एक फक्कड लावणी

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जे न देखे रवी...
12 Oct 2008 - 11:25 am

"फक्कड" लावणी

रेशमाच्या बाबांनी ...

रेशमांच्या बाबांनी, काल लाथा, बुक्कयांनी
बाकपुरा आहे, माझा, काढीला....
हात नगा लावू माझ्या बॉडीला... ।।धृ।।

चूक झाली माझी, लाखमोलाची ...
विचारल मी ही, पोर, कोणाची गं कोणाची
विसरलो आहे कोण, आहे कोण जोडीला...
हात नगा लावू, माझ्या बॉडीला...।।१।।

जात होती वाटेनं ती तोऱ्यात ...
अवचित आला, बाप, म्होऱ्यात गं म्होऱ्यात
आणि माझ्या नरडीला, धरूनिया ओढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला...।।२।।

भीड नाही केली, आल्या गेल्याची...
मागितली माफी, मी त्या, मेल्याची गं मेल्याची
म्हणेन मी आता, 'ताई', तुमच्या या घोडीला
हात नगा लावू , माझ्या बॉडीला...।।३।।

कवी - श्री.अज्ञात

विनोदविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 11:30 am | विसोबा खेचर

ही लावणी एकेकाळी आम्ही ज्यांना आमचे मित्र मानत होतो त्या केशवसुमारांनी लिहिलेली आहे..

तात्या.

शशिकांत ओक's picture

12 Oct 2008 - 11:34 am | शशिकांत ओक

माहितीसाठी धन्यवाद.

ऋषिकेश's picture

12 Oct 2008 - 12:47 pm | ऋषिकेश

:)
फक्कड लावणी आहे. केसु म्हणजे केसुच!!! बर्‍याच दिवसांनी केसुचे विडंबन वाचून बरे वाटले..
धन्यवाद ओकसाहेब! :)

बाकी "आणि माझ्या नरडीला, धरूनिया ओढीला" हे चुकुन "आणि माझ्या नाडीला , धरूनिया ओढीला" असे वाचले ;)
ह. घ्यालच !

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

र's picture

4 Nov 2008 - 11:27 am |

सुरेख

पूजादीप's picture

4 Nov 2008 - 11:53 am | पूजादीप

झक्कास लावणी ...