पानिपतचे खलनायक - दोन नवीन चित्रे

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
14 Jan 2018 - 10:42 am

चित्र १ शुजा-उद्दोला

Shuja-uddola

चित्र २ अहमदशाह अब्दाली

Ahmadshah

पानिपतच्या लढाईला १४ जानेवारी रोजी २५७ वर्षे पूर्ण होतील. या प्रसंगाच्या निमित्ताने पानिपतचा विजेता अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या बाजूने लढलेला शुजाउद्दोला या दोघांची नवीन चित्रे मला एका संग्रहात सापडली. ही चित्रे आणि त्यामागची कथा अत्यंत रोचक अशी आहे. पानिपत लढाईच्या निमित्ताने ही खास इतिहासाची सफर.

पानिपतचे खलनायक कोण असं शोधलं की दोन नावे लगेच आठवतात - लढाईचा विजेता अहमदशहा अब्दाली आणि नजीबखान रोहिला हा त्याचा हस्तक. अहमदशाह अब्दालीने भारतावर एकूण सात वेळ स्वाऱ्या केल्या. त्यामुळे त्याचा काही हिंदुस्थानी संस्थानिकांशी साहजिकच घनिष्ठ संबंध आला. अवधचा नबाब शुजाउद्दोला हा त्यापैकीच एक. मराठ्यांच्या विरुद्ध पानिपतच्या लढाईंत शुजा अब्दालीच्या बाजूने लढला.

शुजाची मराठ्यांशी लढण्याची ईच्छा नव्हती, पण नजीबखानाच्या रचलेल्या कारस्थानामुळे त्याचा नाईलाज झाला. लढाई संपल्यानंतर जी माणसें जिवंत परत आली त्यातली बरीचशी १४ जानेवारीच्या रात्री आणि त्यानंतर शुजाच्या छावणीत घुसली. त्याने इतर अफगाण सारदारांप्रमाणे कैद्यांची कत्तल करून मुंडक्यांचे मिनार रचले नाहीत. शुजाने लाखो रुपये दंड अब्दालीला भरून शरण आलेले मराठे धर्मार्थ सोडून दिले. शुजाच्या पदरी असलेल्या गोसावी सरदारांनीच मग काही मराठ्यांच्या मदतीने भाऊसाहेब आणि विश्वासराव यांचे मृतदेह ओळखून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.या शुजाच्या पदरी कर्नल जेंतील नावाचा फ्रेंच सैनिक त्याचा खास लष्करी सल्लागार म्हणून फैजाबाद इथे राहिला होता. तो १७७८ साली फ्रान्सला परत गेला. जाताना त्याने भारतात जमवलेली सर्व हस्तलिखिते, चित्रे आपल्याबरोबर नेली.

हा संग्रह सध्या फ्रान्समध्ये आहे. त्यातच अहमदशहा अब्दालीचे हे चित्र मला आढळले. शुजा आणि अब्दालीचे संबंध लक्षात घेता शुजाकडे अब्दालीचे चित्र असणे अगदी स्वाभाविक आहे असे माझे मत आहे.

पहिल्या चित्रात अहमदशहाचे नाव फ्रेंच भाषेत 'abdali amadcha' असे उजव्या कोपऱ्यात खाली लिहिलेले आहे. अहमदशहाने तुर्की पद्धतीचा सोन्याचा रत्नजडित मुकुट घातला आहे आणि हातात रत्नजडित सोन्याची कुऱ्हाड आहे. त्याच्या चेहेर्याभोवती राजघराण्यातील व्यक्तीसाठी काढले जाणारे सोन्याचे वलय आहे. चित्रात अहमदशहाच्या नाकावर आपल्याला एक जखम दिसते. शीख ग्रंथांच्या मतानुसार अहमदशहाच्या नाकावर हरमंदिर साहेब इथे मंदिर तोडताना एक विटेचा तुकडा लागून हि जखम झाली आहे. हि जखम पुढे वाढत जाऊन हालअपेष्टा भोगल्यावर अहमदशहाचा दीर्घ आजारानंतर १७७२ साली मृत्यू झाला. माझ्या मते ही जखम म्युकोसल लेशमॅनिया या कुष्ठरोगासारख्या आजाराची असू शकते. परजीवी जंतूंमुळे होणाऱ्या या आजाराची लक्षणे अहमदशहाच्या अवस्थेशी जुळतात.

दुसऱ्या चित्रात शुजाउद्दोला आणि कर्नल जेंतील हे आपल्याला एका महालाच्या गच्चीवर दिसतात. शुजाच्या हातात एक लांब पल्ल्याची बंदूक असून तो त्यातुन एक गोळी डागतो आहे असं चित्रकाराने चित्रात दाखवले आहे. हे चित्र १७६५ च्या सुमारास फैजाबाद इथे कंपनी शैलीत काढलेले आहे. चित्रावर आपल्याला पाश्चात्त्य प्रभाव दिसतो. चित्रातील रंगसंगती आणि ऐतिहासिक महत्वाच्या व्यक्ती यामुळे हे चित्र महत्वाचे आहे.

या दोन्ही चित्रांविषयी मी पुढील संशोधन एका शोधनिबंधात प्रकाशित करेन.

ही पोस्ट इतर जागी अथवा सोशल मीडियावर शेअर करण्यास माझी हरकत नाही. ही चित्रे पोस्टमधून काढून इतरत्र (जसे विकी) वापरायची असतील तर त्यासाठी 'नॅशनल लायब्ररी, फ्रान्स' यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. या लेखापुरती ती परवानगी मी घेतली आहे. आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ही चित्रे प्रकाशित झाली आहेत.

इतिहासलेखबातमी

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

14 Jan 2018 - 12:50 pm | चित्रगुप्त

वा छान. पॅरिसच्या राष्ट्रीय पुस्तकालयात निकोलो मनुचीचा ग्रंथ देखील असून त्यात शिवाजी महाराजांचे चित्रही आहे, ते बघितले का? पूर्वी मिपावर कोणत्यातरी एका लेखात मनुचीच्या ग्रंथातली अनेक चित्रे दिली होती.
वरीलपैकी शुजाचे चित्र इथे टाकताना ते जास्त उभट झालेले दिसते आहे.
अब्दालीच्या हातातली रत्नजडित सोन्याची कुऱ्हाड ही डोक्याभोवतालच्या वलयाप्रमाणे सांकेतिक आहे का? असल्यास त्याचा अर्थ काय आहे ? (काफिरांचा नाश करणारा वगैरे ?)
रच्याकने तुम्ही पॅरिसात आहात काय ?

पगला गजोधर's picture

14 Jan 2018 - 1:51 pm | पगला गजोधर

Ax

Axe-pistol (1930.73.5)
The ambitious King Ahmad Shah (1747–1772) consolidated various territories to establish the Durrani Empire (modern Afghanistan and Pakistan). In his bid to subdue India in 1757, his soldiers may have used weapons like this: a combined axe and rudimentary matchlock pistol, all made of steel. The pan and its sliding cover are visible and it was probably lit with a hand-match. The chain may have held this match or a pricker with which to clean the touch-hole.

मनूची चा अल्बम आहे माझ्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांची ३ चित्रे पॅरिसमध्ये आहेत. बॅटमॅन ने इथे सगळी यादी दिली आहे.
https://www.quora.com/How-did-Shivaji-Maharaj-look

नाही, मी फ्रान्समध्ये नाही. दुरूनच ऑनलाईन केला सगळं. चित्र देताना अस्पेक्ट रेशो थोडा चुकला लिंक मध्ये, म्हणून उभट झाले आहे.

कुऱ्हाडीबद्दल लिहितो निवांत नंतर.

वरचा लेख आणि या दुव्याबद्द्ल खूप धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jan 2018 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रांच्या माहितीबद्दल आभार...!!!

-दिलीप बिरुटे

पगला गजोधर's picture

14 Jan 2018 - 1:00 pm | पगला गजोधर

छान लेख, अजून वाचायला आवडेल...
तुमच्या मेहनतीबद्दल १+

मुक्त विहारि's picture

14 Jan 2018 - 1:50 pm | मुक्त विहारि

लेख आवडला...

पैसा's picture

14 Jan 2018 - 3:01 pm | पैसा

लेख आणि चित्रे यासाठी धन्यवाद!

पैसाताई, ज्ञानेश्वरीवरच्या लेखावर तुम्ही ३ वर्षांपूर्वी दिलेले प्रोत्साहन अजून लक्षात आहे माझ्या. ते काम चालू आहे. त्याचं एक सुंदर पुस्तक मूळ चित्रांसकट जसंच्या तसं करूया असा प्लॅन आहे. मदत लागली तर संपर्क करीन काम थोडं पुढें सरकल्यावर.

आनन्दा's picture

14 Jan 2018 - 3:26 pm | आनन्दा

छान आहेत चित्रे..
थोडी रिफ्रेशमेन्ट पण झाली

बबन ताम्बे's picture

14 Jan 2018 - 8:11 pm | बबन ताम्बे

आपणच लिहिलाय का ?

मनो's picture

14 Jan 2018 - 10:00 pm | मनो

होय. मीच दिला आहे.

गामा पैलवान's picture

14 Jan 2018 - 11:49 pm | गामा पैलवान

बबन ताम्बे, कृपया दुवा मिळेल काय? धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.

बबन ताम्बे's picture

15 Jan 2018 - 9:46 am | बबन ताम्बे

शोधली लिंक ऑनलाइन , पण नाही मिळाली. रविवारच्या मटा आवृत्ती मध्ये आहे हा लेख.

गामा पैलवान's picture

15 Jan 2018 - 1:45 pm | गामा पैलवान

हाच लेख आहे का? वेगळा असेल तर शीर्षक काय आहे? धन्यवाद!
-गा.पै.

बबन ताम्बे's picture

15 Jan 2018 - 5:07 pm | बबन ताम्बे

.

पगला गजोधर's picture

15 Jan 2018 - 6:37 pm | पगला गजोधर

http://epaper.timesgroup.com/olive/apa/timesofindia/SharedView.Article.a...

गामाजी,
वरील लिंक पाहून घ्या रेंडर होतीये का ?
खूप मेहनत करून खास तुमच्यासाठी शोधलीये...

गामा पैलवान's picture

15 Jan 2018 - 6:48 pm | गामा पैलवान

धन्यवाद प.ग. हटमल दुवा का नाही म्हणून महाराष्ट्र टाईम्सला विचारेन म्हणतो.
आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jan 2018 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान लेख आणि चित्रे.

अजून माहिती वाचायला आवडेल. तुमच्या संशोधनाबद्दल नक्की लिहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2018 - 1:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

आता लेखात म्हटल्यापरमाणे या चित्रांवरही लिहा. वाचायला जरूर आवडेल.

प्रचेतस's picture

15 Jan 2018 - 8:31 am | प्रचेतस

नवीन चित्रे प्रकाशात आणल्याबद्दल आभार.

गामा पैलवान's picture

15 Jan 2018 - 1:44 pm | गामा पैलवान

लेख व चित्रे यासाठी मनो यांचे आभार.

-गा.पै.

विशाल कुलकर्णी's picture

15 Jan 2018 - 1:46 pm | विशाल कुलकर्णी

उत्तम माहिती. धन्यवाद !

पद्मावति's picture

15 Jan 2018 - 2:41 pm | पद्मावति

उत्तम माहीती.

गावठी फिलॉसॉफर's picture

15 Jan 2018 - 7:41 pm | गावठी फिलॉसॉफर

छान माहिती

राघव's picture

15 Jan 2018 - 8:31 pm | राघव

खूप आवडले.

शिवरायांच्या चित्रांच्या लिंकबद्दल मनःपूर्वक आभार!

पु.ले.प्र.

प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे आभार! इतिहासात नवीन काही मिळावे असा माझा प्रयत्न असतो. सध्या दोन नवे मराठ्यांशी संबंधित 'खजिने' सापडले आहेत. एक अस्सल हिऱ्यांच्या खजिना आणि एक चित्ररूपी खजिना. त्यांच्या प्रसिद्धीची परवानगी मागितली आहे. महिन्याभरात करतो प्रसिद्ध.

प्राची अश्विनी's picture

17 Jan 2018 - 12:18 pm | प्राची अश्विनी

आश्र्चर्य म्हणजे यातल्या बहुतांश चित्रांमध्ये महाराजांच्या अंगरख्यावरील नक्षी आणि रंग पोत सारखाच आहे.
कसं काय?

प्राची अश्विनी's picture

17 Jan 2018 - 12:21 pm | प्राची अश्विनी

प्रतिसाद चुकून इथे पडला. बॅटमॅन यांनी दिलेल्या रेफरन्स बद्दल म्हणायचं होतं.

चित्रे एक मूळ समकालीन ओरिजिनालवर आधारित असू शकतात. मनूचीने असं म्हणले आहे की शहजादा मुअज्जम म्हणजे शाह आलम याच्याकडे असलेल्या मूळ चित्रांच्या कॉपी त्याने पाण्यासारखा पैसे खर्च करून मिळवल्या आहेत.

प्राची अश्विनी's picture

18 Jan 2018 - 10:29 am | प्राची अश्विनी

म्हणजे मूळ एकच चित्र असावे का?

असं ठामपणे सांगता येत नाही. त्यासाठी इतरही निकष लावून पाहावे लागतील.

प्राची अश्विनी's picture

17 Jan 2018 - 12:22 pm | प्राची अश्विनी

लेख, चित्रे अतिशय माहितीपूर्ण. आवडली. अजून लिखाणाच्या प्रतिक्षेत.