इतिहास व्याख्यान - पाक्षिक सभा

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
28 Oct 2017 - 6:59 pm

मी भारत इतिहास संशोधक मंडळात काही गोष्टींविषयी शुक्रवार दि. ०३ नोव्हेंबर २०१७ संध्याकाळी ६.३० वाजता एक व्याख्यान देतो आहे. इतिहासात रस असलेल्या सर्वानी जरूर या, तुमचे स्वागतच आहे.

इतर तपशील, विषय, स्थळ इत्यादी
=====================
श्री राजा शिवछत्रपती महाराज आणि ज्ञानियांचा राजा श्री ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचे दोन मानबिंदू. भारत इतिहास संशोधक मंडळातल्या शुक्रवार ०३ नोव्हेंबरच्या पाक्षिक सभेत या दोन्ही विषयी एकत्रित आजपर्यंत अप्रकाशित आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे कागद आणि चित्रे याविषयी श्री मनोज दाणी यांच्या व्याख्यानाचा योग जुळून येत आहे. या सभेत मोगल बादशहा शहाजहान आणि औरंगझेब यांची एकूण चार अस्सल फारसी फर्माने, एक याददाश्त, एक दस्तक यांच्याविषयी श्री दाणी हे बोलतील. या कागदांतून महाराजा जसवंतसिंग यांची शिवाजी महाराजांवरची मोहीम, सरदारांची सैन्यसंख्या, त्यांच्या नेमणुकीची जागा अशी अत्यंत उपयुक्त आणि नवीन शिवचरित्रविषयक माहिती पुढे येत आहे. त्यातील एका फर्मानावर औरंगझेबाच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील काही ओळी आहेत. महाराजा जसवंतसिंग याची काही चित्रे आणि त्याने रचलेल्या ग्रंथाविषयीही श्री दाणी बोलतील. आपल्या व्याख्यानाच्या दुसऱ्या भागात ते १७६३ साली लिहिलेल्या सचित्र ज्ञानेश्वरीतील निवडक चित्रे दाखवतील. अत्यंत सुंदर अशी ही चित्रे म्हणजे मराठी चित्रकलेचा मोगली सजावटीच्या बाद्शाहनामा आणि इतर सचित्र ग्रंथाच्या तोडीचा, किंबहुना सरस असा उत्कृष्ट नमुना आहेत. इतिहासाचे संशोधक, अभ्यासक आणि इतिहासात रस असणाऱ्या सर्वांसाठी ही एक पर्वणीच आहे, त्यामुळे शक्य असेल त्या सर्वानी या पाक्षिक सभेस जरूर उपस्थित राहावे.

सभेची वेळ: शुक्रवार दि. ०३ नोव्हेंबर २०१७ संध्याकाळी ६.३० वाजता
स्थळ: भारत इतिहास संशोधक मंडळ
भरत नाट्य मंदिराशेजारी, सदाशिव पेठ पुणे
=====================

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Oct 2017 - 7:12 pm | प्रचेतस

जबरी.
येण्याचा अवश्य प्रयत्न राहील.

अरे वा! प्रयत्न करतो येण्याचा.

दीपक११७७'s picture

29 Oct 2017 - 12:41 am | दीपक११७७

दोबत Video shooting केलतर बर होईल
म्हणजे सगळ्यांना पाहता येईल.

दीपक११७७'s picture

29 Oct 2017 - 12:41 am | दीपक११७७

सोबत Video shooting केलतर बर होईल
म्हणजे सगळ्यांना पाहता येईल.

दीपक११७७'s picture

29 Oct 2017 - 12:41 am | दीपक११७७

सोबत Video shooting केलतर बर होईल
म्हणजे सगळ्यांना पाहता येईल.

दुर्गविहारी's picture

29 Oct 2017 - 10:33 am | दुर्गविहारी

तुमच्या व्याखानाचा व्हिडीओची लिंक येथे शेअर करा किंवा किमान एखादे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तरी याच धाग्यावर द्या.

कुणी कार्यक्रमाचा आढावा लिहा.

बॅटमॅन येणार आहे त्याला सांगतो - विडिओ जर काढला तर गरज नाही मग.

मनो's picture

29 Oct 2017 - 4:37 pm | मनो

विडिओ शूटिंगची सोया मंडळात आहे का पाहतो. नक्कीच कारेन जर जमत असेल तर.

आज संध्याकाळी ६.३० वाजता सभा सुरु होईल, इतिहासात रस असलेल्या सर्वानी जरूर या.