ताज्या घडामोडी - भाग २८

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in राजकारण
23 Mar 2018 - 7:09 pm

राजकीय पक्षांना 1976 नंतर मिळालेल्या परदेशी देणग्यांची आता चौकशी होणार नाही. या संदर्भातल्या दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत कोणत्याही चर्चेविना बुधवारी मंजूर करण्यात आले.

भाजप सरकारने यापूर्वी वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. ज्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणं सोपं झालं होतं. पण 1976 पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही बुधवारी मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे. यासाठी FCRA कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या आहेत.

काय आहे FCRA कायदा?

लोकसभेत FCRA हा कायदा 1976 मध्ये मंजूर करण्यात आला होता. याअंतर्गत भारतातील आणि परदेशी कंपन्या ज्यांची नोंदणी परदेशात आहे, किंवा त्यांची सबसिडरी कंपनी परदेशात आहे. त्यांना परदेशी कंपन्या असं मानलं जातं.

अशी असेल FCRA ची नवी व्याख्या

पण सध्याच्या भाजप सरकारने वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी कंपन्यांची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याख्येनुसार, ज्या परदेशी कंपन्यांची 50 टक्क्यांपेक्षा कमी शेअरमध्ये गुंतवणूक आहे, त्यांना परदेशी कंपनी मानले जाणार नाही.

गेल्या आठवड्यात जे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर केलं गेलं. त्यापूर्वी 26 सप्टेंबर 2010 पूर्वी ज्या राजकीय पक्षांना परदेशी देणग्या मिळाल्या, त्यांची चौकशी केली जाऊ शकत होती.

दिल्ली हायकोर्टाचा भाजप-काँग्रेसवर नियम उल्लंघनाचा ठपका

पण वित्त विधेयक 2016 मधील 233 कलम मंजूर झाल्यानंतर, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातून दाखल याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टाने दोन्ही पक्षांवर परदेशी देणग्या स्विकारण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

यांना कोण पैसे देत आहे? कोणाच्या फायद्याचा अजेंडा राबवला जात आहे. निवडणूकी मधला प्रचंड पैसा कोणाचा असतो ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र भाजप की काँग्रेस भांडणार ! शेवटी गंगाधर हाच शक्तिमान आहे.

प्रतिक्रिया

डँबिस००७'s picture

8 Apr 2018 - 10:47 pm | डँबिस००७

घर बांधायला दोन लाखांची सबसिडी द्यायची हे ह्यांच्या डोळ्यावर येतय पण स्वतः मात्र १५ लाखाच्या आशेवर रहायच !

manguu@mail.com's picture

9 Apr 2018 - 8:08 am | manguu@mail.com

आमच्या डोळ्यावर काहीच येत नाही.

पण अनुदान देवून जनता फुकटी होते , टॅक्स पेअरचे पैसे जातात वगैरे वगैरे इथे मिसळपावावर २०१४ पूर्वी अनेकदा वाचायला मिळत होते. हल्ली ते लोक असं लिहित नाहीत , हे नमूद करावेसे वाटले.

manguu@mail.com's picture

9 Apr 2018 - 8:03 am | manguu@mail.com

रामसेतू मानवनिर्मित होता की नैसर्गिक याचा शोध घेण्यासाठी भारतीय इतिहास संशोधन मंडळाने कुठलेही संशोधन करण्याचे ठरवलेले नाही किंवा त्यासाठी निधी देण्याचाही प्रस्ताव नाही असे परिषदेचे अध्यक्ष अरविंद जामखेडकर यांनी सांगितले.
मनुष्यबळ विकास खात्याने रामसेतूचा अभ्यास करण्यासाठी संशोधन प्रकल्पाची घोषणा केली होती त्याबाबत त्यांनी ही माहिती दिली. गेल्या मार्चमध्ये इतिहास संशोधन परिषदेने रामसेतू किंवा अ‍ॅडम्स ब्रीज नैसर्गिक की मानवनिर्मित यावर पाण्याखाली संशोधन करण्यासाठी प्रकल्प राबवणार असल्याचे म्हटले होते. त्यावर जामखेडकर यांनी सांगितले की, एका इतिहासकाराने अशा संशोधनाचा प्रस्ताव मांडला होता पण त्याला इतर सदस्यांनी पाठिंबा दिला नाही. आम्ही त्यावर कुठलाही अभ्यास प्रकल्प राबवणार नाही किंवा निधीही देण्याचा विचार नाही. उत्खनन किंवा तत्सम कामे ही इतिहासकारांची नसतात त्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग आहे. यात इतिहास संशोधन परिषद फार तर शिफारस करू शकते. याआधीचे अध्यक्ष वाय. सुदर्शन राव यांनी यात सैद्धांतिक प्रशिक्षण सुरू केले जाईल व नंतर शोध प्रकल्प राबवला जाईल. रामसेतू पथदर्शक प्रकल्प राबवला जाणार असून तो नैसर्गिक होता की मानवनिर्मित हे शोधले जाईल असे राव यांनी त्यावेळी म्हटले होते. भारतीय पुराणशास्त्रानुसार रामसेतू हा भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान असून तो रामाच्या वानरसेनेने श्रीलंकेत जाण्यासाठी बांधला होता.

डँबिस००७'s picture

9 Apr 2018 - 3:07 pm | डँबिस००७

मंगु काका,

रामसेतू मानवनिर्मित होता की नैसर्गिक याचा शोध घेण्याच कारण आता राहीलेल नाही कारण तो सेतु मानव निर्मितच होता हे आता निर्विवाद सिद्ध झालेल आहे.
१. http://www.dw.com/en/a-bridge-that-lord-ram-built-myth-or-reality/a-4179...
A bridge that Lord Ram built - myth or reality?
A US television show's promo claims that a scientific investigation into the structures forming Ram Setu, also called Adam's Bridge, suggests that the ancient Hindu myth of Lord Ram building such a bridge could be true.

The promo for an upcoming show, "Ancient Land Bridge," on Discovery Communications-owned Science Channel quotes American archaeologists saying that the 50-kilometer (30-mile) line between India and Sri Lanka was made up of rocks that are 7,000-years old while the sand on which they are sitting is only about 4,000-years old.

मार्मिक गोडसे's picture

9 Apr 2018 - 8:15 am | मार्मिक गोडसे

आता पुढे... रामच नव्हता,त्यामुळे राममंदिर इल्ले.

विशुमित's picture

9 Apr 2018 - 11:27 am | विशुमित

मला असे वाटते भारतात राम मंदिर फक्त काँग्रेस च्या सत्ता काळातच होऊ शकते. मी तर म्हणतो काँग्रेस जर पुढे सत्तेत आली तर पहिल्या १०० दिवसात राम मंदिर बांधायचे काम हात घ्यावे आणि या देशातील सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि आस्थेचा महत्वाचा प्रश्न मार्गी लावावा. मुबलक पोलिटिकल मायलेज मिळेल.
भाजपकडून हा प्रश्न सोडवला जाईल याची शक्यता कमी वाटते. कारण भाजपनं प्रयत्न केला तर त्याला विरोध देखील खूप होईल, दंगली भडकत राहतील आणि वेगवेगळे शिक्के बसतील ते वेगळेच.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2018 - 2:31 pm | श्रीगुरुजी

श्रीराम ही केवळ कवीकल्पना असून वास्तव नाही असे न्यायालयात शपथपत्र देणारे श्रीराम मंदीर कसे बांधणार? बांधूही शकतील कदाचित, कारण आता नूतन अध्यक्ष सदर्‍यावरून जानवे परीधान करणारे शिवभक्त आहेत म्हणे.

विशुमित's picture

9 Apr 2018 - 3:45 pm | विशुमित

कारण राम मंदिरासाठी बाबरी पाडली ती काँग्रेसच्या सत्ता काळातच. काँग्रेस ने मंदिर बांधून ते काम पूर्णत्वाला घेऊन जावे. भाजपला का म्हणून आयत्या पिठावर रेघोट्या मारून द्याव्यात?
मी तर म्हणतो काँग्रेसने हे नेक काम करावेच. भाजप ने अदृश्य हाताचं टेका दिला तर अतिउत्तम.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2018 - 5:02 pm | श्रीगुरुजी

कोणाच्याही काळात बांधले तरी हरकत नाही.

भाजपपेक्षा काँग्रेसला ते सोपे जाईल असे वाटते.

कारण राम मंदिरासाठी बाबरी पाडली ती काँग्रेसच्या सत्ता काळातच. काँग्रेस ने मंदिर बांधून ते काम पूर्णत्वाला घेऊन जावे. भाजपला का म्हणून आयत्या पिठावर रेघोट्या मारून द्याव्यात?

बाबरी मस्जिद पाडण्याचे श्रेय असणे आणि ते ही पुरोगाम्यांनी घेणे म्हणजे किती मोठा नतद्रष्टपणा आहे हे एक मिनिट बाजूला ठेऊ, पण ....
हे बघा,
शिवाजीने स्वराज्याचे तोरण बांधले ते मोगलांच्या सत्ता काळातच. मोगलांनीच ने भगवा फडकावून बांधून ते काम पूर्णत्वाला घेऊन जावे. शिवाजीला का म्हणून आयत्या पिठावर रेघोट्या मारून द्याव्यात?
हे लॉजिक कसं वाटतं?

भाजपकडून हा प्रश्न सोडवला जाईल याची शक्यता कमी वाटते. कारण भाजपनं प्रयत्न केला तर त्याला विरोध देखील खूप होईल, दंगली भडकत राहतील आणि वेगवेगळे शिक्के बसतील ते वेगळेच.

भाजपनं लोकसभेत बिल आणून मंदिर बांधलं तर दंगे वैगेरे तरीही म्हणता येऊ शकतं.
-----------------------------------------------
पण कोर्टानं योग्य तो न्याय द्यावा आणि दंगे करणारांस सरकारनं जेलमधे टाकावं.
राम रहिमचे दंगे करणारे लोक उडवले तसे उडवायचे मग निकाल रामाच्या बाजूनं येवो नैतर रहिमाच्या.
-----------------------------
परवा झालेल्या दलित आंदोलनाबाबत एक दलित विचारक आज टिवीवर म्हणत होते कि हे सरकार दलित विरोधी आहे. कारण? देशात अनेक ठिकाणी मिळून १०,००० दलित प्रदर्शनकार्‍यांना जेलमधे टाकले. असं कधीही इतिहासात झालं नव्हतं म्हणे.
---------------
खरं तर-
http://www.business-standard.com/article/current-affairs/lenin-periyar-i...
हे आंदोलन राजकीय इ इ असायला हवं. मोदी भाजप संघ इ इ चा राजकिय विरोध. पण ब्राह्मणांवर हल्ले? काय संबंध? का अटक करू नये अशा गुंडांना? हजारो काय लाखोनी अटक करायला पाहिजे अशा गुंडांना.
शिवाय यांनी दलित चळवळीचा अख्खा इतिहास मार्च २०१८ मधे बदनाम केला.
१. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हिंसक चळवळ झाली नाही.
२. कोणत्याही जातीचा द्वेष नव्हता.
३. देशद्रोह नव्हता.
४. विपर्यास नव्हता. (कायदा कँसल केला इ आवया)
५. हिंसेकडे कानाडोळा नव्हता (जो प्रकाश आंबेडकर करतात)
६. बिन्बुडाचे आरोप नव्हते.
================================================
सरकार कुणाचं आहे आणि कोणता पक्ष जिंकेल याचा विचार न करता कठोर निर्णय घेतले पाहिजेत.

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 11:18 am | बिटाकाका

ते नव्हं, अशा बातम्या सो कॉल्ड पुरोगाम्यांच्या नजरेत का बरं येत नसतील? दांभिकपणा सोडून अशा घटनांकडे गुन्हा म्हणून बघायला शिकणे खोट्या पुरोगाम्यांसाठी आवश्यक आहे असे मला वाटते.

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/upper-caste-man-kille...

मार्मिक गोडसे's picture

9 Apr 2018 - 12:05 pm | मार्मिक गोडसे

मृत्युचे कारण काहीही असो, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. मी पुरोगामी नाहिये, परंतू ह्या घटनेचा निषेध केला तर चालेल ना?

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 12:59 pm | बिटाकाका

नीट वाचलं कि आसं होत नाय बगा! पर्तिसाद "खोट्या" पुरोगाम्यांबद्दल हाय ओ! तुम्ही खोटे पुरोगामी नसाल तर ठोका कि निषेद बिन्धास्त!

विशुमित's picture

9 Apr 2018 - 12:25 pm | विशुमित

बिटाकाका कोणी कशाचा निषेद करावा किंवा नाही याचे सल्ले द्यायला, तुम्ही कधी पासून चालू केलेत ?
तुम्ही नाही आहात ना दांभिक, मग निषेद करायचा आणि मोकळे होयचे. प्रशासन त्याचे काम करत असते. ते नीट करत नसेल तर पुन्हा निषेद करायचा, आवाज उठवायचा. पुरोगाम्यांना सिलेटिव्ह अंधविरोध तुमच्या कडून अपेक्षित नव्हते. असो.
(हे एक ढोबळ निरीक्षण होते. कृपया याला वैयक्तिक हल्ला वगैरे वाटले असेल तर क्षमस्व.)
====

मार्मिक गोडसे's picture

9 Apr 2018 - 12:37 pm | मार्मिक गोडसे

नाय नाय, ह्याला वैयक्तीक हल्लाच म्हणतात. गपगुमान निषेध नोंदवा बरं.

सेलेटिव्ह तज्ज्ञ, विश्लेषक, तटस्थ, निःपक्ष, भक्त, समर्थक आणि प्रवक्त्यांचे गपगुमान ऐकून घेतले असते तर मिपावर आमचा बाजार कधीच उठला असता...!!

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 1:04 pm | बिटाकाका

+१००००००. त्या लिस्ट मध्ये गुलाम, चाटू, नास्तिक, आपटार्ड, पुरोगामी, खोटे पुरोगामी आन अजून अनके जण ऍड करतो.

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 12:57 pm | बिटाकाका

वरील पर्तिसादतील नेमकं काय खुपलं ते कळलं नाय बगा! जेव्हा दलित विरुद्ध सवर्ण गुन्हा घडतो तेव्हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा बातम्या वापरणारे लै हायती बगा! जरा आजूबाजूच्या धाग्यावरच बगा, घोड्यावरून फिरू देत नाही म्हणे हा देश दलितांना वगैरे मुक्ताफळे चालतात. त्यास्नी उद्देशून असणारा पर्तिसाद तुम्हाला का टोचला आसल बरं? तिथे हा उपदेशाचा डोस द्यावा वाटलं नाही का? का आयडी टोचतोय?
****************************
आन मालक तुमास्नी आदीबी सुचवून झालंय कि तुमास्नी काय खरडायचंय ते तुमि बगा, माजं मी बगतु, कसं? मुद्द्यांवर बोलत चला, बरं असतं चर्चेला! नुसता ढिस्क्लेमर टाकून कायबी होत नसतं बगा!

<<<जेव्हा दलित विरुद्ध सवर्ण गुन्हा घडतो तेव्हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा बातम्या वापरणारे लै हायती बगा!>>>
==>> त्यांनी केले म्हणून आता तुम्ही पण तेढ निर्माण करणार का ?
भिमाकोरेगावला तेढ निर्माण होण्याचा पेच झाला होता हे विसरू नका. दोन्ही समाजाने समंजसपणा दाखवला म्हणून पुढील हानी टळली.
=====
<<<घोड्यावरून फिरू देत नाही म्हणे हा देश दलितांना वगैरे मुक्ताफळे चालतात.>>>
==>> तुमच्या कोषातून जरा बाहेर या. खूप उदाहरणे सापडतील.
<<< तिथे हा उपदेशाचा डोस द्यावा वाटलं नाही का?>>
==>> हे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या कडे आहे.
<<<आन मालक तुमास्नी आदीबी सुचवून झालंय कि तुमास्नी काय खरडायचंय ते तुमि बगा, माजं मी बगतु, कसं? मुद्द्यांवर बोलत चला, बरं असतं चर्चेला! नुसता ढिस्क्लेमर टाकून कायबी होत नसतं बगा!>>>
==>> बेकार हसलो.

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 1:18 pm | बिटाकाका

असेच हसत राहा, हसण्यासाठी लै लै शुभेच्छा!
------------------------------------------
मी गुन्हा म्हणून बघा म्हणून सांगतोय आन तुमी मी तेढ निर्माण करण्यासाठी टाकतोय म्हणताय. लै मंजी लैच पूर्वग्रह. नवा आयडी घ्यावा म्हणतोय.

विशुमित's picture

9 Apr 2018 - 3:03 pm | विशुमित

शुभेच्छे साठी धन्यवाद...!!
======
<<<मी गुन्हा म्हणून बघा म्हणून सांगतोय >>
==> असे होय. मग ते पुरोगामी वगैरे कुठून आले. का माझा गैरसमज झाला तुमचे म्हणणे समजून घेण्यात.
<<< लै मंजी लैच पूर्वग्रह>>>
==>> माझा तरी सहसा नसतो. प्रतिसाद स्पेसिफिक प्रतिवाद करण्याचा नेहमी प्रयत्न असतो.
<<< नवा आयडी घ्यावा म्हणतोय.>>>
==>> त्याने काही फरक पडेल असे वाटत नाही.

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 3:11 pm | बिटाकाका

मग ते पुरोगामी वगैरे कुठून आले.

परत प्रतिसाद वाचा. प्रत्येक गुन्ह्यात व्हिक्टीम दलित असला कि आगा-पिछा न बघता कांगावा सुरु करणाऱ्या खोट्या पुरोगाम्यांबद्दल चाललंय. अशाने खऱ्या दलित अत्याचाराकडे पण राजकारणाच्या दृष्टीने बघण्याची वृत्ती वाढीस लागतेय.

माझा तरी सहसा नसतो. प्रतिसाद स्पेसिफिक प्रतिवाद करण्याचा नेहमी प्रयत्न असतो.

यावेळेस तरी तसे दिसत नाही. मी अशा घटनांकडे गुन्हा म्हणून बघा असे स्पेसिफिकली सांगत असताना जाणीवपूर्वक "तेढ" वगैरेचा उल्लेख योग्य नव्हता असे नम्रपणे नमूद करतो.

त्याने काही फरक पडेल असे वाटत नाही.

तेही बरोबरच आहे म्हणा ;);)

भिमाकोरेगावला तेढ निर्माण होण्याचा पेच झाला होता हे विसरू नका. दोन्ही समाजाने समंजसपणा दाखवला म्हणून पुढील हानी टळली.

असले पेच करणारा समाजांनी देश वाटून घ्यावा नि सवतं राहावं. उगंच रोज पेच, रोज समंजसपणा काय कामाचा? ज्या जातींचे एकमेकांबद्दल इतके पराकोटीचे गैरसमज आहेत, द्वेष आहेत त्या एका देशाच्या असूच शकत नाहीत. हे सगळं कधी ना कधी पुन्हा उफाळणार.

आपला देशच विविधतेने नटलेला आहे. छोटे मोठे पेच हे निर्माण होणारच, म्हणून काय वेवेगवेगळे देश करत बसणार काय?
====
दोन भावांची भांडणे असती तर ठीक होते. इथे सतराशे साठ जाती धर्म आहेत. पडत का तुकडे ?
====
महत्वाचं मुद्दा म्हणजे हा द्वेष पसरवला कोणी, ते अजून मोकाटच कसे ? (आताशी एकबोट सापडले आहे, अखे धड कधी सापडणार ?)

आपला देशच विविधतेने नटलेला आहे. छोटे मोठे पेच हे निर्माण होणारच, म्हणून काय वेवेगवेगळे देश करत बसणार काय?

पेच वेगळा आणि द्वेष वेगळा. लोकशाहि पद्धतीनं निवडून आलेलं सरकार अमान्य असणं काही वेगळंच सांगतं. आणि हे द्वेष्टे बोटावर मोजावेत इतके नाहीत. हे करोडो आहेत.
-----------------------------------------

दोन भावांची भांडणे असती तर ठीक होते. इथे सतराशे साठ जाती धर्म आहेत. पडत का तुकडे ?

तुकडे पडल्याने इथल्या लोकांना फरक पडत नाही. पडू द्या. भारतीय संस्कृती वा तत्सम संस्कृती असलेला भूभाग इराण - अफगाणीस्तान - तिबेट - म्यानमार - सिंगापोर - इंडोनेशिया - श्रीलंका इतक्या मोठ्या भागात होता. आता मूळ भारतात देखील त्याला कोणी धड बाप नाही. ह्या नव्या तुकड्यांची ही देशाला सवय होईल. १९४७ मधे देखील किमान काश्मिर जिंकून घेणं कोणाला महत्त्वाचं वाटलं नाही. दहा लाख लोक मेले त्याचा कोणाला गम नव्हता. एका गांधीजींच्या हत्यार्‍याला सजा देऊन सर्वांचा आत्मा संतोष पावला. आजही नुसतं अखंड म्हटलं कि फिदिफिदि करणारी मंडळी आहेत.
--------------------------
एका लोकशाहीतल्या कोणत्याही दोन राजकीय पक्षांत सर्व विषयांवर ९०% मतसमानता आणि १०% मतांतर असते. आपल्या देशात ९०% मतांतरच नव्हे, विद्वेष आहे.
आणि देशात एकही नेतृत्व इतकं प्रभावशील नाही कि सर्व समाज एकत्र बांधून ठेवेल. मंजे तिथेही बॅडलक.

manguu@mail.com's picture

10 Apr 2018 - 4:52 am | manguu@mail.com

१९४७ मधे देखील किमान काश्मिर जिंकून घेणं कोणाला महत्त्वाचं वाटलं नाही

नेहरु आमचे तर बिचारे कुचकामीच होते.

पण हिंदुत्ववादी , संघवाले हेही फक्त पुस्तके लिहिणे , कवने लिहिणे आणि लाठ्या फिरवणे इतकेच करत बसले. स्वयंसेवकाना तेंव्हाच दिली असती ऑर्डर तर पाकिस्तानच काय ब्रिटनसुद्धा जिंकला असता !

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2018 - 8:13 am | श्रीगुरुजी

स्वयंसेवक लांबची गोष्ट आहे. परकीयांच्या ओंजळीने पाणी पिऊन युद्ध न करता संयुक्त राष्ट्रसंघात जाऊन काश्मिर प्रश्नाचा विचका करून एक कायमस्वरूपी पाचर मारून घेण्याऐवजी आहे ते सैन्य वापरून युद्ध केले असते तर काश्मिरचा भूभाग गमवायला लागला नसता.

manguu@mail.com's picture

10 Apr 2018 - 9:00 am | manguu@mail.com

आता गांधीजींचे आदर्श न् मानता गोडसेंना आदर्श मानणारे लोक प्रबळ झाले आहेत.

नमोनी कसली तरी विमाने घेतली आहेत.

संघ तयारीत आहेच.

उडवून द्या बार आता. नेहरुंची किती लफडी होती आणि आमचे नमो कसे संसारसुखपरांमुख आहेत , अशा भाकड व्हाट्सपी तुलना करण्यापेक्षा नेहरुनी पाकिस्तान प्रश्न वाढवला व नमोनी सोडवला असे कायतरी करा आता.

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2018 - 9:06 am | श्रीगुरुजी

जाऊ द्या. हा विषय तुमच्या आवाक्याबाहेरचा आहे.

बिटाकाका's picture

10 Apr 2018 - 10:08 am | बिटाकाका

प्रश्न वाढलाय हे तरी मान्य आहे का पण?

विशुमित's picture

10 Apr 2018 - 12:41 pm | विशुमित

कुठलं काय ते काहीही करत नसत्यात. १०० दिवसात ३७० रद्ध होणार होता. नुसता वाफा.
===
तसे ही तुम्हाला काही विषय कळत नाही ते एक बरे आहे.

बिटाकाका's picture

10 Apr 2018 - 1:05 pm | बिटाकाका

१०० दिवसात ३७० रद्ध होणार होता.

कृपया याचा संदर्भ देता का? म्हणजे ठरवता येईल नुसत्या वाफा कि नुसता द्वेष.

आता गांधीजींचे आदर्श न् मानता गोडसेंना आदर्श मानणारे लोक प्रबळ झाले आहेत.

यात चूक आहे?
गांधी भारताला खूप महाग पडला.
आणि गोडसेचं राजकीय चिंतन गांधीपेक्षा उच्च आहेच.

स्वयंसेवकाना तेंव्हाच दिली असती ऑर्डर तर पाकिस्तानच काय ब्रिटनसुद्धा जिंकला असता !

शेवटी काय ठरलं?? ६ डिसेंबरला स्वयंसेवक होते का नव्हते?

manguu@mail.com's picture

9 Apr 2018 - 1:29 pm | manguu@mail.com

ब्रिटनच्या राजघराण्याच्या वंशज राणी एलिझाबेथ द्वितीय या इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांचे थेट वंशज असल्याचा खळबळजनक दावा एका विदेशी इतिहासतज्ज्ञाने केलेल्या अभ्यास करण्यात आला आहे.

एका मोरोक्कन वृत्तपत्रात मार्च महिन्यांत प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, सेव्हिलीचे अरब राजे यांनी स्पेनवर राज्य केले होते. हे मुस्लिम राजे प्रेषित मोहम्मद यांच्या कन्या फातिमा यांचे वंशज आहेत. त्यानंतर या राजांच्यामार्फत ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ या थेट प्रेषित मोहम्मद यांच्या ४३व्या वंशज असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/queen-of-england-direct-descen...

डँबिस००७'s picture

9 Apr 2018 - 3:22 pm | डँबिस००७

चल्ला म्हणजे लाडु वाटायला मोकळे !!

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 4:59 pm | बिटाकाका
विशुमित's picture

9 Apr 2018 - 5:47 pm | विशुमित

अरे वाह... जमायला लागले की शोधून शोधून सिलेक्टिव्ह अंधविरोध करायला.
===
बातमीनुसार हे लाक्षणिक उपोषण होते, जे १०.३० वाजता सुरु होणार होते. नेत्यांनी नाश्ता ८ वाजता केला होता.
===
बाय द वे मला सोमवार चा उपवास असतो. संध्याकाळी तो सोडल्यावर कधी कधी मला रात्री भूक लागते. १२ नंतर मी पुन्हा एकदा जेवणावर ताव मारतो. देव त्यासाठी अजून तरी रागावला नाही आहे.

आवरा, तुमच्या पूर्वग्रहामुळे तुम्ही कैच्या कै बोलायला (स्वारी लिहायला) लागले आहात.
*********************************
मी त्यांच्या खाण्यावर काही बोललो का?
*********************************
उपवास आणि उपोषण यातील फरक कळत असेल अशी अपेक्षा आहे.
*********************************
मी आज १०:३० ते ४:३० उपोषणाला बसणार आहे म्हणायचं आणि भरपेट खाऊन उपोषणाला बसायचं हि प्रतिमा घरी खाऊन येऊन टाळता आली असती एवढं पण कळत नाहीये काँग्रेसच्या नेत्यांना या अर्थाने ते अवघड आहे होतं. अर्थात तुम्हाला हे इस्कटून सांगायची काहीच गरज नाहीये कारण यावरही काहीतरी उकरून काढता येणे शक्यच आहे, त्यामुळे परत....शुभेच्छा!

तुम्ही अर्धवट लिहता आणि परत स्पष्टीकरण देत बसता.
====
आम्ही तर मागे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पूर्वीच चकचक असणाऱ्या एरियात हिरव्या पानांवर झाडू मारताना पाहिले आहे. त्यात काय विशेष नाही आहे.

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 6:22 pm | बिटाकाका

खरंच आवरा! मी लिहिलेले प्रतिसाद फक्त तुमच्यासाठी आहेत या भ्रमातून बाहेर पडा. एखादी गोष्ट समजली नाही तर आधी विचारावी असं म्हणतात, बरं असतं!
**************************************
एवढं पर्सनली लावून का घेत आहात ती बातमी? मारले असतील स्वच्छ जागेवर झाडू कोणीतरी दिखावेगिरी करणार्याने, त्याचा इथे काय संबंध? काँग्रेसच्या लोकांच्या कृतीला भाजपच्या लोकांच्या कृतीचे समर्थन कशाला? भाजपाला तेव्हा शिव्या घालायच्या, आता काँग्रेसला, हाय काय नाय काय!

मार्मिक गोडसे's picture

9 Apr 2018 - 6:36 pm | मार्मिक गोडसे

मी आज १०:३० ते ४:३० उपोषणाला बसणार आहे म्हणायचं आणि भरपेट खाऊन उपोषणाला बसायचं हि प्रतिमा घरी खाऊन येऊन टाळता आली असती एवढं पण कळत नाहीये काँग्रेसच्या नेत्यांना या अर्थाने ते अवघड आहे होतं.

पारदर्शक कारभार आहे त्यांचा.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2018 - 7:54 pm | श्रीगुरुजी

मी आज १०:३० ते ४:३० उपोषणाला बसणार आहे म्हणायचं आणि भरपेट खाऊन उपोषणाला बसायचं हि प्रतिमा घरी खाऊन येऊन टाळता आली असती एवढं पण कळत नाहीये काँग्रेसच्या नेत्यांना या अर्थाने ते अवघड आहे होतं. अर्थात तुम्हाला हे इस्कटून सांगायची काहीच गरज नाहीये कारण यावरही काहीतरी उकरून काढता येणे शक्यच आहे, त्यामुळे परत....शुभेच्छा!

जानवेधारी शिवभक्त युवराज तब्बल ६ तास प्राणांतिक उपोषण करणार होते. उपोषण १०:३० ला सुरू होणार होते, तरीसुद्धा ते १ वाजण्याच्या आसपास अवतरले. येण्यापूर्वी भरपेट न्याहारी/ब्रंच/भोजन झाले होते. फार्सिंग साईट, आय मीन फास्टिंग साईटच्या, ठिकाणी १ नंतर आल्यावर त्यांनी मस्तपैकी ताणून दिली असावी व झोपेतच रालोआच्या दलितविरोधी धोरणांचा जोरदार प्रतीकात्मक निषेध केला असावा.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2018 - 8:31 pm | श्रीगुरुजी

अण्णा हजारेंचे उपोषण म्हणजे कसोटी सामना असतो, तर छोटा भीमचे उपोषण म्हणजे ट-२० सामन्यातील सुपर ओव्हर असते.

भाजपेही उपोषण करणार आहेत म्हणे. विरोधी पक्षाने काम करु दिले नाही म्हणून.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Apr 2018 - 12:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उकाड्याचे दिवस. खाण्यापेक्षा फळांचे रस, लिंबू सरबत ह्यावर राजकारण्यांच्या भर दिसतो.

manguu@mail.com's picture

11 Apr 2018 - 7:18 am | manguu@mail.com

https://www.news18.com/news/india/saffron-br-ambedkar-statue-in-ups-bada...

Lucknow: The saffron coloured coat on the statue of Dr BR Ambedkar, which was unveiled in Badaun district of Uttar Pradesh, has been painted back to its original Blue colour.

Am

ध्वजामधल्या चार रंगांमधे चांगलंच जुंपलेलं दिसत आहे.