समाधान कुठे सापडेल हो ?

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
30 Sep 2018 - 12:05 pm

समाधान कस कुठे सापडेल सांगता येत नाही राव. कधी ते निसर्गात सापडत तर कधी पार निर्मानुष्य नसलेल्या देवळात मिळत. हे समाधान खुप वेगळे असते. नाकात उदबत्ती धूप कर्पूर मिश्रीत सुगंध, डोळ्याला पार गाभारा भरून राहीलेली मूर्ती शितल, कानात येते वेळी वाजवलेल्या घंटेचा रेंगाळणारा नाद ब्रम्ह, मध्येच छेदणारा दूर कुठल्यातरी पक्षाच्या किलकिलाट अगदी अकृत्रिम, पायाला स्पर्शणारा दगडी फर्शीचा ठंड़ावा, जिभेवर कर्पूर मिश्रीत तीर्थाचा शिडकावा कान, डोळे, नाक, स्पर्श, चव सर्व एकाच वेळी सुखावतात. आणि तुम्हाला समाधानाचा शोध नव्याने लागतो

कधी बाजारातून जाउन किंवा घराच्या कुंडीत रोवलेली छानशी पालेभाजी आणावी, घरी आणून लगेच ती निवडावी, चिरावी, शिजवावी, गरम गरम भाता बरोबर ती पानावर घ्यावी आणि तिची चव जिभेवर पसरवावी. पुन्हा त्या भाजीचा खुडतानाचा स्पर्श, भाजी शीजताना येणारा गंध आणि तो मटमट आवाज आणि पुन्हा डोळे ठंड करणारा तो भाजीचा ओलावा आणि जिभेवर विरघळणारी ती चव आणि समाधानाचे वर्तुळ पुन्हा एकदा पूर्ण

हे इतक सगळ डीटेल मध्ये लिही णयाचे प्रयोजन इतकेच की समाधान आपल्या आत असते आणि आपण ते बाहेर शोधत रहातो. आपली पंचेन्द्रिय आपल्याला समाधानाचा अर्थ सांगू पहातात पण आपण तो अर्थ ऐकतही नाही आणि समजतही नाही. शेजारच्याने हुँदै आणली तर आपण टोयोटा आणली पाहीजे, एक बी एच के लहान पडतोय दोन बी एच के घ्या, परवडते आहे तर वीकेंड होम घ्या भले ते रीकामे राहूदया. महिन्द्रा हॉलीडेज ची मेम्बरशिप भरा, घराचे हप्ते भरण्यासाठी सोळा सतरा तास काम करा. जॉब स्वीच करा . पेपरवर तुमची नेट वर्थ वाढते खरी पण समाधान मात्र व्यर्थ जाते.

समाधान आपल्या आत असते पण आपण ते बाहेर शोधत रहातो. समाधान खुप महाग गोष्ट आहे सर्वाना परवड़तेच असे नाही

केदार अनंत साखरदांडे

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

खूप सुंदर लिहले आहे."तुझ आहे तुझ पाशी परी तु जागा चुकलाशी".

सुचिता१'s picture

1 Oct 2018 - 1:38 pm | सुचिता१

खुप मनापासुन लिहले आहे आणि मनाला भिडणारे !!

सतिष खांडे's picture

2 Oct 2018 - 7:13 am | सतिष खांडे

अगदी बरोबर आहे समाधान मानले तर ठीक आहे ते काही बाजारातून विकत घेता येत नाही

भाजी हा भाताबरोबर खाण्याचा पदार्थ आहे हे मला अजिबात मान्य नसल्याने फक्त स्वतःपुरता 'गरम गरम भाता बरोबर ' च्या ऐवजी 'गरम गरम पोळी बरोबर' असा सोयीस्कर बदल करून वाचले :)
छोटंसं पण खूप छान लिहिलंय, आवडलं...

उपयोजक's picture

4 Oct 2018 - 11:33 am | उपयोजक

लेख थोडा दवणीय आणि वास्तवापासून दूर नेऊ पाहणारा वाटला. 'Life is a race' हेच बहुसंख्य लोकांसाठीचं सत्य आहे.

धर्मराजमुटके's picture

4 Oct 2018 - 12:07 pm | धर्मराजमुटके

कदाचित हॉस्पीटलमधे. आमच्या ओळखीच्या एका जोडप्याला मुलगा झाल्यावर त्यांनी त्याचे नाव 'समाधान" ठेवले.

सुख है अलग और चैन अलग है
पर जो ये देखे वो नैन अलग है
चैन है तो अपना सुख है पराये

एक छायाचित्रकार's picture

5 Oct 2018 - 8:57 pm | एक छायाचित्रकार

छान लिहील॑ आहे. पण लेख सुरु झाल्याझाल्याच स॑पला.
खेड्यापाड्यातील लोक या बाबतीत तरी अजुन मोठ्या शहरातील लोका॑पेक्शा आहेत समाधानी.

भृशुंडी's picture

6 Oct 2018 - 1:23 am | भृशुंडी

हे खास मराठी समाधान आहे.
असं का पण?

आता जर कुणाला रोजचा वरण भात आणि भाजी गोड लागत असेल तर ते ठीके. उत्तम.
पण आम्हाला चिकन मन्चुरिअन आवडतं आणि शेजाऱ्याने ते खाल्लं तर आम्हालाही खावंसं वाटतं
ह्यात काय चूक?
उलट असंच असावं. खावंसं वाटलं तरच ते मिळवण्याचा प्रयत्न करणार ना? नाहीतर काय "आहे आपला वरण भात उत्तम, शिवाय पैसे वाचतात, आणि आरोग्यवर्धकही किती!" असं खोट्टं खोट्टं मनाचं समाधान करून घ्यायचं?
मग आपल्याला खरंच हे सगळं खरंच वाटायला लागतं .

त्यापेक्षा कचकावून पैशे कमवा.

..... असं मराठीतून कधी ऐकू येणारे?

आम्हाला जुन्या त्या सोन्या मराठमोळ्या जीवनाचा कंटाळा आला आहे. जग नवेनवे अनुभव घेतंय आणि आपण अजून "अंथरूण पाहूनच झोपता येईल की नाही ते ठरवतो. घ्या ना नवीन अंथरूण!