आत्मनिर्भर

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
14 May 2020 - 12:32 pm

मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले
आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले

शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले...
अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले

सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी...
दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले

बांधण्यासाठी नवे सेतू फुकटचे
माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले

चालणे नशिबात होते का म्हणू मी...
राहण्यासाठी कुठे घर होत गेले?

प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे
मौनही माझे निरुत्तर होत गेले

- कुमार जावडेकर

gajhalgazalकवितागझल

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

14 May 2020 - 1:37 pm | चांदणे संदीप

पण, आत्मनिर्भर वाचून वेगळ्या अपेक्षेने आलो होतो. ;)

सगळे शेर आपापल्या जागी उत्तम!

सं - दी - प

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2020 - 1:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्या शब्दामुळे आलो होतो किलोभर प्रतिसाद लिहायला. ;)

बाकी रचना छान. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

14 May 2020 - 1:43 pm | प्राची अश्विनी

सुरेखच!

कौस्तुभ भोसले's picture

15 May 2020 - 12:33 pm | कौस्तुभ भोसले

आवडली

संजय क्षीरसागर's picture

15 May 2020 - 9:50 pm | संजय क्षीरसागर

मान आणि खांदा यामधली गॅप भरणारं एक सुखद कुशन घेऊन तुमचा प्रश्न सोडवता येतो.

चपले ऐवजी सॅंडल्स वापरायला लागून जमाना झाला ( त्यात क्रॉक्सनी तर कमालच केलीये !). चप्पल दोन बोटात धरुन, दरवेळी उचलणं हा छळ आहे.

गाविशी खुर्चीबाबतीत एकमते. आयुष्यातला प्राईम टाईम जिच्यावर बसायचं आणि ज्या कामातून तुफान मजा आणायची, ती खुर्ची अत्यंत आरामदायी हवी. माझी खुर्ची हाय-बॅक विथ नेक सपोर्ट आहे आणि फ्लेक्सी हँडल्समुळे खुर्चीवर मांडी घालून शांतपणे बसता येतं. मग कामाची मजाच काही और असते!

संजय क्षीरसागर's picture

15 May 2020 - 9:53 pm | संजय क्षीरसागर

कंफर्टेबलवर प्रतिसाद पुन्हा दिलायं.

गोंधळी's picture

16 May 2020 - 11:14 am | गोंधळी

अगदी वास्तविक.