प्रत्येक व्यक्ती सन्मानाला पात्र असते.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
14 Nov 2008 - 10:40 pm

आज प्रो.देसाई खूप दिवसानी आपल्या नवीन मित्राबरोबर तळ्यावर आले होते.माझी ओळख करून दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा करायला सुरवात केली.त्यांचा हा माझा नव्याने ओळख झालेला मित्र आपली नोकरीत
असतानाचे काही अनुभव सांगण्याच्या ओघात एका मजेदार किस्याला त्यानी हात घातला.ते एका सॉफ्टवेअर कंपनीचे सि.इ.ओ होते ते ओघाओघाने मला कळलं.

ते म्हणाले,
"कामानिमीत्त मी एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना बरेच वेळा त्या कंपनीची गाडी येऊन मला त्यांच्या मिटींगच्या जागी घेऊन जायची.पण कधी कधी मला एअरपोर्टवरचीच टॅक्सी करून जावं लागायचं.असंच एकदा बंगलोर एअरपोर्टवर टॅक्सीत बसल्यावर ड्राईव्हर बरोबर हलो-हाय झाल्यानंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी करीत असताना,माझ्या लक्षात आलं की तो ड्राईव्हर साधारण साठएक वर्षाचा असावा.माझ्या मनात आलं की ह्या वयावरही त्या बिचार्‍याला हा साधा जॉबकरून मेहनत करायला किती कष्ट पडत असतील.नंतर चौकशी केल्यावर लक्षात आलं की तो पण एका मोठ्या कंपनीतून चीफ फायनॅन्स मॅनेजर होऊन रिटायर्ड झाला होता.आणि पुन्हा आपल्या अनुभवासाठी त्याला दुसर्‍या कंपन्या मिटिंगसाठी बोलवत राहयचे.तिच तिच मंडळी तेच तेच विषय याला तो कंटाळून त्याला ती कामं नकोशी झाली.आणि हा टॅक्सी चालवायचा जॉब त्याने घेतला होता.मी हे ऐकून थोडा स्तिमीतच झालो.
मी असं का म्हणून विचारल्यावर मला म्हणाला,
"इतर जगाशी संबंध रहावा,निरनीराळे लोक भेटावे, आणि वेळ निघून जावा यासाठी टॅक्सी चालवण्याची त्याला कल्पना सुचली.जाता जाता त्याने मला फायनॅनशीयल बाबतीत एक उपयुक्त उपदेश पण दिला.

मला वाटतं,प्रत्येक माणूस आदर सन्मानाला पात्र असतो.आणि प्रत्येकाकडून नवीन काही शिकायाला मिळतं.
त्यामुळे मी एक निर्धार केला होता की टॅक्सी ड्राईव्हर पासून साध्या चपराश्यापर्यंत त्यांच्या गोष्टी ऐकून घ्याव्या.आणि त्यामुळे प्रत्येकजण मला त्या जागी- मी कधी भेट दिली नसती अशा जागी- येण्याचा अवसर द्दायचा, किंवा मी स्वतःहून कधीच केली नसती अशी गोष्ट करायला मोका द्दायचा.

मी पाहिलंय की बरेचसे लोक माझ्याशी समजूतदारपणे वागतात.जेव्हा मी त्यांच्यात स्वारस्य दाखवतो आणि त्यांना सन्मानाने वागवतो तेव्हा.ते काय म्हणतात ते सारं ऐकून घेतो तेव्हा.सन्मान द्दायचा याचा अर्थ प्रत्येक गोष्टीत त्यांच्याशी सहमत झालं पाहिजे असं काही नाही.माझ्या कामातही शंका, गैरसमज,आणि चूका व्हायला वाव असायचाच.
प्रत्येक बाबतीत सभ्यता ठेऊन वागायचं आश्वासान देता जरी आलं नाही तरी मला आठवत नाही एखाद्दाच्या संस्थळावर जाऊन त्या लेखावर कटूप्रतिक्रिया देऊन झाल्यावर खरमरीत प्रतिसाद त्यावर आला नसावा. आणि कालांतराने मी
अपमानजनक वागल्याचं आठवून मलाच अनुचीत आणि खराब वाटायचं.

काही लोकाना वाटतं ही संस्थळं माणसामाणसातला जीवंत संबंध विलग करतात.पण मला ते पटत नाही.प्रत्यक्षपणे ते एक दुवा ठेवण्याचं माध्यम आहे.कधी कधी संस्थावळरच्या विचारांची देवाण-घेवाण चिडचीडी झाली की बरेच वेळा इमेलने किंवा फोन करून त्यातील सामुहीक संकेत थोडे विचारपूर्ण करून कटूता कमी करता येते.
निव्वळ शब्दाचं वाचन बरेच वेळा अनर्थाला आमंत्रण देतं.हे चांगलं लक्षात ठेवून राहणं ही संस्थळाच्या वाचनाची क्लुप्र्ती आहे.

संस्थाळावर असो किंवा प्रत्यक्षपणे असो मी ज्यावेळी नव्या लोकाशी परिचय करतो त्यावेळी मी जर का उघड मनाचा, आणि जिज्ञासू राहून वागलो तर मी नवीन गोष्टी नक्कीच शिकतो.
मला वाटतं,दुसर्‍या व्यक्तिला सन्मानाने वागवणं हे अत्यावश्यक आहे-वाटलं तर स्वार्थीपणाचं-म्हटलंत तरी चालेल.

भाऊसाहेबांच्या ह्या नवीन मित्राबरोबर चर्चा करण्यात माझा वेळ मात्र मजेत गेला.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

15 Nov 2008 - 2:17 am | कपिल काळे

ऑपरेशन थिएटर मध्ये तज्ञ डॉक्टर्स नर्सचा सल्ला घेतात.

मलाही काम करताना काही अडल्यास मी नि:संकोचपणे ड्राफ्टसमनचे मत मागतो.
बरयाच अनुभवाने अश्या कमी शिकलेल्या माणसांनाही बरेच ज्ञान प्राप्त झालेले असते असा मला चांगला अनुभव आहे.

http://kalekapil.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

15 Nov 2008 - 8:50 am | श्रीकृष्ण सामंत

कपिल काळे ,
आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com