आशा

गुंडोपंत's picture
गुंडोपंत in जे न देखे रवी...
10 Dec 2007 - 1:33 pm

काही सुचत नाही
काही टोचत नाही
रस्त्यावरच्या छोट्या मुलीने विकलेली फुलं बोचायची
मनाला सवय तरी होती दुसर्‍याचा विचार करायची
पण हल्ली मी असले विचारही वेचत नाही
हल्ली मनाला फार काही टोचतही नाही
जरडच झालोय मी, तुटल्यासारखा,
जख्ख म्हातार्‍या वाळल्या खोडासारखा

तरी आशा आहेच, कधी तरी खोडाला पान येईल
जरड झालेल्या मला, एक विचार करणारं मन येईल.
मग मलाही कणव येईल त्या रस्त्यावरच्या छोट्या मुलीची
मी ही काही तरी करणे लागतो रे, ही उभारी येईल मनाची.
मला काही टोचत नाही, ही निर्लज्ज भावनाही संपुन जाईल
एक दिवस कुणासाठी काही करण्याचे सुख घेवून येईल

पण तोवर सत्य हेच... मी एक जरड जख्ख... बोथट बनचूका!
--------------------------------------- १०-१२-२००७

------------------------------------------------------
कशानेच काही फरक पडत नाही मनाला असे का?
सगळे जग गांडू आहे हे म्हणण्याआधी आत डोकावून पाहिले की मग दिसते,
आपण किती षंढ झालो आहोत. किती जग बदलावे? काय करावे...
ही बोचरी भावना मनातून जात नाही हेच खरे, या भूमिकेतून वरचे शब्द उतरले.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Dec 2007 - 4:58 pm | विसोबा खेचर

तरी आशा आहेच, कधी तरी खोडाला पान येईल
जरड झालेल्या मला, एक विचार करणारं मन येईल.
मग मलाही कणव येईल त्या रस्त्यावरच्या छोट्या मुलीची
मी ही काही तरी करणे लागतो रे, ही उभारी येईल मनाची.

क्या बात है... आशा अमर आहे! छान लिहिलं आहेस हो गुंड्या!

पण काय रे, असा एकदम अचानक निराशावादी आणि जरड कशापायी झालास? हम्म! मिपावर नाहीतरी तुझा वावर तसा कमीच असतो, तो जरा वाढव म्हणजे सगळी जरडता निघून जाईल आणि चांगला ताजा-टवटवीत-भांडखोर आणि शिवराळ होशील! :)

असो, मस्करी अपार्ट, पण कविता खरंच छान केली आहेस. प्रकटन सहजसोप्या शब्दात आणि प्रांजळपणे उतरलंय! मला अशा प्रकारच्या कविता आवडतात!

अवांतर - अर्ध्यसत्य चित्रपटात अशीच एक फार सुरेख कविता आहे. ओम पुरीच्या स्वरात ती ऐकायला खूप छान वाटते! मिळाल्यास देईन इथे केव्हातरी!

तात्या.

पण काय रे, असा एकदम अचानक निराशावादी आणि जरड कशापायी झालास?
काही घटनांमधले अंग काढून घेतले तरी मनाला त्या क्षणी लाज वाटली नाही याची खंत नंतर जाणवली. पण वेळ गेली होती.
असे पुन्हा आपल्या हातून अजाणतेपणीही घडू नये असे वाटून हे शब्द आले आहेत.

आपल्याला काही गोष्टी पुर्वी जशा जाणवायच्या तशा आता जाणवत नाहीते हे कळले. त्याने अजूनच अस्वस्थता आली.
असो.
मिपावर नाहीतरी तुझा वावर तसा कमीच असतो, तो जरा वाढव म्हणजे सगळी जरडता निघून जाईल आणि चांगला ताजा-टवटवीत-भांडखोर आणि शिवराळ होशील! :)

मिपावर यायला खुप आवडते. पण मनापासून सांगतो रंगसंगती आजाबात झेपत नाही.
ती जरा सौम्य (एक्सपी किंवा व्हिस्टा) केलीत तर मीच काय इथे अनेक लोक पडीक राहू लागतील हे सत्य आहे!

आपला
गुंडोपंत

विसोबा खेचर's picture

11 Dec 2007 - 7:14 pm | विसोबा खेचर

पण मनापासून सांगतो रंगसंगती आजाबात झेपत नाही.
ती जरा सौम्य (एक्सपी किंवा व्हिस्टा) केलीत तर मीच काय इथे अनेक लोक पडीक राहू लागतील हे सत्य आहे!

अरे गुंड्या, नीलकांताला किंवा ओंकारला पोष्टकार्ड पाठवून सुचव की तसं! नाही कुणी म्हटलंय?

खरं सांगायचं तर मला त्यातल्या तांत्रिक बाबीतलं काहीच कळत नाही त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. परंतु नीलकांताला किंवा ओंकारला पोष्टकार्ड पाठवून मिपाच्या रंगसंगतीबद्दल काही सूचना केल्यास तर बरंच होईल. सध्या ओंकारला वेळ नाही, परंतु आता मिपाच्या रंगसंगतीमध्ये आणि एकंदरीतच मिपात काही फेरबदल करण्याचे ओंकारने ठरवले आहे.

नीलकांताने वेळात वेळ काढून मिपा उभं केलं तेव्हा त्याचं कौतुक केव्हाही अधिक आहे परंतु आता मिपामधील पुढील फेरबदल करण्याचे आश्वासन साक्षात गमभनकारांनी दिलेले आहे! :)

आपला,
(सर्वांच्या सहकार्याने मिपा पुढे नेऊ पाहणारा!) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2007 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण मनापासून सांगतो रंगसंगती आजाबात झेपत नाही.
ती जरा सौम्य (एक्सपी किंवा व्हिस्टा) केलीत तर मीच काय इथे अनेक लोक पडीक राहू लागतील हे सत्य आहे!

आम्हीही किती दिवसापासुन सांगतोय....!!! इथे लाल रंग फार झालाय.
पण, कसे आहे....आत्ताच कुठे मिसळपाववर मनमनाचे गहिरे रंग बहरताहेत, तेव्हा म्हट्ले जरा वाट पाहावी. पण, रंगसंगतीत बदल झालेच पाहिजे असे वाटते....!!!
ते काही नाही...............घ्या ना राव, निलकांत जरा मनावर :) !!!

आपला.
मिसळपावचा पडीक ग्राहक.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट's picture

11 Dec 2007 - 2:56 am | सर्किट (not verified)

आजवर रानातल्या, वनातल्या, अंथरुणातल्या, घरातल्या, आंगणातल्या आणखी कुठल्या कुठल्या कविता वाचल्यात.

पण ह्या व्यायामशाळेतल्या कवितेची सामाजिक जाणीव त्यांत नाही.

मग मलाही कणव येईल त्या रस्त्यावरच्या छोट्या मुलीची
मी ही काही तरी करणे लागतो रे, ही उभारी येईल मनाची.

मस्त.

लगे रहो गुंडोपंत !

- सर्किट

गुंडोपंत's picture

11 Dec 2007 - 4:23 am | गुंडोपंत

सर्किटराव,
तुमच्या सारखी समजून घेणारी लोकं आहेत म्हणून इथे कविता द्याविशी वाटली हो!

मनालाही व्यायाम असला तरच ते लवचिक राहते हो.
गेले काही दिवस ध्यानही जमत नाहीये.
अस्वस्थता अशी बाहेर पडली... तर काल जरा कुठे जमले.

असो,
असाच लोभ असु द्या.

आपला
गुंडोपंत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2007 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंत,
कविता आवडली.
कमी शब्दात अधिक आशय पकडण्याची तगमग आपल्या शब्दातुन आम्हाला दिसली.
पहिल्या काही ओळीत निराशा, नंतर पुन्हा काही आशावादी विचार दिसलेत.
कवीने असे काय पाहिले, की तो हतबल, अस्वस्थ, व्हावा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुंडोपंत's picture

12 Dec 2007 - 6:30 am | गुंडोपंत

काय सांगु सर... झाले होते काही तरी...
विचार पोहोचले, आपल्याला आवडली कविता हे महत्वाचे.
आशा तर आहेच... ती संपते तेंव्हाच नैराश्य येते. मग मात्र रस्ता दिसेनासा होतो
म्हणूनच ते पान नि ते मन महत्वाचं आहे.

आपला
जख्ख
गुंडोपंत

प्रकाश घाटपांडे's picture

11 Dec 2007 - 9:54 pm | प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत , आम्ही बी मंग माळ्यावरच्या धूळ खात पडलेल्या कविता बाहेत काढू , पन मंग आम्हाला हसायच न्हाई.
( मनातल्या मनात हसलात तर आम्हाला काय कळणार म्हणा? )
प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत's picture

12 Dec 2007 - 6:34 am | गुंडोपंत

काढा बाहेर ते शब्द, ऐकु द्या ना त्यांना
नको या जगाची पर्वा, हसु द्या ना त्यांना

आपला
अतिकवी
गुंडोपंत

राजे's picture

11 Dec 2007 - 10:08 pm | राजे (not verified)

वा,

"पण हल्ली मी असले विचारही वेचत नाही
हल्ली मनाला फार काही टोचतही नाही
जरडच झालोय मी, तुटल्यासारखा,
जख्ख म्हातार्‍या वाळल्या खोडासारखा"

क्या बात है, मस्त कडवं.

पंत एकदम गझल नंतर ही कविता... खुप मोठे विचार व्यक्त झाले आहेत ह्या मोजक्याच ओळीतून.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

गुंडोपंत's picture

12 Dec 2007 - 6:19 am | गुंडोपंत

राजे आपला गैरसमज होतोय का?
-----------
ते श्रेय माझे नाही, मी गझल केलेली नाही हो कधी
मुक्तच राहिलो असा, काफियात अडकलो नाही कधी
----------
(वा काय पण विरोधाभास जमलाय... वा!)
:)))

आपला
फुटकळ शाब्दीक
गुंडोपंत

राजे's picture

12 Dec 2007 - 8:24 pm | राजे (not verified)

अहो तुमच्या नावामुळे गोंधळ झाला होता... गझल कार धोंडोपंत व तुम्ही कवी गुंडोपंत...;}

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....