.. शी मस्ट बी राइट !

उन्मेष दिक्षीत's picture
उन्मेष दिक्षीत in जनातलं, मनातलं
19 Aug 2019 - 10:49 pm

शनिवार रात्र
स्थळ :- घर (आमचं)
.....
ती : नाही! मी चालले आहे झोपायला, तुझं संपलं की ये.
मी : थांब की. ११ वाजलेत फक्त
ती : .......
मी : ओके, जा
------------------------------------------------------------
साधारण १५ मिनिटांनी,
मी (डिश हातात) : श्रद्धा ss.. !?
ती : काय ?
मीठ कुठाय ? मिळत नाही आहे ! .... , इकडं ये जरा..
ती आली.
मी : थांब जरा, तुला आता डेमो दाखवतो, दर वेळी नेमकं काय होतंय वस्तू शोधताना ते बघ आता (आमच्या श्रद्धाचा वस्तूंच्या जागा बदलत राहणे हा एक छंद म्हणा, किंवा "स्थायी" भाव म्हणा, तो आहे )
मी (ड्रॉवर उघडत ) .. हे बघ, इथं ? नाहीये.
(कट्ट्यावर ) इथं? नाहीये .. (मिठाच्या ओरिजिनल जागेवर ) इथं पण नाहीये.....
टेबलवर बघितलं, तिथं नाहीये...( माझं एक टेक्नीक आहे. वस्तू एका ठिकाणी पटकन दिसली नाही, तर लगेच दुसरीकडे बघायचं. कारण मला तिथेच जरा शोधाशोध करून बघितल्यास वस्तू मिळण्याची शक्यता असते, यावर विश्वास नाही. मी स्मार्ट आहे एकदम ) बघितलंस ? वेअर इज इट ? मिस्टरी ?? बघू दे आता शोधून.
ती ( "डेमो" संपेपर्यंत , नेहमीप्रमाणे शांतपणे उभी)
कट्ट्यावर्च्याच ! एका कुठल्यातरी न दिसणार्‍या (मला) वस्तूंच्या जागेतून मीठ उचलून, "हे काय इथं आहे?" समोरच्या वस्तू दिसत नाहीत तुला. मिस्टरी म्हणे.
मी : ??!!??
मी : तुम्ही मुद्दामून वस्तू कायम लपवून ठेवता आणि कायम आम्हाला तुमच्यावर डिपेंडंट ठेवता ! किती वेळा सांगितलंय वस्तू जागच्या जागेवर ठेवत जा, का सारख्या इकडून तिकडे जागा बदलत असतीस ? सारखं विचारायला लागतंय मला ! (मी आता सोफ्याकडे वळतो)
ती : ..........
मी : (वैतागून) चष्मा सापडत नाही आहे आता ! (तणतण पुढे चालू) तुमचा प्लॅनच असतो आम्हाला डिपेंडंट ठेवण्याचा ! बघितलंय मी. आय लाइक टु बी इंडिपेंडंट !
(चष्मा शोधण्यात ती ही सहभागी झालीच होतीच . अशा वेळी काही बोलायचं नाही हे तिला माहिती आहे. हुशार आहेच ती, बीइंग वूमन )
तेवढ्यात मला आठवलं, मी मगाशी कुठं ठेवला होता तो, आणि सापडला (मलाच ! येस ! ) असं म्हणून स्वतःवरच खूश होऊन तिकडे वळलो, तर..
ती आधीच पोचली होती तिथं.
हा काय इथं आहे !!..

मी : बरोबर. दे इकडं. थँक्यु. ( हे कसं काय, ते आता विचारायचं नाही. आपण अशावेळी गप्प बसायचं )
ती : ( थोड्या वेळाने ) लाइट घालव आणि ये आता, जागत बसू नकोस.
मी : (लाइट घालवत ) .. आलोच.
ती : गोळी घेतलीस ?

मी : .........

: डेडिकेटेड टु माय डिअर वाइफ अँड ऑल स्मार्ट विमेन. तुम्ही आमचं जगणं सोपं करता ,की अवघड, हेच कळालेलं नाही अजून ! मिस्टरी ??

- उन्मेष

विनोदप्रकटन

प्रतिक्रिया

चामुंडराय's picture

20 Aug 2019 - 3:27 am | चामुंडराय

.

जॉनविक्क's picture

20 Aug 2019 - 1:08 pm | जॉनविक्क

आपण महान आहात :)

_/\_

महासंग्राम's picture

20 Aug 2019 - 1:37 pm | महासंग्राम

कधी रॉंग म्हणून पाहायची हिम्मत करून बघा