खास पाहिजे असलेल्या पुस्तकांसाठी मदत धागा

उपेक्षित's picture
उपेक्षित in जनातलं, मनातलं
7 May 2017 - 6:09 pm

बरेच दिवस झाले हा धागा काढायच्या विचारात होतो पण राहून जात होते, आजच मोदकचा पुस्तकावरचा धागा पाहून परत उचल खाल्ली.

तर मंडळी बर्याचदा आपल्याला एखादे पुस्तक अथवा एखाद्या विषयावरचे पुस्तक पाहिजे असते पण ते कसे/ कुठे मिळेल याची माहिती नसते तर या धाग्याचा उद्देश हाच आहे कि तुम्हाला पाहिजे असलेल्या पुस्तकाची इथे तुम्ही चौकशी करू शकता, ते कुठे मिळेल याचे पण इथे इतर सदस्य मार्गदर्शन करतील.

काही वेळा पुस्तकाचे नाव माहित असेल तर चटकन मिळून पण जाते पण बर्याचदा आपल्याला एखाद्या विशिष्ठ विषयावरचे पुस्तक पाहिजे असते ज्याचे नाव आपल्याला माहित नसते तर त्यासाठी पण कदाचित इथे मदत होऊ शकते.

धागा छोटा आहे पण माझ्या आणि इतर सदस्यांसाठी खूप महत्वाचा आहे.

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

मितान's picture

7 May 2017 - 7:00 pm | मितान

खरंच खूप उपयुक्त धागा.

मला 'कायाकल्प' या नावाचे ढवळे प्रकाशनाचे भि के गुर्जर-पाध्ये यांचे पुस्तक कुठेही सापडत नाहीये !

कोणाला सापडल्यास प्लिज सांगा.

पिशी अबोली's picture

8 May 2017 - 11:06 am | पिशी अबोली

हे माझ्या घरी आहे, पण मी घरी लवकर जाणार नाहीये. तुला वाचायचं असेल तर मी घरी जाईन तेव्हा घेऊन येईन.

मितान's picture

10 May 2017 - 9:21 pm | मितान

हे काखेत कळसा झालं की ग ! नक्की आण.

माझी लिस्ट बर्यापैकी मोठी आहे तरी त्यातल्यात्यात छोटी करून टाकतोय :)

खालील पुस्तके मराठीत / अनुवादित पाहिजे आहे (आमचे इंग्रजी थोडे विक आहे )

१) मंगोलियन योद्धा चेंगीझखान याच्याबद्दलचे एखादे पुस्तक कुणाला माहित असल्यास कृपया इथे नाव आणि कुठे मिळेल ते सांगा.

२) चंद्रगुप्त मौर्य/ बिंदुसार/ सम्राट अशोक यांच्या बद्दलचे सकस पुस्तक वाचायला खूप आवडेल so यांची चांगली पुस्तके प्लीज सांगा कुणीतरी.

३) इजिप्तशियन / माया संस्कृती याबद्दली पुस्तके सुद्धा रेफर करा.

हुश

जयंत कुलकर्णी's picture

7 May 2017 - 7:55 pm | जयंत कुलकर्णी

चेंगीझखानवर मी एक मोठे पुस्तक लिहिण्यास घेतले आहे.... पण अजून एक वर्ष तरी लागेल.

वाह जयंत सर तुमचे येथील लिखाण आणि अनुवाद यांचा पूर्वीपासून चाहता आहे आणि आता हे पुस्तक म्हणजे पर्वणीच म्हणायची.
पण १ वर्ष थांबायचे म्हणजे :( तोवर मराठीतील या विषयावरचे एखादे दुसरे पुस्तक रेफर करू शकलात तर आभारी असेल :)

मंगोलियन योद्धा चेंगीझखान याच्याबद्दलचे एखादे पुस्तक कुणाला माहित असल्यास कृपया इथे नाव आणि कुठे मिळेल ते सांगा.

पुस्तक नाही, पण चेंगीझखानावर Dan Carlin चा Wrath of Khans नावाचा पॉडकास्ट फार उत्तम आहे.

चेंगीझखान ह्याच्याबद्दल अल्प माहिती रियासतकार सरदेसाई ह्यांच्या मुसलमानी रियासतीत मिळेल.

सम्राट अशोकाबद्दल रोमिला थापर ह्यांचे 'अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास' हे अभ्यासपूर्ण पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संस्थळावर पीडीएफ स्वरूपात उतरवून घेता येते(मराठी अनुवाद आहे).

चंद्रगुप्त मौर्यावर मॅगेस्थेनिका इंडिका ह्या ग्रंथात माहिती मिळेल. तो बहुधा अर्काएव्ह. ऑर्ग वर उपलब्ध आहे.

उपेक्षित's picture

8 May 2017 - 1:55 pm | उपेक्षित

धन्यवाद प्रचेतस आणि आदुबाळ

+१ माहिती दिल्यानंतर हा प्रतिसाद पाहिला.
इंडिका फारशी माहिती नाही देत. पण उत्तम ग्रंथ आहे.

सागर's picture

10 May 2017 - 9:41 pm | सागर

१. चंगीजखान द एम्परर - हे उषा परांडे यांचे उत्तम पुस्तक आहे. आता ग्रंथालयातूनच मिळेल.
२. कादंबरी हवी की अभ्यासण्यासाठी हवी हे स्पष्ट केले असते तर नेमके सुचवता आले असते.
रोमिला थापर यांचे अशोक आणि मौर्यांचा र्‍हास हे उत्तम पुस्तक आहे. यात मौर्य घराण्याचा सगळा इतिहास आलाय. पण प्रमुख फोकस अशोकावर आहे. याची पीडीएफ उपलब्ध आहे ऑनलाईन. अनेकांनी गूगल ड्राईव्ह वर अपलोड केलेली आहे. पीडीएफ साठी आपला मित्र मोदक याला व्यनि करावा. तो मदत करु शकेल.
कादंबरी स्वरुपात ह.ना. आपटे यांचे चंद्रगुप्त हे पुस्तक आहे पण याची मराठी जुनी असल्यामुळे भाषा बोजड वाटू शकते. स्पेसिफिकली चंद्रगुप्त मौर्यावर आहे. बिंदुसारावर बहुतेक एक कादंबरी आहे. नीटसे आठवत नाहिये.
३ . इजिप्त आणि माया संस्कृतीवर इंग्रजीतून भरपूर पुस्तके आहेत. मराठीतूनही आहेत पण फारशी नाहीत. या बाबतीत मदत नाही करु शकत. इजिप्शियन व माया संस्कृतीची तोंड ओळख करुन घ्यायची असेल तर माझ्या ब्लॉगवर माहिती दिली आहे.
इजिप्शियन संस्कृती

चंद्रगुप्त मौर्य मिपावरील माझा जुना लेख

उपेक्षित's picture

11 May 2017 - 9:30 pm | उपेक्षित

धन्स सागर
कादंबरी पाहिजे आहे अभ्यासाचे वाय नाय आमचे आता :) (तसा पण जेव्हा करायचा तेव्हा पण आमचा दिवा निट लागला नाही कधी :) )

सतिश गावडे's picture

7 May 2017 - 7:37 pm | सतिश गावडे

मी मेजर रामचंद्र साळवींचे "स्वाधीन की दैवाधीन" हे पुस्तक अनेक वर्ष शोधत होतो.

हे पुस्तक मी अगदी न कळत्या वयात वाचलेलं पहिलं पुस्तक. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटीश आर्मीकडून लढणार्‍या भारतीय सैनिकांना ईटलीतील एका टेकडीवरील जंगलात अज्ञातवासात रहावे लागते आणि अन्न न मिळाल्यामुळे जंगलातील गोगल गायी खाऊन दिवस काढावे लागत असतानाच हे लपलेले सैनिक टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या खेड्यातील गावातील लोकांच्या नजरेस पडतात आणि ते गावकरी या सैनिकांना कसे अन्न पुरवतात, त्यांना शोधायला आलेल्या शत्रु सैनिकांपासून कसे लपवतात याचे चित्त थरारक वर्णन आहे. हे सत्य कथानक आहे.

हे पुस्तक फक्त कळव्यातील एका वाचनालयात दिसत होते आणि रसिकच्या वेबसाईटवर आऊट ऑफ स्टॉक दिसत होते.

हा धागा वाचून ते पुस्तक शोधण्याची उर्मी पुन्हा जागृत झाली आणि चक्क ते पुस्तक रसिकच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे असे दिसले. लगेच ऑर्डर केले, आशा आहे की ते पुस्तक मला मिळेल.

धन्यवाद उपेक्षित. :)

वाह सतीश जी तुमच्यामुळे मलाही एका वेगळ्या पुस्तकाची माहिती समजली आभारी आहे.

टवाळ कार्टा's picture

7 May 2017 - 8:36 pm | टवाळ कार्टा

भारी वाचनालय आहे ते...मी शाळेत असताना मे महिन्याच्या सुट्टीत सकाळी जाउन पुस्तक आणणे....दुपारी वाचून संध्याकाळी परत करून दुसरे पुस्तक आणणे, दुसरे पुस्तक रात्री वाचून संपवून दुसर्या दिवशी सकाळी बदलून तिसरे पुस्तक घेणे असे उद्योग केलेले आहेत...तिथला स्टाफसुद्धा ओळखायला लागलेला...लायब्ररी उघडल्या उघडल्या येणारा पहिला नमुना म्हणून =))

सतिश गावडे's picture

7 May 2017 - 8:44 pm | सतिश गावडे

शाळेच्या दिवसांमध्ये मी ही असाच होतो.

रच्याकने, रसिककडून मला हे पुस्तक जर नाहीच मिळाले तर एखाद्या आठवड्यासाठी हे पुस्तक तू मला त्या वाचनालयातून मिळवून दे. :)

टवाळ कार्टा's picture

7 May 2017 - 11:47 pm | टवाळ कार्टा

आता मी तिथे नाही जाऊ शकत :D

विशाल कुलकर्णी's picture

8 May 2017 - 10:33 am | विशाल कुलकर्णी

जवाहरच्या कात्रे मॅडम आणि देशपांडे मॅडम माझ्यावर सुद्धा दात खावून असायच्या. ४०० पानी पुस्तक एका दिवसात संपतेच कसे म्हणुन ;)

प्रसन्न३००१'s picture

12 May 2017 - 11:34 am | प्रसन्न३००१

अरे वा, कळवेकर पण आहेत कि मिपावर. सहीच....

मी सुद्धा लहानपणी जवाहर मधून बरीच पुस्तकं आणायचो. मे महिन्यात त्यांची लहान मुलांसाठी लायब्ररी चालू व्हायची. ती चालू झाली कि स्वतः लायब्ररी मधून पुस्तकं आणण्यात एक वेगळंच फिलिंग यायचं...

पुढे १२वीच्या अभ्यासासाठी जवाहरची अभ्यासिका पण जॉईन केलेली. त्यावेळी आम्ही साधारण १५-१६ मुलं होतो बारावीची. मुख्य लायब्ररी बंद झाली कि रात्री ९ वाजल्यापासून रात्री साधारण २ वाजेपर्यंत आमचा सगळ्यांचा धुडगूस चालायचा.. नंतर त्यांनी अभ्यासिका रात्री १० ला बंद करायला सुरुवात केली.

पण ब्येष्ट होती ती लायब्ररी.. त्यांच्याकडे जेवढी पुस्तकं आहेत तेव्हढी मी तरी अजून दुसऱ्या कोणत्या लायब्ररी मध्ये पहिली नाही.

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी :-D

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Mar 2019 - 6:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

सार्वजनिक वाचनालय कल्याण, शिवाजी चौक- येथे असणारा प्रचंड संग्रह कळ व्याच्या जवाहरपेक्षा नक्कीच जास्त असेल.

फारएन्ड's picture

7 May 2017 - 11:56 pm | फारएन्ड

उपयुक्त धागा आहे. मी राजा गोसावी चे आत्मचरित्र अनेक दिवस शोधतोय. पुण्यातही अनेक ठिकाणी शोधले पण मिळाले नाही. कोणाला कोठे मिळेल ते माहीत असेल तर सांगा.

जालिम लोशन's picture

13 Mar 2019 - 7:18 pm | जालिम लोशन

या नावाने लिहीलेले त्यांच्या बायकोचे पुस्तक अप्पा बळवंत चौकातील लायब्ररीमधे उपलब्ध आहे. तिथल्या दुकानांनमध्ये सुध्दा मिळेल.

डॉ अलका मांडके यांचे "हृदयबंध" नावाचे एक पुस्तक आले होते. त्या पुस्तकात अनेक लोकांनी लिहिलेले डॉ नितू मांडके यांच्याविषयीचे श्रद्धांजलीपर लेख एकत्र केले होते.

ते पुस्तक कुठे मिळेल / कोणी वाचले आहे का..?

वरुण मोहिते's picture

8 May 2017 - 12:40 am | वरुण मोहिते

आणि थोडं अतिरंजित आहे .

मोदक's picture

8 May 2017 - 12:59 am | मोदक

अतिरंजित..?

विशाल कुलकर्णी's picture

8 May 2017 - 10:34 am | विशाल कुलकर्णी

हृदयस्थ आहे माझ्याकडे. हृदयबंध काही नाही वाचलेले.

कवितानागेश's picture

8 May 2017 - 1:11 am | कवितानागेश

कुणाकडे बाकी शून्य आहे का?
नको असेल तर मला द्या! :)

प्रचेतस's picture

8 May 2017 - 8:57 am | प्रचेतस

गावडे सरांकडे आहे :)

सतिश गावडे's picture

8 May 2017 - 9:08 am | सतिश गावडे

माझं ढापलं रे कुणीतरी. कुणीतरी वाचायला म्हणून नेलं आणि परत दिलंच नाही. नेमकं कुणी नेलं होतं ते ही आठवत नाही. :(

टवाळ कार्टा's picture

8 May 2017 - 10:25 am | टवाळ कार्टा

पुढच्या वेळेपासून पुस्तक देताना फोटो काढून ठेवत जा....बक्षीस देतो त्या पोज मध्ये =))

अभ्या..'s picture

8 May 2017 - 2:31 pm | अभ्या..

मा. सतीशजी गावडे ह्यांनी स्वहस्ते मला ते पुस्तक दिलेले आहे. "माझ्याच्याने काय वाचणे होणार नाही, तू वाच" असे म्हनून ते पुस्तक मला दिलेले आहे. ते परत मिळणार नाही.
बादवे मी जोसेफ पलित्झरचे अगदी बाळबोध पध्दतीचे मराठी चरित्र वाचलेले आहे, कुणास त्याची माहीती असल्यास द्यावी अन्यथा पुस्तक कुठे मिळेल ते सांगावे.

सतिश गावडे's picture

8 May 2017 - 2:47 pm | सतिश गावडे

>>माझ्याच्याने काय वाचणे होणार नाही, तू वाच
हे RGB(२५५, २५५, २५५) खोटं आहे. मी हे पुस्तक पूर्ण वाचले आहे.

कवितानागेश, तुम्ही हे पुस्तक अभ्या.. यांच्याकडून "रिकव्हर" करु शकलात तर ते तुम्हाला वाचायला मिळू शकेल :)

मी हे पुस्तक पूर्ण वाचले आहे.

सांग बरे कथानायकाला शेवटी कुणाला मारणे अधिक श्रेयस्कर वाटते? ;)
.
लगेच ५ मिन्टात सांगितलास तर पुस्तक तुझ्या घरी पोहोच होईल. ;)

धनाजीराव ऑफर संपलेली आहे, तस्मात आपण ते पुस्तक विसरणे श्रेयस्कर. ;)

आपल्याच अभ्याशेठ यांचेकडे आहे ते बहुधा. आपण सोलापूरला गेल्याशिवाय ते देणार नाहीत म्हणे.

सतिश गावडे's picture

8 May 2017 - 11:38 am | सतिश गावडे

आता आठवले. तोच घेऊन गेला होता एकदा. =))

प्रचेतस's picture

8 May 2017 - 11:46 am | प्रचेतस

बघा, तुम्ही तेव्हाच कार्तविर्याजुनाचा मंत्र म्हणाला असतात तर हे पुस्तक तुम्हाला तेव्हाच सापडले असते, पण तुमची श्रद्धा नाहीच कशावर.

उपेक्षित's picture

8 May 2017 - 2:01 pm | उपेक्षित

साला माझी अशी ३ महत्वाची पुस्तके गेली आहे मर्मभेद (जुनी आवृत्ती होती), शहेनशहा आणि मंत्रावेगळा
(पर्व पण गायब आहे पण कुणाला दिलय ते माहित आहे so :) )

देशपांडे विनायक's picture

8 May 2017 - 9:30 am | देशपांडे विनायक

मला पु य देशपांडे यांचे '' THE AUTHENTIC YOGA " नावाचे पुस्तक हवे आहे
मला ते xerox रूपातही चालेल
सदर पुस्तक '' हचिन्सन पब्लिशिंग ग्रुप " तर्फे "रायडर अँड कंपनी " ने लंडन मध्ये प्रसिद्ध केले

अत्रे's picture

8 May 2017 - 12:01 pm | अत्रे

the authentic yoga p y deshpande free pdf

असे गुगल करा. scribd . com ची लिंक मिळेल. त्या वेबसाइटवर फ्री अकाउंट काढा आणि डाउनलोड करा. (कदाचित एखादी pdf फाइल स्वत: अपलोड करावी लागेल ही फाईल डाउनलोड करण्यासाठी)

देशपांडे विनायक's picture

8 May 2017 - 6:36 pm | देशपांडे विनायक

शतशः धन्यवाद

अबोली२१५'s picture

8 May 2017 - 12:57 pm | अबोली२१५

दुर्ग भागवताचे खमंग पुस्तक आऊट ऑफ प्रिंट आहे.
लक्ष्मीबाई धुरंदर यांचे गृहिणीमित्र हे पुस्तक
हे दोन्ही पुस्तके pdf स्वरूपात ऑनलाईन मिळालं तर लिंक share करा.

यशोधरा's picture

8 May 2017 - 7:14 pm | यशोधरा

मजपाशी आहे खमंग.

अस्वस्थामा's picture

8 May 2017 - 8:12 pm | अस्वस्थामा

प्रकाश संतांचं 'वनवास' शोधतोय कधीचा (आणि शारदा संगीत पण!). मिळत नाहीय आणि आउट ऑफ प्रिंट आहे म्हणे. प्रकाशक 'पुढच्या महिन्यात येईल' असं गेले ३ महिने तरी सांगतायत (नसेल छापणार तर नाही म्हणून सांगायला काय जातं? पुढच्या महिन्यात परत फोन करून तेच ऐकायला लावतेत.. ).

असो, जुनं मिळालं तरी सुस्थितीत असेल तर घ्यायला तयार आहे पण तरी मिळाल नाहीय अजून.

माझ्या एका परिचितांकडे आहेत वनवास, शारदा संगीत आणि पंखा.

श्रीरारा बिपीनराव कार्यकर्ते यांनी भरपूर आग्रह करून चारही पुस्तकांचा सेट घ्यायला लावला होता.

त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार्स. ;)

अस्वस्थामा's picture

11 May 2017 - 9:44 pm | अस्वस्थामा

प्रकाशप्रत चालेल की पण तो शेवटचा ऑप्शन ठेवलाय. मोदकाशी चर्चा झाली होती याबद्दल आणि पुस्तक नाहीच मिळालं तर तेच करायचं मग शेवटी. :)

रुस्तुम's picture

26 Jan 2019 - 1:42 am | रुस्तुम

वनवास परवाच पाहीलं डोंबिवली मँजेस्टिक मध्ये. ...झुंबर ही आहे.

"नांदवी ते वर्षा" हे कुणी वाचले आहे का..?

हे पुस्तक सध्या मिळते का..?

कपिलमुनी's picture

8 May 2017 - 9:55 pm | कपिलमुनी

ज्यूल व्हर्न च्या कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद हवे आहेत .
पुस्तकांची नावे आणि उप्लब्धता दोन्हीची माहिती हवी आहे

कपिलमुनी's picture

10 May 2017 - 5:55 pm | कपिलमुनी

धन्यवाद

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2017 - 9:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जवळपास सगळे अनुवाद वाचुन झालेले आहेत. अत्यंत गंडेश भाषांतर आहे. तस्मात वर्जिणल इंग्रजी वाचं.

mayu4u's picture

11 May 2017 - 6:23 pm | mayu4u

ज्यूल राव फ्रेंच होते ना?

मारवा's picture

8 May 2017 - 10:24 pm | मारवा

बिभीषण दंजेवार आणि जॉन मुडोस्कीच्या कवितांतील आदीम संवेदनांचे तौलनिक परिक्षण. इथेच रामदास यांच्या लेखाचा संदर्भ उत्सुकता आहे

रामदास काकांनी खायची पाने आणि त्यासंबंधी गोष्टींबद्दल एक अप्रतीम लेख लोकप्रभामध्ये लिहिला होता.

त्याची लिंक आहे का कोणाकडे..?

मारवा's picture

8 May 2017 - 10:48 pm | मारवा

१ - जे कृष्ण्मुर्ती यांनी काही कविता लिहिलेल्या आहेत त्याचे पुस्तक.
२- गालिब च्या फारसि शायरि चे रसग्र्हणात्मक अनुवादित हिन्दि मराठी वा इंग्र्जी पुस्तक
३- व्हॉट इज लिव्हींग अन्ड व्हॉट इज डेड इन इन्डीयन फिलॉसॉफि लेखक देबिप्रसाद चट्टोपाध्य्याय

२- गालिब च्या फारसि शायरि चे रसग्र्हणात्मक अनुवादित हिन्दि मराठी वा इंग्र्जी पुस्तक
- गालिबचे उर्दू काव्यविश्व, अर्थ आणि भाष्य. लेखक- डॉ. अक्षयकुमार काळे. पद्मगंधा प्रकाशन
अतिशय सुंदर पुस्तक आहे. नक्की वाचा.

सतिश गावडे's picture

10 May 2017 - 10:54 pm | सतिश गावडे

- गालिबचे उर्दू काव्यविश्व, अर्थ आणि भाष्य. लेखक- डॉ. अक्षयकुमार काळे. पद्मगंधा प्रकाशन

हे पुस्तक परवा पुण्यात अक्षरधाराला पाहीले.

+1.. मी अक्षरधारा मधूनच घेतलं 3 वर्षांपूर्वी..

सानझरी's picture

13 Mar 2019 - 12:48 pm | सानझरी

J. Krishnamurti यांचे 'Poems and parables' हे पुस्तक मला २ वर्षांपूर्वी मला मिळाले. तुमची ही कमेंट वाचुनच मला कळलेलं कि असंही पुस्तक आहे म्हणुन. कृष्ण्मुर्तींनी कविता लिहिल्यात हे माहितीही नव्हतं. मध्यंतरी मिपावर नसल्याने कळवता नाही आलं तुम्हाला.

मला पुढील काही पुस्तके हवी आहेत जी बाजारात उपलब्ध नाहियेत.
झेरॉक्स , स्कॅन , पीडीएफ वा मूळ पुस्तक अशा कोणत्याही स्वरुपात मला ही पुस्तके हवी आहेत.
कोणी मदत करु शकले तर अतिशय आभारी असेन.
१. शकुंतला - आनंद साधले
२. मालविका - आनंद साधले
३. चाणक्य - आनंद साधले
४. वारसा नॉस्ट्राडेमसचा - रेमंड लिओनार्ड - अनु: अनिल काळे

उपेक्षित's picture

11 May 2017 - 9:32 pm | उपेक्षित

चाणक्य - majestic च्या stall वर पाहिल्यासारखे वाटत आहे आठवून सांगतो.

अतिशय उत्तम पुस्तक आहे. घेऊन ठेवा ही आग्रहाची विनंती :)

चित्रगुप्त's picture

18 May 2017 - 2:02 pm | चित्रगुप्त

'आत्मसामर्थ्य योग' हे पुस्तक मला हवे आहे. लेखक बघुतेक) अ.ल. भागवत.

वासंती मुझुमदार यांचं 'झळाळ' हे पुस्तक मला हवं आहे. कुठे मिळेल कुणी सांगू शकेल का..

उपेक्षित's picture

6 Dec 2017 - 8:59 pm | उपेक्षित

मुद्दाम धागा वर काढतोय...

उपेक्षित's picture

25 Jan 2019 - 3:05 pm | उपेक्षित

लुचाई व अनोळखी दिशा खंड 1, खंड 2 आणि खंड 3 ही पुस्तके नुकतीच उपलब्ध झाली आहेत. ती नारायण धारप ग्रुपतर्फे सवलतीत उपलब्ध करून देण्याबद्दल आमची प्रकाशकांशी बोलणी झाली होती. तर ही पुस्तके आता तुम्हाला कशी ऑर्डर करायची यासंदर्भात माहिती देण्यासाठीची ही पोस्ट आहे.
आम्हाला साकेत प्रकाशकांच्या कार्यकर्त्यांनी काही नंबर दिले आहेत, त्यावर फोन करून तुम्हाला ऑर्डर बुक करावी लागेल.आणि तुमचा पत्ता वगैरे माहिती त्यांना द्यावी लागेल. बुकिंग करताना त्याचं पेमेंट कसं करावं याची माहिती तुम्हाला त्याच फोनवर दिली जाईल.तसेच पुणे व औरंगाबाद मधील लोक थेट त्यांच्या ऑफिसमध्ये भेट देऊ शकतात. ऑफिसचा पत्ता देखील खाली देत आहोत.
बुकिंग करताना तुम्ही या नारायण धारप ग्रुपचा रेफरन्स दिला असता तुम्हाला प्रत्येक पुस्तकावर 25 टक्के डिस्काउंट मिळेल.
पुस्तकांच्या किमती व सवलत दर
1) लुचाई = मूळ किंमत 300 रुपये , सवलत 25 टक्के.
सवलतीची किंमत = 225 रुपये.
2) अनोळखी दिशा खंड 1= मूळ किंमत 325 रुपये , सवलत 25 टक्के.
सवलतीची किंमत = 244 रुपये.
3)अनोळखी दिशा खंड 2= मूळ किंमत 325 रुपये , सवलत 25 टक्के.
सवलतीची किंमत = 244 रुपये.
4) अनोळखी दिशा खंड 3 = मूळ किंमत 325 रुपये , सवलत 25 टक्के.
सवलतीची किंमत = 244 रुपये.
संपूर्ण सेटची सवलतीची किंमत = 957 रुपये. आधिक पोस्टल चार्ज.
यातील एक किंवा अधिक पुस्तके तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्ही कुठे रहाता त्यावरून तुम्हाला पोस्टल चार्ज (डिलिव्हरी चार्ज) लागेल. तुम्ही सर्व पुस्तके एकदमच ऑर्डर केली तर डिलिव्हरी चार्ज एकदाच लागेल.
ऑर्डर साठी फोन नंबर व पत्ता :
पुणे
फोन नं : 09422225407
020-24436692
पत्ता (पुणे ब्रँच):
साकेत प्रकाशन ,373,
शनिवार पेठ,अपोझिट पाटे हाइट्स,
कागद गल्ली ,पुणे 30
औरंगाबाद
फोन नं : 9881745605
0240-2332692
पत्ता (औरंगाबाद ब्रँच) :
115, स्टेशन रोड,
महात्मा गांधी नगर,
औरंगाबाद 431005.
ही पुस्तके आपल्या ग्रुपच्या रेफरन्सने का खरेदी करावी ??
तर ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात ,या ग्रुपच्या ऍडमीन टीमचा कोणताही आर्थिक फायदा नाही. फक्त हेतू हाच की आपल्या ग्रुपतर्फे सदस्यांना पुस्तके सवलतीत उपलब्ध व्हावीत, तसेच इथून तुम्ही ऑर्डर केल्यास आपल्या ग्रुपचं नावलौकिक वाढावं जेणेकरून आपण सर्वांना नारायण धारप यांची आधिकाधिक पुस्तके उपलब्ध व्हावीत.आणि पर्यायाने आपले सर्वांचे आवडते लेखक नारायण धारप यांच्या लेखनाची माहिती आधिक लोकांपर्यंत पोहचावी. हा हेतू आहे. तरी तुम्हा सर्वांना विनंती आहे की किमान एकतरी पुस्तक नक्कीच खरेदी करा. सर्व केलात तर त्याला तोड नाही.ते उत्तमच.
तसेच ऑर्डर करताना आपल्या ग्रुपचं नाव घ्यायला विसरू नका.

विनिता००२'s picture

30 Jan 2019 - 4:07 pm | विनिता००२

मी घेतलीत पुस्तके :)

चांगली माहिती __/\__

विनिता००२'s picture

30 Jan 2019 - 4:10 pm | विनिता००२

मी एक पुस्त्क शोधतेय...साधारण थीम अशी होती की एक डॉक्टर कम संशोधक आदिवासींच्या त्वचेवर माशांचे खवले रोपण करतो.
मला आता पुस्तकाचे नाव, लेखक कोणीच आठवत नाहीये. कृपया कोणाला माहित असेल तर सांगावे __/\__

बाप्पू's picture

30 Jan 2019 - 7:37 pm | बाप्पू

मिपावर कोणी japanese शिकत आहे का किंवा शिकलेले आहेत का ?? कोणी उपयुक्त पुस्तके सुचवू शकेल का??

जालिम लोशन's picture

13 Mar 2019 - 8:20 pm | जालिम लोशन

पुण्यात लक्ष्मीनारायण चौकात मुकंदनगर च्याबाजुला जालतापचे आॅफीस आहे तिथे निहोंगो श्योहो नावाची जापानी पाठ्यपुस्तकांची series मिळते ती वापरा.

सानझरी's picture

13 Mar 2019 - 12:47 pm | सानझरी

Hermann Hesse- 'Wandering : Notes and sketches' हे पुस्तक किंवा pdf आहे का कोणाकडे? झेरॉक्सही चालेल.