पर्वती

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
16 Jul 2019 - 8:50 am

पर्वती चढत होतो
साथीला ५-६ तरुणाईचे टोळके होते
ते गप्पा मारत पर्वती चढत होते
मध्यावर आल्यावर तरुणाई दमली व बाजूला विश्रांती साठी बसली
मी त्यातल्या एका तरुणाला म्हणालो अरेतुम्ही जवान तरुण मुले दम्लात एव्हढ्यात ? पर्वती एका दमात चढायची असते
मी तर अजूनही एका दमात चढतो
त्यावर तो तरुण म्हणाला " काका तुमची पिढी साजूक तुपावर मोठी झाली आमची पिढी रिफाईंड ऑइल वर -तेव्हढा फरक तर पडणारच ना "
त्याच्या उत्तराची गंमत वाटली व त्या कडे पाहून हसलो
व पाय-या चढायला सुरवात केली

समाजलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

16 Jul 2019 - 12:00 pm | मुक्त विहारि

मी पहिला. ..

अतयंत रहस्यमय व गूढ गर्भ कथा

मुक्त विहारि's picture

16 Jul 2019 - 12:22 pm | मुक्त विहारि

कुठल्याही वाक्याला, पुर्णविराम नाही...

आणि शीर्षक पण जोरदार आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2019 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

अकुकाका पर्वती एका दमात चढतात म्हणजे विरामाला जागा नाही आणि कथासुद्धा एकाच दमात लिहितात... म्हणून पूर्णविरामालाही जाsssगा नाsssही. :)

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2019 - 12:35 pm | चौथा कोनाडा

"अकुं"ची मानवी तळाचा आणि व्यापारी मळाचा शोध घेणारी , वृत्त, छंद, मुक्तछंद वै चौकटी उद्धवस्त करून टाकणारी सखोल अर्थगर्भी कविता !
साहित्य अकादमीचा पुरस्कार नक्की मिळवणार !

श्वेता२४'s picture

16 Jul 2019 - 12:47 pm | श्वेता२४

व त्या कडे पाहून हसलो
मोनालिसाच्या हास्यानंतर ज्या गूढ हास्याचा अर्थ मानवास लागला नाही ते हास्य हेच!

बाप्पू's picture

16 Jul 2019 - 1:14 pm | बाप्पू

मला वाटल आता पर्वती वर पण कुठेतरी रोमँटिक सीन वाचायला मिळेल..
पण हे काय..फक्त तूप आणि रिफाईंड तेल.... . श्या ...!!!
पूर्वीचे अकु नाही राहिले आता...

इथे पर्वती म्हणजे टेकडी नसावी

फुटूवाला's picture

16 Jul 2019 - 1:45 pm | फुटूवाला

पर्वतीवर चढतायत ते आत्ता.

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

16 Jul 2019 - 5:08 pm | प्रलयनाथ गेंडास...

पर्वतीवर चढतायत ते आत्ता.

अश्लील अश्लील

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2019 - 11:00 am | चौथा कोनाडा

मा. प्रलयनाथ गेंडा,

तुम्हाला कुठेही काहीही दिसते का ?

अश्लील अश्लील

असंसदीय, असंसदीय ... !

तरुणाईने तुमचे लेख वाचले असणार. खरं कारण सांगितलं नाही.

जॉनविक्क's picture

16 Jul 2019 - 10:30 pm | जॉनविक्क

बरे केलेत.

आता उतरतानाचा किस्सा येऊदे.

फुटूवाला's picture

17 Jul 2019 - 1:43 am | फुटूवाला

चढल्यावरचे नको का?

:)

जॉनविक्क's picture

17 Jul 2019 - 2:23 am | जॉनविक्क

पर्वती चढत होतो
साथीला ५-६ तरुणाईचे टोळके होते
ते गप्पा मारत पर्वती चढत होते
मध्यावर आल्यावर तरुणाई दमली व बाजूला विश्रांती साठी बसली

ह्हे फुरेस नही का ?

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2019 - 11:02 am | चौथा कोनाडा

हा ..... हा ..... हा ..... :-)))