केयलफिड्डी!

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
17 Feb 2020 - 12:39 pm

(नंब्र सूचना: कृपया कवितेचे रसग्रहण आपापल्या मनातच करावे. कवीकडे स्पष्टीकरण मागू नये. कवी मिपावरून हद्दपार होऊ इच्छित नाही. तसेही समझनेवाले अगोदरच कवितेचा अर्थ समझ गये है!)

बाई अगदी बावनकशी
शिनेमावाणी दिसते जशी
काका नेतो तिला डेटवर
पिळत पिळत आपुली मिशी

कॉफी, गजला, पुस्तकचर्चा
काका जाणी जुने बहाणे
"वाड्यावरती येइल का ही?"
मनात मांडे गुपचुप खाणे

बाई परंतू त्यास सवाई
ऐकुन हसते चावट कविता
फिरुनी सांगे, "सहा वाजले,
कन्या थकली वाट पहाता"

पर्स उचलुनी भुर्रकन जाते
टाळुन त्याची लाडीगोडी
हिरमुसलेले काका बसती
कुरवाळत मग 'केयलफिड्डी'

(पूर्णविराम)

कविताविनोद

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

21 Feb 2020 - 6:05 pm | चौथा कोनाडा

'केयलफिड्डी' .... छान !
असे मनात मांडे खाल्यावर केएलपीडी होणारच ना !

बाकी, कविता मनोरंजक आहे, कुणीच प्रतिक्रिया दिली नाही याचे आश्चर्य वाटले.

चलत मुसाफिर's picture

21 Feb 2020 - 10:26 pm | चलत मुसाफिर

रसग्रहण मनातच करावे अशी विनंती केली होती त्यामुळे असेल :-)

पण तरीही प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्हाला कविता आवडली हे वाचून आनंद झाला. (पण याहून अधिक पृच्छा करू नका प्लीज!)

टवाळ कार्टा's picture

21 Feb 2020 - 7:14 pm | टवाळ कार्टा

आरारारा =))

चलत मुसाफिर's picture

21 Feb 2020 - 10:26 pm | चलत मुसाफिर

धन्यवाद