उज्जैनचे प्रसिद्ध यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली.
.
ती घोडे सांभाळणार्या सेवकाच्या प्रेमात पडली. राजाला पिंगलाचे हे कृत्य माहिती नव्हते, कारण तो तिच्या प्रेमात आंधळा झाला होता. जेव्हा छोटा भाऊ विक्रमादित्यला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी मोठ्या भावाला या संदर्भात सर्व माहिती दिली. त्यानंतरही राजा भर्तृहरी पिंगलाच्या बाजूनेच उभा राहिला आणि विक्रमादित्यवरच वाईट चारित्र्याचा आरोप लावत त्याला राज्यातून बाहेर काढले.
.
अनेक वर्षानंतर पिंगलाचा व्यभिचार उघड झाला, जेव्हा एका तपस्वी ब्राह्मणाने कठोर तपश्चर्या करून देवतांकडून मिळालेले अमरफळ( हे फळ खाणारा व्यक्ती अमर होतो) राजाला भेट स्वरुपात दिले. राजा पिंगलाच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होत की, त्याने हे फळ तिला दिले. कारण हे फळ खाल्ल्यानंतर पिंगला नेहमीसाठी तरुण आणि अमर होईल तसेच आपणही तिच्या सहवासात राहू असा राजाने विचार केला.
.
पिंगलाने ते फळ घोडे सांभाळणार्या सेवकाला दिले. त्या सेवकाने ते फळ एका वेश्येला दिले, जिच्यावर त्याचे प्रेम होते. वेश्येने विचार केला की, हे अमरफळ खाऊन आयुष्यभर तिला या पाप कर्मात राहावे लागेल. यामुळे तिने ते फळ राजाला भेट दिले आणि सांगितले की, तुम्ही हे फळ खाल्ले तर प्रजासुद्धा दीर्घकाळापर्यंत सुखी होईल.
.
पिंगलाला दिलेले ते फळ वेश्येकडे पाहून राजा भतृहरीच्या पायाखालची जमीन सरकली. राजाला भावाचे शब्द आठवले आणि पिंगलाचा विश्वासघात लक्षात आला. राजा भतृहरीचे डोळे उघडले आणि पिंगलाबद्दल मनामध्ये घृणा उत्पन्न झाली. त्यानंतर राजाने पिंगला आणि त्या सेवकाला शिक्षा दिली नाही. राजाने सर्व राजवैभवाचा त्याग करून वैराग्य धारण केले. आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये राजा भर्तृहरीने भर्तृहरि शतक ग्रंथामध्ये श्रुंगार शतकच्या माध्यमातून सौंदर्य विशेषतः स्त्री सौंदर्याशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींना कोणताही पुरुष नाकारू शकत नाही
प्रतिक्रिया
9 Dec 2019 - 10:55 pm | जॉनविक्क
http://misalpav.com/node/44631
10 Dec 2019 - 6:06 am | आनन्दा
यांच्या उद्योगामुळे बाकीचे सगळे धागे बोर्डावरून गेले. याला काय उपाय करता येईल? मिपावर रतीब नावाचा नवीन विभाग सुरू करावा का?
10 Dec 2019 - 1:17 am | रमेश आठवले
मिसळपाव मध्ये पुराणातली वांगी खास नवी चव आणतील.
10 Dec 2019 - 9:29 am | mrcoolguynice
असु द्या की लोकहो..
कुलकर्णी यांच्या धाग्यांमुळे मला तर् चांदोबा ठकठक किशोर वाचल्याची गम्मत येतेय.
10 Dec 2019 - 2:03 pm | जॉनविक्क
हाच धागा याच नावाने त्यांनी सन्यासी होण्या पूर्वी प्रकाशित केला होता वर त्याची लिंकही दिली आहे पुन्हा तोच धागा नव्याने प्रकाशित करणे साहित्य संपादकांना *त्या बनवण्याचा उद्योग वा ट्ट त नाही के ?
अर्थात योग्य ठीकाणी न सांगता *त्री लावतील तर ते ******क कशाला म्हणवून घे तील म्हणा ?
10 Dec 2019 - 2:25 pm | mrcoolguynice
शांत गदाधारी भीम शांत...
10 Dec 2019 - 2:42 pm | जॉनविक्क
आता जर सास ला कोणी तात्या बनवत असेल तर रागावुन मला काय मिळणार ?
10 Dec 2019 - 3:39 pm | mrcoolguynice
तात्या ?
रियली ?
अशारितीने जानराव यांनी, यष्टी बाहेर जाणाऱ्या चेंडूला, हलकेच बॅट चा स्पर्श करून,थर्ड मॅन च्या दिशेने एक चौकार मारला.
10 Dec 2019 - 7:19 pm | जॉनविक्क
;)
10 Dec 2019 - 9:30 pm | जॉनविक्क
बघुयात हणपायर नो बॉल देतात की पक्षपात करून माझे वरील विधान सत्य सिध्द करतात ते :)
10 Dec 2019 - 12:05 pm | श्वेता२४
चांदोबा व ठकठक ची अकुशी केलेली तुलना अजीबात आवडलेली नाही त्याबद्दल जाहीर निशेध. दोन्ही पुस्तके निखळ मनोरंजन व संस्कार करायची. पण त्या पुस्तकात अक्युमनची दैवी देणगी न्हवती त्यामुळे अकुंपुढे ही पुस्तके म्हणजे काहीच्या काही ;)
10 Dec 2019 - 10:03 pm | ट्रम्प
तरी अकु च्या गाडीचा ट्रॅक बदललेला दिसतोय !
काही दिवसांपूर्वी त्यांच्या कथेत जोशी , देशपांडे प्रधान आडनाव असलेल्या मुलींची आंतरजातीय लग्न हे कॉमन कथाबीज असायचे .
10 Dec 2019 - 10:30 pm | तेजस आठवले
आता पुढच्या धाग्यात अकबरफळ आणि ऍंथोनीफळ ह्यांचं फ्रुटसॅलड करून वाचकांना खायला घाला की वाचक वैराग्य धारण करायला मोकळे!!