मित्रांनो,
थोड्याच दिवसात मी या पुस्तकाच्या काही प्रती तयार करणार आहे. कारण हे पुस्तक कोणी प्रकाशक छापेल असे मला वाटत नाही. कोणाला पाहिजे असेल तर अगोदर कळवले तर मी तेवढ्याच प्रती छापून घेईन. पुस्तक अॅमेझॉन कडून येईल. पुण्यातील मित्रांना प्रत्यक्ष भेटून व सही करून दिले जाईल. (पाहिजे असल्यास :-) ) कमी प्रती असल्यामुळे जरा महाग पडणार आहे पण त्याला नाईलाज आहे... ज्यांना हे पुस्तक पाहिजे आहे त्यांनी जर मला खाली किंवा खरडवहीत कळवले तर बरे होईल.
जे शेती करतात, किंवा ज्यांना निसर्गाचे वेड आहे, भटकण्याचे वेड आहे त्यांनी हे पुस्तक जरुर वाचावे..
नाव : वॉल्डन व हेन्री डेव्हिड थोरो यांचे चरित्र.
पाने : अंदाजे ४५०
किंमत : रुपये ५००/-
जे परदेशी आहेत त्यांच्यासाठी याच किमतीला किंडलवर पुढच्या महिन्यात मी ते उपलब्ध करेनच.
जयंत कुलकर्णी
जर प्रकाशक मिळाला तर त्याच्या किमतीला ते पुस्तक देण्यात येईल किंवा फरक परत करण्यात येईल
प्रतिक्रिया
29 Sep 2018 - 2:57 pm | टर्मीनेटर
मला हे पुस्तक हवे आहे.
29 Sep 2018 - 3:28 pm | जयंत कुलकर्णी
धन्यवाद !
मी प्रति हातात आल्यावर आपल्याला कळवेनच.