आडनावे व इतिहास
-----------------
पेशवे दरबारी पटवर्धन नावाचा एक तरुण व शूर सरदार होता
पेशव्यानी एक मोहीम काढली त्यात हा सामील झाला
त्या काळात कुटुंबास बरोबर घेण्याची अनुमती असल्याने त्याने आपल्या भार्येस पण समवेत घेतले
रात्रीची वेळ होती
पेशव्यांच्या छावणीवर मोगलांची टोळधाड तुटून पडली
हातघाईची चकमक झाली
मोगलांनी लूट केली व विद्युत वेगाने ते पसार झाले
ह्या चकमकीत पटवर्धन सरदार धारातीर्थी पडला
बाईने आक्रोश करत मदती साठी टाहो फोडला
-
घोरपडे नावाच्या सरदाराने तो ऐकलं
अंधार होता धुमश्चक्री चालू होती
घोरपडेंनी त्या स्त्रीस खूण करत व आधार देत घोड्यावर मागे बसवले
शांतता झाली अन घोरपडे नी पटवर्धन बाईस घरी आणले
युद्धात जिंकलेली स्त्री
घरातील पोक्त बायला एकत्र झाल्या अन बाईची विचारपूस केली
त्यात त्यांना समजले की बाई गरोदर आहे
बाईचे काय करायचे प्रश्न निर्माण झाला
शास्त्र व धर्म काय सांगतो त्या प्रमाणे वागावे -आज्जी बाई म्हणाल्या
दशग्रन्थि राशिंनकर विप्रास मार्गदर्शना साठी बोलावणे धाडले
-
राशीनकारानी कथा ऐकली व म्हणाले
युद्धात पळवून आणलेली स्त्री आहे
मालकी हक्क घोरपडे सरदारांचा आहे -त्यांनी तीवा पत्नी म्हणून स्वीकारावे वा दासीचा दर्जा द्यवा सेवेसाठी व अंगवस्त्र म्हणून बाळगावे
सर्व प्रकार शास्त्र संमत आहेत -
परंतु स्त्री गरोदर आहे त्यातून सरदार साहेबाच्या घोड्यावर मागे बसून आल्याने ती बहीण समजावी
पत्नी अंगवस्त्र आदी ना घोड्यावर पुढे बसवले जाते तर बहीण वा अन्य ना मागे
हा रीती रिवाज आहे
त्या मुळे तिला बहिणी प्रमाणे वागवावे असा सल्ला आम्ही देत आहोत
बाकी सरदार साहेबांची मर्जी
सरदार साहेबानी वडील धा-या शी चर्चा केली
व मी हिला बहीण मानत आहे असा निर्णय जाहीर केला
व चर्चा समाप्त झाली
-
घोरपड्यांचा चौसोपी वाडा होता त्यातली एक खोली तिला देण्यात आली
परिवारातल्या स्त्रिया पण तिच्याशी आपुलकीने वागू लागल्या
ती गरोदर आहे असे समजल्याने तिचे लाड कौतुक सुरु झाले
योग्य समयी ती प्रसूत झाली अन एका बालकास जन्म दिला
वाड्यात आनंदाचे वातावरण सुरु झाले
घोरपडे मामा पण आनंदित झाले
मामाचा भाच्यांवर खूप जीव होता त्यांनी त्यास धर्म पुराणे आदी शिकवण्यासाठी गुरुजी ची सोया केली
त्याच प्रमाणे भाच्चा मामाच्या तालमीत तलवार बाजी घेडेस्वारी आदित प्रवीण झाला
-
पुढे त्याने पेशवे दरबारी पेशव्यांची सेवा केली
अनेक मोहिमा पार पाडल्या
बाईचा अंतकाळ आला
तिने भावास जवळ बोलावले व म्हणाली
तुमचे उपकार मी विसरू शकत नाही
आपण माझे रक्षण केले आपल्या छत्रछायाे खाली आम्ही मायलेक वाढलो
त्या रात्री जर मोगलांची शिकार झालेअसते तर कल्पना करवत नाही अश्या यातना मला सहन कराव्या लागल्या असत्या
आम्ही आपले ऋणी आहोत
ते फेडणे आम्हास शक्य नाही पण एक विनंती करते मुलास घोरपडे आडनाव लावण्याची अनुमती द्यावी व ऋणातून अंशता मुक्त होण्याची संमती द्यावी
मामाच्या डोळ्यास अश्रूंची धार लागली होती
त्यांनी बहिणीची विनंती मान्य केली
-
तेव्हा पासून घोरपडे घराण्याच्या २ शाखा झाल्या
एक क्षत्रीय व एक ब्राह्मण
आजही ब्राह्मणा मध्ये घोरपडे आडनाव आहे
उंडे ठोसर ढेरे घाटगे आदी आडनावे पण ब्राह्मण व मराठा समाजात कॉमन आहेत
-
{लेखनादर केसरीतला लॆखा }
प्रतिक्रिया
14 Apr 2019 - 6:37 pm | आनन्दा
रोचक माहिती
14 Apr 2019 - 7:51 pm | कुमार१
रोचक माहिती
15 Apr 2019 - 12:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक ऐतिहासिक माहिती !
15 Apr 2019 - 3:49 pm | सिरुसेरि
मस्त संशोधन
15 Apr 2019 - 4:11 pm | श्वेता२४
कारण बाळाजी विश्वनाथ यांची मुलगी व थोरल्या बाजीरावची बहिण अनुबाई हीचा विवाह इचलकरंजीच्या व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला होता. हे घोरपडे मुळचे जोशी. परंतु ते संताजी घोरपडेंच्या छत्रछायेखाली वाढले व त्यांना इचलकरंजी व अजरे ही गावे त्यांच्याकडून मिळाली होती. स्वामीवरील निष्ठा व प्रेमापोटी या घराण्याने जोशी हे आडनाव सोडून घोरपडे हे आडनाव धारण केले, असा इचलकरंजी संस्थानचा इतिहास आहे. त्यामुळे ब्राम्हण घोरपडे आधिपासूनच अस्तित्वात होते. आपण वर रचलेली कथा नेमकी कोणत्या पेशव्याच्या कारकीर्दीत घडून आली म्हणायची?
15 Apr 2019 - 4:22 pm | अभ्या..
ही रणवीरसिंग भवनानी पेशव्यांच्या काळात रचलेली आणि घडलेली कथा आहे.
15 Apr 2019 - 4:26 pm | श्वेता२४
रणवीरसिंग भवनानी
या ऐतिहासिक पात्राचे ज्ञान मज पामरास ज्ञान नसल्याने यापुढे पास.15 Apr 2019 - 7:42 pm | mrcoolguynice
15 Apr 2019 - 6:29 pm | सिरुसेरि
बॅन्ड बाजा बारात