेत होत असणार्‍या घडामोडी / बदल आता वेगाने घडत असल्याचे का कोणास ठावूक मला भासते ! जसा वेळ मिळेल तसे या धाग्यात भर टाकीन.

मदनबाण.....

आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट ?

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

28 Jun 2022 - 8:40 pm | श्रीरंग_जोशी

आज डॉलर रुपये विनिमयदर ७९.०२ वर जाऊन आता ७९ वर आलेला दिसतोय.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Jun 2022 - 9:09 pm | अमरेंद्र बाहुबली

:(

आग्या१९९०'s picture

28 Jun 2022 - 9:39 pm | आग्या१९९०

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेतल्याने रुपया घसरला हे समजू शकते ,परंतु चालू खात्यातील तूट वाढली तर चिंता करण्यासारखे आहे. बघू या निर्यातदार कितपत फायदा घेतात रुपयाच्या अवमूल्यनाचा.

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 4:23 pm | शाम भागवत

खरंय.
क्रूड आयात खर्च वाढेल. शिवाय रशियाने सवलतीत तेल विकायचे बंद केलंय म्हणे.
पण डॉलरचा साठा सध्या चांगला आहे त्यामुळे तगून राहावयाची शक्ति थोडी वाढलीय एवढंच.

पूर्वी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक काढून घेतली की बाजार जोरदार कोसळायचा. पण अजून तरी सेन्सेक्स व निफ्टी सर्वकालीन उच्चांकावरून फक्त १० टक्केच खाली आलाय. भारतीय गुंतवणूकदारांची शक्ति वाढलीय असं म्हणावसं वाटतंय.

मी तज्ञ नाही. फक्त मत नोंदवलं

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:58 pm | शाम भागवत

जम्मू काश्मिरमधे जी20 परिषद भरवली जाणार.

आग्या१९९०'s picture

30 Jun 2022 - 9:00 am | आग्या१९९०

परदेशी गुंतवणूक एका दमात काढून घेतल्यास परदेशी गुंतवणूकदारांचे नुकसान होते. RBI च्या हस्तक्षेपाची वाट बघतात परदेशी गुंतणूकदार. रुपया स्थिर झाल्यास मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढली जाईल. ती वेळ जवळ आली आहे. मार्केट सावरण्यासाठी देशी वित्त संस्था फार गुंतवणूक करणार नाहीत. अपेक्षा फक्त सरकारी आयात निर्यात धोरण आणि निर्यातदारांची स्पर्धात्मक संधी. शेअर मार्केट मोठे करेक्शन लवकरच बघायला मिळेल.

मदनबाण's picture

10 Jul 2022 - 1:54 am | मदनबाण

जाता जाता :- आज लंका जळाली... पुढचा नंबर पाकिस्तान ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TV