... एक क्षण भाळण्याचा.(४)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
27 Dec 2017 - 5:10 pm

मागील दुवा : http://www.misalpav.com/node/41704
ती आत आहे. येईलच.
सामोसे घेउया तोवर. आता आमच्या गप्पा चहाच्या टेबलवर सुरू झाल्या. अचानक खोलीच्या दारातून एक साधारणतः पन्नाशी पलीकडच्या एक बाई आल्या.

बाइंच्या चेहेर्‍यावर काहीसे हरवल्यासारखे भाव. किंवा कोणतेच भाव नाहीत असे म्हणाना. बाईनी आमच्या कडे पाहिले आम्ही नमस्कार केला. त्यानी उलट नमस्कार केला नाही.
ही माझी पत्नी सौंदर्या. नाथ साहेबानी ओळख करुन दिली.
चला . बसायचंय इथे. का आत जायचंय परत.
बाईंच्या चेहेर्‍यावर काहीच प्रतिक्रीया नाही. चला नाथ साहेबानी बाईंचा हात धरुन त्याना आत नेले. जवळजवळ ओढतच नेले.
आमच्या चौघांच्या चेहेर्‍यावर एक मोठठे प्रश्न चिन्ह.
काही क्षण कोणीच काही बोललं नाही. इतक्या रसिक माणसाचं असं का व्हावं हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता.
अचानक माझ्या खांद्यावर एक थाप पडली. ओ भावसाहेब चला . ते सामोसे गार होऊन गेले.
नाथ साहेब माझ्या मागे उभे होते. चला तुम्हाला आणखी एक गम्मत दाखवतो. हा माझा वेगवेगळ्या नाण्यांचा संग्रह. या मुळे एखाद्या देशाची संस्क्रुती सहज कळते.
संगीत म्हणा , पुस्तके म्हणा नाणी म्हणा या सगळ्या गोष्टी एखाद्या देशाबद्दल समाजाबद्दल बरेच काही सांगत असतात. आता हे बघा हे नाणे अफगाणीस्थानातील आहे यावर बामियान मधील बुद्धाच्या मूर्तीचे चित्र आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या काळातील हे नाणे आहे. त्यावरुन समजते की तेथून व्यापार होत असावा.
नाथ साहेब बोलत होते. ऐकण्याची मनस्थिती कोणाचीच नव्हती. नाथ साहेबाना ते जाणवले असावे.
मला माहीत आहे की तुमच्या मनात काय आहे ते. तुम्हाला सौंदर्या बद्दल विचारायचे आहे ना?
कोणीच काही बोलले नाही. एक दोन सेकंदांची जीवघेणी शांतता.
फार काही नाही. सौंदर्या माझीच बायको. आमचं अगदी ठरवून दाखवून देवा ब्राम्हणासमोर लग्न लागलेलं आहे. माझ्या मामानी सुचवलं हे स्थळ. मी तील पहिल्यांदा
पाहिल्ं वीस वर्षांपूर्वी. पहायच्या कार्यक्रमातच मला ती खूप आवडली. तीची सहजता साधेपण खूप आवडला. आमचं रीतसर लग्न झालं. खूप छान गायची . गीता दत्तची गाणी हा तीचा वीक पॉईंट. आणि माझाही. आम्ही खूप फिरलो. बाईकवर अक्षरशः कुठेही फिरायचो. गोवा , बेंगलोर , गुजरात . तीला बाईकवर भरधाव वेगात जायला आवडायचे. ते गाणं आहे ना. "जिंदगी एक सफर है सुहाना यहां कल क्या हो किसने जाना". तसे फिरायचो आम्ही बिंधास्त उद्या ची चिंता न करता. लग्ना नंतर पाच वर्षानी तीला दिवस गेले. पण डोहाळे बाईकवर फिरायचेच होते.
तीला पाचवा महीना संपून सहावा चालू झाला होता .खरेतर अशा अवस्थेत बाईकवर फिरू नका हा सल्ला बर्‍याचजणानी दिला. पण तारुण्याचा कैफ म्हणा, ते वय असेल म्हणा. किंवा दैवाने ठरवले असेल म्हणा पुण्याहून महाबळेश्वरला गेलो होतो . फार मोठे अंतर नाही. महाबळेश्वर ला वेण्णा लेक ला बोटिंग केले. शेजारच्या परतापसिंह बागेतल्या कारंजातल्या पावसासोबत थंडीची मजा घेतली. मेन मार्केट मधे रासबेरी स्ट्रॉबेरी घेवुन निघालो. संध्याकाळ झाली होती. पाचगणीच्या पारसी पॉईंट वर थांबून गरमागरम चहा प्यायचा प्लॅन करत होतो. अंजूमन शाळे जवळचे वळण आजही लक्षात आहे. बाईकचा वेगही फार नव्हता. समोरुन अचानक रस्ता ओलांडणार्‍या एका शाळकरी मुलाला वाचवायचे म्हणून जोरात ब्रेक मारला. बाईक स्लीप झाली. बाइकसोबत मी आणि सौंदर्या दोघेही रस्त्यावर घसटत गेलो.. सौंदर्याचे डोके रस्त्यावरच्या एका माईलस्टोन ला धडकले. मी कसाबसा वाचलो. पण माझ्याही पायाला खूप लागले होते. रस्त्यावर काही लोक होते त्यानी एक टेंपो थांबवला.
आणि आम्हाला दवाखान्यात हलवले.
दवाखान्यात जागा झालो तेंव्हा समजले की त्या अपघातात सौंदर्याच्या पोटातले मूल दगावले. मिस कॅरेज झाले. पण त्याही पेक्षा भयानक म्हणजे सौंदर्या कोमात गेली होती. तीला शुद्ध आली तेंव्हा ती कोणाला ओळखतच नव्हती. हळु हळू ती बरी झाली. पण गर्भपात झाला याचा तीला फारमोठा मानसीक धक्का बसला.
त्या अपघातानंतर आम्ही खूप बदललो. बाईकवर फिरणारे ते आनंदी जोडपे आता तसे राहीले नव्हते. रस्त्यावर रहदारी पाहिली तरी ती आता घाबरत होती आणि तीला तसे घाबरलेले पाहिले की तो भेदरलेल्या सशासारखा होत होता. तीचे घाबरणे भेदरणे वाढतच गेले. त्यातून ती केंव्हा केंव्हा एखाद दीड महिन्यांसाठी बरी होते.
पुन्हा गीता दत्तची गाणी म्हणत असते. तो एक दीड महीना ते जोडपे पुन्हा स्वर्ग जगत असते. अचानक काहीतरी होते तीचे घाबरणे पून्हा सुरू होते. नवर्‍याला ही ओळखणे बंद होते. तिच्यासाठी माणसेच काय पण आसपासच्या इतर गोष्टीही नसल्यातच जमा असतात. डॉक्टर म्हणता हा ऑटीझम चा प्रकार आहे.
वर्षभर किंवा काही जास्त काळासाठी ही अवस्था टिकते. कधीतरी एक सकाळ येते . रेडीओवर गीतदत्तची गाणी लागलेली असतात. तीला काहीतरी आठवते.
हळुहळू तीच्या चेहेर्‍यावर हसु खुलायला लागते. आणि एक दीड महिन्यासाठी ते जोडपे आनंदी होते. तीला मात्र याची जाणीव नसते. आणो तो या एक दीड महिन्यांतल्या एक एक आठवणींवर पुढचा जन्मही आनंदात काढायच्या विचारात असतो.
भावसाहेब, एक सांगतो नवरा बायको चे नाते सात जन्मांचे आहे की नाही हे माहीत नाही. पण तीचे या एकाच जन्मात सात जन्म जगुन झालंय.
मला माझ्याच काय पण तीच्या आईवडीलांनी ही दुसरे लग्न करायचा सल्ला दिला होता. मी नकार दिला. मनात म्हणालो जो हीरा तुम्हाला आवडलाय त्याला तुम्हीच जपायचं असतं त्या हीर्‍यावर भाळण्याचा एक क्षणअसेल तर आख्खा जन्म संभाळण्याचा असतो. मी हीच्या सोबतच रहाणार. एरव्ही काही वेळा ती मला ओळखतही नाही . ती माझ्या सोबत आहे हेच मला पुरतं. लहापणी आपल्या आवडलेलं मोडकं खेळणंही आपण जपून ठेवतो. काय काय असतं त्यात मोडकी बॅट, फुटक्या गोट्या, चारही चाके हरावलेली गाडी सुद्धा असते. जीवापाड जपत असतो आपण त्या खजिन्याला. का माहीत आहे? आपला जीव त्या खेळण्यात नाही तर त्या सोबत घालवलेल्या आनंदी क्षणात अडकलेला असतो. त्या क्षणांमुळे तर आपण आनंदी जगु शकतो.
माझंही तसंच आहे. ती घरात आहे म्हणून मी आहे.. लोक म्हणतात की मी तीला जपतो सांभाळतो खरं सांगायचं तर तीच मला सांभाळतेय. जपतेय. ती आहे याच विचाराने मी पुन्हा गाण्याचा आनंद घेतो. पुस्तक वाचून एखाद्या प्रदेशात मनाने मनसोक्त भटकतो.
एक क्षण भाळण्याचा बाकी सारे संभाळण्याचे हे तीच्याकडून शिकतोय मी. तीची स्मृती हरवते त्यानंतर आलेला प्रत्येक क्षण तीच्यासाठी नव्याने येतो. समोर आलेला माणूस नवा असतो निसर्ग नवा असतो. माझ्या साठी हा सुखाचा मूलमंत्र आहे. ओल्या स्पंजाने पुसून कोरी केलेल्या पाटीसारख्या मनाने प्रत्येक क्षणाला सामोरे जायचे.
नाथ साहेब बोलून थांबले. आम्ही चौघेही तसेच निशःब्द , स्तब्ध. कुणीतरी स्ट्याच्यू केल्या सारखे.
कुठूनतरी गाण्याचे स्वर आले म्हणून आम्ही भानावर आलो. नाथ साहेबानी रेकॉर्ड लावली होती. गीता दत्त खट्याळ आवाजात गात होती.
ठंडी हवा काली घटा आही गयी झुमके. प्यार लिये डोले हसी , नाचे जिया झूम के.....
( समाप्त )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ट्रेड मार्क's picture

27 Dec 2017 - 8:28 pm | ट्रेड मार्क

भाळणारे बरेच जण असतात पण असे सांभाळणारे सापडणे अवघड असते.

शिव कन्या's picture

11 Jan 2018 - 9:43 pm | शिव कन्या

बरोबर.

II श्रीमंत पेशवे II's picture

28 Dec 2017 - 10:18 am | II श्रीमंत पेशवे II

"एक क्षण भाळण्याचा बाकी सारे संभाळण्याचे" - हे वाक्य डोक्यात घर करून बसलं

१ नंबर

तुषार काळभोर's picture

28 Dec 2017 - 12:53 pm | तुषार काळभोर

हे जर वास्तव असेल तर नाथसाहेबांना आणि काल्पनिक असेल तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद...
"एक क्षण भाळण्याचा बाकी सारे संभाळण्याचे" ही आयुष्यभर ना विसरण्यासारखी शिकवण देण्यासाठी.

शब्दानुज's picture

28 Dec 2017 - 4:45 pm | शब्दानुज

आवडली...

यशोधरा's picture

28 Dec 2017 - 4:59 pm | यशोधरा

सुरेख.

सस्नेह's picture

28 Dec 2017 - 5:31 pm | सस्नेह

नि:शब्द !!
सुरेख लिहिलंय. बरेच दिवसांनी विजूभाऊ अवतरले :)

सिरुसेरि's picture

28 Dec 2017 - 6:30 pm | सिरुसेरि

आसु आणी हसु दोन्हीचा अनुभव छान मांडलात .

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jan 2018 - 3:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली, फार आवडली गोष्ट,
पैजारबुवा,

जगप्रवासी's picture

1 Jan 2018 - 6:05 pm | जगप्रवासी

एकच शब्द "क्लास". बऱ्याच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिलाच लेख वाचून मन खुश झालं. खूप खूप धन्यवाद विजुभाऊ नवीन वर्षाची इतकी छान सुरुवात करून दिल्याबद्दल

पद्मावति's picture

1 Jan 2018 - 6:22 pm | पद्मावति

आहाहा!! सुरेख लिहिलंय, खरोखर.

अमित खोजे's picture

11 Jan 2018 - 2:22 am | अमित खोजे

क्या बात है!

अमित खोजे's picture

24 Apr 2019 - 10:56 pm | अमित खोजे

परत परत वाचून पुन्हा पुन्हा दाद द्यावीशी वाटते. आज वर्षभराने पुन्हा वाचले - अगदी पाटी कोरी करून, नव्याने. आणि प्रतिसाद द्यायला खाली पाहिले तर शेवटचा माझाच प्रतिसाद. तरीही म्हटले पुन्हा प्रतिसाद देऊयात. त्या निमित्ताने विजुभाऊंचे हे लिखाण वर तरी येईल.

जालिम लोशन's picture

25 Apr 2019 - 12:16 am | जालिम लोशन

शब्दातीत

श्वेता२४'s picture

26 Apr 2019 - 12:26 pm | श्वेता२४

अमित खोजे धागा वर काढल्याबद्दल आभार. त्यामुळे हे सुंदर लिखाण वाचायला मिळालं

गामा पैलवान's picture

4 Jul 2020 - 2:05 am | गामा पैलवान

विजुभाऊ,

कथा सुरेख फुललीये. हिच्यावरून 50 First Dates या इंग्रजी चित्रपटाची आठवण झाली. हा चित्रपट अल्पकालीन स्मृतीभ्रंशाशी निगडीत आहे.

धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

या चित्रपटावरुन मराठीत " रोज नव्याने भेट तू " हा चित्रपट निघाला आहे. सुनील बर्वे आहे त्यात.

अभ्या..'s picture

4 Jul 2020 - 9:31 am | अभ्या..

रोज नव्याने भेट तू हे आपण मनाने दिलेले टायटल रोचक आहे पण त्या चित्रपटाचे नाव गोजिरी आहे. गोजिरी ची भूमिका मधुरा वेलणकर ने केली आहे. सुनील बर्वे आहेच.

धन्यवाद अभ्या. नाव नीट आठवत नव्हते. तरीच हा चित्रपट सापडत नव्हता नेटवर.
" चूकभूल देणे घेणे"

प्राची अश्विनी's picture

5 Jul 2020 - 8:08 am | प्राची अश्विनी

कथा छान आहे.