सौर उर्जा आणि काही शंका

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
31 Jan 2018 - 8:49 am

फार वर्षापुर्वी रेवा नावाची विजेवर चालणारी गाडी बाजारात आली होती.

<टाइम प्लीज>
ज्यांना पॉपकॉर्न खाऊन घाण करायची आहे त्यांनी
https://www.misalpav.com/node/41559
इथे व्यक्त व्हावे.
</टाइम प्लीज>

फार वर्षापुर्वी रेवा नावाची विजेवर चालणारी गाडी बाजारात आली होती. वापरण्यापूर्वी काही तास ती चार्ज करावी लागते. गाडी विजेवर असल्याने प्रदूषण करत नाही याचे वापरणार्‍याला समाधान वाटते. परंतु आपल्याकडे जी वीज तयार होते, ती बहुतेकदा औष्णिक वीज असते. त्यासाठी चंद्रपूर भागामधे औष्णिक केंद्रांत खूप मोठ्या प्रमाणावर दगडी कोळसा जाळावा लागतो. म्हणजे प्रदूषण बाकी कुठे नसले तरी चंद्रपूरमधे होतच असते. एका आकडेवारीनुसार आपल्याकडे फक्त तेरा टक्के वीज हायड्रो पॉवर प्रोजेक्टमधे तयार होते. मग ही गाडी प्रदूषणमूक्त कशी !
या कंपनीला रेवा ही गाडी झेपेना. कंपनीने ही गाडी महिंद्राला विकून टाकली.
ashutoshjog@yahoo.com
महिंद्राने देखील त्याची प्रदूषणमुक्त अशी जाहिरात करायला सुरुवात केली. ही गाडी विजेवर काही तास चार्ज केल्यानंतर शंभर किलोमीटर अंतर धावू शकते.

पण या मुळे विजेचे बिल प्रचंड प्रमाणात वाढते. ते पाच-सहा हजारापर्यंत जाऊ शकते, त्याहूनही अधिक असण्याची शक्यता आहे. पण यावरही आपल्या व्यवस्थेने काही उपाय सांगून ठेवलेले आहेत. आजकाल अपारंपरिक ऊर्जा हा शब्द चर्चेत आहे. सरकारी पातळीवरून त्याची मोठ्या प्रमाणावर जाहिरात सुरु असते. त्याचे फायदे लोकांपर्यंत पोचवले जातात.

म्हणजे ग्राहकाने स्वतःच वीज निर्माण करणारे एखादे सोलर प्रोजेक्ट उभे करायचे. त्यासाठी सरकार काही प्रमाणात अनुदान देते. त्यातून तयार होणारी वीज विज महामंडळाला पुरवायची. महामंडळ त्याचा परतावा देते. हा परतावा क्रेडिटच्या स्वरूपात असतो. दर महीन्याचे वीज बिल तेवढे कमी होते.

एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेमधे रूपांतर होताना काही ऊर्जा खर्ची पडते. आऊटपूट नेहमीच इनपुटपेक्षा कमी असते. त्यामुळे कुठलीही ऊर्जा आहे त्याच स्वरूपामधे वापरणे फायदेशीर. रूपांतर करताना काही ऊर्जा खर्च होते.

दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पाच ते सहा हजार इतके विजेचे बिल येते तेव्हा तेवढी वीज निर्माण करण्यासाठी खूप मोठे सोलर प्रोजेक्ट उभारावे लागते. त्यासाठी मोठी जागा लागते. शेतजमीन असेल तर हे शक्य होते. शहरांमधे हे सहसा अवघड असते. अशी सोलर प्रोजेक्ट्स उभारण्याचा खर्च सहा-सात लाखांपर्यंत जातो. झालेला खर्च भरून निघायला आठ नऊ वर्षे तरी नक्की लागतात. (७ लाख / ५००० = १४० महीने). मधल्या काळात मेंटेनन्स, दुरुस्तीचाही खर्च येतो. अनेक बिल्डर याबाबतच्या यशोगाथा, सक्सेस स्टोरीज सांगत असतात. परंतु याचे निगेटिव पैलू फारसे कोणी सांगत नाही.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची सरकार एवढी जाहिरात का करते ? एखाद्या गोष्टीमधून ग्राहकालाच जर फायदा मिळणार असेल तर त्यासाठी सरकार अनुदान का देते ? जनतेच्या हिताची सरकारला एवढी काळजी का असते ?

किंबहुना सरकारी पातळीवरून एखाद्या गोष्टीची फार मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी सुरू झाली की त्या गोष्टीबद्दल शंका यायला सुरुवात होते. अशावेळी सरकारला खरोखरच जनतेचे हित जपायचे असते की त्या वस्तू विकणार्‍या कंत्राटदारांचे हित जपायचे असते हा एक भाबडा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

तज्ञांनी आणि अनुभव घेतलेल्यांनी याबाबत कृपया मार्गदर्शन करावे !

ashutoshjog@yahoo.com

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

प्रदर्शनातल्या स्टॅालवरून, दहा हजार सबसिडी मिळते म्हणून कोकणात ( वाडीत) सोलर पॅनेल लावून घेतले होते पन्नास हजारांचे काहींनी. - १) मळभ येणे, नारळाच्या झावळ्यांची सावलीने वीज पुरेशी होत नाही. २) बॅटय्रा उतरतात. महाग आहेत.

* शेती असणाय्रांना सोपे हा मुद्दा खोटा आहे. सेलसच्याखाली झाडे कशी वाढणार. झाडे ही स्वत:च सोलर सेल असतात. वांझ खडकाळ जमीनीवर ठीक आहे.

* वाय्राच्या विजेवर जर्मनी यशस्वी झाली आहे. न्युक्लिअर संयत्र जपानमधल्या फुकुशिमा घटनेनंतर निर्णय घेऊन काढून टाकण्यत यशस्वी.

*सोलर सेलसाठीचे रेअर अर्थ मेटल्स खाणी चीनकडेच आहेत.
* अभयारण्यातली वाहने इलेक्ट्रीकच हवीत. आवाज आणि धूर नसणारी.

मार्मिक गोडसे's picture

31 Jan 2018 - 4:37 pm | मार्मिक गोडसे

१) मळभ येणे, नारळाच्या झावळ्यांची सावलीने वीज पुरेशी होत नाही.
हे तर आहेच. अर्धवट सावली पॅनलचे आयुष्यही कमी करते. बायपास डायोड ठराविक मर्यादे पर्यंतच काम करतो.
२) बॅटय्रा उतरतात. महाग आहेत.
ऑफ ग्रीड सोलर सिस्टम महाग पडते. अखंडित वीजपुरवठा असलेल्या ठिकाणी बॅटरी वापरु नये. नेट मीटर वापरावे.
शेतीचे सोलर पंप अतिशय महाग असतात. हे पंप DC वर चालतात, लाखात किमती असतात.

आनन्दा's picture

31 Jan 2018 - 11:47 am | आनन्दा

वाखु केला आहे..
ही चर्चा उद्बोधक ठरावी

मराठी_माणूस's picture

31 Jan 2018 - 1:01 pm | मराठी_माणूस

आजच्या लोकसत्तेत आलेला ह्याच विषयावरचा लेख
https://www.loksatta.com/virodh-vikas-vaad-news/sources-of-energy-non-co...

आशु जोग's picture

1 Feb 2018 - 8:33 am | आशु जोग

समजायला अवघड लेख

'जैतापूरचे अणुमंथन' या पुस्तकात विविध ऊर्जास्रोतांविषयी बराच ऊहापोह आहे. जिज्ञासूंनी आकडेवारीनिशी दिलेली जगभरातील पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जाप्रकल्प व ततसंबंधी माहिती जरूर वाचावी.

सौरऊर्जा हा ऊर्जेचा सध्याचा सर्वात शाश्वत पर्याय जरी असला, तरी सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची स्वतःची ऊर्जास्वाक्षरी (Energy signature) ही त्यातून दीर्घकाल मिळू शकणाऱ्या परताव्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. असे प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सौरऊर्जा साठविण्याची यंत्रणा ही जास्तीत जास्त कार्यक्षम बनवणे आवश्यक आहे.

आशु जोग's picture

2 Feb 2018 - 12:11 pm | आशु जोग

हे पुस्तक नक्कीच वाचेन

मार्मिक गोडसे's picture

31 Jan 2018 - 3:35 pm | मार्मिक गोडसे

चीन व मलेशियातील सोलर पॅनल वर अँटी डंपिंग ड्युटी व सोलर पॅनलवरील सबसिडीचा घोळ ह्यामुळे सामान्य ग्राहक सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे. गेल्या दीड दोन वर्षात सोलर पॅनलच्या किमती निम्म्याने स्वस्त झाल्या असताना परदेशी सोलर पॅनल अँटी डंपिंग ड्युटी मुळे महाग होण्याची शक्यता आहे. एकतर भारतात दर्जेदार सोलर पॅनल तयार होत नाहीत आणि मागणीच्या प्रमाणात उत्पन्न करण्याची ह्या उद्योगाची क्षमताही नाही.

मुक्त विहारि's picture

31 Jan 2018 - 4:00 pm | मुक्त विहारि

मान्यवरांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.

कपिलमुनी's picture

31 Jan 2018 - 5:27 pm | कपिलमुनी

महिन्द्राच्या अधिकृत वेब साईट वरून मिळालेली माहिती
https://www.mahindrae2oplus.com/pages/buyers-guide/faqs

It takes 11.5 units of electricity for a full charge for e2oPlus 48V and 16.5 units for the e2oPlus 72V.
Assuming that the cost of electricity is Rs. 6 per unit, you will pay Rs 66/Rs99 for a full charge (110kms/140kms). This means you pay just Rs. 0.70 per km!

१००० किमी चालवल्यास ७०० -८०० बिल येइल , त्यामुळे विद्युत कार वापरून ५- ६ हजार बिल येइल ही भिती निराधार आहे . बाकी सोलरचे डिस्कशन उत्तम चालू आहे .

आमच्या सोसायटीत सोलर सिस्टीम बसवायचे चाललेय. आम्हाला वाटले की आता महावितरणची पॉवर गेली तरी प्रॉब्लेम नाही. डिझेल जनरेटर चालु करायची गरज नाही.
सिस्टीम एस्टीमेट देणार्‍याने क्लीअर केले की जी काही एलेक्ट्रीसिटी तुम्ही सोलार पॅनेलमधून उत्पादीत कराल, ती महावितरणच्या ग्रिडला जोडायला लागते. म्हणजे तुम्ही ती महावितरणला देता आणि महवितरण ती तुम्हाला पुरवते. थोडक्यात मेन्टेनन्स किंवा लोड शेडींगसाठी महावितरणने पुरवठा खंडीत केला तर लिफ्ट, पंप चालवण्यासाठी डिझेल जनरेटर चालु ठेवावाच लागेल. म्हणजे तो खर्च काही वाचणार नाही.

धर्मराजमुटके's picture

31 Jan 2018 - 6:55 pm | धर्मराजमुटके

सोलार हा भविष्यात फायदेशीर ठरणारा व्यवसाय असणार आहे त्यामुळे मी सध्या त्या दृष्टीने अभ्यास करत आहे. मला वाटतेय की तुमच्या सोसायटीला एस्टीमेट देणार्‍याचे किंवा तुमचे मांडणी करण्यात काही तरी चुक असण्याची शक्यता आहे. मुळात तुमची सोसायटी किती मोठी आहे ? तुम्ही सरप्लस वीज उत्पन्न करणार आहात काय जी महावितरणला द्यावी लागेल.
दोन पर्याय आहेत.
१. अधिक वीज उत्पन्न होणार असेल तर अधीकच्या बॅटरीज जोडून ती साठवता येईल.
२. मुळातच वीज कमी उत्पन्न करणे. म्हणजे सोसायटीचा कॉमन पॅसेज, पंप चालविता येईल इतकीच वीज उत्पन्न करणे. साधारण एका सोसायटीत पाण्याचे दोन पंप, २०-२५ ट्युबलाईट आणी दोन लिफ्ट अशी आकडेवारी धरली तर दरमहा विजेचा खर्च २०-२५ हजाराच्या आसपास जातो. त्या हिशोबाने प्रोजेक्टचा खर्च किती वर्षात वसूल होते हे बघणे पण गरजेचे आहे.
प्रायोगिक तत्वावर अगदी सोसायटीच्या कॉमन पॅसेजमधील दिवेच सोलारवर ठेऊन एक दोन वर्षे अंदाज घेऊन मग मोठा प्रोजेक्ट करण्यास हरकत नाही. महावितरणच्या ग्रीड ला जोडणे वगैरे भानगडीत तांत्रिक आणि कागदोपत्री बर्‍याच भानगडी आहेत.
कोणीही एस्टीमेट देणारा सोलार सबसिडीच्या गप्पा ठोकत असेल तर सावधान राहणे गरजेचे आहे. सबसिडी द्यायचा सरकारी क्रम ठरलेला आहे. उदा. सरकारी कार्यालये, शाळा, हॉस्पीटल्स वगैरे (क्रम थोडा उलट सुलट असू शकेल पण सहकारी गृहनिर्माण संस्था अगदी शेवटच्या पायरीवर आहेत हे नक्की)
अर्थात आपल्याकडून अधिकची माहिती मिळाली तर अजुन चर्चा करता येईल.

बबन ताम्बे's picture

31 Jan 2018 - 8:58 pm | बबन ताम्बे

तुमचा अंदाज बरोबर आहे. पम्प,तीन लिफ्ट, कॉमन एरिया लाईट मिळून 27 हजार बिल येते. 25 KW ची सोलर सिस्टिम लावण्याची योजना आहे. पाच मजली बिल्डिंग आहे आणि तीन विंग आहेत. एकूण 72 फ्लॅटची बिल्डिंग आहे.
सोलर सिस्टिम व्हेंडरने सांगितलंय की,
1. सोलर सिस्टिम जी वीज निर्माण करेल ती महावितरणच्या ग्रीडला जोडावी लागते.
2. महावितरण जास्तीच्या विजेचे काहीही क्रेडिट आता देत नाही.
3. वीज साठवण्यासाठी battery चा पर्याय खूप खर्चिक आहे. मेंटेनन्सही खर्चिक आहे.
3. लोड शेडींगच्या वेळी महावितरणने वीज पुरवठा बंद
केला तर सोसायटीचा जनरेटर चालू करायला लागेल. सोलर सिस्टिम त्यावेळी stall होईल.

धर्मराजमुटके's picture

31 Jan 2018 - 9:40 pm | धर्मराजमुटके

यात लिफ्ट साठी जवळजवळ १५-१८ किलोवॅट खर्च होणार आहेत. लिफ्ट आता आहे त्याचप्रमाणे जनरेटरवर ठेऊन पाण्याचा पंप आणि कॉमन एरीया लाईट सोलार वर टाकणे हा उपाय दिसतो. वीज जाण्याची वारंवारीता किती आहे यावर जनरेटर ला किती डिझेल जाते याचा खर्च काढता येईल. मात्र पाण्याचा पंप सोलार वर टाकण्यात सध्या तरी धोके आहेत. साध्या पंपातच जर काही बिघाड झाला तर दुरुस्तीवाले कमीतकमी ३-४ दिवस घेतात. सोलार सिस्टम च्या सर्कीटचे काम करणारी माणसे उपलब्ध नसल्यास पिण्याचेच काय पण धुण्याचे पण वांदे होऊ शकतात. जर स्टँडबाय पंप असेल तर मात्र रिस्क घेता येईल. आमच्या सोसायटीत आम्ही दोन पंप ठेवले आहेत पण पाईपलाईन अशाप्रकारे केली आहे की एक पंप बंद झाला तरी दुसर्‍या पंपाने दोन इमारतींना पाणीपुरवठा करु शकतो. मात्र बोअरवेल पंपासाठी अजुनही मर्यादा येतात.

मार्मिक गोडसे's picture

31 Jan 2018 - 7:23 pm | मार्मिक गोडसे

थोडक्यात मेन्टेनन्स किंवा लोड शेडींगसाठी महावितरणने पुरवठा खंडीत केला तर लिफ्ट, पंप चालवण्यासाठी डिझेल जनरेटर चालु ठेवावाच लागेल. म्हणजे तो खर्च काही वाचणार नाही.

हो. परंतू बॅटरी बॅकअप हा खर्चिक प्रकार आहे. त्यामुळे सोसायटीच्या टेरेसवर जास्तीत जास्त सोलर वीज निर्मिती करून सोसायटीचे इलेक्ट्रिक बिल कमी करण्याचा प्रयत्न करावा.

बबन ताम्बे's picture

31 Jan 2018 - 9:00 pm | बबन ताम्बे

25 KW चा साधारण 15 लाख रुपये खर्च सांगितला आहे.

आशु जोग's picture

4 Feb 2018 - 11:57 am | आशु जोग

संपूर्ण सोसायटीसाठी सोलर प्रकल्प उभारायचा असेल तर बिल्डिंग बांधत असतानाच तशी व्यवस्था करणे गरजेचे असते. तो बिल्डिंगच्या आराखड्याचा भाग असणे हे केव्हाही योग्य.

अन्यथा गच्चीवरील खूप मोठी जागा अडून राहते आणि मोकळ्या गच्चीचा म्हणून जो उपयोग असतो तोही करता येत नाही.

एखाद्या गोष्टीमधून ग्राहकालाच जर फायदा मिळणार असेल तर त्यासाठी सरकार अनुदान का देते ? जनतेच्या हिताची सरकारला एवढी काळजी का असते ?

शौचालय बांधण्यास सरकार अनुदान का देते हा प्रश्न स्वतःला विचारुन पाहिला की मग वरील प्रश्नाचे उत्तर मिळेल. असो. सौर उर्जेवरचा धागा शौचउर्जेवर खर्च होऊ नये म्हणून अवांतर थांबवतो.

पगला गजोधर's picture

31 Jan 2018 - 8:21 pm | पगला गजोधर

काही दशकांपूर्वी इंजिनिअरिंगच्या पुस्तकातील २-४ पाने वाचली होती, त्यास स्मरून ...
औष्णिक ऊर्जा प्रकल्पात कोळसा जाळून बॉयलरने पाण्याची अतिसंपृक्त वाफ करतात .. त्यावर टर्बाईन चालवतात, त्यातून वीजनिर्मिती होते...
बॉयलरची एफिशिअन्सी ८८-९२ % पर्यंत असते. झालेली वीजनिर्मीती हाताळण्यास सोपी व वाहून नेताना होणारे टेक्निकली वेस्टेज नगण्य.. (आकडा टाकून वीजचोरी इथे इंग्नोर केलेली आहे) म्हणजे एकूण इंधन ज्वलनाच्या ८० % पेक्षा जास्त ऊर्जा वापरण्यात आली.

आता पेट्रोल डिझेल च्या गाड्या एकूण इंधनाच्या ज्वलनाच्या, जवळ जवळ ३३ % धूर/उष्णता मधे , ३३% फ्रिक्शन मधे, ३४% उपयुक्त वापर (प्रॉपल्शन) साठी होतो.

म्हणजेच १ किलो इंधन जर बॉयलर मधे वापरले व डिझेल इंजिनमधे वापरले तर, बॉयलर (पक्षी औष्णिक वीज) हा जास्त परतावा देतो, पर्यायाने
कमी इंधन लागते तेव्हडीच ऊर्जा निर्मिती साठी...

पगला गजोधर's picture

31 Jan 2018 - 8:23 pm | पगला गजोधर

अणुउर्जेवर तर अजून एफिशिएंन्टली वीज निर्मिती करता येते...

सुबोध खरे's picture

1 Feb 2018 - 11:03 am | सुबोध खरे

काही तरी मुळातूनच गल्लत (BMR) होते आहे.
ऊर्जेचे रूपांतर करण्यात फक्त "उष्णता निर्मिती" हि उत्तम कार्यक्षमतेने होते. बाकी एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर होताना कार्यक्षमता सहसा ५० % च्या वर जात नाही. कारण ऊर्जा रूपांतरित करताना थोडीफार उष्णता(HEAT LOSSES) निर्माण होतेच. अगदी एल इ डी दिवे जे थंड समजले जातात त्यात पण साधारण कार्यक्षमता ५० %च असते.
कोळसा जाळून बॉयलरमध्ये वाफ तयार करून त्यापासून वीज तयार करण्याची क्षमता ३९ ते ४७ टक्के आहे
तर तेल जाळून बॉयलरमध्ये वाफ तयार करून त्यापासून वीज तयार करण्याची क्षमता ३८ ते ४४ टक्के आहे
अणुऊर्जेची कार्यक्षमता सुद्धा ३३ ते ४५ % च आहे. त्यामुळेच अतिरिक्त निर्माण होणारी उष्णता बाहेर टाकण्यासाठी एवढे मोठे मनोरे उभारावे लागतात. किंवा अणु पाणबुडीत अणुभट्टी थंड ठेवण्यासाठी फार मोठी यंत्रणा कायम कार्यरत ठेवावी लागते.
https://www.eia.gov/tools/faqs/faq.php?id=107&t=3
efficiency in electricity generation - Eurelectric
www.eurelectric.org/Download/Download.aspx?DocumentID=13549

वि सु. --मी इंजिनियर नाही, वाचन आणि शास्त्राच्या मूलभूत ज्ञानावर विसंबून लिहीत आहे.
यात चूक असेल तर सुधारून घ्यायला आवडेल.

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2018 - 5:30 pm | मराठी कथालेखक

हे second law of Thermodynamics मध्ये आहे
इंजिनिअरिंगमध्ये शिकलेलं आता सगळं नेमकेपणाने आठवत नाही.

तेजस आठवले's picture

31 Jan 2018 - 8:49 pm | तेजस आठवले

माझ्या काही शंका

  • घरगुती ग्राहकांनी सौर ऊर्जेचा वापर वाढवावा म्हणून सरकार काही योजना / सबसिडी देते का ?
  • लघु पातळीवर सौर बंब(२ लोकांसाठी पाणी गरम मिळेल किंवा आपल्या इलेक्ट्रिक गिझर च्या आकाराचा ) अश्या लहान आकारात उपलब्ध आहेत का ? आकार लहान असला पाहिजे, गॅलरीत बसवता येईल असा काहीसा ?
  • पेटी सूर्य चूल आपल्यापैकी कोणी वापरली आहे का, किंवा सध्या वापरत आहे का ? ती वापरण्यातले फायदे तोटे काय आहेत? किंमत किती असते, मेंटेनन्स करावा लागतो का ?
नाखु's picture

1 Feb 2018 - 8:16 pm | नाखु

शंकानिरसन
लघु पातळीवर सौर बंब(२ लोकांसाठी पाणी गरम मिळेल किंवा आपल्या इलेक्ट्रिक गिझर च्या आकाराचा ) अश्या लहान आकारात उपलब्ध आहेत का ? आकार लहान असला पाहिजे, गॅलरीत बसवता येईल असा काहीसा ?

  • अगदी अपार्टमेंटमध्ये टेरेस वर बसवता येईल, कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही कायद्यानेच याला पूर्ण संरक्षण आहे

पेटी सूर्य चूल आपल्यापैकी कोणी वापरली आहे का, किंवा सध्या वापरत आहे का ? ती वापरण्यातले फायदे तोटे काय आहेत? किंमत किती असते, मेंटेनन्स करावा लागतो का

काहीच खर्च नाही, एक तप वापरत आहे.
सुरवातीला अगदी वरणभात भाजी शिजली आहे.
सध्या वेळेअभावी शेंगदाणे, रवा ई खरपूस भाजून घेतोय
किमान देखभाल म्हणजे फक्त साफसफाई आणि पाण्यापासून जपणं, गंजू नये म्हणून

आभाळाखालचा नाखु पांढरपेशा

तेजस आठवले's picture

4 Feb 2018 - 3:42 pm | तेजस आठवले

मी साधारण माझ्या छोट्या गॅलरीत काही करता येईल का ह्याची चाचपणी करत होतो, म्हणून छोटा सोलर गिझर आहे का ते बघत होतो
पेटी सूर्य चूल कुठे विकत मिळते ?ठाणे-मुंबई भागात मिळते का? पुण्यात तर नक्कीच मिळत असणार, माहित असल्यास पत्ता द्यावा.

आशु जोग's picture

5 Feb 2018 - 7:09 pm | आशु जोग

अगदी अपार्टमेंटमध्ये टेरेस वर बसवता येईल, कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही कायद्यानेच याला पूर्ण संरक्षण आहे

कॉमन टेरेस म्हणताय का की एका फ्लॅटची ?

सचिन काळे's picture

5 Feb 2018 - 8:28 pm | सचिन काळे

अपार्टमेंट की को-ऑपरेटिव्ह सोसायटी?

नाखु's picture

5 Feb 2018 - 10:29 pm | नाखु

अपार्टमेंटमध्ये असो किंवा सोसायटीचे सामाईक टेरेस व्यक्तिगत सौरऊर्जा प्रकल्पाला अडवणूक करता येत नाही
फक्त तो आपल्या जागेत (त्याचा अडथळा होणार नाही याची काळजी घेतलेला) असावा

सौर चूल जालावर माहिती मिळेल
पुण्यात येरवड्यात त्रिदलनगर येथे उर्जा विक्री केंद्र आहे तिथे चौकशी करणे श्रेयस्कर
इस्सेन सोलर म्हणून चिंचवड एय आय डी ही त कंपनी आहे

अशा साठी शेतीविषयक प्रदर्शन उत्तम

http://www.insolergy.com ही वेब साइट माजी आय. आय. टी. च्या विद्याथ्रींनी चा लू केलेल्या कंपनीची आहे. जी, टर्नकी सोलर एनर्जी सोल्यूशन्स प्रदान करते. मुख्य चमूमध्ये अनुभवी व दिग्गजांचा समावेश आहे ज्यांना भारत आणि अमेरिकेत व्यापक अनुभव आहे. ते ग्रिड-कनेक्टेड री साठी न्यू आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (एमएनआरई, भारत) च्या अधिक्रुत चॅनेल भागीदार आहोत.
ईएमआयच्या स्वरुपाची व्यवस्था आहे.त्यामधे सोलरसाठी कर्ज योजना विशेषत: आयडीबीआय आणि एसबीआय सारख्या बँकांकडून घेतले जाते. त्यांचा एका योजनेमधे केवळ सौर ऊर्जा विकत घेता येते, सोलर पॅनलच्या गुंतवणूकीचा खर्च न घेता सौर उर्जेचा फायदे घेऊ शकता. सौर प्रोजेक्ट डेव्हलपर सौर यंत्रणेची स्थापना, देखभाल ख्रर्च कंपनीच करत आहे. आपल्या उपयोगाप्रमाणे, साधारणतया 25% ते 40% बिलामधे बचत होते.

सॉलर पीव्ही सिस्टम इन्स्टॉलेशनची क्षमता, खर्च, बचत, रॉय आणि आयआरआरचा अंदाज लावण्यासाठी सौर खर्च कॅल्क्युलेटर तयार करण्यात आला आहे. हे सौर कॅलक्यूलेटर सौर पॅनेलच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्राची गणना देखील करुन देते. ते निवासी तसेच व्यावसायिक सौर बचत यांची गणना करण्यासाठी अंदाजपत्रक साधन वापरला जाऊ शकते.

पिवळा डांबिस's picture

31 Jan 2018 - 11:33 pm | पिवळा डांबिस

मी सोलार किंवा अन्य अपारंपारिक उर्जा क्षेत्रातला तज्ञ नाही. खालील अभिप्राय म्हणजे फक्त माझा अनुभव...
गेले दोन वर्षे माझ्या घरावर मी सोलार सिस्टम बसवून घेतलेली आहे, जी ग्रीड्ला जोडलेली आहे. दिवसा सूर्य आकाशात असतांना ती वीज निर्माण करून अधिकची वीज ग्रीडमध्ये घालते (कळतं, कारण त्यावेळेस मीटर उलटा फिरतो) आणि रात्री ग्रीड्मधून वीज वापरते.
माझं मासिक बिल पूर्वी $१८०-१९० येत असे ते आता फक्त $१०-१५ (त्यातही बहुतेक चार्जेस हे कर आणि सरचार्जेस असतात) येतं. सोलार सिस्ट्म बसवणार्‍या कंपनीची १५ वर्षांची वॉरंटी आहे तेंव्हा जर काही दुरुस्ती करायची असेल तर ते येऊन मोफत करतात. माझं एक पॅनेल काम करेनासं झालं होतं मध्यंतरी तेंव्हा त्यांनी ते मोफत बदलून दिलं.
वीजकंपनीच्या (सोलार कंपनीच्या नव्हे) २०१७ च्या रिपोर्ट्नुसार आम्ही २०१७ मध्ये वीजबिलाच्या बचतीच्या बरोबरच अ‍ॅडिशनली अंदाजे १५००० पौंड सीओटू बनण्यापासून वाचवला = अंदाजे ११७ नवी झाडं लावण्याबरोबर. (हे त्यांचं कॅलक्युलेशन आहे, मिपाविंजिनेरांनी उगाच वाद घालू नये!)
प्रारंभीची इनव्हेस्टमेंट मोठी आहे. इथे घरांच्या विक्रीरकमेत जर सोलार असेल तर जास्त भाव मिळतो. ती पुढल्या ग्राहकावर ट्रान्स्फर करता येते.
तात्पर्यः जर तुमचं वीजबिल खूप जास्त असेल आणि तुमच्या मालकीचं रूफ असेल तर सोलार उपयुक्त पर्याय आहे.
अवांतरः आमच्याकडे कारण नसतां वीज जाणे वगैरे सरकारी करमणूक नसल्याने त्याबद्दल मत देणे कठीण. :)

थॉर माणूस's picture

1 Feb 2018 - 1:16 am | थॉर माणूस

>>> मग ही गाडी प्रदूषणमूक्त कशी !
गाडी स्वतः इंधन जाळून प्रदूषण करत नाही म्हणून ती प्रदूषणमूक्त. गाडीला लागणार्‍या उर्जेच्या निर्मितीमधे प्रदूषण होत असेल तर त्यात गाडी काहीच करू शकत नाही. हेच आपल्या कंबश्चन इंजिनवाल्या गाड्यांच्या बाजूने पहा. त्या स्वतः प्रदूषण करतातच, पण त्यांना लागणार्‍या इंधनाच्या निर्मितीमधे देखील प्रचंड प्रदूषण होते. वर त्या रीफायनरीजना/ऑइल वेलना बरीच वीज लागते, जी निर्माण करण्यासाठी प्रदूषण होतच आहे.

>>>पण या मुळे विजेचे बिल प्रचंड प्रमाणात वाढते. ते पाच-सहा हजारापर्यंत जाऊ शकते,
बिल वाढते पण इतक्या प्रचंड प्रमाणात नाही. तुमच्या पेट्रोलच्या खर्चाच्या प्रमाणात हे बिल जास्त नसते.

>>>झालेला खर्च भरून निघायला आठ नऊ वर्षे तरी नक्की लागतात.
काही अंशी बरोबर. म्हणूनच आपल्या घरावर सोलर पॅनेल बसवण्यापूर्वी नीट गणित मांडूनच निर्णय घ्यावा. तुमच्या वीज बिल व एकूण वीजनिर्मिती क्षमतेवर खर्च भरून निघण्यास किती वेळ लागेल ते ठरते.

चामुंडराय's picture

1 Feb 2018 - 8:43 am | चामुंडराय

फोटोसिन्थेसिस

मला फार पूर्वीपासून एक प्रश्न आहे.
वनस्पती लाईट एनर्जी चे केमिकल एनर्जी (ग्लुकोज) मध्ये रुपांतर करतात आणि या रिअक्शन मुळे ऑक्सिजन हा बाय-प्रॉडक्ट तयार होतो.
मग आपण अशी टेक्नॉलॉजि का नाही डेव्हलप करत कि आपल्याला हि एनर्जी झाडांमधून टॅप करता येईल.

आपल्याला मुबलक एनर्जी मिळेल आणि त्या निमित्ताने झाडे लावणे आणि जोपासना करणे वाढेल. शिवाय ऑक्सिजन ची उपलब्धता का अतिरिक्त फायदा. अर्थात अति ऑक्सिजन देखील धोकादायकच.

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2018 - 5:53 pm | मराठी कथालेखक

... जेनेटिक इंजिअरिंग प्रगत होईल तेव्हा माणसाचं झाड बनवून टाकू ....म्हणजे रोज थोडा वेळ खड्ड्यात उभ रहायचं की झालं अन्न तयार. मग शेतीची वेगळी कटकट नको...

अस्वस्थामा's picture

6 Feb 2018 - 8:05 pm | अस्वस्थामा

खड्ड्यात नै हो, उन्हात उभे रहावे लागेल. पानि आणि क्षार तर पिऊ शकतोय की आपण.. :))

चांगली चर्चा चाललीय. नवीन माहिती मिळतेय.

कंजूस's picture

1 Feb 2018 - 11:32 am | कंजूस

पिडां, सुबोध खरे बरोबर सांगताहेत.

भारतात आणि आपल्या महावितरणच्या कामकाज आणि आश्वासनांची धास्ती वाटते. जर काही तसं झालं नाही तर सोसायटीमध्ये त्या १५ लाख खर्चावरून हाणामारी होईल.
उषणतेचे मेकॅनिकल शक्तीत रुपांतर स्टीम एंजिनमध्ये करण्याची क्षमता ३० टक्क्यांपेक्षा कमीच असते परंतू ती एक काळाची गरज होती.
अणू उर्जेतले धोके आणि रेडियोअॅक्टिव कचरा टाकण्याचा प्रश्न फ्रान्सने बेटे भाड्याने घेऊन सोडवला आहे तो फार खर्चिक आहे.
वाय्राची वीज करणे, चक्क्या समुद्रात उभ्या करणे हाच एक खात्रीचा उपाय आहे.
बॅटरी प्रकरण अव्यवहार्य आणि खर्चिक आहे.

नाखु's picture

2 Feb 2018 - 9:59 pm | नाखु

मटा मध्ये पुणे पुरवणी मध्ये

पृष्ठ ४ वर बातमी आहे,त्या अनुषंगाने मेडाकडून अनुदान देण्यात येते.अगदी सोसायटीचे सौरऊर्जा प्रकल्पाला ही

पटा पटा मटा वाचक नाखु

आशु जोग's picture

6 Feb 2018 - 1:18 pm | आशु जोग

सोलर कुकर आणि वीज तयार करणारी सोलर यंत्रणा यामध्ये फरक आहे. कुकर हा लहान जागेमध्ये बसतो. वीज तयार करणाऱ्या यंत्रणेला मात्र खूप मोठी जागा लागते.

आशु जोग's picture

7 Feb 2018 - 12:43 am | आशु जोग

ओके पाहतो

१. अणूऊर्जा सुरक्षित आहे. १००% टक्के सुरक्षित असे काहीच नसते. पण अणू ऊर्जेच्या तंत्रज्ञानात अनेक सुधारणा झालेल्या आहेत. अनेक देश अनेक दशके अनेक अणू ऊर्जा वापरणार्‍या भट्ट्या वापरत आहे.
२. एका व्यक्तीकरता एक वर्ष निव्वळ अणू ऊर्जा वापरून वीज बनवली तर निर्माण होणारा रेडियोअ‍ॅक्टिव कचरा किती होतो? साधारण ४० ग्राम. हा कचरा जहाल विषारी, समस्त मानवजातीचा विध्वंस करु शकेल इतका विनाशक असतो का? आजिबात नाही. उलट ५०-१०० वर्षात तो अत्यंत निरुपद्रवी बनू शकतो. एखादा दगड वा काचेचा तुकडा असावा तसा.
३. आण्विक भट्टी ही अत्यंत स्वच्छ ऊर्जा निर्माण करते. थोड्या प्रमाणात इंधन वापरून मोठ्या प्रमाणात प्रदूषण न करता ऊर्जा बनवण्याकरता अणू ऊर्जा हा सकस पर्याय आहे. सौर, वारा हे प्रकार खूप इनएफिशियंट व खर्चिक आहेत.
४. अणू ऊर्जा बदनाम करण्याची मोठी फॅशन आहे. परंतु हे तंत्रज्ञान गेल्या ५० वर्षात विकसित होत आहे. त्यातील त्रुटी कमी करुन, धोके कमी करुन ती वापरता येण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलली गेलेली आहेत. बाकी ऊर्जेच्या स्रोतांप्रमाणे ह्याचाही पूर्वग्रह न ठेवता विचार व्हायला हवा.

आशु जोग's picture

10 Feb 2018 - 5:08 pm | आशु जोग

हुप्प्याराव,
अणू-उर्जेबाबत महत्त्वाची माहीती दिलीत आपण. एकूण उर्जेच्या किती प्रमाणात अणू-उर्जा सध्या तयार होते. काही आकडेवारी आहे का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2020 - 5:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घरगूती वापरासाठी योग्य शिष्टिम कोणतं ? किती खर्च ? सोलर पॅंनल कोणते ? कंपनी. वीजमंडळ मदत करते का ? अनुदान ?

-दिलीप बिरुटे

आशु जोग's picture

27 Nov 2020 - 12:14 pm | आशु जोग

वरती वीजमंडळाच्या मदतीबाबत लिहीलेले आहे

तयार झालेली वीज बॅटरीमधे साठवण्याची गरज नसते. तयार झालेली वीज ग्रिडला पुरवायची. त्याप्रमाणे मंडळाकडून आपल्याला क्रेडिट मिळते.