ताज्या घडामोडी - भाग २८

Primary tabs

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in राजकारण
23 Mar 2018 - 7:09 pm

राजकीय पक्षांना 1976 नंतर मिळालेल्या परदेशी देणग्यांची आता चौकशी होणार नाही. या संदर्भातल्या दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत कोणत्याही चर्चेविना बुधवारी मंजूर करण्यात आले.

भाजप सरकारने यापूर्वी वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. ज्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणं सोपं झालं होतं. पण 1976 पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही बुधवारी मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे. यासाठी FCRA कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या आहेत.

काय आहे FCRA कायदा?

लोकसभेत FCRA हा कायदा 1976 मध्ये मंजूर करण्यात आला होता. याअंतर्गत भारतातील आणि परदेशी कंपन्या ज्यांची नोंदणी परदेशात आहे, किंवा त्यांची सबसिडरी कंपनी परदेशात आहे. त्यांना परदेशी कंपन्या असं मानलं जातं.

अशी असेल FCRA ची नवी व्याख्या

पण सध्याच्या भाजप सरकारने वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी कंपन्यांची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याख्येनुसार, ज्या परदेशी कंपन्यांची 50 टक्क्यांपेक्षा कमी शेअरमध्ये गुंतवणूक आहे, त्यांना परदेशी कंपनी मानले जाणार नाही.

गेल्या आठवड्यात जे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर केलं गेलं. त्यापूर्वी 26 सप्टेंबर 2010 पूर्वी ज्या राजकीय पक्षांना परदेशी देणग्या मिळाल्या, त्यांची चौकशी केली जाऊ शकत होती.

दिल्ली हायकोर्टाचा भाजप-काँग्रेसवर नियम उल्लंघनाचा ठपका

पण वित्त विधेयक 2016 मधील 233 कलम मंजूर झाल्यानंतर, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातून दाखल याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टाने दोन्ही पक्षांवर परदेशी देणग्या स्विकारण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

यांना कोण पैसे देत आहे? कोणाच्या फायद्याचा अजेंडा राबवला जात आहे. निवडणूकी मधला प्रचंड पैसा कोणाचा असतो ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र भाजप की काँग्रेस भांडणार ! शेवटी गंगाधर हाच शक्तिमान आहे.

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

11 Apr 2018 - 3:25 pm | manguu@mail.com

५० वर्षे तिरंगा विसरलेले खुर्चीत बसले , मग काय होणार दुसरे ?

manguu@mail.com's picture

14 Apr 2018 - 7:07 am | manguu@mail.com

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी फक्त एक महिना राहिला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेत असणा-या काँग्रेस पक्षासहित, विरोधी पक्ष भाजपाही पुरेपूर प्रयत्न करत असून दोन्ही पक्ष विजय आपलाच होईल असा दावा करत आहेत. दरम्यान आजतकने ओपिनियन पोल जारी केला असून, यानुसार काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे. सर्व्हेनुसार, आज जर निवडणूक पार पडली तर २२५ सदस्यांच्या विधानसभेत सत्तेत असणारी काँग्रेस ९० ते १०१ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. दुसरीकडे भाजपाला मात्र ७८ ते ८६ जागांवरच समाधान मानावं लागले. जेडीएस युतीला ३४ ते ४३ जागा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

सध्याच्या घडीला कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे १२२, भाजपाचे ४३, जेडीएसचे २९ आणि इतर १४ आमदार असून १६ जागा रिक्त आहेत. हा सर्व्हे इंडिया टुडे ग्रुप आणि कार्वी इनसाइट्सने मिळून केला आहे. १७ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान एकूण २२४ विधानसभा मतदारसंघात हा सर्व्हे करण्यात आला. यावेळी एकूण २७ हजार ९१९ लोकांची मतं जाणून घेण्यात आली. सर्व्हेत ६२ टक्के ग्रामीण आणि शहरातील ३८ टक्के लोकांनी सहभाग घेतला.

manguu@mail.com's picture

14 Apr 2018 - 7:15 am | manguu@mail.com

सीधा रुपैय्या बेकु, नररुंड मोडी ब्याडा ..... कर्नाटका !!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 Apr 2018 - 6:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कॉंग्रेसचे ताकदवान नेते एस.एम.कृष्णा काही काळापूर्वीच भाजपामधे आले आहेत रे मंगू. आपणास हाय कमांड महत्व देत नसल्याने त्यांनी तो निर्णय घेतल्याचे समजते.

manguu@mail.com's picture

16 Apr 2018 - 9:01 pm | manguu@mail.com

हेच कारण असेल तर आग - फुफाटा , दगड-वीट वगैरे म्हणी त्याना लवकरच आठवतील असे वाटते.

manguu@mail.com's picture

16 Apr 2018 - 8:51 pm | manguu@mail.com

तुसी म्हणाले, मुघलांचे थेट वंशज या नात्याने मुघलांनी बांधलेल्या इमारतींच्या देखभालीसाठी मुत्तवलींची (ट्रस्टी) नेमणुक करावी यासाठी मी दाखल केलेली याचिका अद्यापही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या सर्व मालमत्ता मला भारत सरकारच्या स्वाधिन करायच्या आहेत.

ताजमहाल ही देशाची संपत्ती आहे. त्यामुळे त्यावरुन कोणालाही राजकारण करण्याचा अधिकार नाही; असे सांगताना तुसी म्हणाले, मी हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना शहाजहाँच्या उरुसासाठी (जत्रा) निमंत्रण देत आहे. हा उरुस येत्या रविवारी समाप्त होत आहे. यासाठी ३५ हजार लोक हजेरी लावणार आहेत. या उरुसाच्या शेवटच्या दिवशी शहाजहाँच्या कबरीवर १,१११ मिटर लांबीची सप्तरंगी चादर वाहण्यात येणार आहे.

------------------------------

https://www.loksatta.com/desh-videsh-news/taj-mahal-belongs-to-india-not...

----------------------------

पुरातन वास्तूना फाइव्ह स्टार हॉटेल करुन त्याला गोचिडागत चिकटलेले इतर राजवारस असे कधी करतील ?

manguu@mail.com's picture

16 Apr 2018 - 9:04 pm | manguu@mail.com

https://www.loksatta.com/desh-videsh-news/judge-who-gave-verdict-of-mecc...

असीमानंद प्रकरणात राजीनामा देवुन त्या जज्जनी लगेच राजीनामा दिला.

सलमान - हिट रन केसमध्येही ते जज्ज राजीनामा की रिटायर काहीतरी झाले होते ना?

जयन्त बा शिम्पि's picture

29 Jun 2018 - 1:52 pm | जयन्त बा शिम्पि

१६ एप्रिल २०१८ नंतर देशात काही घडलेच नाही कां ? " ये इतना सन्नाटा क्युं है भाई ? "

विशुमित's picture

29 Jun 2018 - 4:16 pm | विशुमित

तुमची गल्ली चुकली बहुतेक.
येथे शोरशराबा आहे.
https://www.misalpav.com/node/42805

मार्मिक गोडसे's picture

30 Jun 2018 - 10:48 am | मार्मिक गोडसे

देशातील कर चुकवून फक्त हवाला मार्गेच पैसा स्विस बँकेत जमा होतो, आणि तेथे जमा झालेला सर्व पैसा हा काळाच असतो, असा समज असलेल्या सर्वांचा हिरमोड अर्थमंत्र्यांनी केला.

https://www.businesstoday.in/current/economy-politics/all-deposits-in-sw...

इन्व्हेस्टमेंट म्हणतात हं बरं का ह्याला.☺