(सत्य घटनेवर आधारित)
तारीख : 2 नोव्हेंबर
माणसं : एकूण आठ
अवस्था : प्रचंड दमलेली
व्यवस्था : एक क्वार्टर फ्युएल, दोन बाटल्या सिग्नेचर
तयारी : वेफर्स, शेंगदाणे, थोडसं चिकन, थोडे मासे, (गरीब शाकाहारी माणसांसाठी) थोडंस पनीर, चार ग्लास, कोल्ड्रिंक्स
वेळ : रात्रीचे अकरा वाजून तीस मिनिटे
अंक 1 : सुरुवात
एका ओळीत ठेवलेले चार ग्लास
एकात 10 मिली आणि दुसर्यात 30 मिली फ्युएल
तिसर्यात आणि चौथ्यात 30 मिली सिग्नेचर प्रत्येकी
कोल्ड्रिंक्स स्वादानुसार
"" चांगभलं ""
चर्चा : दमलेल्या आई बापाची कहाणी
अंक 2 : दुसरं वळण ( सेकंड राउंड)
20 मिली फ्युएल बाकी आणि सिग्नेचर अर्धा खंबा डाऊन
चर्चा पुढे चालू .......
अंक 3: गुगली
गहन चर्चेत आमच्या कन्यारत्नाची उडी
" आई मला आत्ताच्या आत्ता नरकासुराचा वध ही गोष्ट सांग "
आई, मावश्या, काका आणि बाबा तोंडावर पहिल्या बॉलवर पाचही जण आउट झाल्याचे भाव घेऊन..
" आई मला आत्ताच ऐकायची आहे, सांग " फर्मान पुढे ..
गडबडलेली आई ..
" बरं सांगते, पण शांतपणे ऐकायचं,मध्ये बोलायचं नाही "
(स्वतःला विचार करू द्यायला सबब)
" एक नरकासुर होता "
" त्याच नाव होतं का ते? "
" नाही, तो नरकात गेला म्हणून त्याच नाव नरकासुर पडलं "
" मग आधी काय नाव होतं त्याच? " शंकासुराचा प्रश्न
आई लेग बाय विकेट ..
शक्य असेल तर भयाण आणि इच्छूक शांतता, सगळ्यांचे लक्ष आईकडे ( डोळे नाहीत, काय हिंमत अश्या खिंडीत गाठलेल्या वाघिणीला डीवचायची कुणाची) ..
" मला आठवत नाही पण पुढे ऐक "
कन्यकेच्या चेहर्यावर नाराजीचे भाव, पण पुढे ऐकायला तयार ..
" कृष्णबाप्पा लहान असताना एक असुर ...... म्हणजे राक्षस "
कन्यकेच्या चेहर्यावर प्रश्नार्थक भाव उमटल्यावर आईचे उत्तर ..
" कृष्णबाप्पा लहान असताना एक असुर त्यांना खूप त्रास द्यायचा. तो असुर खूप घाण राहायचा.
तो आंघोळ नाही करायचा.
दात नाही घासायचा.
बाहेरून आल्यावर पाय नाही धुवायचा.
डोक्याला तेल नाही लावायचा. "
(पोरगी जे जे करायला त्रास देते, ते सगळं घुसडवायचा आईचा प्रयत्न)
(पोरीच्या चेहर्यावर ढिम्म)
" मग काय केलं कृष्णबाप्पाने "
बाळबोध चेहर्याने मी आधीच काही ऐकलचं नाही अश्या अविर्भावात पुढचा प्रश्न
" मग त्याने त्या असुराला शाप दिला "
" आई, शाप म्हणजे? "
( दारू म्हणजे काय रे भौ, या धर्तीवरच निरागस प्रश्न)
" म्हणजे त्यांनी असुराला शिक्षा दिली नरकात ढकलून. म्हणून तो नरकासुर "
"आई, नरक म्हणजे? आणि ते कुठे असतं? "
पुढची गुगली ..
" ती जागा खूप धाण धाण असते. आंघोळ न करणारी, दात न घासणारी मुलं तिकडे पाठवली जातात "
(आईचा पॉवर प्ले करायचा प्रयत्न)
" म्हणून आपण दिवाळीच्या पाहिल्या दिवशी लौकर उठतो, अभ्यंगस्नान करतो आणि देवबाप्पाला भेटायला मंदिरात जातो "
कन्या विचारमग्न ..
परत इच्छूक, भयाण शांतता ..
कन्या आईकडे बघते, मान डोलवते आणि काकांकडे वेफर्स मागते
निशब्द आणि निर्ध्वनी सुस्कार ( सगळ्यांकडून)
चतुर बाबा विषय बदलतो ...
समाप्त !
प्रतिक्रिया
8 Nov 2019 - 1:42 pm | कंजूस
चक्रासुर.
8 Nov 2019 - 3:28 pm | mrcoolguynice
नाईस...
8 Nov 2019 - 5:26 pm | संजय पाटिल
हे चांगलच आहे.......
पण ते मावळ्यांच्या पुढचा भाग आणा कि.....
26 Nov 2019 - 9:51 pm | लाल गेंडा
मावळ्यांचा पुढचा भाग आकार घेतो आहे. त्याच थोडं जॉर्ज मार्टिन सारखं झालं आहे.
11 Nov 2019 - 6:11 pm | दुर्गविहारी
मस्त लिहलंय !
11 Nov 2019 - 6:17 pm | साबु
आईचा पॉवर प्ले करायचा प्रयत्न-> +१
15 Nov 2019 - 2:26 pm | प्रशांत
मस्त लिहलंय !