अविनाशीत्व

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in जे न देखे रवी...
2 Jul 2017 - 7:19 pm

ग्रीष्माच तप्त ऊन ,
पुरातन काळ्याशार मंदिराचा रणरणता प्रदक्षिणा मार्ग
गावोगावच्या आबाल वृद्धांनी
श्रद्धा , भक्ती , उपचार , सोपस्कार आणि दृढ विश्वासावर जागृत ठेवलेलं देवस्थान
पूजा , आरत्या , फेर्या , लोटांगणे
यांनी तापलेल्या वास्तवाला शमवण्यासाठी देवाला दिलेली हाक
देवाने ऐकली बहुतेक.
कारण ..
यानंतर जवळच्या संगमावरून गार वारे वाहू लागले
नंदादीप उजळले ,
दीप माळांनी तळावलेल्या डोळ्यांचे पारणे फिटले
आरत्या - कीर्तनांच्या आवाजाने कान
तर प्रसादाच्या माधुर्याने जठराग्नी निवळले
अचानक आलेल्या समाधानाने भक्त लोक प्रदक्षिणा मार्गावरच गाढ सुखाच्या झोपेत प्रवेशले..
कोणतीही जातीपातीची वर्गवारी न करता.
जाग्या होत्या तीन अविनाशी गोष्टी
शांत चंद्र तारांकित आकाश
झुळूकांवर झळकणारा धर्मध्वज
आणि नदीवर थांबून राहिलेला पहाटेचा पहिला सूर्यकिरण !

फ्री स्टाइलकविता