महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
8 Apr 2020 - 1:44 pm

 

महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा

नमस्कार मिपाकरांनो,
लॉकडाउनमध्ये कंटाळला असाल ना?
यंदाचा महाराष्ट्र दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रूपात साजरा करणार आहोत.

शतशब्दकथा हा विशेष लेखनप्रकार आहे.
केवळ सरळधोपट कथा सांगणे हा या लेखनप्रकाराचा मूलभूत उद्देश नसतो.
• बरोब्बर १०० शब्दांमध्ये कथा सांगणे आणि
• शेवटच्या शब्दात / वाक्यात वाचकाला अनपेक्षित धक्का बसेल असा कथेचा शेवट करणे,
ही या कथाप्रकाराची दोन कळीची लक्षणे आहेत.

स्पर्धेसाठी विषयाचे कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत.
१) धागा प्रकाशित झाल्यानंतर स्पर्धा लगेचच सुरू होईल आणि २६ एप्रिल २०२० रोजी २३.५९ भाप्रवे संपेल.
२) स्पर्धकांनी आपली कथा साहित्य संपादक या आयडीला व्यनिने पाठवायची आहे.
साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा.
कोणत्याही साहित्य संपादकाला वैयक्तिक व्यनि किंवा मिसळपावच्या अथवा सासंच्या ईमेल आयडीवर किंवा अन्य कोणत्याही दुसऱ्या मार्गाने कथा पाठवू नये.
३) प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त २ (अक्षरी दोन फक्त) शशक पाठवू शकते. मतदान दोन्ही कथांना होईल, मात्र जर दोन्ही कथांची मते विजयी क्रमांकाच्या यादीत आली, तर दोन्हींपैकी ज्या कथेला जास्त मते मिळालेली असतील, ती एकच कथा विजेती धरली जाईल.
४) ०८ एप्रिल २०२० ते २७ एप्रिल २०२० या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कथा स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ लेखकाचे नाव जाहीर होणार नाही. ('कथा बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात' हा आक्षेप घेतला जाऊ नये, म्हणून हे करण्यात आले आहे.). स्पर्धा संपल्यावर लेखकांची ओळख जाहीर करायचीच आहे.
५) मूळ लेखकाने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कथेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाउंटवर आपली ओळख कथालेखक म्हणून जाहीर केल्यास ती कथा रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल.
६) साहित्य संपादक कथा प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या शतशब्दकथेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधन वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल.
७) लेखकाने कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खातरी करावी ही विनंती. Microsoft Wordमध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.
८) तसेच, कथेत कोणतीही चित्रे, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कथा प्रकाशित केली जाईल.
९) जातिधर्माला दुखावणारे वा अश्लील लेखन आल्यास कथा स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर लेखक नियमबाह्य कथा स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात.
१०) कथेला आपण देऊ इच्छित असणारे नाव व्यनिच्या विषयामध्ये लिहिलेले असावे.
११) कुठेही पूर्वप्रकाशित कथा स्वीकारली जाणार नाही.
१२) कथा आधारित असल्यास, कथेच्या शेवटी तसा स्पष्ट उल्लेख करावा. हे शब्द १००मध्ये मोजले जाणार नाहीत.

कथा प्रकाशित झाल्यावर लगेच मतदान सुरू होईल आणि दि. २९ एप्रिल २०२०, २३.५९ भाप्रवेपर्यंत करता येईल.

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.

निकाल दिनांक १ मे २०२० रोजी - अर्थात महाराष्ट्र दिनी घोषित केला जाईल.

विजेत्यांना मिसळपाव दिवाळी अंक २०१९ची छापील प्रत बक्षीस म्हणून देण्यात येईल (विजेता भारतामध्ये असल्यास).
भारताबाहेरील विजेत्यांची प्रत त्यांच्या जवळच्या व्यक्तीला देता येईल.

लेखन करण्याविषयी / व्यनिविषयी / स्पर्धेविषयी कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास प्रतिसादांमध्ये विचारू शकता.

एक मार्गदर्शिका -
कथा मराठीमध्ये असावी. एखादे हिंदी-इंग्लिश वाक्य कथेची गरज म्हणून चालेल, पण कथा मराठीत हवी. प्रमाण मराठी, झाडीबोली, वऱ्हाडी, खान्देशी, सातारी, पुणेरी, आगरी, मालवणी... कोणतीही पण मराठीत हवी..

body {
background: url(https://i.postimg.cc/WzqRmptr/Light-Background-Desktop-Wallpaper-16371.jpg);

background-size: 1900px;
}

कथाप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

लई कंटाळा आला होता या लॉकडाऊनचा.

आता उत्सुकता प्रवेशिकांची.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2020 - 2:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शतशब्दकथा स्पर्धेला शुभेच्छा आहेतच. सुचलं तर आपली प्रवेशिका आहेच.
ते कै मॅटर नै.

-दिलीप बिरुटे

चांदणे संदीप's picture

8 Apr 2020 - 2:27 pm | चांदणे संदीप

मस्तच.... आयपीलची वाट बघण्यापेक्षा हे भारीये. :)
वर प्राडॉ सर म्हटले तसेच, सुचले तर... नाहीतर वेन्जॉय करणार सर्वांच्या कथा वाचून.

सं - दी - प

स्पर्धेची आतुरतेने वाट बघत आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Apr 2020 - 6:01 pm | अत्रुप्त आत्मा

अरे व्वा! मस्तच! :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Apr 2020 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार

कथा वाचायला मजा येणार,
शशकच्या जन्मदात्री अतिवासताई सध्या इथे फिरकत नाहित.
या निमित्ताने त्याही सक्रीय झाल्या तर अजून मजा येईल
पैजारबुवा,

अनिंद्य's picture

9 Apr 2020 - 2:32 pm | अनिंद्य

झकास.
कथांची वाट पाहतो आहे.

बिपीन सुरेश सांगळे's picture

11 Apr 2020 - 2:56 pm | बिपीन सुरेश सांगळे

स्पर्धेस खूप खूप शुभेच्छा .
कथा कधी वाचावयास मिळतील ?
प्रतीक्षेत .

जेम्स वांड's picture

11 Apr 2020 - 10:59 pm | जेम्स वांड

संपवायचा दाब चान्स आहे खरा! बघुयात काही जमलं तर.

शब्दसखी's picture

14 Apr 2020 - 6:35 pm | शब्दसखी

असा काही एखादा टॅब तयार करता येईल का वेबसाइटवर ज्याच्यावर क्लिक केल्यावर सर्व कथांची लिंक मिळेल? कारण एखादी कथा नंतर आलेल्या नवीन लेखांमुळे खाली गेली तर तिचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मराठी कथालेखक's picture

15 Apr 2020 - 6:07 pm | मराठी कथालेखक

साहित्य प्रकार या ड्रॉप डाउन मध्ये "स्पर्धा" नावाचे मेन्यू आहेत. पण सगळ्यांचीच नावं "स्पर्धा" असल्याने गोंधळ होतो. त्यांची नावे बदलून ह्या मेन्यूचा वापर अधिक परिणामकारकपणे करता येईल

साहित्य संपादक's picture

15 Apr 2020 - 6:15 pm | साहित्य संपादक

यावर काम चालू आहे. लवकरच ही सुविधा ऊपलब्ध होईल.

मराठी कथालेखक's picture

15 Apr 2020 - 6:02 pm | मराठी कथालेखक

स्वतःच्या कथांवर "+१" द्यावे का ? किंवा दिले तरी ते अंतिम गुणसंख्येत ग्राह्य धरावे का ?
मला वाटते असे करु नये. साहित्य संपादकांनी याबद्दल काहीतरी निश्चित धोरण ठरवायला हवे.

यापुर्वीच्या स्पर्धांमध्ये माझी कथा मागे पडू नये म्हणून मी ही माझ्या कथांवर मतदान केले होते हे मला सांगायला हवे. पण तरी ते चूक आहे असेच मला वाटते.

साहित्य संपादक's picture

15 Apr 2020 - 6:18 pm | साहित्य संपादक

स्वतःच्या कथांवर "+१" द्यावे का ?
हो. स्वतःच्या कथांवर मतदान केले तरी चालेल. फक्त ओळख उघड न होऊ देण्याची खबरदारी घेण्यात यावी.

शब्दसखी's picture

18 Apr 2020 - 11:38 pm | शब्दसखी

नवीन सुविधा छान आहे. सगळ्या शशक एकत्र दिसत आहेत.

कथा कशी पाठवायची? वर दिलेली लिंक दाबल्यानंतर, "Access denied. You are not authorized to access this page" असा फलक छळकतो. कोणी मदत करू शकेल?

दोन्ही लिंकवर तेच. का ते काहीच कळत नाहीये. संपादक मंडळाने मदत करावी.

ऋतु हिरवा's picture

21 Apr 2020 - 7:15 pm | ऋतु हिरवा

कल्पना फारच छान आहे. आत्ताचा स्पर्धेविषयी समजले आहे. काही सुचल्यास नक्कीच सहभागी होईन

गणेशा's picture

24 Apr 2020 - 5:46 pm | गणेशा

कथा वाचुन मस्त वाटले.. आज बर्याचश्या कथा वाचल्या..
रिप्लाय पण आवडले.

पण इतक्या कथा आहेत की कुठल्या कथा वाचायच्या राहिल्यात हे कळेनाच

साहित्य संपादक's picture

24 Apr 2020 - 6:05 pm | साहित्य संपादक

https://misalpav.com/shashak2020.html या लिंकवर तुम्हाला सर्व कथा एकत्रित वाचता येतील. व कोणत्या राहिल्या आहेत ते ही समजेल.

माझे काल पासून प्रतिसाद देत असलो कि मला error येतो पण प्रतिसादाची पहिली लाईन फक्त (subject ) तेथे दिला जातो आणि इतर प्रतिसाद मिटला जातोय..

काही help मिळेल का? कोणाला असे problem येतायेत का?

साहित्य संपादक's picture

26 Apr 2020 - 12:16 am | साहित्य संपादक

आठवण : शशक पाठवण्याचा आजचा शेवटचा दिवस. कथा पाठवण्याची मुदत २६ एप्रिल २०२० रोजी २३.५९ भाप्रवे संपत आहे. तेव्हा आपला सहभाग आजच नोंदवा. ज्यांनी एकच कथा पाठवली आहे त्यांना अजून एक कथा पाठवण्याची संधी आहे. तेव्हा वेळ दवडू नका.

साहित्य संपादक's picture

26 Apr 2020 - 10:12 pm | साहित्य संपादक

मतदान आणि अभिप्राय :
मंडळी,
शतशब्दकथा स्पर्धा - २०२० या लिंकवर क्लिक केल्यास आतापर्यंत आलेल्या सर्व कथा एकत्रित पाहता येतील. आपल्या आवडत्या कथेला मतदान कराच, पण इतरही कथांवर आपला अभिप्राय जरूर नोंदवा. बहुतेक सदस्यांचा कथा लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तेव्हा आपल्या अभिप्रायांचा त्यांना जरूर लाभ होईल.
मतदानाची शेवटची तारीख दि. २९ एप्रिल २०२०, २३.५९ भाप्रवेपर्यंत आहे.