माझ्या प्रिय मित्र्-मैत्रिणिनो, ही माझी पहिलिच वेळ आहे, माझी स्वताहाची एखादि कविता कोणासमोर तरी ठेवायची. मला जराशी भीती ही वाटते आणी उत्सुकताही. मी मुम्बईत जन्माला आलो आणी कापड गिरण्या बन्द पडल्या म्हनुन लहान्पणीच गावाकडे गेलो. एक जिद्द होती मुम्बईत यायची. नोकरी मिळवायची. मी एका मोठ्या कम्पनीत २ वर्षान्पासुन कामाला आहे . कायम स्वरुपी नोकरी आहे माझी. आता गरज आहे एका घराची. माझ्या हक्काच्या घराची. यावर सुचली काल एक कवीता, -
पहाटेच पाखरु सान्जेला
घरट्याकडे फिरते
मी शोधतो आजही
आहे माझे कुठे घरटे
स्वप्न पाहण दोष नाही
मी पाहतो पुन्हा पुन्हा
पण जेव्हा राहती अधुरी
मग बनती माझा गुन्हा
पाहुन रस्त्यावर मला
जेव्हा एक खिडकी हसते
दुखी होवुन शोधतो
आहे माझे कुठे घरटे
प्रयत्न चालुच माझे
निर्णयास तारिख नाही
ही वाट किती मोठि
कळायला मार्ग नाही
सगळ्यान्च्याच नशीबी जसे
आयते ताट नसते
दुखी होवुन शोधतो
आहे माझे कुठे घरटे
घरट्यासाठी वणवण आता
सावलीसाठी धड्पड
पाण्यामधल्या माशाची
जणु पाण्यावाचुन तड्फड
विन्चवाचे घर त्याच्या
पाठीवरती असते
मी " तो " नाही
म्हणुन शोधतो
आहे माझे कुठे घरटे
मी " तो " नाही
म्हणुन शोधतो
आहे माझे कुठे घरटे
माझ्या प्रिय मित्र्-मैत्रिणिनो, ही कवीत नसुन माझी एक व्यथा आहे, पण हो आजही माझ्यात जिद्द नक्कीच आहे. मला आत्म् विश्वास आहे की एक दिवस मी माझ घरट मिळवल्याची कवीताही तुम्ही नक्की वाचाल. आणी हो मला नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया. मी वाचेन जरूर.
तुमचाच मित्र्,
प्रतिक्रिया
14 Oct 2008 - 7:32 pm | प्राजु
व्यथा छान मांडली आहे..
शुभेच्छा!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Oct 2008 - 7:56 pm | धुमधडाका
तु काळजी करु नकोस,
अरे घर घर काय करतोस , तु काय ग॑गाराम आहेस का? मिळेल तुला तुझ॑ घर,
जरा धीर धर, होईल ना सगळ॑ छान. अस॑ घर जे सगळया॑ना सुखावेल. जे कुणाकडेच नसेल.
तुझा मित्र,
धुमधडाका
15 Oct 2008 - 12:17 am | चन्द्रशेखर गोखले
वेडा ! मुम्बईत घर मिळायला तु काय भैय्या आहेस. चल फुट कल्याणच्या पुढ.
15 Oct 2008 - 12:17 am | चन्द्रशेखर गोखले
वेडा ! मुम्बईत घर मिळायला तु काय भैय्या आहेस. चल फुट कल्याणच्या पुढ.