गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक ८ कॉफी

@tul's picture
@tul in जनातलं, मनातलं
15 Jul 2020 - 12:21 pm

प्रियांसी
खूप काही सांगायचंय पण लिहितात येत नाहीये आज.
आपल्या आवडत्या व्यक्तीचा परिचय करून घ्यावा की हळूहळू ओळखावं त्याला? व्यक्तिमत्व हळूहळू उमलले, अलगत उलगडले की जास्त भावेल, नाही का? giftbox सारखं. आकार केवढाही असला तरी आत काय असेल याची उत्सुकता कायम राखणारा. गम्मत म्हणजे देणारा आणि घेणारा दोघेही तितकेच उतावीळ, उत्सुक, अस्वस्थ!! देणारा फारच विचार करून देतो आणि मग अस्वस्थ होतो आवडेल की नाही.
एक गिफ्ट योजलय तुझ्यासाठो . आणि बघ ना gift च्या नुसत्या विचारांनी हृदयाचे ठोके वाढले. तू ते अलगद उघडताना दिसतेयस. किती रोमांचकारी क्षण असेल तो.

मन आधी मग स्पर्शाने जवळ येते स्त्री; हे माहीत नव्हतं मला. पुरुष फार निर्दयी, unkind असतो का गं? पुरुष स्त्री संबंधांचा इतिहास बघता पुरुषाने स्त्रीचं मन फार कधी समजून घ्यायचा प्रयत्नच केला नाही असं वाटतं. दोघांनाही मन देऊन काय वेगळं बनवलं असेल निर्मात्याने? म्हणायचं दोघांनाही माणूसच पण तन आणि मन दोघांचीही रचना वेगळी. आधी स्पर्श !! अवघडलोय मी.

ती बेचैनी ती हुरहूर पुन्हा वाढली आहे. तयार होत नव्हतं मन कॉफीसाठी विचारावं म्हणून. ह्या अदृश्य शब्द संवादात मजा येत होती. आपण भेटलोय बघितलंय एकमेकांना पण समोरासमोर अवतीभवती कोणी ओळखीचं नाही, फक्त तू आणि मी, ते कॉफीशॉप मधलं romantic वातावरण कसं जमेल मला तुझ्या मनातली माझी प्रतिमा आबादीत ठेवायला. असो ही anxiety अस्वस्थ करतेय मला.
शुक्रवारी भेटूया का? ऑफिस सुटल्यावर?
नको शनिवारी भेटू, सुट्टीचा दिवस, fresh
शनिवारी 6 वाजता?
एक request आहे मध्यंतरी आकाशी रंगाचा ड्रेस घातलेलास तो फार छान दिसतो तुला, तो mango yellow होत नाही म्हणतेस नाहीतर तो आवडला असता. असो आकाशी किंवा पिवळा आतली प्रियांसी महत्वाची
भेटूच
आता ह्याच confirmation WA वर दे हां:)
तुझा...

https://youtu.be/XV198AYBUNo

मुक्तकलेख