डिस्क्लेमर : हा लेख तद्दन फालतू आहे. आम्ही आमच्या बायकोवर, इथे हवे तितके लिहू शकतो. त्यामुळे स्त्रीमुक्ती वाल्यांनी खालील लेख नाही वाचला तरी चालेल
तर अशाच एका शनिवारची गोष्ट आहे. आम्ही आमच्या बाबा महाराजांचे साप्ताहिक दर्शनासाठी गेलो होतो. अर्थात तीर्थ प्राशन करून मग घरी गेलो. तसे नौकानयन न करता, पंख लावूनच घरी गेलो आणि बघतो तर काय. ..घरी बरीच मंडळी जमलेली. आई-वडील तर होतेच, पण शिवाय बायकोची भावंडे पण होतीच. चपला काढून, जेमतेम बसतोय न बसतोय, तोच बायकोचा हुंदका कानावर आला. आता हिला काय झालं, म्हणून नजर वरती केली, तर मातोश्रींनी हातात एक कागद ठेवला. कसाबसा कागद वाचला. तर त्यात लिहिले होतं की...
चंद्र-मोहीमे साठी तुमची अंतराळ वीर म्हणून निवड झाली आहे. तुमच्या मागील अनुभवावरून, तुम्हीच भारतीय जनतेतील पहिला चंद्रवीर होऊ शकता. लवकरात लवकर आपला होकार अपेक्षित आहे. खाली मोबाईल क्रमांक दिला आहे. त्वरित संपर्क साधावा. ही विनंती.
तसे ह्या आधी पण मी चंद्रावर गेलो होतो. पण ती मिपाकरांसोबत सामुदायिक मोहीम होती. त्यामुळे मी तसा बिंधास होतो. पण ही मोहीम मात्र एकट्यानेच पार पाडायची होती. मी होकार देणारच होतो आणि मी मोबाईल फोन घेतला आणि बायकोने हंबरडा फोडला. हे एक असे शस्त्र आहे की, ते वापरले की, सासू आणि सून एकत्र येतातच पण पिताश्री पण त्यात विरघळून जातात.
मी : आता काय झालं? रोज रोज लोकल मध्ये प्रवास करण्यापेक्षा, चंद्रावर गेलो तर काय वाईट?
बायको : कोण कोण येणार आहे?
मी : माहीत नाही. पण बहुतेक एकटाच असेन.
बायको : पण तुम्हालाच का निवडले?
मी : मला काय माहीत? मी मागे मिपाकरांसोबत गेलो होतो. ते वाचून निर्णय घेतला असेल. तसेही आजकाल मिपावरील चर्चा वाचून सरकारी धोरणे राबविली जात आहेत, असे आमचे बाबा महाराज, म्हणत होते.
बायको : तिथे खाणार काय?
मी : तिथे दगड आणि माती आहे. मला ते पचवायचा अनुभव आहे. मागच्या वेळी मी 3-13-1760 ह्या ग्रहावर गेलो होतो. तो पण लेख मी मिपावर लिहिला होता.
बायको : (सगळ्यांकडे बघत) : बघीतलंत, हे नेहमी असंच करतात. सतत इकडून तिकडे नाना ग्रहांवर फिरत असतात. पण मला मात्र कुठेही नेत नाहीत. मला पण न्या.
मी : अगं, हा निर्णय मी कसा घेऊ?
बायको : समजा, तुमच्या सूटला भोक पडले तर कोण शिवणार? मी बरोबर असेन तर , तुम्हाला चिंता नाही. तुम्हाला धड बटण पण लावता येत नाही.
मी : अगं, ते स्पेशल सूट असतात.
बायको : समजा वाटेत इंधन संपले तर?
आता हा सवाल जवाब ऐकता ऐकता इतरांना पण एक एक प्रश्न सुचायला लागले.
आई : तुला काही झालं तर हिने काय करायचे?
पिताश्री : मुलांना कोण सांभाळणार?
बायकोची भावंडे (नक्की कोण काय म्हणाले? ते आठवत नाही) : डिप्लोमा करतांना इतक्या गंटागळ्या खाल्या, तरी पण सिलेक्शन? नशीब एकेकाचे. नक्की चंद्रावरच जातील, ह्याचा काय भरवसा? परत येताना कुठे जातील ह्याचा काही भरवसा नाही. हे कधी चंद्रावर गेले होते? आतल्या गाठीची माणसे नुसती. हा 3-13-1760 ग्रह नक्की आहे का? नुसत्याच बाता मारतात.
आता तुम्हीच सांगा, ह्या अशा प्रश्नांची उत्तरे देण्या पेक्षा मी, मौनव्रत धारण केले आणि समाधी अवस्थेत गेलो. अर्थात, आमच्या कडून प्रतिसाद न गेल्याने, आमच्या ऐवजी दुसर्याची निवड झाली.....
प्रतिक्रिया
29 Jul 2019 - 3:58 pm | नावातकायआहे
ह ह पु वा...
मला काय माहीत? मी मागे मिपाकरांसोबत गेलो होतो
29 Jul 2019 - 4:09 pm | खटपट्या
घरगुती जेवणाचा डबा, भाजणीचे पीठ, भूक लाडू पाहिजे असतील तर सांगा. थेट चंद्रावर डिलिव्हरी करू.
डबा तुम्हाला घासून परत करावा लागेल.
आठवड्यातून दोनदा ब्रॉयलर चिकन, आणि एकदा गोडाचा पदार्थ मिळेल.
परत आल्यावर पैसे दिलात तरी चालतील.
पत्ता बरोबर द्या मात्र - मागच्या वेळेला मेला आमचा गणू दुसऱ्याच ग्रहावर डबा देऊन आला, त्याला तो तुमचा 3-13 ग्रह गावला नाय.
बाकी मीठ थोडं कमी टाकतो आम्ही.
चिकन मध्ये घरचा मसाला टाकतो.
कळवा काय ते
29 Jul 2019 - 4:21 pm | अभ्या..
मुविकाका चंद्रावर जाणार म्हणजे डबा घरीच पाठवा.
बिल तेवढी सॉफ्ट कॉपी मोबल्यावर किंवा तिकडे चंद्रावर अद्याप टावर नसल्यास हार्ड कॉपी मु. पो. चंद्र अॅड्रेसला पाठवा. आल्यावर अदा होईल ते. ;)
29 Jul 2019 - 4:10 pm | यशोधरा
=))
29 Jul 2019 - 4:21 pm | ज्ञानोबाचे पैजार
मागच्या चंद्र मोहिमेत मी पण तुमच्या सोबत होतो पण मग मला चिठ्ठी का बरे आली नसावी? मी लगेच विचारतो बालाजीला.
पण त्या वेळाचा अनुभव मोठा रोचक होता. तिकडे केलेल्या मिपा कट्ट्याचे फोटो ट्रंपतात्यांनी मागुन घेतले माझ्या कडून श्वेतगृहात लावायला.
मंगळ मोहिमेच्या वेळी तुमचा गुरुवार होता त्यामूळे तुम्ही तिर्थ घेतले नव्हते. अजूनही गुरुवार करता का?
आणि ३-१३-१७६० च्या वेळी मी अंतराळयान चालवत होतो आणि ऐन वेळी माझा सीट बेल्ट लॉक झाला म्हणुन उतरु शकलो नाही.?पण मी अंतराळयानातुन तुमच्या खादाडीचा घेतलेला फोटो णॅशनल झोग्रोफी ने फ्रंट पेजवर छापला होता.
पण यावेळी तसाही चंद्र नको, फार वेळा गेलो आपण तिकडे, खड्डा न खड्डा माहित झाला आहे चंद्राचा. नवमिपाकरांना करुदे कट्टा चंद्रावर आपण आता दुसरी कोणती तरी जागा शोधू कट्ट्या साठी.
पैजारबुवा,
29 Jul 2019 - 7:31 pm | पाषाणभेद
न कळवता कट्टा करणा-यांचा निषेध.
मुविकाका, आम्हाला फोन नंबर द्या त्या चिठ्ठीतला.
29 Jul 2019 - 4:24 pm | रानरेडा
हि चंद्रा कोण ?
29 Jul 2019 - 4:28 pm | ज्ञानोबाचे पैजार
त्यांनी पष्ट श्ब्दात लिहिलय ना
स्त्रीमुक्ती वाल्यांनी खालील लेख नाही वाचला तरी चालेल
मंग काहून विचारुन राहिले?
पैजारबुवा,
29 Jul 2019 - 4:33 pm | जॉनविक्क
29 Jul 2019 - 4:42 pm | जॉनविक्क
तुमच्या नसण्याने एक फार मोठा व्हॅक्युम तयार झाला आहे, वाचत असाल तिथून लिहते व्हा
29 Jul 2019 - 7:33 pm | पाषाणभेद
हिलते व्हा हा जुना वाक्यप्रचार इथलाच.
आज वापरायला भेटला.
हिलते व्हा.
29 Jul 2019 - 8:20 pm | जॉनविक्क
अजून भरपूर संधी मिळो हि आकाशाकडे प्रार्थना
29 Jul 2019 - 6:35 pm | दुर्गविहारी
;-) भारी लिवलयं. लिहीते झालात याचा जास्त आनंद आहे.
29 Jul 2019 - 6:47 pm | जव्हेरगंज
लै खत्रा!!!
=)))))
29 Jul 2019 - 7:16 pm | भंकस बाबा
जबरदस्त
29 Jul 2019 - 7:16 pm | भंकस बाबा
जबरदस्त
29 Jul 2019 - 7:54 pm | Rajesh188
लेख मस्त झालाय .
29 Jul 2019 - 8:17 pm | नाखु
बाबा महाराजांच्या प्रकृतीची काळजी घेत जा किती त्यांनी (स्वप्नात) ये जा करण्यासाठी डोंबिवली ते कोकण व्हाया पुणे ये जा करायची.
त्या दमणूकीमुळेच ते गेले बरेच दिवस आम्हाला ( आदरार्थी नाही तर बहुवचन) मला आणि पैजारबुवा यांना दृष्टांत देईना झालेत.
बाकी निव्वळ खालील नियमावली वाचली असती तर आणि त्याची उत्तरे घरच्या उलटतपासणीत दिली असती तर आपल्याला चंद्रावरच काय, मंगळावर जायची संधी मिळाली असती
१ अत्यंत समरप्रसंगी निर्विकार चेहऱ्याने लोकल पकडण्याची जन्मजात गुणवत्ता असल्यानेच माझी निवड झाली आहे.
२ मी चंद्रावर जितका भू भाग तपासणीसाठी पादाक्रांत करणार आहे तितकीच जागा डोंबवलीत ( फक्त तिथले मीटर ईथे फूट) प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे.
३ कुणी कितीही तारीफ केली तर मी हवेत जात नाही असा नासाने गोपनीय अहवाल माझ्या जुन्या हाफिसातून आणि नातेवाईकांकडे चौकशी करुन मिळवला आहे ( यावेळी संशयीताकडे रोखूनच हे वाक्य उच्चारले तरी चालेल)
४ ही मोहिम यशस्वी झाली तर मंगळ स्वारीकरीता विचार केला जाईल अशी अपेक्षा आहे
५ अत्यंत महत्त्वाचे: मिपावर सुद्धा बर्याच जणांनी कि मुवि जात असतील चंद्रावर तर बरं आहे.(पुढे मागे तिथे मिपा कट्टा) झाला तर झाला नाहितर चांदोमामा चांदोमामा !!!
हा प्रतिसाद बाबा महाराजांच्या इच्छेने आहे मी केवळ निमित्तमात्र.
आज्ञाधारक अज्ञ बालक नाखु
29 Jul 2019 - 10:33 pm | टर्मीनेटर
हे बाकी बरं झालं बघा मुवि काका! तुमची संधी हुकल्याचा खेद आहे, पण तुम्ही येणार म्हणून शिंच व्हिस्कीचं बाटली आणलंय त्या विष्ण्याला सांगून त्याचं काय करायचं हा प्रश्न मिटला :-)
30 Jul 2019 - 11:06 am | विजुभाऊ
वा झकास लिवलय
30 Jul 2019 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता तुम्हीच सांगा, ह्या अशा प्रश्नांची उत्तरे देण्या पेक्षा मी, मौनव्रत धारण केले आणि समाधी अवस्थेत गेलो. अर्थात, आमच्या कडून प्रतिसाद न गेल्याने, आमच्या ऐवजी दुसर्याची निवड झाली.....
अरेरे, मिपाकर एका मस्तं सचित्र प्रवासवर्णनाला मुकले ! =)) =)) =))
21 Aug 2019 - 2:18 pm | मृणालिनी
:D
21 Aug 2019 - 5:22 pm | बंट्या
हा हा