शब्द झाले मोती.. - २

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
9 May 2020 - 5:25 pm

शब्द झाले मोती..१

मागील धाग्याबद्दल :
या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले.

नियम :
तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा

नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही.
उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

27 Jul 2020 - 9:34 pm | गणेशा

This is my first english poem.
I am not good in english too.. but just in the morning i thought i can try at least once..
----------

Shadows
____________

You hurt me..
hurt me a lot
You hurt me..
hurt me a lot

I couldn't lie
'cause we wrote a story
in which you were my queen baby

But You left me with all those memories
like sun left to the sky
now all shadows of them
still haunts me
sometimes I am tired, want to forget which happend between us

But I can't
I can't

your dimples are engraved in my heart
that burns me a lot
you are still in my thought
which keep me alive like a Tequila shot
I couldn't lie
'cause we wrote a story
in that you were my queen baby
I can read you
in all that messy things
I can feel you
in that scattered things
you may think
I'm insane
But I'm not
I am not

You hurt me..
hurt me a lot
hurt me a lot
hurt me a lot

--- शब्दमेघ

चांदणे संदीप's picture

29 Jul 2020 - 12:49 pm | चांदणे संदीप

मन रे तू काहे खेल रचाय?
जग सारा घुमाय, बैठ बिठाय

मत कहे ठहर ठहर
जे कोसों दूर है ठाय
कब कही अब ना चल
जे पास नदी जल बहाय

मन रे तोरा खेल गजब
मिल सके ना उसे दिखाय
पास जे चमके सोनरसयी
उसे मोह के फांसा बताय

मैं राही इस राह अकेला
ढूंढू साथी कही मिल जाय
जो मैं देखूं तू मुसकाय
बात भीतर की जान जाय

मन तू कहाँ का है राजा?
जरा आके सामने दिखाय
देखूं मैं भी तुझे परखके
जो तू दिखे जैसा जताय

सं - दी - प

गणेशा's picture

29 Jul 2020 - 7:39 pm | गणेशा

मेरी पहली उर्दु मिश्रीत काव्यपंक्तीयाँ...

शरीक-ए-ज़हर ये गुल मेरी, आँखों मे शमा ये सुलगती रही
तीर-ए-इश्क ने लिखी थी मौत, जा जिंदगी तुझपे उधार रही

------ शब्दमेघ

Bhakti's picture

29 Jul 2020 - 8:21 pm | Bhakti

कुछ पंक्तिया
...
तीर ए शमा थी कातीलानी
आधी बसी मुझमे मेहरबानी
जिंदा तो हू अब गम नहीं
दिलकी जख्मोपर नाम तुही..

मोगरा's picture

29 Jul 2020 - 11:40 pm | मोगरा

@गणेशा

खुप दिवसांनी आले, आणि काय लिहलंय वाहः वाह
कॉलेज काय, english काय.
छान झालंय, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
आता थोडा वेगळा mood पेरते.
__________________________________

ऑनलाईन शाळा म्हणजे अगदी डोक्याला शॉट असतो. मुलीला कंप्यूटर लावून देऊन, zoom वर बसायचे,
हा, पान नंबर 23 सांगितलं आहे गं..
3 + 4 किती सांग बघू ?
अरे आता शाळा तिची आणि शाळेवरची कसरत मी करतेय.

त्यात शिऱ्या चे घरून काम, डोक्याला ताप नुसता..
Yes yes., हा हा., definatly., आज., नक्की., Exactly., you guys did funtastic job.

काय? हे काय आहे?
काय वाटतेय तुम्हाला? अहो अशी वाक्य झाली की चहा ची order येते बाकी काही नाही..
Yes yes., आज., नक्की अगं चहा कर गं एक कप कडक.

कधी कधी तर वाटते, त्या नेटची ऐशी का तैशी.,
आता कळाले मला आयटीतले नवरे का करू नये.
चहा ढोसायचा., आणि ढेरी वाढवायची.
पोस्ट बरोबर ह्या दोन्ही गोष्टी वाढलेल्याच पाहिजेत., नाही तर प्रमोशन रद्द करतात की काय? काय माहित.

आणि एक, parents whats app group वेगळा, School madam group वेगळा.
बरं मॅडम शिकवताना बायकांनी गप बसायचे ना?
नाही, मॅडम हे कसे हो? नाही पहिला हुकार की दूसरा?
कुठली लाल कलरची नोटबुक वापरायची की पिवळया?
अरे सांगितले ना कितीदा. आणि मॅडम ला काय शिकवताय आता.
तेव्हडेच बघायचे राहिले होते रे..

अश्या सगळ्या कसरती झाल्यावर, दोन घास तोंडात टाकायला बसले की ह्या शिऱ्या चे कॉल चालू होतात..
Yes, sure..actually.. अगं?

तुम्हाला सांगतेय, कश्या एक एक जनी सुग्रास पदार्थ बनवून फोटो टाकतात बाई, मला तर चपात्या करायला पण नको नको होते.

चला पुन्हा बोलते. नाहीतर आजच सगळं संपेल.

~
मोगरा.

Bhakti's picture

30 Jul 2020 - 1:28 pm | Bhakti

तुम्हाला सांगतेय, कश्या एक एक जनी सुग्रास पदार्थ बनवून फोटो टाकतात बाई, मला तर चपात्या करायला पण नको नको होते
चला पुन्हा बोलते. नाहीतर आजच सगळं संपेल.
_____________________________________________________________________________________________________________
खरंय बाई.पहिल्यांदा किती किती उत्साह होता स्वयंपाकाचा नव नवीन पदार्थ करायचे .अगदी मास्क ,सोशल Distance पाळून सामुग्री आणायचे.अगदी सुपर हिरो असल्याच्या आवेशात.रवा आणि मैदा आख्या स्त्री जातीने या जगातले संपले असतील.:)फोटो काढले,पण पोस्ट नाही करावे वाटले ..उगाच ओर्डर आली तर..
मुलीच्या online अभ्यासा बाबतीत मी सुखी आहे.मुळात लेकीला शाळा आवडत नाही.तेव्हा ठरवलं असाही online शिकायची सक्ती नको.काळाची गरज आहे पण ..झूम हा फारच गुळगुळीत option आहे.
मानसिक शास्त्रानुसार विद्यार्थ्यांना अर्धा तास lecture शाळेतील योग्य आहे.इथे तर online शिकवण आणि शिकण म्हणजे पालकांची आणि शिक्षकांची कसरत अधिक आहे.त्यामुळे ३+४=७ ऐवजी चित्रकला,योगा,क्राफ्ट या activity अधिक असायला हव्या.त्यात पालकांचा सहभाग जास्त ही या lockdown शिक्षणातील तर्हा आहे.कारण लहान असो वा मोठी मुल सध्या प्रत्यक्ष मित्रांशिवाय त्यांना शिकावं लागतंय.म्हणजे discussion हा प्रकार घरातल्या घरात ४ डोक्यामध्ये online असल्याने थोडा लोड होत आहे.:)
सुरुवातीला मुलीबरोबर बरोबर आम्ही खूप चित्रे काढली.नवऱ्याला हौस. चित्र काढून पोस्ट करायची..तो करायचा ..मला नाही जमल.आता तर नवीन activity करायचा सुद्धा कंटाळा आलाय.मुलीला म्हणते काय करायचं ते कर .जेवढा पसारा करायचा आहे तेव्हढा कर.मी आवरेन.ती मग नैसर्गिकपणेच शिकते त्यातून नवीन काहीतरी ,त्यात मी सुधारणा तिला करून देते. सध्या सुधारणा हीच आपल्या हातात आहे ती चांगली शिकवली पाहिजे.
lockdown मध्ये म्हणशील तर..gallary ने खूप काही दिलंय.इथे थाळ्या वाजवून gallary ची नवीन ओळख झाली.चिनी गुलाबाच्या 2 कुंड्या तिथे आल्या..चिनी गुलाब लावायला सोपा आहे.पण याची फुलं मात्र दरवेळी वेगवेगळ्या रंग संगतीची येतात.अगदी जादुच वाटते.रोज वाट बघायची.. आज कोणत्या रंगांची फुलं आली.मोबाईलमध्ये फोटो जमा करायची आणि पाहत राहायची.त्यातच starmaker चा शोध लागला.एका निवांत वेळी gallary मध्ये बसून गाण्याची जुनी आवड परत उफाळून आली.खूप खूप गाणी गायली. वेळ होता म्हणून youtube वर कसे channel सुरु करायचं ते शिकले.शिकत राहावे नवीन काहीतरी .
gallary तला सुखाचा काळ म्हणजे संध्याकाळ...मुलीबरोबर ढगांच्या गप्पा मारायच्या.आधी निरभ्र असलेल आकाश..आताशा सावळ्या मेघांनी ,कधी लाल ..केशरी..निळसर छटा उधळत येत ..तेव्हा किती रम्य -मोहक दिसतं.पाहत राहावं वाटत.तर संध्याकाळी१८-२० वयोगटातील तरुण मुल tiktok साठी व्हिडीओ तयार करायची ,ते पाहतांना मनोरंजन व्हायचं.आता तर ते पण ban हा हा .नटून थटून कोणी नाचायचं..छान वाटायचं.मोराचं नाचण पाहून जस डोलावं तसे डोलायची .आप्तस्वकीयांची फोनवर बोलत तर कधी गुगल ,whats app व्हिडीओ कॉल विचारपूस करत डोलणारी लोकं पाहिलं की छान वाटत की ..
“दूर के अपने पास आते है
चेहरे दिल मे समा जाते है”
सुरुवातीला लवकर उठून योगाची नाटकं केली.उंबराच्या झाडावर पाखरांचा मंजुळ आवाज पार्श्वसंगीत म्हणून असायचा.आता ते अति वाटायाला लागलंय तेव्हा जमेल तस व्यायामाची आवड जोपासते.यात सुद्धा इंटरनेट च्या cure.fit app ची विशेष मदत झाली.
कोरोनाने माणसाला पुन्हा स्वत:च्या आत डोकवायला भाग पाडलंय....काळचक्र फिराव तस आंतरिक भावनांचा शोध घेण्यास भाग पाडलंय.लिखाणानी या वर्षाच्या सुरुवातीलाच रुंजी घातली होती.ओढून ओढून आणलेलं लिखाणातल मन पुन्हा हळू हळू रमायला लागलंय.यातपण कोणी वाचाल तर उत्साह वाढतो.हो की नाही.
चल बेसिनमधली भांडी आणि मुलीने घातलेला पसारा बोलवत आहे....मालकीण बाई आमच्याकडेपण पहा म्हणून...
-भक्ती

Bhakti's picture

31 Jul 2020 - 3:38 pm | Bhakti

आज पुन्हा तुझा धागा वाचला.रोज नवनवीन अनुभवायला मिळतंय.वाटा वाटा वाचाल पुन्हा ..हसू आल मला माझाच .. आवडणाऱ्या लोकांना अजून रंगवायच राहूनच गेलं.:)तर आज जरा मित्रांविषयी लिहाव म्हणालं.
काल नयनाचा मेसेज आला ..मरायच्या आधी सगळ्यांनी व्हिडीओ call करुया खूप कंटाळा आलाय ..बायकांनी इतक पुरलं असत ना स्वत: संसारात की मैत्रीणीना वेळ द्यायचं राहतच.नाही तर तेल ,भाजी संपली.हे करायचं ते घ्यायचंय याला आयुष्य पडलंय.पण जरा वेळ काढावा वाटतो.
“वेळ पळत राहते
तेव्हा...
काळाच्या घड्याळ्यात
शिरून काटे फिरवावे
नाहीतर तिथेच गोठून
ठेवावा तो काळ आपण
मुक्त होई पर्यंत ...”

तर तो वेळ मी काढते ..पण आज मित्रांची आठवण काढते अगदी शाळेपासूनचे ...
माझ्या शाळेतले मुल खूप चम्पू होते.हे तेलाची बाटलीच ओतून यायचे काय डोक्यावर काय माहित.:)आमच्या वर्गात पहिला नंबर मुलींचाच असायचा.पाचवीला श्रीक्या आणि मी प्रधानमंत्री होतो..मी असली डेंजर होते.पोर रडयाचेच.बाईना नाव सांगेन म्हणून धमकी द्यायचे.तुष्क्या आणि मी तर मारामारी केली होती.तो ४.५५ मिनिट म्हणजे ५ वाजायच्या आधी..घंटा व्हायच्या आधी वर्गातून पळून चालला होता.काही नियामांची कदर आहे की नाही तुला? म्हणाले होते मी .तुष्क्याचा राग आता आता गेलाय ह्या गोष्टीहून आता आम्ही चांगले मित्र आहोत.
मी चांगल लिहित ..लिहित राहा अस शाळेच्या मित्रांमधून सांगणारा तो आणि श्रीक्या .श्रीक्यान लग्न केल की नाही?तो आता कसा दिसतो? मला माहीतच नाही ..फार कमी बोलतो.,मी लिहिलेलं सगळ वाचतो.दाद देतो.त्याचा आणि माझा अजून एक समान दुवा म्हणजे गणपती..इतकी सुंदर मूर्ती बनवतो तो.साक्षात्कार होतो..प्रसन्न वाटत.
सुग्या नुसता हसायचा. मी दोन वर्षापूर्वी याला असं पिडलं.कारण याला रागच नाही येत. निश्या ..तुष्क्याच्या लग्नात आम्ही खूप दिवसांनी भेटलो.हाच काय मी उधार देण लागते काय माहित असा लूक देतो की बस..मी पण आता बिनधास्तपणे त्याला काळ्या चिडवते. बाकी पोर लयी बिझी आहेत.कधी कधी त्यांच्या क्षेत्रातलं अनुभव सांगतात.
११-१२वीला माझे कोणीच मित्र नव्हते.वेळच नव्हता.Bsc.ला परत मित्र व्हायला लागले ते सगळे Msc पर्यंत तेच होते.हे पण मवाळ..पुस्तकातले किडे...कवड्या परीक्षेला माझ्या मागेच असायचा...आंघोळ करायचा की नाही काय माहित...गबाळा होता ..आता HOD आहे.विज्या आधी शांत वाटायचा ..आता आमच्या batch मधून हाच नोबेल आणणार एवढा पुढे गेला आहे..पण याची राजकीय मत दुबळी बाजू आहे.आपण ज्या हुद्द्यावर आहोत त्यानुसार निष्पक्ष तो नाही ..याचा मला खेद वाटतो.जाऊ दे मला काय करायचं.
पुढचा मित्र म्हणजे केड्या..गजनी सिनेमा पाहिल्यावर lab मधला उंदीर मारायला ह्याने खूप ड्रामा केला. पिपेट stand घेऊन अख्खी lab पालथी घातली.
साहूल...ह्याला आम्ही आगलाव्या चिडवायचो...एकवेळ पोरी बऱ्या..एवढ्या पटकन हा इथली बातमी तिथ पोहचावायचा.ह्याने कुरियर अजेन्सी काढायला पाहिजे होती.याच रडगाण अजूनही सुरु आहे. हा बहुतेक असाच मरणार.
नव्या,नित्या खूप फोकस्ड होते.आनंदी आहेत .दोघानाही एकच परी पाहिजे होती..पण तिला तिचा तिसराच राजकुमार अमेरिकेत सुखी ठेवतोय ..हा हा...तेव्हा पेटून दोघांनी असल्या सुंदर बायका केल्या....वा रे वा रे...क्या जलनकी आग..आग लागो असल्या जळक्यांना...कॉलेज सुटलं आणि हे मित्रपण सुटले.
आता मी पण समजूतदार झाली होती.मंगल्या हा माझा मित्र ..अत्यंत हुशार ..किडकिडीत..ह्याच्या डोक्यात एक ..बोलण्यात एक..आणि करायचा तिसर....ह्याची आई सुगरण होती.हा कमी जेवायचा.मग ह्याचा डब्बा मीच संपवायचे.बोट चाटीत राहावे असे एक एक पदार्थ असायचे.मंगल्यामुळे आम्ही पावसाळी सहल काढली होती.
हिरवा रंग ..पाण्याचे थेंब..त्यात फुटले मग आनंदाचे कोंब....मस्त मस्त..
मंगल्या सध्या कोणाशीच बोलत नाही.हिशोबी प्राण्यांचे असेच असते.
नंतरचे मित्र सगळे माझ्याहून लहान होते.तरी मी खूप साधी..माझीच परीक्षा घ्यायचे उगीच ..हा हा... आणि सगळ्यांना समजून घ्यायचे ..परवा हर्षलचा वाढदिवस होता..म्हणाला हर्षल नाही हो “हर्षद” ह्याची माझी केबिन शेजारचीचपण..ह्याला मी हर्षलच म्हणायचे..नावात काय आहे ..म्हणलय नां कोणीतरी.
शेखू आणि माझी मैत्री उतार चढावांची..कधी भांडलो नाही.पण रुसवे फुगवे चालायचे.शेखुला कोरोनाच्या काळात लग्न करायची काय गरज होती.तेवढंच ह्याच्या लग्नात मौज करायला मिळाली असती.

अजून खूप मोठी लिस्ट आहे लिहीन पुन्हा...

-भक्ती

मोगरा's picture

19 Aug 2020 - 12:36 am | मोगरा

@ शब्दमेघा.,

मी मिपा वर आले की पहिला हा धागा शोधते.,
आजकाल येथे लिहिणे कमी केले आहे काय?
~~~~~~~~~~~~~~

बाहेर पाउस पडतोय..,
पाण्याच्या धारा वाहतायेत आणि.
काळाची असंख्य जळमटे उगाच श्वास रोखून धरायला लावतात.,
कधी कधी तर कोंडमारा होतो., भावनांचा चिखल म्हण हवं तर.
मुंबई चा समुद्र, आताही असंख्य लाटा उधळत असेल नाही.
तुझ्या माझ्या आठवणींचा नेकलेस,अजूनही त्या लाटा आनंदाने झेलत असेल.
पुण्यात मात्र पाउस तसा पडत नाही., असंख्य लाटा अंगावर घ्यायला येथे मिळतही नाही.

गणेशा's picture

19 Aug 2020 - 12:48 am | गणेशा

@ मोगरा..
धन्यवाद.

तसे या धाग्यावर लिहिणे कमी झालेय खरे, काम आणि सायकल च्या धाग्यामुळे दुर्लक्ष झाले आहे. लिहिल पण.
कॉलेज च्या वेळेस च्या मेस बद्दल लिहायला घेतले होते. राहिले आहे.
----
पण तू मुंबई म्हणाली आणि मन तिकडे गेलं, 2007-2014 माझा मुंबईतला काळ.. मस्त दिवस..
लिहिल मुंबई वर पण नंतर कधी सवडीने.

तुर्तास मुंबई ची आठवण झाली, म्हणुन मुंबई वर मी 2007-08 ला लिहिलेली कविता येथे पुन्हा देतो.. या कवितेला नंतर खुप नावे चिकटली.. पण असो..
खालील प्रतिसादात देतोय..

गणेशा's picture

19 Aug 2020 - 12:48 am | गणेशा

स्वप्नांचे पुर्णत्व येथे
स्वप्नांचे पान मुंबई

तरुणाईची सळसळ येथे
तारुण्याची जान मुंबई

वृत्तीतली धगधग येथे
जिवाचे रान मुंबई

मनामनाची ओढ येथे
मनातली जाण मुंबई

प्रीतीतला गोडवा येथे
प्रीतीचे गान मुंबई

लावण्य रुप्-सौंदर्य येथे
लावण्याची खाण मुंबई

नजर घायाळ होती येथे
नजरेचा बाण मुंबई

लखलखता श्रुंगार येथे
नटलेली छान मुंबई

क्षणाक्षणांस महत्त्व येथे
वेळेचे भान मुंबई

भविष्याची उज्वलता येथे
भविष्याचे ध्यान मुंबई

व्यवहारातली कुशलता येथे
व्यवहाराचे ज्ञान मुंबई

ध्येयाचे शिखर येथे
प्रगतीचे यान मुंबई

कष्टकरी हात येथे
हाताचे त्राण मुंबई

जीवनातले अनुभव येथे
अनुभवाचे दान मुंबई

मराठीचे अस्तित्व येथे
मराठीचा मान मुंबई

महाराष्ट्राचा अभिमान मुंबई
देशाची शान मुंबई
आमचा प्राण मुंबई
स्वप्नांचे पान मुंबई.........

---------- गणेशा

Bhakti's picture

19 Aug 2020 - 5:23 pm | Bhakti

आता एवढच सुचलय
आई

भावनेचा ढग
बरसला मग
ओलावा मातीला
हळू बिलगला
रोपट मायेचं
नात जीवनाचं
फुलं लगडली
सडा ओंजळी!!
-सरीवर सरी

आज बर्याच दिवसांनी, माझ्या या धाग्याची आठवण झाली..
जेंव्हा येइल तेंव्हा जे सुचेल ते , किंबा जे आठवले ते जसे आहे तसे लिहिणाअर म्हणुन हा धागा सुरु केला.. पण बर्याचदा डायरी सम लिहिण्याची सवय नसल्याने हे लिखान मागे पडतेच ...

आता पुन्हा या बिझी आयुष्यातुन काही वेळ काढुन लिहावे म्हणतोय बघु..

सुरुवात कविते मार्फत करतोय .. खरे तर कविता येथे जास्त लिहिणाअर नव्हतो.. पण आता ही जी कविता आपल्या मिपा दिवाळी अंकासाठी लिहिणार होतो, ती राहिली ती राहिलीच म्हणुन पुर्ण करतो येथे आणि येथेच ठेवतो ..

दिवाळी अंकाचे म्हणाअल तर लिखाण मनापासुन झालेले असेल तर देण्यात अर्थ आहे, उगाच द्याय्चे म्हणुन कसे ही शब्द ओढुन देण्यात पॉईंट वाटला नव्हता ...

असो तर पुन्हा सुरु करतोय माझे 'शब्द झाले मोती' बघु कुठपर्यंत जातोय ते

मी पण डायरी वगैरे काही लिहीत नाही.पण तुझ्या या धाग्यावर मित्रांविषयी लिहले.आणि श्रीक्या विषयी लिहिले..काय आश्चर्य श्रीक्याशी मी बोलले आणि आता तो माझा चांगला मित्र झालाय :).

Bhakti's picture

25 Nov 2020 - 6:07 pm | Bhakti

आज खूप दिवसांनी laptop उघडला.महिना दीड महिना दुखण्यातच गेला.मराठी app वर पण मोबाईलवरूनच लिहायचे.या धाग्यावर लिहितांना उगाच वाटते आपण खूप सुखी आहोत.:) सांजवेळ आहे,बाहेर झाडावर घरी परतलेल्या चिमण्यांचा मस्त चिवचिवाट आहे.
तर या धाग्यावर पहिला लेख गणेशाच्या मुलीच्या जन्माचा आणि नावाचा वाचला.माझ्या मुलीचा जन्म हि सुद्धा माझ्या आयुष्याची दुसरी नांदी आहे.तिच्या नावची सुद्धा खूपच गंम्मत आहे.
माझ्या मुलीचा जन्म नवरात्रीतल्या अष्टमीचा ..डॉक्टर हिचा जन्म झाल्या झाल्या म्हणाले ‘दुर्गा’ झाली हो.माझी पोर नवसाची ..तेव्हा मी तीच नाव ‘संतोषी’ असे देवीच ठेवणार होते.पण पुढे जाऊन पोरगी मलाच जाब विचारत बसली असती म्हणून हे नाव नाही ठेवलं.
आम्ही नवरा-बायको म्हणजे दोन ध्रुव आहोत.नावावर सुद्धा आमच एकामत नाही झाले.मला राधिका नाव ठेवायचे होते.राधा ,राधिका नावातच किती गोडवा आहे .कोणी सुंदर घुंगरू घालून इकडे तिकडे बागडणारी गोड मुलगी डोळ्यासमोर उभी राहते .पण कोणीच पसंती नाही दिली.नवरा म्हणाला ‘गौरी’ नाव ठेवूया.मी म्हणाले एका घराआड एका घरात गौरी आहेत ,एवढं कॉम्मोन नाव नको.आमच्या सासुबाईवर टीव्ही सिरीयाचा पगडा म्हणाल्या ‘शुभ्रा’ नाव ठेवूया.म्हणाल घरातच सिरीयालची पात्र नकोत.:)
मला वाटत होत ‘मेधा’ वा ‘सखी’ नाव ठेवाव..कोणालाच नाही आवडल.दोन अक्षरी अपभ्रंश नाही होत .
शोधता शोधता ‘गिरीजा ‘ नाव मला आवडलं.म्हणजे जजन्मादिवसाची आठवण ती नवरात्रीची!!आणि देवीचीही कृपा तिच्या सतत बरोबर असेल.गिरीजा म्हणजे पार्वती..इष्ट देव गणपतीची माता!
आता तरी सगळ्यांना नाव आवडत .शाळेत होऊ शकतात अपभ्रंश पण ते ती खोडून काढेल कारण तिला तीच नाव खूप आवडत ..वेगळ आणि आईने दिलेले.

गणेशा's picture

28 Nov 2020 - 8:01 pm | गणेशा

__/\__

गणेशा's picture

28 Nov 2020 - 8:00 pm | गणेशा

श्रुंगार्/प्रेम काव्य हा माझा प्रांत मुळीच नाही, पण चंद्र माझ्या कुशीत आहे, नंतर ही दिवाळी अंकासाठी श्रुंगार कविता लिहिण्याचा केलेला अर्धवट प्रयत्न येथे देतोय..
आणि अत्यंत खेदाने म्हणावे लागेल मिपाच्या इतक्या वर्षात मी एकदाही दिवाळी अंकात भाग घेतला नाही..
--------------

उमलत आहे पहाट अजुनी
तरी मिठी तुझी ना सैल व्हावी
गुंफलेली रातराणी तू कोवळी
वीजफुलांची अजुनी बरसात व्हावी ||

आर्जवे मेघांची अजुनी या ओठांवरती
अबोलीची फुले कर रीती तू त्यावरती
मग चढेल रंग गुलाबी हळुच शब्दांना
अन उमटेल स्वर मालकंस स्पर्शांना

अशीच राहुदे चंद्रशेज.. माझ्या खांद्याची,
अन हळुच ओढ पांघरुण चांदण्यांचे ..पाठीवरती
अशीच राहुदे आभाळमाया.. केसात तुझ्या माळलेली
लाजतील पहाट किरणे ही ओलांडण्यास त्याला...

उमलत आहे पहाट अजुनी
तरी मिठी तुझी ना सैल व्हावी
गुंफलेली रातराणी तू कोवळी
वीजफुलांची अजुनी बरसात व्हावी ||

- शब्दमेघ
अपुर्ण , १५ ऑक्टो २०.

अशीच राहुदे चंद्रशेज.. माझ्या खांद्याची,
अन हळुच ओढ पांघरुण चांदण्यांचे ..पाठीवरती
.
.
गोंदण उमटले त्या चांदण्यांचे..
भावस्पर्श उगा ते आसुसलेले..
रातराणीसम धुंद गंधाळलेली..
वीजफुलांची अजुनी बरसात व्हावी ||

कुमार१'s picture

5 Dec 2020 - 8:06 pm | कुमार१

छान
आवडली.

हे लिहायला मी कोणी डिसले गुरुजींप्रमाणे क्रांतिकारी नाही पण प्रामाणिक काम केलेली एक साधी शिक्षिका होते ..काल त्यांची मुलाखत ऐकली तेव्हा...आणि हा ११ वर्षांचा तप काहीसा शिक्षणाचा उहापोह करते.
“तुमच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या पंखांना बळ द्या ते छाटू नका..”हे जर माझ्या त्या वेळच्या विभागाच्या प्रमुखांना कोणी त्यांच्या बालपणीच्या शिक्षकांनी सांगितले असते तर सूड बुद्धी ठेवत ते माझ्याशी असे वागले नसते.असो...तो प्राक्तनाचा भाग समजून आणि देव त्यांना या पुढे भेदभाव न करण्याची बुद्धी देवो! (खेद असा कि हि बुद्धी त्यांना अजून नाही आली)असे म्हणत मी तो गुणप्रत्रकाचा कागद नजरेआड केला.पण हरेल ती भक्ती नाही.प्राक्तानाने पुन्हा एक संधी दिली.आवडते ज्ञानदानाचे काम करण्याचे..आवडत्या क्षेत्रात करायचे!!
प्रयोगशाळा तर अलहिदाच होती.तरीही ती आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द होती.मला आठवतय रसायनांचा तुडवडा होता तेव्हा मी होम पद्धतीने धुण्याची पावडर वापरत dna आयसोलेट करून दाखवला.अजूनही त्या वर्गातील मुले मला भेटले कि तो प्रसंग आठवून सांगतात.
पुढे अनेक अनेक प्रोजेक्ट केले.त्यातला पुढचा प्रोजेक्ट म्हणजे synthetic seed बनविण्याचा..अंतिम सादरीकरणाच्या वेळी
“कोण आहे गाईड ?” ..असे म्हणत माझ्याकडे कौतुकाच्या नजरेने माझ्याकडे mpkv च्या वरीष्ठ संशोधकांनी पाहिले.
त्या नंतर माझ्या प्रत्येक विध्यार्थ्याला मीच गाईड म्हणून पाहिजे होती..अक्षरशः मी गाईड असल्यावर विद्यार्थी घोड गंगेत न्हाऊन निघाल्यासारखे आनंदी व्हायचे.
काही चुका झाल्या म्हणजे पेपर प्रदर्शित करण्यात माझा रस नसणे,वा पेटेंटसाठी काम न करणे ..पण माझ उदिष्ट केवळ १००% ज्ञान देणे हेच होते.या गोष्टी गौण होत्या.
तरीही एकदा आकाशवाणीवर उतीसंवार्धन या विषयावर एक मुलाखत दिली तेव्हा कुठे माझ्यावर माझ्या जुन्या शिक्षकांनी विश्वास ठेवला.अर्थात माझे विश्व तर माझे विध्यार्थी हेच होते..कोणत्याही अपेक्षांच्या पार पुढे होते मी!!
डिसले गुरुजी म्हणाले त्याप्रमाणे आनंद घेत काम करा ध्येय घेत नाही! अशाप्रकारे पुढे संधी मिळाली तर काम घडो!!
टीप:पुढ जे होईल ते ..नाहीतरी माझी वंशाची पणती आहेच शिक्षणातले प्रयोग करायला. :-)
-भक्ती

चांदणे संदीप's picture

16 Dec 2020 - 5:41 pm | चांदणे संदीप

बाभळीच्या झाडावरून एक हिंदी कविता आठवली जी माझी आवडती आहे. एक नाजूक कळी आणि बाभूळ अशी परस्परविरोधी भाव असणारी रूपकं घेऊन ही कविता रचली गेली आहे.

दो जीवन

कली निगाह में पली,
हिली-डुली कपोल में,
ह्र्दय-प्रदेश में खिली,
तुली हंसी की तोल में|

गरम गरम हवा चली,
अशान्त रेत से भरी,
हरेक पंखुरी जली,
कली न जी सकी, मरी|

बबूल आप ही पला,
हवा से वह न डर सका,
कठोर जिन्दगी चला,
न जल सका, न मर सका|
- केदारनाथ अग्रवाल

सं - दी - प

Bhakti's picture

16 Dec 2020 - 6:44 pm | Bhakti

ह्र्दय-प्रदेश में खिली,
तुली हंसी की तोल में|

Bhakti's picture

16 Dec 2020 - 6:45 pm | Bhakti

विद्यार्थ्यांचे मन वाचायचे असेल तर त्यांच्या वहीचे शेवटचे पान पहावे.अशीच पसारा आवरताना जुनी जनुकीय अभियांत्रिकीची वही सापडली...पहिली पान वाचतांना ,हळूच शेवटचे पान पाहिले..अर्थात माझ्या त्यावेळच्या वह्यावर काय सापडणार तर कविता 
विशेष म्हणजे हि कविता त्याच्यासाठी लिहिलेली त्याच्याबरोबर असतानाची एकमेव कविता..ती आता सापडावी म्हणजे आश्चर्यचं ... बहुतेक मी तेव्हा आंतरजालावर नव्हती दिलेली ..आधीच खूप कविता अदृश्य झाल्या आहेत ,तेव्हा त्याच्यासाठीची हि कविता अदृश्य होण्याआधी इथे लिहिते..
तो तसाच नेहमी दाराच्या बागेतून येणारा
अप्रतिम जगावेगळ माझ्या ओंजलीत देणारा

तो तसाच मला स्वत: बोलक करणारा
मात्र मी त्याला बोलक करायची वाट पाहणारा

तो तसाच नात त्याच माझ मलाही न सांगाणारा
पण कवाड त्याच्या मनाची माझ्यासाठी उघडणारा

तो तसाच,मला माहित नाही होईल का तो माझा?
रंगेल त्याचे आयुष्य सप्तरंगाने माझ्या

पण तो ...स्मरेल ...कायमच
-भक्ती

एका मोहिमेसाठी जाहिरात बनवायची आहे? काम करताल का? आधीच घरात बसून कंटाळा आलाय त्यात जर असे नवीन काहीतरी करायला मिळतेय ..करूया म्हणल.मानधन अगदीच कमी पण कंपनी मोठी होती.मग त्यांनी कागदपत्रे पाठविली.नीट न वाचता सुरु केल्यामुळे चुकीच्या वस्तू वापरल्या .मग पुन्हा ते ज्या उत्पादनाची जाहिरात करायची होती ती २- ३ वेळा आणली.आता स्क्रिप्ट त्यांनी पाठवली होती.खरच पाठांतराची सवयच राहिली नाही.तेव्हा परत परत मोबाईलमध्ये प्रसंग चित्रित करावे लागायचे.इनमिन ८-९ वाक्य पण मोबाईल सुरु झाला कि गोंधळच उडायचा.१०-२० टेक घ्यावे लागले.अर्थातच मला नाटकं कधी जमली नाही..तेव्हा थोडा खोटेपणा वाटलाच ..असो..पण अशी संधी घरबसल्या कोण देणार..
मग आली एडिटिंगची वेळ .बापरे सांगते ४ दिवस लागले.त्या कंपनीला जेव्हा जेव्हा पाठवायचे तेव्हा हे असे ते असे करत करत खूप खूप तास लावले.एव्द्याच मिनिटात बसावा, असेच सबटायटल टाका (यासाठी मला १ तास लागला) शेवटचा दूरचित्रवाणी पाठवला तेव्हा..तुम्हा पुन्हा चित्रित कराल का ?विचारणा झाली. मी जरा का कु केली ..तर तेव्हा ५०% रक्कम वाढवून देतो म्हणाले(अरे वाह आधी माहित असत तर अजून २-३ चुकीचे शूट केले असते.).मग पुन्हा काही प्रसंग पुन्हा चित्रित केले. पुन्हा ते जोड एडीट करा,पुन्हा ५९ सेकांदात बसवा.त्यांना पाठवला,अप्रूव्हल झाला तर सांगतो...म्हणजे गायी भैस पानी मै!!चित्रीकरण ठीकठाक होते.पुन्हा मग मेसेज केला की प्रदर्शित केला.छान वाटले.संमिश्र प्रतिक्रिया आल्या पण मेहनत जी करावी लागली त्यामुळे कार्यपूर्तीचा आनंद होता.
खरोखरी धन्य ते कलाकार ..निर्मिती,छायाचित्रण,संकलन आणि अजून कितीतरी बाजू....

Bhakti's picture

2 Jan 2021 - 6:48 pm | Bhakti

My heart is always full of love
So mind is like one gypsy alive..

Glass is filling with fairy wine
Makes days with colored n divine..

Though path lighting by thunder
Slowly why followers got disappeared?

I viewed through kaleidoscope apparently
Furious object stacked in eyes fearlessly..

-भक्ती

Bhakti's picture

2 Jan 2021 - 6:48 pm | Bhakti

My heart is always full of love
So mind is like one gypsy alive..

Glass is filling with fairy wine
Makes days with colored n divine..

Though path lighting by thunder
Slowly why followers got disappeared?

I viewed through kaleidoscope apparently
Furious object stacked in eyes fearlessly..

-भक्ती

गणेशा's picture

25 Feb 2021 - 11:31 am | गणेशा

आज सौंदाळा यांच्या मुळे पुन्हा हा धागा वाचण्यात आला..
पुन्हा अनेक आठवणी आणि अनेक लेख पाहून छान वाटले..

इतरांच्या हि तितक्याच गोड प्रतिसादा मुळे आणि त्यांच्या अनुभवाने छान वाटले..

पुन्हा येथे लिहावे असे वाटते आहे.. वेळ मात्र खूप कमी असल्याने अवघड वाटते आहे...

पण या सर्व आठवणीत शाळा आणि कॉलेज च्या आठवणी जास्त मनाला हलवून सोडतात..

त्यातील गणपती लेखमाला ला धागा येथे देतो पुन्हा..
त्यावेळेस कुठे अन्य ठिकाणी लिहलेले accept नव्हते म्हणुन तो इकडे दिला नव्हता..

देतो आणि पुन्हा लिखान चालू करतो हळू हळू..

गणेशा's picture

25 Feb 2021 - 11:34 am | गणेशा

नोट : नावे बदलली आहेत पुन्हा..
--

Maroon color

तू हसलीस की, फुले उमलू लागतात,
आणि त्याचे रंग तुझ्या ओठांवर दिसू लागतात.
तू अशीच हसत रहा, सर्वांचे मन मोहत रहा
माझी नसताना पुन्हा, माझीच होत रहा..

मेघा, तुझ्या डायरीतील ह्या ओळी माझ्या अजूनही लक्षात आहेत. हातात घेतलेल्या फूलपाखराचे रंग जसे उडून जातात, तशा आठवणी थोड्याच त्या रंगांसारख्या असतात? काही आठवणी असतात त्या फूलपाखरासारख्या, नाजूक.. सुंदर.. नितळ..
ह्या ओळी मनावर कोरल्या गेल्या त्या कायमच्या. त्या काळी मी लिहीत नव्हतो, तरीही मीही एक डायरी घेतली होती तेव्हा. त्याच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेले 'आते जाते, हसते गाते, सोचा था मैने मनमे कई बार' हे गाणे अजूनही तसेच आहे, तुझ्या नावासहित. आणि मग डायरीच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेल्या गाण्याच्या मागे मी लिहिले...

* * *

तर, हा काळ आहे २०००-०२चा. तेव्हा आजकालच्यासारखे मोबाइल, व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस, फेसबुक असले social life नव्हते. तुमच्या भावना ह्याच उत्कट होत्या. तेव्हा वाटणार्‍या गोष्टींमध्ये एक अनामिक हुरहुर दाटलेली असायाची.. एक ओढ असायची.. वाट पाहणे असायचे. बरेच काही..

मेघा खूप शालीन मुलगी, रेखीव. तिच्या दोन्ही गालांवर खळ्या पडायच्या. मला आवडायच्या त्या. तेव्हा कविता लिहीत नव्हतो मी. लिहीत असतो, तर त्या चंद्रखळ्यांवर असंख्य कविता लिहिल्या गेल्या असत्या, इतक्या त्या आवडायच्या मला. मेघा शांत, सुशील, कमी मित्र असलेली मुलगी. मी त्याउलट, खूप बोलका, टुकार, कँटीनला पडीक असलेला, मुक्त.. स्वैर.. स्वच्छंद.

मेघाला मात्र फक्त दोन मित्र - एक मी आणि दुसरी मनाली. मनाली ही अतिशय सालस मुलगी. मेघामुळे माझी तिच्याशीही खूप छान मैत्री झाली होती. नंतर आमच्या तिघांचा असा ग्रूप तयार झाला होता. मला मात्र खुप जास्त मित्र-मैत्रिणी होत्या. आपला स्वभाव बोलका. त्यामुळे माझे ग्रूपही जास्त. मी तेव्हा खूप भांडायचो खरे. आता हसू येते, पण तेव्हा मी नक्कीच वेगळा होतो. पटकन रिअ‍ॅक्शन, पटकन प्रेम, पटकन भांडण..

मेघाची आणि माझी मैत्री झालीच कशी? असा प्रश्न मला पडायचा कधी कधी. ती इतकी नाजूक, सुंदर, गोरीपान, शालीन.. मी इतका बेडर, सावळा, उंच, धिप्पाड, भीडभाड न बाळगता कसेही बोलणारा, माहीत नाही. पण मी तेव्हा ही खूप respect करायचो तिचा. तेव्हा त्या सर्व गोष्टींना respect म्हणतात हे माहीत नव्हते, इतकेच.

खरे तर ती होतीच तशी, जीव लावावी अशी. प्रेमात अखंड बुडून राहावे अशी. तिने maroon colorचा, बुट्ट्या असलेला ड्रेस घातल्यावर तर ती खूप सुंदर दिसायची. मला खरे तर मुली आवडायच्या त्या ब्लॅक ड्रेसमध्ये, पण ह्या maroon colorच्या ड्रेसमुळे मात्र मला ह्या याही कलरचे खूप आकर्षण झाले होते.
मेघाचा बॉब कट असायचा. कधीकधी तिचे सिल्की केस डोळ्यांपुढे यायचे. मला तिच्या केसाला हात लावून ते मागे सारण्याचा मोह व्हायचा. कधीकधी तिने डोळे वटारले तरी तो मोह मी पूर्ण करायचो.

त्या काळी आपल्याला आवडणार्‍या माणसाबद्दलच्या भावना अशाच असायच्या मर्यादेत. मेघा मर्यादेचा अतीव पुतळा होती. ती खडूसही होती. सुरुवातीला तिला माझ्या भावनांचे जास्त काही पडले आहे की नाही, असे मला नेहमी वाटायचे.
मी पहिल्यांदा तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितल्यावर तर ती किती भडकली होती. टुकार हा तिने तेव्हा मला म्हटलेला शब्द अजून आठवतो. नंतर काही काळ असाच गेला. नेमके शनिवारीच हे सगळे घडायला हवे होते का? सोमवारपर्यंत वाट पाहणे म्हणजे काय, हे आता त्या खडूस मुलीला कोणी सांगावे असेच वाटत होते मला.
सोमवार आला, गुपचूप पुन्हा आम्ही प्रॅक्टिकलला बसलो, न बोलता. प्रॅक्टिकललाही आमचा एकच कॉम्प्युटर होता, कोपर्‍यातला. दोघे एकत्रच तासन तास c and data structuresचे प्रोग्रॅम करत बसायचो. इतके की मी त्या विषयात पहिला आलो. नंतर कंपनीतही त्याचा जास्तच उपयोग झाला :-))
तर गुपचुप बसणे हे आपल्या स्वभावात नव्हते. पुन्हा बोलणे, पुन्हा आर्जवे.. "फक्त मैत्रीण म्हणून आपल्याला जमणार नाही तुझ्याकडे बघायला" असली असंख्य वाक्ये माझ्याकडे होती. मी माझे नेहमीच खरे करत आलो आहे. तेव्हाही मी आतासारखाच होतो या बाबतीत.

***

मेघा माझ्याबरोबर कँटीनला येत नव्हती जास्त. खूप कमी वेळा आम्ही कँटीनला गेलो असू. एकदा ती माझ्याबरोबर भटाच्या कँटीनला आली होती. तुषारच्या कँटीनपलीकडे गुलाबाचे झाड होते, त्याचा गुलाब तोडून मी तिच्यासाठी आणला होता. हाय, तो गुलाब चक्क पांढरट पिवळट होता. लाल नव्हता. ती हसत होती. मी देताना म्हणालो, "देणार्‍याच्या भावना महत्त्वाच्या, कलरचे काय एवढे.."

मी खूप वाया गेलेलो आहे असे कोणाचेही म्हणणे असेल, पण तरीही मी पहिला आलो सेकंड इअरला. आपले असेच असते. जे करायचे ते मनापासून, मग तो अभ्यास असो वा प्रेम वा मैत्री. गणित आणि c and data structuresमध्ये संपूर्ण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी पहिल्या काही जणांत होतो, असे सरांनी सांगितले मला.
मी हुशार होतो. पण टिपिकल वरणभात, सोज्ज्वळ हुशारपण आपल्यात नव्हते. आपल्याला जे यायचे ते असेच यायचे नॅचरली.

मग आम्ही एकत्र अभ्यास करू लागलो. एकत्र अभ्यास हा कॉलेज सोडून भेटण्याचाही एक मार्ग होता आमचा. मला आवडायचे शिकवायला. किती किती अभ्यास करायचा म्हटले, तरी एक एक टॉपिक मी चुटक्लीसरशी संपवून टाकायचो. मग उगाच असंख्य गप्पांत आमचे तासन तास जायचे.
ते तास, त्या गप्पा पुन्हा मिळतील का मला पुन्हा? असा प्रश्न माझे मन कायम मला विचारत राहते. तेव्हा आमचे एक सूत्ही होते - 'more study - more confusion - less marks, less study - less confusion - more marks."

तिला तिच्या डायरीतल्या कविता, लेख वाचायला आवडायचे.
'बस होती चिंचवडची' ही कविता तर मी तिला कितीदा म्हणायला लावायचो. ती कविता ती खूप छान म्हणायची. तेव्हा मी स्वत: कधी आयुष्यात कविता लिहीन असे वाटले नव्हते. कदाचित मी कविता लिहिण्याला हे सारे प्रसंगच कारणीभुत आहेत. असो.

***

मेघा माझ्यापेक्षा मोठी होती. वागण्यानेसुद्धा. मेघाचे डोळे खूप काळेभोर, मस्त होते. मी नंतर तिला बर्‍याचदा चश्मा काढायला लावायचो. बर्‍याचदा तिच्या डोळ्यात बघायचा हट्ट करायचो मी.. मी ऐकत नव्हतोच :-))

मी खूप हळवा होतो तेव्हा. मेघा हसायची माझ्या हळवेपणावर कायम. मेघा होतीच तशी, ती कुठल्याही गोष्टीवर मनमुराद हसू शकत असे. एखादी गोष्ट मिळाली नाही, तरी त्या गोष्टीकडेही ती हसत पाहू शकत असे. मला असले वागणे कधी जमत नसे.
'धडकन' रिलीज होण्याआधीच माझे 'तुम दिल की धडकन मे.. रहते हो,. तुम रहते हो' हे गाणे पाठ होते. माझा आवाज चांगला नव्हता. पण सर्व वर्गात मी हे गाणे तिच्यासाठी गायले होते, तेही पूर्ण. ते गाणे तेंव्हा मला इतके यायचे की त्याचे म्यूझिकसुद्धा मी तसेच गायचो. हे गाणे मी मेघाला dedicate केले होते. नंतर तो पिक्चर रिलिज झाला आणि त्या देवसारखाच मी आहे असे तिचे म्हणणे होते :-)) आणि असे म्हणून ती हसत असे.

पुढे नंतर तिने वर्गात 'आते जाते, हसते गाते | सोचा था मैंने मन में कई बार | वो पहली नज़र, हलका सा असर |करता है क्यों दिल को बेक़रार' हे गाणे गायले होते.
मला खूप आवडले हे. तिला लता मंगेशकरने गायलेले 'होठों की कली कुछ और खिली' ह्या ओळीपासून हे गाणे जास्त आवडायचे. मला एस.पी, बालासुब्रह्मण्यमचे कडवे आवडायचे.
एस.पी. माझा आवडता गायक. अजूनही मी त्याची कित्येक गाणी ऐकतो. विशेष म्हणजे आराध्यालाही नेमके 'आते जाते, हसते गाते' हेच गाणे आवडते. आराध्या आणि मी गाडीवर जाताना नेहमी 'मेरे रंग मे' हे गाणे म्हणतो, पण तिला 'आते जाते' हे गाणे आपोआप कसे आवडायला लागले, माहीत नाही. कधीकधी तर ती चक्क "पप्पा, आते जाते लावा ना" असे म्हणते. आराध्याचा जन्मही जानेवारीमधलाच.

आम्ही रूमवर आते जाते गाणे म्हणायचो. मी एस.पी.चे कडवे म्हटल्यावर ती लताचे कडवे म्हणत असे. ती जेव्हा तिच्या गावी जाणार असे, तेव्हा मला उगाच 'आँख हे भरी भरी, और तुम मुस्कुराने की बात करते हो' हे गाणे म्हणून चिडवायची.. मी चिडलो की मात्र ती पुन्हा एस.पी.चे आणि लताचे गाणे म्हणायची - 'तुमसे जुदा होकर मुझे दूर जाना है , पलभर की जुदाई फिर लोट आना है?'

तेव्हा मला ऐश्वर्या राय आवडायची खूप. मेघालासुद्धा ऐश्वर्या रायच आवडायची. माझ्या एका वहीवर ऐश्वर्याचे चित्र होते. ती वही मला खूप प्रिय होती. मेघा मात्र प्रीती झिंटासारखी दिसायची. अगदी तसीच अवखळ वाटायची कधीकधी. मेघाला टीव्ही सिरिअल्स आवडायच्या बहुतेक. मला तसल्यात काही रस नव्हता. तिला 'कसोटी जिंदगी की' आवडायची, मी त्याचा एकही भाग बघू शकत नव्हतो.

***

साडी डेला मेघा खूप सुंदर दिसत होती.. मला हिरवी साडी आवडते, हे मी नव्हते सांगितले तिला कधी. तिने Maroon redच साडी घातलेली. तिला मी पाहतच बसलो होतो. मेघा जवळ आल्यावर "मेघा, तू आता मोठी झालीस" असे तन्वीर म्हणाला होता. तो फोटो तिने तिच्या वडलांना दाखवला होता, तेव्हा तेसुद्धा तिला "मेघा, आता तू मोठी झाली" असे म्हणाले होते. हिने आम्हाला मारलेलाच डायलॉग तेथे मारला - "मी आहेच मोठी." तिने काढलेला तो फोटो मी माझ्याकडे ठेवून घेतला नंतर, तिच्या आठवणीसाठी.
आम्ही कॉलेजनंतर पुन्हा भेटणार नाहीच असे तिला कदाचित म्हणायचे होते. मी माझ्या स्वप्नातही असे विचार करू शकलो नव्हतो. पण मी कितीही बेधडक असलो, तरी मात्र मी कधी माझ्या मर्यादा तोडून तिला त्रास होइल असे वागलो नाही. ते चूक की बरोबर हे तीच सांगू शकेल, मी नाही. तिच्या त्या फोटोचे मी खूप छान स्केच बनवले होते. आहे अजून माझ्याकडे ते.

आम्ही कॉलेज संपल्यावर काय काय करायचे, कुठे कुठे अ‍ॅडमिशन घ्यायची, कसे पुढे जायचे असे बोलत असू. मी आयुष्यात तुझ्यासोबत असेन असे मी नेहमी म्हणत असे. मी MCS करणार होतो. मेघाला वाटायचे MCA करावे, ते जास्त चांगले. मेघा पुढे बहुतेक शिकणार नव्हती आणि मी तिला पुण्याला अ‍ॅडमिशन घे म्हणायचो. मी कितीही माझ्या म्हणण्यासारखे झाले पाहिजे म्हणालो, तरी ती तिच्याच म्हणण्याने वागायची. आम्ही खरेच वेगळे होतो.. खुप वेगळे.. तरी एकत्र.

मी नंतर, तिचे तेव्हा म्हणणे होते ते म्हणुन MCAला अ‍ॅडमिशन घेतली. मात्र मी कॉलेजला कधी नीट गेलोच नाही. मी दुसर्‍या वर्षाला असतानाच मॉड्युलर या कंपनीत सिलेक्ट झालो आणि कॉलेजने मला दुसर्‍या वर्षापासून तिकडे काम करण्याची परमिशन दिली (मोड्युलरचे चार भाग मी आधी लिहिले आहेतच).
मास्टर डिग्रीला कॉलेजला मी कधीच रमलो नाही. कारण तिथे तू नव्हतीस मेघा. मी अभ्यासही केला नाही. मला मास्टर डिग्रीला अमोल सोडला तर कोणी मित्रही नव्हते. नशीब, तेथेही मी असाच अभ्यास न करताही पेपरच्या आदल्या दिवशी काही वाचून फर्स्ट क्लास मिळवला.

***

आमच्या लास्ट इअरच्या परीक्षा झाल्या, तरी ३-४ दिवस मी माझ्या घरी निघून आलो नाही. तेथेच रूमवर राहिलो. रोज उद्या जातो म्हणायचो आणि सकाळी लँडलाइनवर फोन करून मेघाला बोलावून घ्यायचो. शेवटी तो दिवस आला तो कसा विसरेन मी.. आणि मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. मनालीसुद्धा रूमवर आली होती काही वेळाने, मेघापाठोपाठ. मेघानेच बोलावले होते तिला, असे मला वाटते. नंतर त्या दोघींना सोडायला मी हडको कॉलनीतून सैनिक कॉलनीत जाईपर्यंत बरोबर गेलो. मेघाचा त्या दिवसी Maroon कलरचाच ड्रेस होता. माझ्या आवडीच्या कलरचा. तिला तेव्हा मी सोडायला जाताना मनात किती स्वप्ने घेऊन चाललो होतो.. तिला शेवटचे पाहताना हेच शेवटचे असे वाटले नव्हते.

निरोपाची वेळ आल्यावर नेमके मला खूप खूप बोलावेसे वाटत होते. कॉलेजच्या सर्व आठवणींना ओंजळीत पुन्हा घ्यावे वाटत होते. पण ती रस्त्याच्या त्या कडेला जाईपर्यंत माझे शब्द ओठांआडच अडकले. नेहमी रस्त्याने चालताना मी रस्त्याच्या बाजूला चालायचो आणि ती आतल्या बाजूला, आता आराध्याला घेऊन चालतो तसे. आता मात्र आमचे रस्तेच वेगळे होणार होते. हलकेच तिने मागे वळून पाहिले, माझे संयमाचे बांध हळूच सुटले आणि रिकामे हात हलत राहिले...

***

नंतर अनेक दिवस गेले. लँडलाइनवर कधीतरी बोलणे व्हायचे. मेघाने पुढे कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली नाही. तिच्या लग्नाचे काही चालले आहे, कधी ती बोलली नाही. एका १० जूनला तिचा फोन आला नाही, म्हणून मी १२ जूनला रागावून फोन केला होता - २१०६६. तेव्हा असलेच नंबर असायचे. आतासारखे मोठे नंबर तेव्हा कधी नव्हते.
तेव्हा तिने मला सांगितले की तिचे लग्न झाले आणि मी ख्कूपच हळवा आहे म्हणून मला तिने मुद्दाम बोलावले नाही. मी म्हणालो तिला, "आलो असतो मेघा मी तुझ्या लग्नाला, बोलवायचे तरी." ती तेव्हा खूप खूश वाटत होती.. मी अभिनंदन केले का.. मला आठवत नाही. तिने मला त्यांचे गाव आणि नाव सांगितले. भेटू म्हणाली बहुतेक तिकडे.
ती हसत बोलत होती. मीसुद्धा खोटे हसू आणले होते ओठांवर. नंतर मी 'आते जाते हसते गाते', 'तुम दिल की धडकन मे', 'तुमसे जुदा होकर' ही सगळी गाणी माझ्या mp3 playerला ऐकली.. काही वर्षांनी मी माझ्या भावना शब्दातून लिहिण्याचा प्रयत्न केला आणि मला नवी दुनिया सापडली - कवितेची. मी इतका भारी लिहीत नव्हतो तेव्हा, पण माझी पहिली कविता क्खूप हिट झाली. तिचे नाव होते - 'माझी तू.. त्याची होताना..' या कवितेची असंख्य विडंबने झाली. स्टेजवर असंख्य once more या कवितेला मिळाले आणि 'शब्दमेघ' हा माझाच मी नवीन पुन्हा जन्मला आलो.

नंतर १४ वर्षे मी तिचे नाव कधीच कोठे सर्च केले नाही. तिला कसलाच भेटण्याचा प्रयत्न माझ्या मनात आला नाही. मी कोणालाच तिच्याबद्दल कधी विचारले नाही. शब्दमेघ होऊन मी असाच फिरत राहिलो.. मुक्त.. स्वैर..स्वछंद.. एक शापित मेघ जणू. कवितेतुन गझलकडे येण्याचा असफल प्रयत्न केला, तेव्हा 'सार्‍या उदास वाटा कापित चाललो मी, होउन मेघ काळा शपित चाललो मी' हा पहिल्या गझलेचा पहिला मतला मी लिहिला.
नंतर मला चुकून काही संगीतकारांबरोबर काम करण्याचा योग आला, मी एका अल्बमला प्रेमिकेने सजणाला बोलवायचे गाणे लिहिले, ते खरे तर माझे मन होते का? माहीत नाही.

एकदा मात्र मी आपल्या कॉलेजला गेस्ट लेक्चर द्यायला गेलो होतो, नेमके मेघा आपण ज्या वर्गात बसायचो तोच वर्ग होता. नंतर सगळे विद्यार्थी गेल्यावर मी तू बसायची, त्या तिसर्‍या नंबरच्या बाकावर शेजारी जाऊन बसलो होतो.

***

दिवस असेच बदलत गेले... माणसाचे आयुष्य पुढे पुढे जात राहते.
त्या क्षणांच्या असंख्य रांगोळ्या मनात मात्र उमटत राहिल्या. तुळशीहूनही पवित्र असणारे आपले नाते माझ्या मनात मी आठवत असे. मग माझे मलाच वाटे - आपण पुन्हा भेटू का कधी? भेटलोच तर काय बोलू?

आणि मग डायरीच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेल्या गाण्याच्या मागे मी लिहिले - 'दिवस सरत जातात, तशी आपल्या आठवणींची फुलं बनत जातात.'

***

आता अलीकडे इतक्या वर्षांनी मात्र मला पुन्हा वाटत होते, आपण पुन्हा भेटावे, तेव्हाचे सगळे सोडून द्यावे आणि मैत्रीच्या निखळ नात्याला पुन्हा अनुभवावे. जे तेव्हा फक्त मैत्रीचे निखळ नाते निभवायचे राहून गेले, ते पुन्हा निभवावे.. काय हरकत आहे? थोडा वेळ काढायला हरकत नक्कीच नाही. एवढा विश्वास आपल्यात नक्कीच आहे.
आता तर हसू येईल, पण मला वाटते पार तुझे पांढरे केस झाल्यावर आणि माझ्या डोक्यावरचे केसच निघून गेल्यावरही भेटत राहावे.. भांडत राहावे.. बोलत राहावे. ..
गोड-कडू आठवणींचे विणून अस्तर, पुन्हा त्या ढगांच्या पलीकडच्या निळ्या आकाशाकडे पाहत बसावे. काय हरकत आहे?
वेळेची गणिते जमणार नाहीत, पण वयाला या वळणावर आणणार्‍या रस्त्यावर पुन्हा भेटुन, मावळतीच्या त्या Maroon red कलरने पुन्हा मैत्रीचे नाव हातावर गोंदवून घ्यायला काय हरकत आहे? अनेक संध्याकाळी विरघळून गेल्यात त्या नदीच्या प्रवाहात, एखाद्या संध्याकाळचे मैत्रीचे रंग पुन्हा झेलावेत आपण आपल्या तळहातावर, काय हरकत आहे?

उद्या मी असेन-नसेन, तेंव्हा माझ्या नावाने मैत्रीचे तोरण तू बांधण्यापेक्षा, मैत्रीचा हात हातात घेऊन पुन्हा जगावे.. आपल्यासाठी.
मी असाच आहे, वेगळा. माझा आवाज, त्याचा टोनही असाच वेगळा. पण त्यात आपुलकी आहे, विश्वास आहे, नितळ भावनेचा एक ओलावा आहे त्यात. म्हणुन म्हणतो, काय हरकत आहे?

आणि मेघा, मला आनंद वाटला आपण पुन्हा भेटलो १८ वर्षांनी.. निखळ ..नितळ.. तू अजूनही तितकीच शालीन. मला खूप अभिमान वाटला आपला, आपल्या विश्वासाचा

- गणेशा

सौंदाळा's picture

25 Feb 2021 - 12:49 pm | सौंदाळा

धागा आणि प्रतिसाद मस्तच

Bhakti's picture

3 Mar 2021 - 10:42 am | Bhakti

विं दा क रं दी क र यांची कविता
सुखाच्या शोधांत
फ़िरते पॄथ्वी
घेऊन हातांत
चंद्राचा चोरकंदील!
आणि फ़िरतात
त्याच्याच शोधांत
पृथ्वीची पोरे
अतॄप्त मुशाफ़िर!
ओसाड पॄथ्वीची
सुखाच्या शोधांत

जंगले पिंजणा~या
माझ्या मुशाफ़िर!
थांब जरासा;
आपल्या बाळांच्या
विस्कळीत केसांतून
फ़िरव बोटे.
पहा असेल
सांड्लेले सूख
तेथेच लपलेले!

माझ्या मुशाफ़िरा!
थांब जरासा;
वादळी जीवनाच्या
सहस्त्र स्वप्नांनी
जागृत होऊन
आकाश पिंजण्य़ापूर्वी
पहा रे आपल्या
उशीच्या खाली;
असेल तेथेही
सूख दड्लेले!

माझ्या मुशाफ़िरा
ऐक,ऐक,
दमलेल्या भागलेल्या
नाजुक हातांनी
आत्ताच दिलेल्या
खरपूस ,खमंग
लसणीच्या फ़ोडणीचा
चर्र आवाज;
आणि तव्यावर
उडू पाहणा~या
भाकरीची फ़डफ़ड!

ऐक,ऐक,
खळ्यांच्या कोप~यावरील
मोहरलेल्या आंब्याच्या
विशाल वॄक्षावर
डॊके टेकून
टिकाळी शोधणा~या
रसाची कुजबूज:

"स्थीर राहूनही
वाढते उंची;
जातात पाळे
खोल खोल;
स्थीरतेचाच
बुरखा पांघरून
जगते गती
निराळ्या पातळीत !"

याच गतीला
असते शोधीत
सुखाचे भूत
बंदिस्त स्थितीतून
होण्या विमुक्त.
सुखाचे भूत-
जे काढते
सर्वांची कळ;
आणि लपते
त्यांच्याच सावलीच्या
मिस्किल अंधारांत!
-विं दा क रं दी क र
~~~~~~~~~~~~~~~~~~`
सुखाच्या शोधांत-रसग्रहण
अनंत काळापासून अगदी मानवाच्या निर्मीतीच्या पासून सुखाचा शोध चराचर सृष्टी सुखाच्या शोधात आहे...सूर्य हेलियम शोधात,पृथ्वी जीवननिर्मितीच्या सुखात,चंद्र प्रकाश आनंदाच्या शोधात..यापुढे अफ़ाट मानव सुद्धा सतत सुखाच्या शोधात आहे...त्याचा हा घडा कायम डगमगतच असतो..
विंदानी सदर कवितेत ह्याच सुखाच्या शोधाच्या मिस्किल गोंधळात,आजुबाजुचे अमूल्य सुख दूर्लक्षित केले आहे हे सांगितले आहे.जसे
माझ्या मुशाफ़िरा!
थांब जरासा;
वादळी जीवनाच्या
सहस्त्र स्वप्नांनी
जागृत होऊन
आकाश पिंजण्य़ापूर्वी
पहा रे आपल्या
उशीच्या खाली;
असेल तेथेही
सूख दड्लेले!
इवलस हे सूख लाखमोलाच!
आयुष्यात मनपाखरू स्पप्नाच्या आकाशात घारीसारखे फ़िरते ’स्वप्नाचे भक्ष्य ’मिळवण्यासाठी .हो कोणालाही हे सूख झदप घालूनच मिळवायच असत...त्यात तो एक विसावा हरवतो कायमचा...ही आहुती का?सुखाच्या शोधासाठी..
कवितेतील शेवटच्या ओळींनी ह्या सुखाचा गॊंधळ विंदांनी काहीसा सोडविले..नव्हे सुखाचे मर्म सांगितले आहे...
स्थीर राहूनही
वाढते उंची;
जातात पाळे
खोल खोल;
स्थीरतेचाच
बुरखा पांघरून
जगते गती
निराळ्या पातळीत !"

याच गतीला
असते शोधीत
सुखाचे भूत
बंदिस्त स्थितीतून
होण्या विमुक्त.
सुख हे त्या वृक्षासारखे आहे..खोल पाळे मुळे गाडून घ्यायची, व रसदार फ़ळे वर्षांवर्षे सुखाने मिळ्वायची,कुजबुज रसाची ऐकायची अनुभवायची चेतनेने...
माणसाने देखील सुखची सीमा मनात रूजवावी ,सुख मनात रूजवाय्च,सुखाला कायम नाविन्यपूर्ण रूप द्यावे,पहावे..सुख नूतनीक्षम आहे.आनंदाच,सुखाच झाड मनात लावाव
पापण्या मिट्ल्यावर होणा~या मिणमिणत्या धुंद काळोखात जे सूख लपलेले आहे ..ते डोळे उघडे ठेवून शोधावे..नक्कीए जवळ्च असेल हे सूख!!
विंदानी सुखसागराच्या किना~यावर आपल्याला पोहचवले आहे.उडी मारूयात..
या कवितेतील काही रूपक अप्रतिम आहेत मनावर अलगद परिणाम करतात,
चंद्रचा चोरकंदील,सांडलेले सुख,रसाची कुजबूज,सुखाचे भूत.
-भक्त्ती(२००८)
संदर्भ:मृदगंध
दुसऱ्या आणि चौथ्या कडव्यातील सुखाचा अर्थ संसारात पडल्यावर जास्त उमगल. अन्नपूर्णाच रूप घेत जीवांना अन्नाचे मोती देण्यात वेगळेच सुख आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फेबुने सकाळी हि सुंदर आठवण दिली.किती सुंदर आणि अलगद लिहलय..आता रसग्रहण करते पण लिहण्यासाठी धीर होत नाही.किती निरागसपणे लिहलय मी कि दुसर आणि चौथ कडव नंतर उमगल ......आता तर सर्व कडव उलगडले आहेत....पण दुसरा कडव म्हणजे संसारमांडवातील खरी घटीका...
जंगले पिंजणा~या
माझ्या मुशाफ़िर!
थांब जरासा;
आपल्या बाळांच्या
विस्कळीत केसांतून
फ़िरव बोटे.
पहा असेल
सांड्लेले सूख
तेथेच लपलेले!

सहावे कडव म्हणजे आता मला पूर्ण कळल आहे....धावाधाव कशासाठी करायची आणि किती करायची ...कधी स्थिर व्हायच ..सगळ सगळ प्रत्येकाने ताडल पाहिजे...जरा विसावू या वळणावर गाण गायल पाहिजे.
स्थीर राहूनही
वाढते उंची;
जातात पाळे
खोल खोल;
स्थीरतेचाच
बुरखा पांघरून
जगते गती
निराळ्या पातळीत !"

विंदाच्या आठवणी आहेत ...पुण्यातल्या साहित्य संमेलनात मी एकटीच गेले होते ...तेव्हा विंदा त्याचे अध्यक्ष होते ...एवढ्याशा साध्या मोबाईल मध्ये मी त्यांचे आवाज रेकॉर्ड केले होते...खुपदा ऐकायचे....अजून एक डायरी सापडलीय ...खजिनाच ...पुण्याला सहा महिने होते त्या आठवणीतल एक फुलं सापडलंय....चाफा ..वेळ मिळाला कि नक्की लिहेल....
चला खूप खूप काम पडली आहेत... 

तर चाफ्याविषयी मी इथे लिहील आहे ,वर्ष २०१० हे लिहायचं राहिलं.शब्द मोतीवर जुन्या आठवणी लिहिताना बासरीमधून मंजुळ धून उठतेय असे वाटते.लिहितांना पुन्हा मन पाकळ्यासम हलक होत जातंय...
https://misalpav.com/node/48541
तर ह्या छोट्याशा आठवणीपासून सुरुवात करते....मी अशीच जगते मनमुराद ...कोणी काहीही बोलो...आपली तत्व आपला आनंद :-) ...
.

.
असा चाफा लहानपणापासून लागल्यापासून नाही तर कळायला आवडतो.पेशव्यांच पुणे आपल्याला आधी फार आवडायचं...खुणवायच.मी धडकले सदाशिव पेठेत..पेठेपासून टिळक रोड पर्यंत माझा सकाळी ७ आणि दुपारी ४ वाजता कामासाठी पायी वाट असायची.सकाळी सकाळी चिमण्या गणपतीच दर्शनाने सुरुवात व्हायची.(जुने काही आठवतेय का म्हणून map पाहतेय.)
जातांना रस्त्यांनी अनेक हॉटेल,दुकान ,गणपतीची मारुतीची मन्दिरे लागायची.दुपारी ताक प्यायचे.तेव्हा सब्जा ,मसाला असे काही काही नसायचं.जवळच प्रसिद्ध सुजाता मस्तानी होती...कमी वेळा प्यायले आकर्षण होत,पण महाग होती.
.त्या रस्त्यावरच एक शंकाराच मंदिर होत ,तिथ हे चाफ्याच झाड होत .. ऊंच ..फुलांचा सतत सडा पडायचा..हळूच फुलं उचलायची आजही ती सवय आहे...कोणत्याही फुलांकडे मी सहजच खेचली जाते.
सप महाविद्यालय आवडायचं तेव्हा मुद्द्दाम त्या रोधून घरी जायचे.दुर्वांकुरला एकदा दोनदा गेल्याच आठवतेय ,विशेष काही वाटल नाही.
हे अस स्थान,निर्देशक फार काही लक्षात राहत नाही.लक्षात राहतात ते प्रसंग आणि चांगली माणस..
पुण्यातली माणस लिहिते हळू हळू.
:-)

रम्य हाक आठवणींची.... उंबरठा ओलांडतांना
माप सुखाचे अमाप सांडले
सप्त रंगात रंगली पाऊले
नको फिरू मागे .. कोणाला आठवतांना...

असच होत त्या आठवणींची मौजच अनोखी....किती किती पाऊले चाललो न थकता न थांबता,म्हणूनच आजही ती धावपळ तो उत्साह मनाला आनंद देऊन जातो.
मी तेव्हा अशी वेंधळी होते...कि पुण्यात आल्या आल्याच पीएमटी मध्ये माझी पर्स चोरीला गेली...हाय राम ..वेलकम वेंधळी मुलगी असच काहीस झालं...रडणार कोण पण ?मलाच हौस ना .पण पैसे एका ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याच्या सवयीमुळे बरोबर अजून पैसे होते...नतंर बाबांनी येऊन मला नवीन पर्स घेऊन दिली होती ‘विजय’ मधून जी मी आता पर्यत जपून ठेवली होती ....बरकत होती त्या पर्सला ,कधीच पैसे संपायचे नाहीत.आता ती पर्स गिरीजाला खेळायला दिली आहे.(अशाच दोन पर्स माझ्या चोरीला गेल्या ..पर्स चोरीला जाण्यापेक्षा त्या सगळ्या पर्स गिफ्ट होत्या म्हणून जास्तच वाईट वाटायचे) .

तर ऑफिसासाठी मुलाखत चांगली झाली.निवड झाली ,राहायचा प्रश्न ?तर दादाकडे राहणार होते.तर तिथेच माझी ओळख नवीन मैत्रिणीशी झाली सोनाक्षी,सारिका यांच्याशी.सोनाक्षी खूपच बडबडी होती,मराठी शिकवायची,स्पष्ट बोलायची.अशी मोकळी राहणारी ,छान बोलणारी जे मनात ते ओठावर बोलणारी मुलगी मी पहिल्यांदाच पाहिली होती.तिच्याशी मारलेल्या एकूण एक गप्पा मला अजून आठवतात.सोनाक्षी सप जवळच राहायची ,तीच नवीनच लग्न झाल होत.नवर्याविषयी भरभरून बोलायची,त्यांचे दोघांचे फोटो दाखवायची. तेव्हा मला वाटायचं मलाही असाच नवरा मिळायला पाहिजे.ऑफिसमध्ये आमचे डेमो लेक्चर व्हायची ज्याचा मला पुढे खूप फायदा झाला.सोनाक्षीने मला खूप शिकवलं कसे बोलायचं ,तिच्यामुळे मी वेगळीच मला सापडले,कधी कधी मी जास्तच टेन्शन घ्यायचे ती मला बहिणीप्रमाणे समजावायची.पुढे ती मी आणि सारिका असा ग्रुप झाला .धमाल करायचो आम्ही ..तर माझ घर जवळ होत आणि दुपारी कोणीच नाही तेव्हा माझ्या घरी पावभाजी करायचा बेत सोनाक्षीनेच केला ...मला पावभाजी यायची आधीपासून पण हिने मला अजून चांगल्या प्रकारे शिकवली...नन्तर या घरी गेल्या.दादा संध्याकाळी आला,एवढी पावभाजी का केली ? विचारलं तेव्हा सांगितलं कि “मैत्रिणी आल्या होत्या...आंम्ही केली वगैरे”दादाचा चेहरा चिंताग्रस्त झाला...म्हणाला “हे पुणे आहे .अस ८-१० दिवस ओळखीच्या लोकांना घरी नाही आणायचं”,खरच मी त्याला आधी विचारलं पाहिजे होते....पण यां काळात मी स्वैपाक शिकले..पोळ्या नाही शिकले त्या आम्ही विकत आणायचो..म्हनुनच नवरा अजून पण तुला चांगल्या पोळ्या जमत नाही म्हणून ओरडतो. ..पण भाजी तूच कर अस सासरी कौतुक असत...पुढे वहिनी आल्यावर गोड पदार्थ मी शिकले..मी एक रेसिपी पुस्तक घेतलं होत,..मस्त होत ते त्यातले सगळे पदार्थ मी बनविले.तेव्हा यु ट्यूब नव्हत..बर झाल नव्हत नाहीतर अस पारंपारिक जेवण मी शिकले नसते.
सोनाक्षी बरोबर मी तुळशी बागेत खूप फिरायचे,तिने पहिल्यांदा मला जीन्स घेऊन दिली जी मी अजून नाही वापरली ...तशीच पडली..पुढे दगडूशेठ ,मंडई,तुळशी बाग असा माझा बराचदा क्रम असायचा आता काय स्वत:चे पैसे मिळत होते ,मस्त खरेदी करायचे..इतके फिरायची कि दादा मला तुळशी बागेत सोडून घरी पळून गेला होता (हा हाहा).तेव्हा मी दीपिका सारखा ड्रेस घेतला होता...स्वत:वरच खुश होते,त्याचावर काढलेला फोटो आजही माझा जीमेलचा प्रोफ़ाईल फोटो आहे.
मी पुण्यात वाचनालय लावलं होत ,,खरच नाव आठवत नाहीये पण हुजुरपाग्याच्या पुढेच त्या रोडवर होत ते...मस्त पुस्तक वाचायची ...लिखाण करायचे ,दादा मुद्दाम माझ्यासाठी laptop चालू ठेऊन ऑफिसला जायचा ,मी लिहिते हे मी घरी कोणा कोणालाच नाही सांगितलं..माझच विश्व होत ते...स्वप्नातलं...
मी सोनाक्षी बरोबर माझे कांदे-पोहेच्या गोष्टी सांगायचे,ती मला सांगायची”लग्न तुला करायचय नीट विचार कर”,तसच ती सारिकाला पण तिच्या संसाराच्या चार गोष्टी समजावून सांगायची...हिला कस जमत हे सगळ काय माहीत?..मला वाटायचं.
पुढे नवीन बॉस आला होता ,माझ्या कामच कौतुक करायचा सगळ्यांसमोर तर आमची सोना “तुझ्यासारखाच दिसतो हा ,तुझ्यावर लाईन मारतोय ,आम्ही काय चांगल काम करत नाही का म्हणायची” मी तर मनातच कोपरापासून तिला नमस्कार करायचे. पुढे अजून एक दिपाली नावाची एकदम मॉड मुलगी आली ,सोना आणि हीच कधीच पटल नाही..ह्या दोघी एकदा खूपच भांडल्या होत्या.दीपाचा नवरा दुबईला होता ती त्याला खूप मिस करायची..आमच काम संपल मी घरी जायला निघालो,तर खाली दीपाचा नवरा तिला सरप्राईज द्यायला आला होता थेट दुबुईहुन...दीपाने पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली...सगळे पाहतच बसले....मला तर हे सगळ नवीनच होत...तेव्हा मी अशी काकूबाई होते कि बस...
सीमा हिंदी शिकवायची ,तीच घर नाना पेठेत होत.एकदम पुणेरी वातावरण होत तिच्या बोलण्यात वागण्यात...ती आणि मी जिम पार्टनर होतो,तीच लग्न ठरलं होत ,तर माझ ठरायच होत.तीच वय बरच होत,पण गोड पुणेरी बोलायची.एक कोकणातली देखील मैत्रीण होती....खूपच हुशार होती ,ती पिजी म्हणून राहायची ,मला पहिल्यांदा पिजी हा प्रकार समाजला.तिच्यामुळे मला कोकणातले लोक किती साधे पण हुशार असते याची झलक मिळाली.
या सगळ्यांमध्ये आज फक्त सोनाक्षी माझ्या संपर्कात आहे ,,,कारण ती तशीच आहे गोड आणि मोकळी...तिच्याशी बोललं कि मला छान वाटत..शेवटी माणस मनात घर करतात आणि तिथे कायम फार थोडी राहतात ,,,अशी सोना...
-भक्ती

चांदणे संदीप's picture

22 Mar 2021 - 1:56 pm | चांदणे संदीप

मैं क्या कुछ नही सोचता
क्या क्या सोच सकता हूँ
ये तुम सोच नही सकती
तुम्हारी सोचको है मर्यादा
अनखिंची अनकही अनसुनी

दुनिया और समाज की
सोच से तुम्हारी सोच मिलनी चाहिए
ये किसीने युगों पहले सोच रखा है
पर आज तक क्यूं इसे ढोया जा रहा है
ये कोई नही सोचता

अब तुम सोच कर देखों
की, मैं भी क्या क्या सोचता हूँ...
...तुम्हारे लिए, हमारे लिए!

- सं - दी - प

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Mar 2021 - 3:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

आयला?
आमाला काय इचारच करता येत नाय
असं समजतीस का काय?
अगं माझ्या टकुर्‍यात
कसले कसले सर्किट सूरु असत्यात
तुला काय ठाव?
तुज्या सारखं नाय आपलं डोकं...
कुणी बी काय बी सांगितल की लागली
बुगू बुगू मुंडी हलवायला

कोण म्हनलं जे तुज्या आज्याने केलं
त्येच तुज्या बापानं केल पायजे
अन जे बापाने केलं
त्येच तुला बी करायला पायजे
अग येडे जमाना बदललाय आता

आता इचार करून बघ
माज्या टकुर्‍या काय काय शिजत असेल ते
तुज्यासाठी.. आपल्या दोघांसाठी

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

22 Mar 2021 - 1:57 pm | चांदणे संदीप

आश्वस्त सुबह
थकी दोपहरी के साथ
अंगडाई भरती सांज के सायें लिए
रात के मौन मलमली आंचलसे मुझे बांधे हुए
फिरसे मिलने के लिए पुरवाई पर एक पुकार छोडती है
तब वह पुकार मेरी खालिस मगर एक वीरान जीवनी बन जाती है
जब मेरी जीवनी अपनी करूणामय हाथोंमे लिए तुम पढती हो
और प्रीतभरी अनुपम आंखोंसे उसे संवार लेती हो
तो वह बन जाती है फिरसे
शबनम से सजी हुई
आश्वस्त सुबह!

- सं - दी - प

एक एक शब्दावर सुंदर नक्षीकाम केले आहे असे वाटते आहे..
वाचताना खुप छान आनंद देतायेत शब्द.

खोटे वाटेल..
पण आजच तुझी आठवण आलेली... त्यामुळे मस्त वाटले वाचुन

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Mar 2021 - 3:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

सकाळी सकाळी कोठा साफ झाला की
दुपारी परत एकदा चापून जेवता येते
आणि मग संध्याकाळी चहा सोबत भजीचा मनमुराद आनंद लुटता येतो
रात्री चे जेवणं झाले की तटतटून फुगलेल्या पोटावर हात फिरवताना
कधीतरी एखादा चूकार आवाज निघून जातो
अन तू नाकाला पदर लावतेस
अन कुत्सित नजरेने माझ्या कडे पहात खोलीतुन निघून जातेस
मी हा अपमान कसाबसा पोटात ढकलतो
कायमचूर्णा सोबत
कारण मला माहीत असतं
सकाळी सकाळी कोठा साफ झाला की
दुपारी परत एकदा चापून जेवता येते

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

22 Mar 2021 - 5:17 pm | चांदणे संदीप

कहर! तुफ्फान! ब्येक्कार! =))
पैजारबुवा, दंडवत घ्या. ___/\___

सं - दी - प

प्रचेतस's picture

23 Mar 2021 - 9:56 am | प्रचेतस

कहर...

संदीपचं मूळ काव्य आणि त्याचं माऊलींनी केलेलं विडंबन दोन्ही जबरदस्त.

दिन बन गया!

गणेशा's picture

22 Mar 2021 - 5:32 pm | गणेशा

आजकाल उन्हं सरळ खिडकीतून आत येतात, तू बसायचीस त्या खुर्चीवर रेंगाळतात काही वेळ...
कदाचित, शोधत असतील ते तुझ्या खाणा-खुणा.. तुझे इथे तिथे विखुरलेले अस्तित्व सापडतेय का ते पुन्हा पुन्हा पाहत असतील बहुतेक...
पण त्यांना काहीच सापडत नसणार..
मार्च च्या असल्या उन्हाळ्यात ही तुझ्या आठवणींचे मग आभाळ भरून येते, आणि मग उन्हाला हि कळते तुझ्या सावल्या कधीच डोळ्यांत विरघळल्यात.. कायमच्या. आणि मग आल्या पावली दाटलेल्या आभाळाच्या पलीकडे उन्हं जाऊन बसतात...

- शब्दमेघ...
२२ मार्च २०२१

Bhakti's picture

22 Mar 2021 - 8:06 pm | Bhakti

आताशा ऊन
मोकळ्या केसांत
ऊनपारा देऊन
खिडकीत निवांत
पहूडत..

बिल्लोरी आभाळ
हळूच डोकावत
ही उन्हाची झळ
असं भासवत
कोसळत..

पार्याचा बिंदू
थेंबाचे मोती
केसांतली धूंदी
ऊनआभाळ वरती
खेळतात..

-भक्ती

गणेशा's picture

24 Mar 2021 - 1:25 am | गणेशा

सूर्य १८० अंशाकडे वळू लागला की तू यायची तशीच तूझी गुलाबपाकळी आठवण येते माझ्याकडे.. ती पार विरघळते माझ्या हृदयात.. आणि मग माझ्या शरीरातून गुलाबरक्त वाहत राहते.. लालसर.. तुझ्या आठवणींचे... हृदयाच्या आवर्तनांचा वेग वाढतच जातो, अगदी दुप्पट वेगाने हृदय धडधड करते, जणू काही माझ्या श्वासात तुझ्या श्वासांना गुंतवून पुन्हा तूच उभी आहेस..अगदी तशीच....तुझ्या अस्तित्वाचा सुगंध सगळी कडे दरवळायला लागतो आणि तेव्हड्यात तुझी आठवण मला निशब्द करून पुन्हा दूर क्षितिजापल्याड निघून जाते..सारे रक्त गोठल्या सारखे होते...आता सूर्य मावळून गेलेला असतो.. मागे उरलेला असतो तुझा मरून लाल रंगाचा पदर... तो अजूनही अडकलेला असतो हलकासा ढगांच्या हातात..आता मात्र हळू हळू रात्र येते.. तीच वेचते गुलाबपुष्प माझ्या डोळ्यातून... दूर चंद्राची कोर सुरेल बासरी वाजवतेय असा भास होतो मला... पण तो भास कसला? त्या मधून मला तुझी धून ऐकू येते.. आणि तेव्हड्यात रात्र अलगद हळुवार केसांवर हात फिरवत कुशीत घेते मला...
तूच माघारी आलेली असते का पुन्हा ? हा प्रश्न घेऊन मी पहाटे उठतो आणि गुलाबा सारखे लाल झालेले आकाश पुन्हा माझ्याकडे पाहत राहते...

- शब्दमेघ
२४ मार्च २०२१

प्रचेतस's picture

24 Mar 2021 - 10:09 am | प्रचेतस

काय रे गणेशा...आँ...

गणेशा's picture

24 Mar 2021 - 10:32 am | गणेशा

बोल मित्रा बोल..
लिही जरा...

आणि
शब्द आणि माणुस बऱ्याचदा तंतोतंत वेगळा असु शकतो...:-)

प्रचेतस's picture

24 Mar 2021 - 10:54 am | प्रचेतस

आपल्याला सुचत नाय राव काही :)

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2021 - 5:57 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप अप्रतिम, गणेशा !
👌

(मला खरं तर बदमाचा इमोजी द्यायचा होता इथं, पण कसा द्यायचा ?)

मोगरा's picture

1 Apr 2021 - 11:30 pm | मोगरा

_^_

आर्त

Bhakti's picture

24 Mar 2021 - 4:45 am | Bhakti

बोचरी पहाट शिंपडे गुलाबदाणी
अन..तुझ्या अत्तरथेंब आठवणी
.
.
अलगद उशाशी ठेवून
माझ्या श्वासांचे आवर्तन
स्वप्नांना घट्ट बिलगून
मंदधून हृदयात मिसळून
हलके हलके...
साखरझोपेतच अर्क सांडतो
दरवळला सूर्य क्षितिजी उगवतो
कोमल ऊन ऊन न्हाऊ घालतो
तरीही आठवदर्प डोळ्यांत उतरतो
चालत चालत...
स्थिरावू पाही लालसर पदरात
माळलेल्या वेणीच्या पाकळ्यांत
गुलाब अर्काच्या रेशम धूपात
प्रसन्न गात्र गायन सुरांत
-भक्ती

Bhakti's picture

28 Mar 2021 - 10:38 am | Bhakti

full moon

गणेशा's picture

31 Mar 2021 - 11:41 pm | गणेशा

(नाव बदलले आहे )

मेघा...
"तू हसलीस कि फुले उमलू लागतात.." ह्या ओळी आज आठवायची काहीच गरज नव्हती खरे तर...

आज चतुर्थी होती, मनसोक्त श्रीखंड खाऊन, ४५ अंशात आलेल्या चंद्राच्या छान प्रकाशात गच्चीवर मस्त मच्चरदाणी लावून पडलोय...आकाशात निरखूण पाहिल्यावर त्याच्या वेगवेगळ्या तुकड्यात एखादी चांदणी लुकलूक करताना दिसतेय..

उद्या पासून नविन फायनान्स वर्ष सुरु होते आहे, त्या संबंधी विचार करत बसलो होतो आणि मध्येच...

"तू हसली कि फुले उमलू लागतात..
आणि त्याचे रंग तुझ्या ओठांवर खुलू लागतात..
तू अशीच हसत रहा..सर्वांचे मन मोहत जा..
माझी नसताना पुन्हा.. माझीच होत रहा..."

पुन्हा विचार बाजूला सारायचा प्रयत्न केला..
तू कायम म्हणायचीस मला, गणेश तू अजिबात व्यवहारी नाहीस..मी तसे नाही गं असे म्हणालो तरी...
'न'ला एक काना आणि 'ह'ला दुसरी वेलांटी देण्याची तुझी सवय काही नविन नव्हतीच मला..

पण आजहि खुप प्रयत्न करून हि, मी तुझ्या आठवणीला 'नाही' म्हणू शकलो नाही..

मी कदाचीत व्यवहारी नाहीच.. आपण एकत्र घालवलेल्या क्षणांच्या कित्येक आठवणी माझ्याकडे अजूनहि येतात, आणि त्यावेळेस दिलेल्या वेळेपेक्षा कितीतरी जास्त वेळ 'व्याज' म्हणुन कायम घेत राहतात..
कित्येक वर्षे झालेत आणि अजूनही व्याजावर व्याज देतोय मी, आणि मुद्दल मात्र तशीच आहे.. कधीच न संपणारी...

"दिवस सरत जातात तसतसे आपल्या आठवणींची फुले बनत जातात.. " आणि माझे मन, मग फुलपाखरू बनते...
एका एका फुलांवर मग ते हलकेच जाऊन बसते.. प्रत्येक फुलाचा रंग वेगळा.. गंध वेगळा..
काही काही फुले मात्र अजूनही चिंब भिजलेली असतात...

- गणेशा...
३१ मार्च २०२१, चतुर्थी.

Bhakti's picture

4 Apr 2021 - 10:47 pm | Bhakti

गुंफलेले हात ताऱ्यांचे
गुंतलेले श्वास ताऱ्यांचे
स्पर्शाचे धुक ताऱ्यांचे
पावलांना आभास ताऱ्यांचे
....अन आठवणी टिमटिमत्या ताऱ्यांच्या
रोजच हिशोब मागतात....
तुझ्या डोळ्यातल्या प्रकाश
आपण बांधलेलं आकाश
दूर फडफडणार अवकाश
चांदण वाहणारे स्वयंकोश
....मी सगळ जपून ठेवलंय
उन्हात नाही घर बांधलं....
....सांगितलं की मगच निजतात
पुन्हा फिरतात ताऱ्यांच्या जगात...
-भक्ती

Bhakti's picture

9 Apr 2021 - 9:56 pm | Bhakti

भरू दे मला घास तुझ्याही चोचीत
मग उरतिल आठव पोटाच्या चक्रात

धरू दे थरथर भरलेल्या नभाची नाळ
मग बरसतील सांज नयनी आभाळ

येऊ दे कापरी शून्यात ती सदैव हाक
मग राहतील फक्त भास विरून साद

घेऊ दे आज मायेनं कुरवाळून
मग करशील पोरके हात सोडून

-भक्ती
०९/०४/२०२१

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Apr 2021 - 2:03 pm | बिपीन सुरेश सांगळे

गणेश
भारीच धागा आहे

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Apr 2021 - 2:03 pm | बिपीन सुरेश सांगळे

गणेश
भारीच धागा आहे

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Apr 2021 - 2:05 pm | बिपीन सुरेश सांगळे

भक्ती

बोचरी पहाट शिंपडे गुलाबदाणी
अन..तुझ्या अत्तरथेंब आठवणी

जबरदस्त शब्द आहेत

फक्त तो आठवदर्प शब्द कशा अर्थाने घ्यायचा ते मात्र कळले नाही .

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Apr 2021 - 2:17 pm | बिपीन सुरेश सांगळे

लांबवर जाणारी
धुक्यात हरवणारी
हुरहूर लावणारी
एक वेडी पायवाट

अन न सुटणारी
मनाला छळणारी
तुझ्या आठवणींची
एक पक्की गाठ

एवढंच उरलंय आता हाताशी
अन व्याकुळ प्राण कंठाशी

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2021 - 5:13 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदरच !

Bhakti's picture

16 Apr 2021 - 6:41 pm | Bhakti

तुझे मुक्त हासू
उमलते कळ्यांच्या
श्वासांसम धुंद धुंद

तुझे कोवळे हासू
घमघमतो मोहोर
जसा चैत्रात मंद मंद

तुझे दिलखुलास हासू
गडगडतो नभी मेघ
तोऱ्यात बेधुंद बेधुंद

तुझे स्मित हासू
खुलतो चंद्रचकोर
आकाशी ताऱ्यांत ताऱ्यांत

तुझे मिश्कील हासू
बिलगतो पारिजात
पहाट गारव्यात गारव्यात

-भक्ती
ही कविता माझ्या लाडक्या लेकीसाठी  (कविता साधीच आहे पण ती हसली की मी हसते .शेवटी कशासाठी चालले आहे सगळे  तिच्या हासूसाठी)

Bhakti's picture

9 Jun 2021 - 6:24 pm | Bhakti

पावसाच्या अल्लड सरी
तुझ्या माझ्या तळहाती
प्रतिबिंब चिंब मानसी
आज बरसती प्रीतमोती|

झेलल्या सृजन सरी
तुझ्या माझ्या गात्री
रूजली नाजूक माला
अन् गंधाळली माती|

क्षितिजाच्या शोधात सरी
तुझ्या माझ्यात गुंतती
भुलल्या चांद चकव्यात
गंधर्व मल्हार गाती|

स्वप्नी सुखाच्या सरी
तुझी माझी अबोल धुंदी
आठवणींच झुकलं अंबर
अनवट मधु धुकं पसरती|

-भक्ती
.

जब दिन होवे मध्धम मध्धम
और रात सारी धुआं धुआं
ओ ss मेहबुबा ...तेरी याद बुलाये ...
..ओ ss सखी रे ss...सखी रे ss
मुझे तेरी भिगी याद बुलाये ....

बिखरा ये आसमान पुरा ..
ना रंग सूरज पे चढा ..
तू थी मेरी परछाई
तेरे बीन मै अधुरा रहा ..
..ओ ss मेहबुबा ...

यही कही , ढुंडता रहा मै लब्जोंको तेरे
और अधुरी रही मेरी जान-ए-गझल...
तसबीर मन मे और आँखो मे तसव्वुर तेरी
..ओ ss सखी रे ss...सखी रे ss
मुझे तेरी भिगी याद बुलाये ....

जब दिन होवे मध्धम मध्धम
और रात सारी धुआं धुआं
ओ ss मेहबुबा ...तेरी याद बुलाये ...

पतझड मै कुछ नम से पत्ते
गुंज उठते है कानों मे कही...
आहट कुछ हलकीसी
जैसे सुरूर मुरझे सप्ने का
ओ ss मेहबुबा ...
..ओ ss सखी रे ss...सखी रे ss
तेरी याद बुलाये ...
मुझे तेरी भिगी याद बुलाये ....
.
.
-- गणेशा
३१ ऑगस्ट २०२१

* तसव्वुर मन मे और आँखो मे तसबीर तेरी

(घाईत उलटे लिहिले गेले ..वाचताना लक्शात आले )