माझ्या स्वर्गवासी पत्निसाठी.....
सख्ये तुझ्या आठवणी
टच्च डोळ्यामध्ये पाणी
एक एक चांदणी
ओघळली....
***********
अजूनही तुझी वेणी
मी शोधितो गं साजणी
आपुल्या शयनी
पुन्हा पुन्हा....
************
कोण खुळा तुला सांगतो..?
मी अजुनही एकटाच रहातो..
खोटेच सांगतो...
हा बघ एकान्त घेउन उशाला
मी रोज झोपतो..
खरे सांगतो...
बघ तर येउन ..
मी वाट पहातो
वाट पहातो.....
***********
प्रतिक्रिया
19 Oct 2008 - 10:37 pm | प्रथमेश गोखले
भावस्पर्शी कविता,
आपला आरंभशूर (|: !!!!!!!.......
19 Oct 2008 - 10:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय बोलणार, मन हेलावून टाकलंत.
19 Oct 2008 - 11:34 pm | शितल
खुप सुंदर कविता.
:)
19 Oct 2008 - 11:41 pm | मीनल
क्लास आहे .
या शब्दातून आठवणींची ईंटेंसिटी कळते आहे.
मीनल.