उदघाटनाला आला कोण ?
उद्योगपती सम्राट अंबानी
स्टेजवर जाताना ठेच लागली
त्यांची पडली खाली फणी
डोळे चुकवून पटकन उचलली
घेऊन गेलो घरी
लक्ष्मीपतीची तरी फणी आणेल
संपत्ती आपल्या दारी
कामधंदे सोडून सारे
फणी पुजू लागलो
रोज धुपारती शंख वाजवुनी
वाहायचो भरपूर फुले
येड लागलं बापाला आपल्या
हसत होती माझी मुले
हसत हसत सांगून टाकले
त्यांनी शेजारीपाजारी जाऊन
इमारतीतले गोळा झाले
सारे झाडून वॉचमनापासून
चर्चा वाढत गेली अन मी
गल्लोगल्ली फेमस झालो
फणीमातेचा भक्त म्हणोनि
शहरात प्रसिद्धी पावलो
हीच संधी मी साधुनी ठरवलं
भरायची आपली तिजोरी
फणिमता हि पावते त्याला
जो तोरण बांधतो दारी
दार आपले , घर आपले
आता फणीही माझीच होती
भक्त आंधळे अन बहू लोचट
त्यांना अक्कल कमीच होती
वाढत गेले भक्तगण
काहीकाळातच बनला सागर
अंबानी खरंच धन्य बाबा तो
त्याची फणीपण भरते पैशाने घागर
=============================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
तळटीप :: आज गुरुदेव अंगात आले हैत किंवा त्यांनी मनोमन आशीर्वाद दिलेले तरी हैत .. काय उमगत न्हाय बघा , येकयेक भावना उचमबलून आलेल्या हैत .. माफी असावी .. थोडा त्रास देत आहोत त्याबद्दल दिलगीर आहोत .. जय गृदेव......
प्रतिक्रिया
28 Feb 2020 - 6:48 pm | माहितगार
वा वा जागृत फणी :))
7 Mar 2020 - 6:36 am | विजुभाऊ
तुमचे नाव आता फणींद्र माथा असे ठेवायला हवे.
लै भारी फणी......