एका चेक इन ची चित्तारकथा

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
14 Aug 2018 - 11:45 pm

एका चेक इन ची चित्तारकथा

कालच गोव्यावरुन मुंबई वर हवाई प्रवास करण्याचा योग आला. येताना बरोबर ताज्या पाले भाज्या, फळ भाज्या, शेंग भाज्या, पाणशेंगा (गोव्यात ज्याला नुसत्ये असे म्हणतात आणि इथे मुंबईत मासे म्हणतात) नारळ, बिस्किट, चकली, शेव,लाडू, इत्यादी इत्यादी पदार्थ आणले. मासे बर्फ घालून व्यवस्थित पैक केले होते. विमान तळावर बैगेज स्क्रीन करण्या साठी टाकल. ऑफीसरने मत्स्य पेटी बाजूला काढली. हे गोवन लोक ( ज्यात मीही येतो) माश्यासाठी साले काहीही करतील.

पेटीत काय आहे?
मासे
आणि ?
मासे
आणि ?
मासे
आणिक कित्ये ?
बर्फ
सॉरी सर तुम्हाला मासे इथेच सोडून जावे लागतील
(मेल्याचा आमच्या माश्यावर डोळा होता तर)
पण का?
( आमच्ये नुसते आमका जाय , आमच्ये गोये आमका जाय च्या चालीवर मी ओरडलो)
आमच्या पॉलीसीत बसत नाही सर
( मग थोड़ा मागे जाऊँन फोनवर कुणाला तरी काहीतरी बोलला. नक्की नक्की बायकोला जाऊन मी मासे घेऊन येतोय तू मसाला वाटून ठेव म्हणाला असणार.)
"सर मी सीनीयरशी बोललो आहे. ऐज स्पेशल केस तुम्हाला मासे घेऊन जाता येईल. पण तुम्हाला बर्फ काढून टाकावा लागेल आणि .."
आणि काय
( अर्धा वाटा मागतो का काय मेला )
आम्हाला पेटी उघडावी लागेल
आत क़ुर्ल्या आहेत काय ?
( कनवेयर बेल्ट वर बसून एक एक कुर्ली पुढे सरकते आहे आणि त्या पकडण्या साठी इतर प्रवाशांची धावा धाव चालू आहे असे काहीस चित्र माझ्या डोळ्या समोर उभ राहील आणि हसू आल)
नाही
त्याने पेटी उघडली आणि मासे चेक केले
" सर जर तुम्ही बर्फ टाकलत तर आम्ही तुम्हाला स्पेशल केस म्हणून परवानगी देऊ शकतो"
मी निमूटपणे बर्फ काढले आणि बेसीन, यूरिनल मध्ये टाकू लागलो तेवढ्यात
" कित्ये करता रे पात्राव? म्हणुन एक क्लीनींग स्टाफ हजर झाला
" हंगा बर्फ उडावप ना. असे म्हणुन गेला
मला खुप राग आला. वाटले लहान पणी आम्ही करायचे तसे बरफाचे दोन तीन खड़े हळूच त्याच्या शरटात घुसवावेत
शेवटी बाहेर आलो
त्याने पेटी चेक करून परत स्क्रीन केली. आणि क्लीयर केली.
बायको म्हणाली शेवटी एक गोयकारच गोयकाराचे मत्स्य प्रेम समजू शकतो
पुढे लगेज चेक इन करताना परत मत्स्य पेटीची विचारपूस झाली
तिला स्क्रीनिंग चा शिकका दाखवला
"सर तुमच्या मुलीचे ओळख पत्र नाहीये का"
( ओ त्तेरी हे आता नवीन भानगड)
" आमच्या पॉलिसी मध्ये ओळख पत्र आवश्यक आहे. पण स्पेशल केस म्हणून तुम्हाला त्याशिवाय परवानगी देतेय. पुढच्या वेळी काळजी घ्या"
(आमची केस खूपच स्पेशल होती)
थेँकु
पुढे सीक्यूरिटीने मला लाकडावर उभ केले आणि हात पसरुन उभे राहायला सांगितले. मी सुद्धा शाहरुख़ सारखा दोन हात पसरून उभा राहीलो. त्यानेही मशीन फिरवून मला तपासला आणि ओके केला
पुढे बोर्डईंग केल्यावर सीट वर बसायाच्या आधी हवाई सुंदरी धावत आली
( आता येऊन म्हणेल आमच्या पॉलिसी मध्ये बसून प्रवास करण्याची परवानगी नाही तुम्हाला उभ्याने प्रवास करावा लागेल पण स्पेशल केस म्हणुन तुम्हाला बसून प्रवास करायची परवानगी देतेय)
"युर सीट नंबर सर"
तीन काही म्हणायची वाट न बघता आम्ही धाड़कन बसलो आणि कुर्सी की पेटी बांधूंन घेतली. बाकीचे यात्रीगण आमच्य कड़े बघत होते पण आम्ही काणा डोला केला
शेवट गोड होऊन आम्ही आमचे सामान आणी मत्स्य पेटी मुंबई ला पोहोचलो ( अच्छे लोगो के साथ हमेशा अच्छा ही होता हे)

(शेवटी कन्फेशन ह्या श्रावणात आम्ही मासे खाणार आहोत. कारण सांगणार नाही एक गोयकारच गोयकाराला समजू शकतो)

विनोदलेख

प्रतिक्रिया

डँबिस००७'s picture

15 Aug 2018 - 12:06 am | डँबिस००७

सही जमलय !!

पिशी अबोली's picture

15 Aug 2018 - 8:54 am | पिशी अबोली

मत्स्य! आपलं, मस्त!

बरें नुस्तें पेटयले दिसता घराकडेन मागीर.

मूखदूर्बळ's picture

15 Aug 2018 - 5:03 pm | मूखदूर्बळ

:)

नुस्तें व्हरच्या दिनाशिल्ले म्हळ्यार कितें? कमाल आसां!!
हाडलें मूं मागिर? कितें मेळले रे?

मूखदूर्बळ's picture

15 Aug 2018 - 12:08 pm | मूखदूर्बळ

हावे वेल्यो, बांगडुले, सुंगटा, पापलेटा हाडली

ट्रम्प's picture

15 Aug 2018 - 10:39 am | ट्रम्प

मजा आली , छान लिहिता .

चौथा कोनाडा's picture

15 Aug 2018 - 1:23 pm | चौथा कोनाडा

मस्त, झकास !

हे छोटं लेखन खुसखुशीत आवडलं !

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2018 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

कंजूस's picture

15 Aug 2018 - 4:39 pm | कंजूस

हे पुन्हा कोकणीत लिहा प्रतिसादात म्हणजे शिकता येईल.

फोटु?