रक्त त्या डोळ्यातले सांगा पुसावे मी कसे?

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
24 Apr 2018 - 5:29 pm

कोण अपुला कोण परका ओळखावे मी कसे?
काळजाचे प्रश्न अवघड समजवावे मी कसे?

कोरड्या रस्त्यात स्वप्नांचे विखुरले पंख कां,
जखम ओली, तप्त रुधिरा आवरावे मी कसे?

हासऱ्या त्या लेकराचे हरवले हसणे कुठे,
रक्त त्या डोळ्यातले सांगा पुसावे मी कसे?

ऐक वेड्या ओळखीचे चोर दिसती साजरे
या घडीला माणसांना पारखावे मी कसे ?

स्वार्थ सत्ता द्वेष मत्सर माणसांचे सोयरे
बंधुभावाचे नगारे वाजवावे मी कसे ?

शांतचित्ताने विशाला आळवावे राघवा
दांभिकांचे दंभ फुसके जोजवावे मी कसे?

© विशाल कुलकर्णी

मराठी गझलगझल

प्रतिक्रिया

एस's picture

24 Apr 2018 - 6:38 pm | एस

कविता आवडली.

हासऱ्या त्या लेकराचे हरवले हसणे कुठे,
रक्त त्या डोळ्यातले सांगा पुसावे मी कसे?

हे कडवे विशेष आवडले.

श्वेता२४'s picture

25 Apr 2018 - 12:29 pm | श्वेता२४

एस यांच्या अभिप्रायाशी सहमत. खुपच छान गुंफलीय कविता. अजुन वाचायला आवडेल. पुकप्र.