बलात्काराच्या तक्रारी : खोट्या की खर्‍या

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
31 Jul 2017 - 3:35 pm


प्रेमसंबंधांमध्ये परस्पर संमतीनं दोघेही शरीरसंबंध ठेवतात. पण प्रेमसंबंध तुटल्यानंतर काही महिला कायद्याचा अस्त्र म्हणून वापर करत बदल्याच्या भावनेतून संबंधित व्यक्तीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असं स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. यावेळी न्यायालयानं बलात्कार प्रकरणातून एका सरकारी अधिकाऱ्याची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

पुढे असंही म्हटलंय

एका महिलेनं आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. तसंच लग्नाआधी पतीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा खटलाही दाखल केला होता. कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणी खटला चालला. २०१६ मध्ये कनिष्ठ न्यायालयानं तिच्या पतीची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटका केली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला संबंधित महिलेनं उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. पतीवर बलात्कार प्रकरणी खटला चालवण्यात यावा, अशी मागणी याचिकेत केली होती. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. लिन्क पहा
http://www.loksatta.com/desh-videsh-news/some-women-term-consensual-acts...

पुण्यातल्या एका प्रकरणात एका महीलेने(वय 41) एका युवा नेत्याविरुद्ध(वय 38) अशीच तक्रार दाखल केली आहे.

पब्लिक फिगर असलेल्या, राजकारणातल्या व्यक्तींवर अशा तर्‍हेचे आरोप करण्याच्या अनेक बातम्या येताहेत. यातल्या किती तक्रारी खर्‍या आणि किती खोट्या ? एक लिमिट क्रॉस केल्याने न्यायालयाने इथे फटकारलेले आहे. विशेषतः मोठ्या लोकांना अशा प्रकरणात अडकवून केलेला हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार तर नसतो ना अशी शंका येते.

याहूनही खरा प्रश्न हा आहे की अशा तक्रारी येत राहील्या तर जिथे खरोखरच अन्याय घडत आहे त्याची दखल घेतली जाईल का ? की अशाने खर्‍याखुर्‍या तक्रारीतले गांभीर्य कमी होइल

मांडणीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

31 Jul 2017 - 5:18 pm | ज्योति अळवणी

बलात्कार म्हणजे मनाविरुद्ध किंवा खोटी आशा दाखवून केलेला संभोग. तो पति ने केला तरी आणि/किंवा इतर कोणीही केला तरी चूकच. तक्रारदार महिलेला तक्रार करण्याचा अधिकार आहे. ती तक्रार खरी की खोटी हे प्रामाणिकपणे शोधणं पोलिसांचा काम आहे.

त्यामुळे एखादी तक्रार खोटी आहे हे सिद्ध झालं तरीही तक्रारी येत राहणारच. या तक्रारींना पूर्वग्रह दूषित नजरेने न बघता त्यातील अन्यायी व्यक्तीला शिक्षा करणं हे पोलिसांच आणि न्यायालयाच काम आहे.

पिलीयन रायडर's picture

31 Jul 2017 - 7:17 pm | पिलीयन रायडर

खोटी आशा दाखवुन ठेवलेला शरीर संबंध बलात्कार कसा? जर दोघेही सज्ञान असतील तर महिलेने स्वतःच्या इच्छेने घेतलेला निर्णय असतो तो. त्यात बळजबरी नसते.

जिथे दोघांच्या संमंतीने संबंध ठेवले गेले आहेत तिथे न्यायालयाने काय करावे? केवळ कायदा महिलांच्या बाजुने आहे म्हणुन पुरुषांना शिक्षा होऊ शकत नाही.

नर्मदेतला गोटा's picture

1 Aug 2017 - 12:15 am | नर्मदेतला गोटा

होय

आजकाल किती तरी पेज थ्री स्त्रिया पुरुषांना वापरून फेकून देतात, डोईजड झाला की नवा शोधतात. कोणत्या कायद्याचा कसा वापर करायचा आणि कशी बोंब ठोकायची हे त्यांना पुरते माहीत असते.

पण

या बायकांच्याच प्रकरणात प्रशासन यंत्रणा अडकली आहे. जिथे खरोखरच अन्याय घडत आहे, जिथे मेडिया पोचत नाही अन्यायाला वाचा फुटू शकत नाही ती प्रकरणे मात्र यामुळे दुर्लक्षिली जातात

mayu4u's picture

2 Aug 2017 - 11:32 am | mayu4u

कायदे/नियम स्त्रियांच्या बाजूने बनवले गेल्याचे हे दुष्परिणाम असावेत.

र च्या क ने : कार्यालयातल्या एका policy चं नाव सुद्धा "prevention of sexual harassment of women " असं आहे.

तो पति ने केला तरी आणि/किंवा इतर कोणीही केला तरी चूकच.>> http://www.loksatta.com/kaydyacha-nyay-news/physical-forces-issue-after-...

पण मी काय म्हंते त्या 'premarital sex is as good as marriage' केस लॉ च काय झालं??

एमी's picture

3 Aug 2017 - 9:03 am | एमी

If any unmarried couple of the right legal age “indulge in sexual gratification,” this will be considered a valid marriage and they could be termed “husband and wife,” the Madras High Court has ruled in a judgment that gives a new twist to the concept of premarital sex.
The court said that if a bachelor has completed 21 years of age and an unmarried woman 18 years, they have acquired the freedom of choice guaranteed by the Constitution. “Consequently, if any couple choose to consummate their sexual cravings, then that act becomes a total commitment with adherence to all consequences that may follow, except on certain exceptional considerations.”
The court said marriage formalities as per various religious customs such as the tying of a mangalsutra, the exchange of garlands and rings or the registering of a marriage were only to comply with religious customs for the satisfaction of society.

http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/couples-who-have-premar...

वरील केसेसचा निकाल या बातमीतल्या केस-लॉ ला गाइडलाइन मानुन का देत नाहीत?

कोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत कुठे बघायला मिळेल का?

एमी's picture

4 Aug 2017 - 6:32 am | एमी

शोधावे लागेल.

मला आठवतेय त्यानुसार या निकालानंतर सोमि वर बराच गदारोळ झालेला. मग 4-5 दिवसांनी त्या न्यायाधीशांनी एक एक्सप्लेनेटरी नोट काढलेली त्यात हा निकाल कसा योग्य आहे हे अगदी व्यवस्थित सांगितलेल.

वरील गुन्हे (हो गुन्हेच!!) कोणत्या हेडरखाली टाकावे हा प्रॉब्लेम आहे. एकतर त्यासाठी वेगळा कायदा करा (फसवणुकीचा गुन्हा; something like posydated cheque bounce) किंवा तो मद्रास कोर्टचा केसलॉ तरी वापरा.

नर्मदेतला गोटा's picture

6 Aug 2017 - 12:57 am | नर्मदेतला गोटा

something like postdated cheque bounce

काय उपमा दिली आहे व्वा

नर्मदेतला गोटा's picture

6 Aug 2017 - 8:23 pm | नर्मदेतला गोटा

वस्तु सेवा विनिमय म्हणता येइल का

हो येईल की! (त्या 2बहक वगैरे बघून लगीन करणार्यापण 'वस्तू-सेवा'चीच किंमत मागत असतात. तो काय भाकर्या बडवण्याचा पागार असतो का :D)

उदय's picture

7 Aug 2017 - 6:35 am | उदय

मग 4-5 दिवसांनी त्या न्यायाधीशांनी एक एक्सप्लेनेटरी नोट काढलेली त्यात हा निकाल कसा योग्य आहे हे अगदी व्यवस्थित सांगितलेल.

ही बातमी कुठे मिळेल? हे तर एकदम इंटरेस्टिंग प्रकरण दिसतंय.

बापू नारू's picture

3 Aug 2017 - 2:02 pm | बापू नारू

"पुण्यातल्या एका प्रकरणात एका महीलेने(वय 41) एका युवा नेत्याविरुद्ध(वय 38) अशीच तक्रार दाखल केली आहे."

युवा नेता कसला? सरळ म्हणा कि टिळकांचा दिवटा आहे .

एमी's picture

6 Aug 2017 - 6:39 am | एमी

खिक् :P
त्यापेक्षा 'टिळक कसे यंव टिळक कसे त्यंव' बोलत बसणे 'त्यांना' जास्त सोयीस्कर आहे :D

एकुलता एक डॉन's picture

8 Aug 2017 - 3:19 pm | एकुलता एक डॉन

नेमके टिळक जयंती असतानाच तिला बलात्कार चा साक्षात्कार झाला ते पण ५ वर्षाने ?

नोंद- मी कोणत्याही पक्षाचा पाठीराख नाही